भाग - २३
अमोल - जिजा बाळा चहा आन गं...मला गोळ्या घ्यायच्या आहेत.....
जिजा - आले बाबा....
अनिकेत - जिजा, अगं माझ शर्ट सापडत नाही आहे....
जिजा - आले आले....
शिवांश - मम्मा अगं माजी ताय कुठे गेली.....
जिजा - आले रे शिवा....
बाबा हे घ्या चहा....
अमोल - थँक्यु...खरच पोरी तुझ्याशिवाय घरात पान हलत नाही आमच्या.....तुझ्यानंतर कोणीतरी हवं आता अनिकेत ला जरा समजव लग्नासाठी......
जिजा - हो बाबा नक्कीच समजवते.....
अमोल - हा...
जिजा - अअअ अनिकेत तुमचा शर्ट तिकडे आहे बास्केट मध्ये.....
अनिकेत - ओह हा सापडला थँक्यु...
जिजा - बाळा हे तुझी टाय....चला लवकर आवरा...
स्कुलला जा...
शिवांश - हो मम्मा...
अमोल - जिजा, चल मी जातोय संध्याकाळी येईन...
जिजा - ओके बाबा...
अनिकेत - जिजा येतो गं..
शिवांश - बाय मम्मा
जिजा - बाय मेरी जान....have a good day...
Uuummmm 😘
शिवांश - शी गाल ओला केला....
जिजा - नालायक.... 😂जा आता....
अनिकेत - नीट जा कामावर....
बाय.... 😅
जिजा - हो..
सगळे गेल्यावर जिजा सुद्धा तीच कामं आवरते, तयार होते, तोंडावर स्कार्फ बांधते....आणि ऑफिस ला निघून जाते....
.
.
.
.
.
.
नताशा - किमया काय बघतेस आता त्यात...
किमया - अगं पॉवर च्या फॅमिली चा फोटो छापून आलाय आणि त्यांची छोटीशी माहिती आले..... मागे त्याचं घरं ही दाखवलय......
सनी - काय सांगतेस...वाव यार....
ए ही कोण आहे गं किती सुंदर दिसतेय....
नताशा - तू तेच बग...
जिजा - क अअअ कोणत्या न्यूज पेपर मध्ये आलंय गं किमु.....
किमया - सगळ्याच पेपर ला आलंय मॅम...
का???
जिजा - अच्छा....अअअ काही नाही खूप ऐकलय त्यांच्याबद्दल so म्हणून विचारलं....
किमया - अच्छा..
जिजा - यांना समजलं तर प्रॉब्लेम होईल....
मी पेपर विकत घेते आणि बघते.....
(मनात...)
जिजा बाहेर जाते.....आणि न्यूज पेपर विकत घेते....तिची नजर पूर्ण पेपर वर भिरभिरू लागते....सगळ्यांना पाहायला ती खूप आसूसली होती...एका पानावर तिला तो आर्टिकलं सापडतो...त्यात फोटो ही होता....त्या फोटो मध्ये माई,आबासाहेब, तारा, इंद्रजीत, अभिजीत, ओवी,अनुसया,जीवा आणि मल्हार होते...
जिजाच्या डोळ्यात लगेच पाणी आलं,बऱ्याच वेळानंतर त्यांना पाहून ती इमोशनल झाली....पेपर जीवाशी कवटाळून बसली....
ती आर्टिकलं वाचू लागली...आर्टिकलं वाचत असतानाच.....
समोरून मोठी गाडी आली.....समोर मोठ्या अक्षरात लिहिलं होत "पोलीस"..
त्यातून दोन चार माणसं उतरली.....त्याच्या मागून....ACP च्या युनिफॉर्म मध्ये इंद्रजीत भोसले उतरला.....इंद्राला पाहताच बरीच माणसं तिकडे जमा झाली.......जिजा त्याच्याकडे पाहतच बसली......
इंद्रा अधिपेक्षा खूप बदलला होता....भारदस्त शरीर अजून भारी वाटतं होत.....चेहऱ्यावर थोडी बेअर्ड होती.....मनात असलेलं दुःख, राग डोळ्यातून स्पष्ट होत होत.....प्रेमळ इंद्रा रागीट झालेला दिसत होता.....त्याची बोलण्याची पद्धत बदलली होती.....
हातात सिगरेट ओढत इंद्रा आजूबाजूला बघू लागला......
जिजाची नजर त्याच्यावरच थांबली,पण त्याला दिसू नये म्हणून ती बाजूला जाऊन लपली....
इंद्रा आणि त्याचे सहकारी काहीतरी चर्चा करतं असल्याच दिसलं.....इंद्राला पाहून जिजाच्या डोळ्यात पाणी आलं.....तिला अश्रू असह्य झाले....
काहीवेळाने इंद्रा आणि त्याचे अधिकारी निघून गेले....
.
.
.
.
.
.
.
जिजा घरी आली......तिच्या खोलीच दार बंद केले.....आणि जोरजोरात रडू लागली......मनात लपून ठेवलेला दुःख आज बाहेर निघालं होता....गुन्हेगार असल्याची भावना जीं तिला जाणवत होती ती आता तीव्र झाली.....आपल्याच माणसापासून लांब राहावं लागतंय हे तिला सहन होत नव्हतं.....
