1 Taas Bhutacha - 29 in Marathi Horror Stories by jay zom books and stories PDF | १ तास भुताचा - भाग 29

The Author
Featured Books
  • हीर... - 28

    जब किसी का इंतज़ार बड़ी बेसब्री से किया जाता है ना तब.. अचान...

  • नाम मे क्या रखा है

    मैं, सविता वर्मा, अब तक अपनी जिंदगी के साठ सावन देख चुकी थी।...

  • साथिया - 95

    "आओ मेरे साथ हम बैठकर बात करते है।" अबीर ने माही से कहा और स...

  • You Are My Choice - 20

    श्रेया का घरजय किचन प्लेटफार्म पे बैठ के सेब खा रहा था। "श्र...

  • मोमल : डायरी की गहराई - 10

    शाम की लालिमा ख़त्म हो कर अब अंधेरा छाने लगा था। परिंदे चहचह...

Categories
Share

१ तास भुताचा - भाग 29

भाग 29

भयानक ट्रक भाग 3





रघ्याने ट्रकची पायरी चढुन एक कटाक्ष ट्रकच्या आत टाकला, तसे रघ्याला पुढचे दृश्य दिसून आले, ज्याप्रकारे दुस-या ट्रकना असतात त्याच प्रकारे सर्व कण्ट्रोल होते , म्हणजेच स्टेरिंग , गियर , इत्यादी.! आत एक छोटासा बल्ब जळत होता, पण त्या छोट्या बल्बने सुद्धा आतल सर्व काही दिसुन येत होत,
राम्या , ड्राइव्हरच्या बाजुला बसला होता , ड्राइव्हर आणि राम्या दोघांची शरीरयष्टी मिलती जुळती होती
, त्या ड्राइव्हरने आपल्या अंगात एक काल्या रंगाची टी-शर्ट घातली होती, आणि खाली एक जीन्स पेंट. तो ट्रक ड्राइव्हर एकटक आपल्या थंड नजरेने पुढे पाहत होता , जणु त्याची नजर रसत्यावर खिळून होती, रघ्याला ही नजर आपण ह्या अगोदर सुद्धा कोठेतरी पाहिल्यासारखी वाटत होती पन आता ते आठवत नव्हत , राम्या कडे पाहतच रघ्या बाजुला असलेल्या सीटवर बसला , आणि पिशव्या तेथेच कोठेतरी ठेवल्या .
तसे एका यंत्रमानवा प्रमाणे त्या ड्राइव्हरने पुढे पाहतच ट्रकची किल्ली फिरवत ट्रक सुरु केली , तस वातावरणात एक मोठा आवाज झाला, वातावरणात म्हणण्या पेक्षा मी पुर्ण जंगलात घुमला हे म्हणणे पसंद करेल मित्रांनो , त्या ट्रकचा विचित्र भेसुर आवाज असा काही जंगलात दुर - दुर पर्यंत घूमला गेला होता , की त्या आवाजाने जंगलाची स्मशानशांतता काहिवेळासाठी का असेना भंग पावली गेली , जंगल दणाणून निघाल ,एकप्रकारे शहारुन निघाल होत जंगल , झाडांवर निजलेली पक्षी पाखर त्या भेसूर आवाजाने आपली घरट सोडून जंगला बाहेर पडु लागली ,
रघ्याने ट्रकचा दरवाजा ओढुन घेतला, तसे त्या ट्रक ड्राइव्हरने सुद्धा पाहिला गियर शिफ्ट केला, त्यासरशी ट्रकने धिम्या गतीने पळण्यास सुरुवात केली.
व राम्या आणि रघ्याचा चेटक्याच्या जंगलातला प्रवास सुरु झाला...
शेवटचा प्रवास............!!!😈
□□□□□□□□□□□□□□□□□□□□□□□□□□□
इकडे टपरीजवळ

