It's your stuff, it's someone else's cart in Marathi Short Stories by Kalyani Deshpande books and stories PDF | आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट

Featured Books
  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

  • मोमल : डायरी की गहराई - 47

    पिछले भाग में हम ने देखा कि फीलिक्स को एक औरत बार बार दिखती...

  • इश्क दा मारा - 38

    रानी का सवाल सुन कर राधा गुस्से से रानी की तरफ देखने लगती है...

Categories
Share

आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट


कृतिका चे लग्न होऊन जेमतेम दोन महिने झाले होते.
तिच्या सासरी महालक्ष्मी चा सण होता. सगळे जण तयारीला लागले होते. तिच्या सासरी तिचे सास, सासरे, पती आणि तिच्याच वयाची नणंद असे सगळे होते.

सासूबाई कृतिकाला हाताशी घेऊन जय्यत तयारीला लागल्या.

"सूनबाई जरा ते लॉफ्ट वरचे पुरण यंत्र काढून दे बरं",कृतिकाच्या सासूबाई

"हो सासूबाई",कृतीका

खरं तर पुरण यंत्र घरच्या एखाद्या पुरुषाने काढून दिलं असतं तरी चाललं असतं पण सासूबाईंना कृतिकाच्याच कडून सगळे कामं करून घ्यायचे होते.
कृतिकाने स्टूल वर चढून पुरण यंत्र काढून दिलं

"सूनबाई ह्या भाज्या चिरून दे"

"हो सासूबाई"

"सूनबाई हे लसूण निवडून दे"

"हो सासूबाई"

"सूनबाई हे पुरण यंत्रातून काढून दे"

"सूनबाई ही डाळ वाटून दे"

"सूनबाई हे वडे तळून घे"

अश्या तऱ्हेने सासूबाई च्या हाताखाली कृत्तिका भराभर कामं आटोपत होती आणि त्याच वेळेस कृतीकाची नणंद फोनवर गेम खेळत होती. तिच्या आईने तिला आत्तापर्यंत एकही काम सांगितलं नव्हतं आणि ती ही स्वतःहून स्वयंपाक घरात यायला तयार नव्हती.

इकडे कृतीकाच्या सासूचे तिला एकेक काम सांगणं सुरूच होतं. कृतीकाला आता थकवा जाणवायला लागला होता. ती घामाघूम झाली पण सासूबाई चे लक्ष त्याकडे नव्हते.

इतक्या वेळाने कृतिकाच्या नणंदेला जाग आली आणि ती स्वयंपाक घरात आली व म्हणाली
"आई तुला काही मदत करू का?",

"बाळा तू फोनवर काहीतरी काम करीत होती न म्हणून मी तुला काही सांगितलं नाही. आता ह्या थोड्या विलायच्या कुटून दे आणि आराम कर आम्ही आहोत बाकीची तयारी पाहायला",कृतिकाची सासू म्हणाली.

कृत्तिका च्या नणंदेने विलायची कुटून काय दिली की कृतिकाचि सासूने तिचे तोंड भरून कौतुक केले.

"वा बेटा! छान कुटली वीलायची"

"आई आता मी जाऊ का माझं जरा डोकं दुखतय फोन बघून"

"हो बाळा जा थोडा आराम कर. आरतीच्या वेळेस आम्ही बोलावू तुला"

"सासूबाई माझेही जरा डोकं दुखतय मी थोडावेळ बसू का?",कृत्तिका म्हणाली

"बाई तुझंही लगे डोकं दुखून राहिलं का? कमालच आहे बाई! सगळे कामं तर मीच केले तू थोडी मदत केली एवढंच तेवढ्याने तुझं डोकं दुखतय म्हणजे फारच आश्चर्य आहे.
एक काम कर सूनबाई एखादी पेन किलर घे आणि लाग कामाला. महालक्षम्या ना नैवेद्य दाखवायला आपल्याला उशीर होता कामा नये", कृतीकाचि सासू

सासूबाईंनी असे म्हंटल्यावर कृत्तिका ने पेनकीलर घेतली आणि पुन्हा ती कामाला जुंपली.

"सूनबाई ताटे,पेले, वाट्या पुसून घे आणि पानं वाढायला घे"

"हो सासूबाई",असे म्हणून कृतिकाने महालक्ष्मीचा नैवेद्याचे ताट तयार केले. तिच्या सासरे बुवांनी देवींना नैवेद्य दाखवला.
कृतीकाने सगळ्यांचे पानं वाढायला घेतले. कृतिकाचा नवरा तिला मदत करायला आला असता कृतिकाच्या सासूने

"अरे बेटा! आज महालक्ष्मी आहेत न त्याला घरच्या लक्ष्मीने च वाढायचे असते", असे काहीतरी निमित्त काढून त्याला थांबवले त्यामुळे कृतिकाच्य नवऱ्याचा नाईलाज झाला.

कृतीकानें सगळी वाढावाढ केली. रांधा वाढा उष्टी काढा हे सगळं तिने केलं. तिची नणंद मात्र आयत्या पानावर बसली आणि जेवण झाल्यावर तिच्या खोलीत निघून गेली. ते पाहून कृतिकाचे सासरे तिच्या सासूबाईंना म्हणाले,

"अगं सूनबाई च सगळी कामं करतेय आपली कन्या कुठे आहे? तिने सूनबाई ला थोडी मदत केली पाहिजे."

त्यावर सासूबाई म्हणाल्या,"अहो ती फोनवर काहीतरी काम करत होती थकली असेल म्हणून मीच तिला आराम करायला पाठवलं तरी तिने वेळात वेळ काढून विलायची कुटून आम्हाला मदतच केली आणि सगळे कामं सूनबाई ने थोडीच केले आहेत मी सुद्धा होती की तिच्या जोडीला. तिला मी जास्त कष्टाचे कामं सांगितलेच नाही."

"ह्यावर कृतिकाच्या सासऱ्यांनी डोक्यावर हात मारून घेतला व ते म्हणाले,
"अगं तुझं आत्ताचं वागणं बघुन मला एक म्हण आठवली"

"कोणती म्हण?",सासूबाई

"आपला तो बाब्या दुसऱ्याचे ते कार्ट",सासरेबुवा

"ते कसं काय?",सासूबाई

"वरून तूच विचारतेय कसं काय म्हणून,कमाल आहे तुझी. अगं सकाळपासून सूनबाई तुझ्या हाताखाली कामासाठी खपतेय त्याचं तुला तिळमात्र कौतुक नाही आणि आपल्या मुलीने फक्त विलायची कुटून दिली त्याचं केवढ कौतुक आहे तुला म्हणून 'आपला तो बाब्या दुसऱ्याचे ते कार्ट' ही म्हण तुला चपखल बसते."
**************************