जिजा - अअअअअअअ 😭😭😭 का? का? माझ्यासोबत असं का?? मी काय गुन्हा केला होता 😭 आम्ही चौघे खुश होतो आनंदी होतो.....माझ्या आयुष्यातून भाग्यश्री ला हिरावून घेतलंस तू....मग माझ्या आयुष्यात इंद्रजीत ला आणलंस....त्याच्यावरील राग निवळून आमच्यात प्रेम निर्माण केलंस....मग माझ्या आई बाबांना हिरावून घेतलंस.....😭 इंद्रा आणि माझं लग्नानंतर आयुष्य कधीच सुखात नाही गेलं, नेहमी संकट रोज नवीन आव्हान.....आम्ही इतर जोडप्यासारखं काहीच आयुष्य जगलो नाही.....नंतर नवीन पाहुण्याची चाहूल लागली पण तेव्हा ही आम्ही लांब झालो.....मला पळून यावं लागलं......कारण माझ्या बाळासाठी....😭यात माझी काय चूक.....😭 आज पुन्हा इंद्रा माझ्यासमोर येऊन उभा राहिलाय....नक्की काय आहे माझ्या आयुष्यात काय लिहिलंय तू 😭 😭मला आता हे सहन नाही होत आहे....😭
काय करू मी सांग.....अपराधी भावना जगू देतं नाही मला....😭मला माझ्या बहिणीला माझ्या मित्रांना सोडून एकटं जगाव लागतंय....जिकडे माझं कुणी नाही.... सांग देवा कसं जगू मी....अअअअअअ 😭
जिजा मनमोकळ रडते........मग फ्रेश होऊन बाहेर येते......बाल्कनी मध्ये बसून तिचे आणि इंद्राचे आनंदी क्षण आठवते.....
जिजा - कसे असतील सगळे तिकडे??? बरे असतील का? माझी तारा काय करतं असेल? आणि इंद्रजीत पोलीस ही झाला?
असं काय काय घडलं असेल या चार वर्षात.....??? 🙄
.
.
.
.
.
.
.
मुंबई//भोसले निवास 🏡🗻
तारा - माईsssss आबासाहेबssss अभि दादा...ओवी सगळ्यांनी जेवायला या....
अभिजीत - अरे वाह वाह! आहा! काय वास येतोय जेवणाचं.....
राजाराम - तर तर...अप्रतिम सुगंध येतोय....
ममता - काय काय केलंस गं जेवायला?
तारा - मी आज केलंय...वरण भात, बटाटयाची भाजी, पुरी, पापड, पुरण पोळी.....
ओवी - वाव! तारा दी पुरण पोळी मला आवडते....
तारा - I know बाळा...
ममता - तारा मोठी झालीस गं.... 🙁
तारा - माई..अहो कुठे मोठी झाले हा...😂फक्त सुगरण झाले म्हण....
राजाराम - हो हो मग ते तू झालेसच....
अनुसया - अरे वाह! जेवायला बसलात....
तारा - ये गं तू पण बस....
अनुसया - हो...
माई रडताय का??
ममता - चार वर्ष झाली गं? जिजा कुठे असेल हा विचार सारखा मनात येतो....इंद्रजीत ची अवस्था बघवत नाही गं.... आज सगळं आहे त्याच्याकडे पण उपयोग काय??
अभिजीत - माई अगं ते तर आम्हाला पण वाटतं...😔पण जिजा जिवंत आहे पण की नाही कुणास ठाऊक.
तारा - हो ना.😭मला वाटतं की ताई ताई जिवंत नसावी....त्यादिवशी चा तो पाऊस, ती वीज आणि ती घटना....😭
राजाराम - तारा असं नको बोलू...😔इंद्राचा पूर्ण भरोसा आहे की जिजा जिवन्त असणार त्याने तिला शोधायला काय काय नाही केला....अजूनही त्यांचा शोध चालू आहेच की....
अनुसया - हो ना, कुणास ठाऊक जिजा कुठे असेल काय करतं असेल.....
अभिजीत - भाऊ पण खूप बदलला आहे.....आधीच इंद्रजीत भोसले आता पाहायला नाहीच भेटणार....
तारा - हो ना... 😔बरं जाऊदे आता उदास नाही व्हायचं जे नशिबात लिहिलंय ते नक्की होईल....
ओवी - हो ना, मामी नक्कीच लवकर येईल....मामा पण नीट होईल....
अभिजीत - भाऊंचा वाढदिवस येतोय काही दिवसांनी.....
तारा - हो ना,पण तो आता कोल्हापूर ला गेला...आपल्याला नाही येणार साजरा करता....
अनुसया - अगं आल्यावर करू त्यात काय....
राजाराम - हो... बरं आता जेवूयात... 😂
तारा - हो 🤣
अभिजीत - 😂
ममता - माझा इंद्रा काय करतं असेल कुणास ठाऊक...........(मनात....)
***************************
इंद्रजीत - कदम...सगळ्यांनी आता घरी जा, अराम करा उद्या टाईमात यायचं ड्युटीवर....
इन्स्पेक्टर कदम - हो सर, जय हिंद..
इंद्रजीत - जय हिंद...
इंद्रजीत रूममध्ये येतो.....फ्रेश होतो, एकटाच जेवण करतो......सगळं आवरून मग बाल्कनी मध्ये बसतो, हातात सिगरेट आणि दुसऱ्या हातात वोडका चा ग्लास.....
डोक्यात अनेक विचार होते.....डोळ्यासमोरून जिजाची प्रतिमा जात नव्हती.....इतक्या वर्षात सगळं बदललं पण त्याचं तिच्याबद्दलच प्रेम नाही.... 💔
इंद्रा त्याच्या फोन मध्ये जिजाचा फोटो बघत बसला.....