त्या पुढे- पुढे जाणा-या ट्रकच्या आकृतीकडे उज्वळ उदास नजरेने पाहत होता, की अचानक त्याला पाठीमागुन एक आवाज आला .
" ए उज्वळ दादा ! " एका लहान मुलीचा आवाज, ह्या आवाजासरशी उज्वळने मागे वळुन पाहिल व चेह-यावर एक स्मितहास्य करत म्हणाला .
" काय ग चिऊ...? " उज्वळ म्हणाला. त्याच्या डोळ्यांसमोर एक 7- 8 वर्षाची गोंडस मुलगी ऊभी होती, तिच्या अंगात एक सफेद कलरची फ्रॉक होती , आणि हातात एक बाहुली होती,
, त्या मुलीच नाव चिऊ होत .
" ए उज्वळ दादा , ते दोघे पन मरणार का आता...?" उज्वळ कडे पाहत चिऊ म्हणाली .
" काय माहीत ....?" खांदे उडवत उज्वळ म्हणाला.
" ए उज्वळ दादा ... मला ना इथे खुप कंटाळ आलाय रे आणि ही माझी बेबी डॉल पन म्हणतीये की कुठे तरी खेळायला जाव नविन घरी...!"
7- 8 वर्षाची मुलगी ती , पन ह्या वाक्यासरशी तिच्या चेह-यावर एक छद्मी हास्य आल , जे भयानक होत - आतिभयानक .
" अस ...व्हय ! " उज्वळ ने तिच्याकडे स्मित हास्य करत पाहील आणि तिच्या गूदगुल्या करु लागला, ज्याने चिऊ च्या हातून तीची डॉल खाली पडली, उज्वळ आणि चिऊ पाहता- पाहता धुक्यामध्ये विरुन जात गायब झाले, तसे काहिवेळाने जमिनिवर पडलेल्या त्या डॉल मध्ये काहि चित्र विचित्र हालचाल होऊ लागली , आणि खाडकन त्या डॉलने आपले डोळे उघडले,
आणि तिच्या तोंडून एक वाक्य निघाल .
" नविन घर ! " ह्या वाक्यासरशी त्या डॉलने पुन्हा आपले डोळे मिटुन घेतले....! आता हे डोळे तेव्हाच उघडणार होते जेव्हा कोणितरी तिला नविन घरात प्रवेश देणार होता...!
□□□□□□□□□□□□□□□□□□□□□□□□
" काय ओ दादा कुठल्या गावचा म्हणायच तुम्ही...?"
त्या ट्रक ड्राइव्हर कडे पाहत राम्या म्हणाला.
" आम्हाला घर नहि आम्ही असच रात्री - अपरात्री भटकत असतो !"
पुढे पाहतच तो ट्रक ड्रायव्हर म्हणाला. त्या ट्रक ड्राइव्हरचा आवाज खुपच वेगळा होता, एकप्रकारे भसाडा म्हणु शकता . त्याच्या ह्या वाक्यावर राम्याने एक आवंढा गिळून रघ्याकडे पाहिल, रघ्याच्या सुद्धा चेह-यावर 12 वाजले होते , परंतु चेह-यावर भिती न दाखवता रघ्या थोड धीरपणानेच म्हणाला
" अरे राम्या घाबरतोस कशाला ! डायवर जोक मारतोत...! व्हय ना डायवर " रघ्या त्या ड्राइव्हर कडे पाहत म्हणाला, तस रघ्याच्या ह्या वाक्यासरशी त्या ड्राइव्हरने रघ्या कडे थंड नजरेने पाहील व आपली मान हलकेच हो असा इशारा करत हलवली आणि अजुन एक गियर शिफ्ट केला.
" पाहीलस राम्या बोललो व्हतू का नाय मी ?" रघ्या म्हणाला .
" काय बोललेला !" राम्या न समजल्या सारखा म्हणाला .
" आर येड्या हेच की डायवर जोक करतोय ...!" रघ्या पुन्हा थोड हास्य करत म्हणाला .
" रघ्या .?? मी एक घोट घेऊ का...? " आपल्या जिभळ्या चाटतच राम्या म्हणाला. त्याला पुन्हा दारु प्यायची तल्लप झाली होती .
" तु पिऊन दाखवच...? " रघ्या आपले दोन्ही हात कमरेवर ठेवत म्हणाला,
" अर मी जोक करतोय लेका...!" हाहाहा "
राम्या ड्राइव्हर कडे पाहत म्हणाला, परंतु ड्राइव्हरच लक्ष पुर्णत पुढे होत, जणु त्या दोघांच्या गप्पागोष्टींशी त्याच काहीही घेण- देन नव्हत,