जगासमोर कठोर असलेला इंद्रा तिचा फोटो पाहून ही पाघळला.....
इंद्रजीत - कुठे आहेस तू? काय करतेस? का पळून गेलीस? जिवंत आहेस ही की....💔?? जिवंत आहेस तू...आहेसच..... माझं मन मला सांगत....माझं हृदय मला सांगत.....मग माझ्यासमोर का नाही आलीस? कुठे लपलेस हू? सांग ना...कुठे लपलेस? सगळं मान्य आहे मला...सगळं.
माझी चूक आहे मी तुझं तेव्हा नाही ऐकलं..पण त्याची शिक्षा तू अशी देणार मला....🙁💔 आपलं बाळ 💔 कुठंय ते....आपण किती स्वप्न बघितली होती तस काहीच कधीच नाही झालं.....हनिमून सोडला तर आपण कुठेच स्वतःचा वेळ एकत्र नाही घालवला....ज्या काळात तुझ्यासोबत वेळ घालवायचा होता तेव्हा पण मी हेच करतं राहिलो.....मला माफ कर मी. तुला तस आयुष्य नाही देऊ शकलो....पण त्याची अशी शिक्षा नको देऊस..आता सगळं बदललं आहे हा इंद्रा आता फक्त इंद्राच आहे......😭जिजाsssss😭
****************************
जिजा - शिवा लिही लवकर....A for Apple बोल..
शिवांश - A फॉल अँपल च का? A फॉल अन्या का नाय😂
जिजा - ते मला आता विचारावं लागेल...तुझ्या टीचर ला ठीके...विचारून सांगेन..... आता सध्या A फॉल अँपल लिही... 😂
शिवांश - A...A.. फॉल अँपल....
जिजा - हा..नीट लिही...
अनिकेत - आ आ जिजा बोलवलंस?
जिजा - हो थोडं बोलायचंय, थांबा..शिवा मम्मा आलीच हा, तू स्टडी कर...
शिवांश - ओके...
जिजा - अअअ अनिकेत मला तुमच्याशी बोलायचं होत थोडं....
अनिकेत - बोल ना..
जिजा - तुम्ही लग्न का नाही करतं आहात? बाबांची खूप इच्छा आहे तुमचं लग्न व्हावं म्हणून....अहो त्यांच्या आयुष्यातले काहीच क्षण आहेत त्यांना तुमच्या बायकोचा चेहरा बघायचंय कारण त्यांना तुमची काळजी आहे.....
अनिकेत - मला कळतंय पण...
जिजा - कारण काय आहे? कोणी आवडते का तुम्हाला?
अनिकेत - अअअ अअअ मी मी...मला....
जिजा - बोला...
अनिकेत - जिजा खरंतर मला तुझ्याशी लग्न करायची इच्छा आहे....मी तुला आणि शिवाला स्वीकारायला तयार आहे...शिवाला माझं नाव द्यायला तयार आहे...बोल तू करशील माझ्याशी लग्न?
जिजा - अनिकेत अहो काय बोलताय हे, मी असा विचार कधीच नाही केला तुमच्याबद्दल...
अनिकेत - आता कर ना मग..जिजा अगं तू सुद्धा एकटी कसं राहणार? शिवाला अजून इंद्रजीत कोण हे सुद्धा नाही. माहित तू बोलतेस म्हणून तो त्याचं नाव लावतो.....मी आहे ना..त्याला मी आवडतो,मला तो...अजून काय हवं? आता तुझा होकार आला की सगळं नीट होईल....
जिजा - नाही नाही.....अनिकेत, अहो मी इंद्रजीत शिवाय अजून कधीच कुणाचा विचार नाही केला.....मला माफ करा 🙏मी तुमच्याशी काय कुणाशीच लग्न नाही करू शकत...तुमच्या उपकाराची अशी परत फेड नाही करू शकत मी..... 🙁
अनिकेत - नाही जिजा...अगं तुझ्यावर मी उपकार नाही केले, आणि कधीच परत फेड नाही मागितली...परत फेड म्हणून हे लग्न तर अजिबात नाही....मला खरच आवडतेस तू म्हणून.....
जिजा - प्रेम~लग्न ही अशी गोष्ट आहे जीं एकदा झाली एकासोबत की झालं.....पुन्हा दुसऱ्या कुणाचा विचार मनात येऊ शकत नाही......आज भले आम्ही सोबत नसू पण आमचं प्रेम अजून ही जिवंत आहे.....लग्नाचं नातं अजूनही आहे....आमचा घटस्फ़ोट तरी कुठेय झालाय? आणि मला खात्री आहे हेच नातं इंद्रा अजूनही जपत असणार....मग मलाही जपायला हवं.....माफ करा मी नाही करू शकत...
अनिकेत - मला ही माफ कर 😔मी असं नव्हतं बोलायला हवं होत तुला...
जिजा - मन हलक झालं ना तुमचं बस्स झालं तर मग...मनात काही ठेवायचं नहीं ते बोलेल केव्हाही बरं..
फक्त आता माझं ऐका आणि लग्न करा आनंदाने रहा....
अनिकेत - ठीके...तू बोलतेस तर मी होतो तयार...
जिजा - गुड,बाकी मी तुमची चांगली मैत्रीण म्हणून कायम आहेच.....
अनिकेत - हो... 🤩
जिजा - मग गिरीश पटवर्धन काकांना बोलवायचं का?
मला बाबांनी सांगितलं, अमृता खूप चांगली मुलगी आहे...तुझा संसार ती खूप छान खुलवेल...
अनिकेत - बरं विचार करुदे मला तिचा हम्म..
जिजा - हा... 🤩
.
.
.
.
.
जिजा - नाही नाही हे नाही चालणार. आपण सर्वात आधी प्रॉडक्ट वर फोकस करतो, नाही की Quantity वर...प्रॉडक्ट चांगल असेल तर Quantity आपोआप वाढेल....Quality is important not Quantity...
वर्कर - ओके मॅडम..
सार्थक - अअअ मिस जिजा....
जिजा - अअ हॅलो सर,
सार्थक - हॅलो...गुड आफ्टरनून..
मग काय आजचे अपडेट्स...??
जिजा - सर हे आजचे अपडेट्स, यात सगळ्या फाईल्स आहेत....सगळ्या रिपोर्ट्स आहेत....
(जिजा तिची केसं एका बाजूला घेत म्हणाली..)
सार्थक - wow❤️ब्युटीफूल.... 🌈
(तिच्याकडे पाहताना..)
जिजा - अअअअ काय?
सार्थक - नाही म्हणजे, ते मी दुसरं काहीतरी बोलत होत....सॉरी...
जिजा - ओके..बाय सर..
सार्थक - काय चीज आहात तुम्ही मिस जिजा...कमाल आहात....!! इतक्या कमाल की सगळ्यांना हवीहवीशी वाटल..पण सध्या तरी तुम्ही माझ्या झालात तर मी तुम्हाला कोणाची होऊ देणार नाही....😍
जिजा - किमया, काय चाललंय हे 😡
कामात अजिबात लक्ष नसतं तुझं....? नुसतं पेपर्स, मॅकजीन बघत असतेस....जर तुला त्या भोसलेना बघायची एवढीच इच्छा असते तर घरी बस आणि बग...घरी निघून जा आताच्या आता....कामावर यायचं नाहीस....
किमया - सॉरी मॅम..सॉरी सॉरी...माझं चुकलं...
जिजा - काय चुकलं? मी माझ्या पदाचा वापर न करता तुम्हाला फ्रेंडली वागवते म्हणजे हे असा वागलं का तुम्ही?? नो...
किमया - सॉरी मॅम...😭
जिजा - ओके ठीके आता करते माफ...जा कामं. कर...
तेवढ्यात तिचा फोन वाजला..... 📲
जिजा - हॅलो....📲
अनिकेत - जिजा अगं कुठे आहेस? अजून ऑफिस मधून निघाली नाहीस तू?..... 📲
जिजा - सॉरी अनिकेत मला जरा वेळ लागेल..प्लिज शिवाला थोडं संभाळा.... 📲
अनिकेत - ओके जास्त उशीर झाला तर मला बोलावं मी येतो...... 📲
जिजा - ओके... 📲
जिजा तीच कामं आटोपते.......रात्री बराच उशीर होतो...
ती घाईघाईत घरी जायला बाहेर पडते.....पण तिला एक ही ऑटो, बस मिळत नाही....आजूबाजूला सुमसाम रस्ता त्यावर ती एकटी उभी होती.....भीती वाटतं होती, डोक्यात अनेक विचार आले, काही वाईट काही चांगले...
लांबूनच एक गाडी आलेली दिसली.....ती गाडी पोलिसांची होती.....जिजा मनोमन सुखावली....
तिने त्या गाडीला हात दाखवला.....गाडी थांबली, गाडीची काच खाली झाली....
पण समोर इंद्रा आणि त्याचे सहकारी होते.....
इंद्राला असं अचानक समोर पाहून जिजा जरा शॉक झाली.....पण, नंतर आठवलं की तिने जाड काळ्या ओढणी ने चेहरा ढाकला होता.....
इंद्राने तिला ओळखलं नाही कारण थोडा अंधार होता....
इंद्रजीत - मॅडम कोण तुम्ही? इतक्या रात्री काय करताय इकडे? असं थांबणं रिस्क आहे....यावेळी इकडे काहीच मिळणार नाही तुम्हाला?
कदम - अहो मॅडम बोला की साहेब तुम्हाला बोलायलेत....ए बाई बोल. कि....बहिरी आहे काय...
जिजा - अरे देवा! आता आता काय करू? माझा आवाज इंद्रा ओळखणार नाही असं होणार नाही....
इंद्रजीत - कदम.... थांबा....
जिजा - अअअ मला बोलता येतं नाही.....
(इशारे करताना म्हणाली......)
कदम - काय म्हणली ही?
इंद्रजीत - तुम्हाला बोलता नाही येतं...ओह सॉरी....
तुम्ही या कंपनीत कामं करता.....
जिजा - हो....
(मान हलवून म्हणाली...)
इंद्रजीत - बरं तुम्हाला घरी सोडतो तुमचा पत्ता सांगता का....
जिजा - हा....हे घ्या पत्ता.....
(ती कार्ड दाखवताना बोलली....)
इंद्रजीत - अच्छा, अनिकेत सूर्यवंशी..गोकुळ निवास..... हम्म या बसा सोडतो....
जिजा - हम...
जिजा गाडीत बसते........तिचे डोळे पाण्याने भरतात......इंद्राला कितीतरी वर्षानी असं जवळून पाहताना तिला सुचत नव्हतं काय करावं....तसंच मनात भीती ही वाटतं होती...
इंद्रजीत - अरे आज असं का होतंय? हृदय धडधड करतय, जणू जिजा जवळपास आहे...नाही नाही जिजा इकडे कशी? कदाचित मलाच भास होतोय....कदाचित माझंच मन मला चुकीचं सांगतय की काय?
(मनात...)
जिजा - किती बदलून गेलास रे, अधिपेक्षा जास्त बॉडीबिल्डर वाटतोयस....आणि ACP झालास वाह! मानलं तुला....तुला आणि तुझ्या कामागिरीला पण...आज आपण एकत्र असतो तर तुला मिठी मारली असती....शाबासकी दिली असती.... 🌈😔😭पण ते ही करता नाही येतं आहे....किती मजबुर आहे मी....कधी कधी वाटतं तुझ्याकडे यावं सांगावं तुला हे बग मी जिवंत आहे....हा आपला अंश शिवांश.....तुझा आणि माझा मुलगा.....😭पण कोणत्या तोंडाने येऊ....एका बाजूला स्वतः ची लाज ही वाटते आणि तुझा राग ही येतोय....त्या वातावरणात माझ्या शिवाला कसं आणू मी....माझ्यातली आई मला अडवते.....😭काय करू मी सांग...कसं करू? 😭
(डोळ्यातील पाणी लपवत..मनात म्हणाली..)
इंद्रजीत - अअअ कदम जरा आवाज वाढवा रेडिओ चा....
(हातात सिगरेट घेऊन....)
कदम - हो साहेब....
📻🎶
शिशे के ख्वाब लेके.......
रातो में चल रहा हू टकरा ना जाऊ कही.......
आशा कि लौ हैं रौशन.......
फिर भी तुफान का डर हैं......
लौ बुझ ना जाये कही......
बस्स एक हा कि गुजारिश........
फिर होगी खुशियो कि बारिश......
तू मेरी अधुरी प्यास प्यास तू आ गयी मन को रास रास.....
अब तो तू आजा पास पास हैं गुजारिश.....💔
इंद्रजीत - मेरी तो बस्स एक ही गुजारिश हैं कि मुझे मेरा चंदा मिल जाये......
कधी भेटशील मला जिजा,कुठे आहेस गं? खूप आठवण येते तुझी....सगळं बदललंय गं मी....खरच...आता आपण सुखानी राहू शकतो....प्लिज ये ना निघून....😔
(मनात...)
जिजा - इंद्रा हल्ली जास्तच सिगरेट प्यायला लागलाय....कदाचित स्ट्रेस....पण याला कसं कळत नाही मी हे सगळं सोडवलं होत याच....हा पुन्हा का जास्त घेतोय....देवा! याच्या तब्बेतीची तूच काळजी घे आता..... 😔
इंद्रजीत - मॅडम, आलं तुमचं घरं.....
जिजा - हम्म....
(गाडीतून उतरताना....)
इंद्रजीत - पुन्हा असं एकटं फिरू नका...कळलं रात्री उशीरं झाला तर घरून कुणाला तरी बोलवा....
जिजा - हो, धन्यवाद 🙏
(हात जोडून म्हणाली....)
इंद्रजीत - अहो धन्यवाद नका म्हणू...हात पण नका जोडू.....नीट जा काळजी घ्या.....
जिजा - एक मिनिटं....थांबा......
(हातवारे करतं....)
कदम - काय बोलतेस बाई कळना बग....साहेब तुम्हाला कसं कळतंय ओ....
इंद्रजीत - थांबा कदम....ती मला थांबा असं सांगतेय.....
कदम - पेपर वर काय लिहिते ही.....
जिजा - हे घ्या.....हे वाचा..... आणि जमलं तर तसंच करा....
इंद्रजीत - अच्छा मी हे वाचू....आणि यात लिहिलंय तस करू....?
जिजा - हो हो....
इंद्रजीत - बरं थांबा....
💌
प्रिय, ACP इंद्रजीत भोसले सर, तुम्हाला मी चांगलंच ओळखते.....खरंतर पूर्ण जग तुम्हाला ओळखत.....माझी मदत केल्याबद्दल धन्यवाद! तुम्ही छान कामं करता असच कामं करतं रहा......अजून यश मिळवा.....देव तुमचं रक्षण करो....
आणि हो एक तुमच्या तब्बेतीसाठी सांगू इच्छिते,
सिगरेट, मद्यपान या गोष्टी जमल्यास सोडा.....
स्वतःची काळजी घ्या......
कदम - वाह बाई छान लिहिलस गं....हेच मी बी साहेबाना समजवतो बग.....
इंद्रजीत - हम्म नक्कीच प्रयत्न करेन..... आणि धन्यवाद....
येतो आम्ही....
जिजा - हम्म...
इंद्रजीत निघून जातो......जिजा त्याला जाईपर्यंत बघत बसते.......इंद्रा सुद्धा आरशातून सहज तिला बघतो.....ती बाहेरच उभी असते.....
.
.
.
.
.
शिवांश - मम्मा.....मम्मा कुठे गेलेली तू....?
(तिला कवटाळून म्हणतो...)
जिजा - अअअ काही नाही बाळा आज कामं जास्त होत ना, सॉरी सोन्या......
शिवांश - इष्ट ओते.....मी समजू शकलो.....
जिजा - अगं बाई हो का...😂चला आता झोपूया....
जेवला ना तुम्ही सगळे?
अनिकेत - आम्ही जेवलो,
अमोल - हो चला आता गुड नाईट...
जिजा - हो ठीके,गुड नाईट..
शिवांश - मम्मा मला स्टोली सांग ना....रोज सांगते ना तू मना....
जिजा - अअअ हो कोणती वाली?
शिवांश - छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मकता....
जिजा - हम्म,बरं सांगते...
ऐक,
तुला बाकी ची कथा माहीतच आहे....आता त्यांचा एक किस्सा सांगते......
लहान असल्यापासून जिजाऊ नी त्यांना स्त्रियांचा, मुलींचा आदर करावा असच शिकवलं.....बहीण असो मग ती आपली किंवा दुसऱ्याची तिच्या मदतीला नेहमी धावता आलं पाहिजे.....शिवाजी महाराज एकदा एका लावणी ला गेले, म्हणजे बैठकीत.....तिकडे त्यांनी लावणी नृत्य पाहिलं.....मग ते जेव्हा घरी आले तेव्हा जिजाऊ माता त्यांच्या समोर पायात घुंगरू बांधून नाचू लागल्या......महाराजांना कळलं नाही आपल्या माता असं का करतं आहेत? मग महाराजांना त्यांची चूक समजली ते जिजाऊंच्या पायाशी गेले माफी मागितली सॉरी बोलें ते.....मग जिजाऊनी त्यांना सांगितलं तिकडे तुम्ही जीं लावणी पाहून आलात तीच आम्ही इकडे केली ती ही स्त्री होती आम्ही ही स्त्रीच आहोत.....म्हणून हरकत काय? मी तुमची आई आहे आणि ती परस्त्री आहे म्हणून....लावणी करणाऱ्या स्त्रिया त्यांच्या इच्छे विरुद्ध करतं असतात हे सगळं बंद व्हावं त्यांना ही आदर मिळावा ह्यासाठी प्रयत्न करायचे तर तुम्हीच बैठकीला गेलात? का? नाच पाहायचा होता तर आम्हाला सांगायचं होत आम्ही दाखवला असता......महाराज खूप रडले त्यांची क्षमा मागितली.....मग जिजाऊ बोलल्या.....
तुम्हाला आता यापुढे प्रत्येक परस्त्री मध्ये आपली आई, बहीणच बघता आली पाहिजे.....
म्हणून महाराज आपल्या इतिहासातील पाहिले राजा आहेत ज्यांच्या दरबारात नाही स्त्रिया कधी नाचल्या नाही त्यांचा अपमान झाला.....
म्हणून गर्ल्स ची रिस्पेक्ट करायची समजलं बेटू.....
शिवांश - वाव! मसत स्टोली.....
मम्मा मी पण महाराजांसारखं वागेन.....स्तिली ची आदल करीन.....
जिजा - हो हो बाळा तू स्तिली ची आदल कर 😂
शिवांश - हो मग...मी पण शिवबाच आहे आणि तू माझी जिजाऊ....
जिजा - हो रे माझ्या राजा....तू खरच शिवबा आहेस...त्यांच्या सारखाच निडर आणि बुद्धिमान आहेस बाळा....नाहीतर आजकाल चार वर्षांच्या मुलांना फक्त अ आ इ सोडल तर काय कळत पण तू खूप हुशार आहेस.....सगळ्यांच्यापेक्षा वेगळा...माझा शिवबा❤️
शिवांश - मना झोप आली आईसाहेब...
जिजा - ओ गं ये माझ्या शोन्या....झोप चल....
**********************
अनिकेत - काय सांगतेस जिजा...काल तुझा आणि त्यांचा सामना झाला? अगं मग त्याने ओळखल का तुला???
जिजा - नाही नाही...अहो मी स्कार्फ बांधला होता, आणि मी बोललीच नाही मी सांगितलं ना कि मी मुकी आहे....
अनिकेत - हो बरं झालं तुला हे सुचलं...
जिजा - हो ना.पण अनिकेत मी हे किती दिवस करू...कारण मी खूप वैतागले हो...तो कोल्हापूर मध्ये आहे तोवर धोकाच आहे....पण असं किती दिवस मी लपून राहू....
अनिकेत - माझं ऐकशील तर त्याच्यासामोर जा....सत्य सांग चार वर्षात काय काय झालं ते सांग...सांगून मोकळी हो....त्याच्यासोबत राहू नकोस पण निदान त्याच्यापासून लपून तर राहायला नाही लागणार...
जिजा - हो खरंय...
अनिकेत - बरं निघू मी...शिवा गेला ना शाळेत....
जिजा - हो आज आजोबा सोबत गेलाय तर खुश होता खूप.....
अनिकेत - हो ना..बरं चला...येतो मी..आणि शिवाला घ्यायला जाणार आहेस ना आज तू...वेळेत जा...
जिजा- हो,बाय...!!
.
.
.
.
.
शिवांश शाळेतून सुटतो.......जिजा अजून पोहोचली नव्हती......शिवांश बराच वेळ गेट वर वाट बघतो पण जिजा काही येतं नाही......वाट बघून कंटाळून शिवा गेट बाहेर येतो.....आणि समोरील रस्त्याने चालत निघून जातो....तो गेल्यानंतर जिजा शाळेत पोहोचते....शिवा कुठेच दिसत नाही....ती घाबरते त्याला सगळीकडे शोधायला सुरवात करते....
जिजा - हॅलो...हॅलो....अनिकेत अहो मला यायला लेट झाला हो शाळेत, शिवा निघून गेला....😭आता सापडत नाही आहे....मी खूप शोधलं प्लिज तुम्ही निघून या लवकर....प्लिज...... 📲
अनिकेत - काय....? कुठे गेला आपला शिवा...? बरं मी. मी आलो....तुम्ही त्याला शोधत रहा मी पन त्याला येता येता शोधत येतो....घाबरू नकोस तू...... 📲
जिजा - हम्म.... 😭📲
शिवाssss 😭
शिवा चालत चालत जात असतो...ऊन खूप लागतं, आता मात्र शिवा रडायला लागतो.....त्याचे हात पाय लाल पडतात.....तेवढ्यात मागून एक ट्रक येतं असतो....हॉर्न वाजवून पण शिवांश बाजूला होत नाही तो रडत असतो....इंद्रजीत तिकडेच असतो तो शिवांश ला बघतो, इंद्रा पळत पळत जाऊन शिवांश ला बाजूला घेतो....
त्याला उचलून कुशीत घेतो.....त्याला शांत करतो....आणि सावलीत घेऊन जातो....
इंद्रजीत - अरे अरे अरे शांत हो बाळा....शुईईई काही नाही झालं.....हा बाळा हुशार बाळ तो....शुईईई काही नाही झालं हू...काही नाही गेला तो ट्रक...खोटा खोटा होता तो बाळा.....गेला तो गेला.... शुईईईई
हात पाय लाल पडले हो कदम लेकराचे जा जरा.... पाणी आणा आणि लेकराला जरा फ्रुटी आना..कॅटबरी पण घेऊन या जा लवकर....
कदम - हो हो साहेब....
इंद्रजीत - शांत हो हा बाळा...मी आहे....
काय झालं? तू एकटा कसा आला??
शिवांश - मना स्कुल मदी कोण न्यायला नाही आना...😭मी निधून आलो मग एकता....मला मम्मा पाहिजे......मम्माssss मम्माsssss😭
इंद्रजीत - हो हो मी फोन केला हा बग...येते आता मम्मा ओके....पण जर तू रडलास तर मम्मा नाही येणार...कारण तू गुड बॉय आहेस ना रडलास तर बॅड बॉय होशील..... मग मम्मा नाही येणार....
शिवांश - ठीके मिनी नाय लडत....
इंद्रजीत - हा शहाणं बाळ....
कदम - हे घ्या साहेब....
इंद्रजीत - हा अरे वाह कदम काका नी बघा काय आणलं....फ्रुटी, कॅटबरी हे घे पी हा....बरं वाटेल तुला...
शिवांश - थँक्यु काका....
कदम - वेलकम बाळा....
किती गोड वाटतोय ओ सर हा फ्रुटी पिताना, एकदम गोरपान गुबगुबीत गोलमोल....🤩लई आवडला मला....
इंद्रजीत - हो मला पण....
बिचारा लाल झाले हो. पाय लेकराचे..घाम बघा किती आला....
कदम - हो ना....एकतर गोरपान आहे लाल पडलेला दिसतोय.....😔
इंद्रजीत - बाळा तू कोणत्या स्टॅण्डर्ड मध्ये आहेस.....
शिवांश - PG (Play Group )
इंद्रजीत - अच्छा...असं होय.... राहतोस कुठे....
शिवांश - घलात.....
कदम - 😂😂 आईला पोरग हुशारं हाय...
इंद्रजीत - ऍड्रेस काय बाळा?
शिवांश - माहिती नाय मना 😔
इंद्रजीत - अअअ अरे असुदे असुदे रडू नको हा....
कुणास ठाऊक मला खूप आवडला हा? असं वाटलं पहिल्यांदा नाही आधी पण भेटलोय मी याला? जुनं नातं आहे आमचं....कदम एक फोटो काढा माझा याच्यासोबत....
कदम - हो साहेब..
इंद्रजीत - बाळा आपण एक फोटो काढूयात सोबत....तिकडे बग.... स्माईल कर हा....
शिवांश - स्माईल....😃
इंद्रजीत - व्हेरी गुड...
कदम - कसलं लाल झालात गं लेकरू, आईबापाला लक्ष पण ठेवता येईना.....
इंद्रजीत - हो म्हणून मी जरा थंड पाणी त्याच्या हाताला पायाला लावल....
बरं याच्या पालकांना बघायला हवं....
कदम - हो साहेब, जरा त्याला ही सावलीत बसुद्या मग जाऊयात आपण....
बाकी कमाल आहे ना साहेब ह्यो पोरगा फक्त प्ले ग्रुप ला शिकतंय, आणि याला आयडी कार्ड बी मिळालं...आपल्या वेळी कुठं होत बालवाडीत असल्यावर युनिफॉर्म आणि आयडी....😂
इंद्रजीत - शिक्षण संस्था बदले आता कदम...अहो तुमच्या माझ्या वेळी, दोनशे तीनशे फी होती आपली पहिली पर्यंत.....आता यांच्या प्ले ग्रुप ची दोन महिन्याची फी तीस हजार आहे फक्त....पहिली ला असलेल्या मुलांची तर वर्षाची एक लाख. म्हणे.....
कदम - होय कि....
इंद्रजीत - पण आताची पोर हुशार आहेत हा....त्यांना खूप नोवलेज मिळणार आहे....
कदम - हो ना...बरं याच पूर्ण नाव काय असलं ओ...आयडी बी दिसत नाय याची.....
शिवांशी - माजी आयली पडली, शाळेत...उद्या भेटेन मना...मग तुमाना दाखवायला आणेल मी सदम काका....
कदम - सदम नाय कदम....
इंद्रजीत - 😂😂😂
अच्छा, थांबा....बाळा तुझं नाव काय रे?
शिवांश - माज नाव शिवांश....
इंद्रजीत - पूर्ण नाव?
शिवांश - माझं पूर्ण नाव शिवांश जि.....
अनिकेत - शिवाssssss
शिवा......
(मागून पळत येताना....)
शिवांश - अन्या....
अन्या..... आलास तू.....
(त्याला बिलगून...)
अनिकेत - सॉरी बाळा....सॉरी मला माफ कर...मी खूप लेट आलो शाळेत पण आणि आता पण....कामात अडकलो ना बाळा.....😔
शिवांश - इट्स ओके अन्या...ह्या काकांनी मना वाचवण मी टलक खाली येणार होतो..
अनिकेत - काय बाळा लागल नाय ना.... अरे असं निघून नाही यायचं शिवा....
शिवांश - शोली अन्या...
अनिकेत - सर, तुम्ही.......🙄
इंद्रजीत.......
कदम - अरे तुम्ही कसं ओळखलं साहेबाना....
अनिकेत - अअअअअ हं ते सरांना सगळं जग ओळखत मी काय चीज आहे...
इंद्रजीत - काय तुम्ही..... 😅
अनिकेत - अहो खरच सर आणि खूप खूप धन्यवाद 🙏माझ्या मुलाला वाचवलत तुम्ही....नाहीतर आता आम्ही कुठे बघणार होतो....
इंद्रजीत - अहो त्यात काय? तुमचा मुलगा खरच गोड आहे खूप.....❤️असा वाटतं त्याला पहिल्यांदा नाही खूपदा भेटलोय....जन्माची ओळख आहे असं जाणवलं....
अनिकेत - हा हा अ अ होत असं 😅
कदम - मला बी लई आवडला राव हा.....
शिवांश - अअअ लांब लहा सदम काका....मगाश पासून माझे गाल ओलता तुम्ही....मना नाय आवडत 🙄
कदम - सदम नाही कदम..... 😂
इंद्रजीत - 😂😂
अनिकेत - अअअ चला आम्ही येतो....शिवा चल.....मम्मा वाट बघत असेल.....
शिवांश - बाय बाय पोलीस काका.....
बाय सदम काका.....
इंद्रजीत - बाय बाय....
कदम - बाय....
.
.
.
.
.
अमोल - अगं जिजा येईल आता अन्या आणि शिवा....
जिजा - बाबा अहो इंद्रा चा.....
शिवांश - मम्मा.....मम्मा......
(तिच्याकडे पळत येतं )
जिजा - शिवा शिवाsssss माझं बाळ.....😭❤️कुठे गेला होता तू बाळा? का गेलास जरा थांबता नाही आलं का तुला 😭मम्मा आली होती ना रे.....तुला काय झालं असत तर मी कसं जगले असते हा 😭काय उत्तरं दिल असत मी स्वतः ला बाळा 😭
शिवांश - आले तू ललू नको....मी जिवन्त आहे....मी ना त्या पोलीस काका ला भेटलो.....मम्मा ला बघत मी जेव्हा रस्त्यावरून चालत होतो ना...एक टलक आला मागून....मला उलवणाल होता.......
जिजा - अय्या मग....तुला लागला का कुठे बाळा..हा...😔
शिवांश - त्या पोलीस काका नी वाचवण मला.... 😂
अमोल - अरे वहा वहा!माझा नातू वाचला यापैक्षा जास्त मोठी कोणती गोष्ट आहे.....❤️माझं लेकरू गं....उन्हाच आलं ना...चल तुला ज्यूस देतो बाळा.....
शिवांश - हा आबा....
अमोल - चल माझं बाळ....
अनिकेत - बरं झालं, तू नाही आलीस ते जिजा....कारण शिवा इंद्रा ला भेटला....तो इंद्राकडे होत...इंद्रा तर हे पण बोलत होता की शिवा खूप गोड आहे आणि शिवा सोबत नातं आहे कायतरी असं....
जिजा - काय सांगतोस....अरे देवा! मी जितका प्रयत्न करते तितकंच तो समोर येतं चाललंय...मला असं वाटतं मी शिवाला घेऊन हे शहर सोडून जावं....
अनिकेत - काय बोलतेस जिजा...अगं तू शिवाला घेऊन जाणार कुठे...? सगळं नवं कसं जमेल? शिवा ला काय सांगशील?
जिजा - ते मी बघेन...तुम्ही नका काळजी करू....
अनिकेत - ते ते बघू आपण नंतर...
जिजा - मी आलेच शिवाला जरा फ्रेश करते....
अनिकेत - हो!! ठीके...
.
.
.
.
.
.
कदम - साहेब अहो अजून नका पिऊ....लई झाली तुम्हाला.... त्रास होईल ओ...
इंद्रजीत - होऊद्या कदम...आहो आयुष्यात राहिलंय काय? जिवन्त आहे तोवर ड्युटी करेन....वेळ आळी की.....
कदम - असं काय बोलता साहेब.... झोपा तुम्ही आता...मी उद्या येतो....
इंद्रजीत - हा या तुम्ही कदम....
कदम - हो साहेब काळजी घ्या...
इंद्रजीत - हम्म...
जिजा....जिजा......का सोडून गेलीस मला....😭का?...
जिजाsssss😭
**************************
क्रमश :
©®Pratiksha Wagoskar