" काय ओ डायवर..? एक विचारु का...?" रघ्या म्हणाला. तस त्याच्या वाक्यावर ड्राइव्हरने एक हूंकार भरला, " हम्म"
"नाव काय ओ तुमच ?" रघ्या म्हणाला.
" गुंजन ! " आपल्या थंड आवाजात तो ड्राइव्हर म्हणाला, त्या ड्राइव्हरच्या ह्या वाक्यावर राम्या तोंडावर हात ठेवून एका बायल्या सारखा दात दाखवत खिदीखिदी हसू लागला, व म्हणाला .
" ए रघ्या गुंजन तर पोरीच नाव असतय की, तुझ बी व्ह्त की तुझ्या बापास्नी ठेवलेल!" हिहिहिही , खीखीखी ...! अस म्हणतच राम्या वेडया सारखा हसू लागला, आणि हसता- हसताच त्याने ड्राइव्हरच्या खांद्यावर हात ठेवला आणि क्षणात एक झटका लागाव तस काढून सुद्धा घेतला,
" काय रे काय झाल ?" रघ्या म्हणाला .
" रघ्या ह्या डायवरचा अंग तर जाम थंड हाय र ! प्रेता सारख " राम्याने रघ्याच्या काना जवळच हे वाक्य अगदी हळूवार पणे उच्चारल.
" आर गप्प काय बी बोलतू..? " रघ्या राम्यावर थोड खेकसत म्हणाला .
" रघ्या आईची शप्पथ खावून सांगतो ! " राम्या आपल्या आईची शप्पथ कधीच खोटी खाणार नाही हे रघ्याला माहीती होत, तस त्याने एक शक्क्ल लढवली एक plan
"राम्या ..? म्या काय म्हणतू ?" रघ्याने एक तिरका कटाक्ष त्या ड्राइव्हर वर टाकला अद्याप सुद्धा तो ड्राइव्हर पुढेच पाहत होता , त्याच त्या दोघांच्या गप्पागोष्टीशी काहीही घेण देन बिल्कुल नव्हत .
" हा काय र ...?"राम्या म्हणाला .
" अर माझ बी लय गळा सुखलाय .? " रघ्या आपल्या गळ्यावर हात ठेवत म्हणाला.
" हा मंग पाणि पी की " राम्या म्हणाला.
" आर नाय रे ...! पाण्यात काय तहान नाय जात ! तू एक काम कर तुझी बाटली दे मला ,! रघ्या आपल्याकडे दारुची बाटली मागत आहे ह्यावर काहीक्षणतर राम्याचा विश्वासच बसत नव्हता, कसा बसणार रघ्या निरव्यसनी जो होता, आज पर्यंत त्याने कधीही कोणतीच नशा केली नव्हती .
" रघ्या तु ना दारु ..? आर काय चेष्टा करतो बेवड्याची...!" राम्या म्हणाला . तसे राम्याच्या ह्या वाक्यावर रघ्याने एक डोळा मारत राम्या कडे पाहील व म्हणाला.
" आर तु दे की ...?" तस राम्याने आपल्या पिशवीत हात घातला, आणि एक प्लास्टिकची बाटली बाहेर काढली, आणि ती बाटली रघ्याकडे देण्यासाठी हात वाढवला, तस राम्या कडून ती बाटली चुकून खाली पडली,
तस थोड खाली झुकुन त्याने ती बाटली आपल्या हातात उचलली, आणि त्या बाटली कडे पाहील , झाकण खोलुन त्याने सर्व बाटली, खिडकीतुन बाहेर ओतली, ति बाटली रिकामी करताना त्याने एका गोष्टीची खबरदारी घेतली होती, की त्या ट्रक ड्राइव्हरच लक्ष आपल्याकडे तर नाही ना...,
असाच काहीसा वेळ निघुन गेला, तस रघ्या मोठ- मोठ्याने आपल्या पोटावर हात ठेवत ओरडू लागला,
"आय..... आय. अय अय ....! "
" काय झाल रघ्या ...?" रघ्याला अस वेदनेने विव्हळताना पाहुन राम्या म्हणाला .
" आ.....आ....राम्या पोटात दुख:तय रे लय ! थांबव ट्रक थांबव बाबा ..?"
वेदनेने विव्हळतच रघ्या म्हणाला .
" तस राम्याने ट्रक ड्राइव्हरला सांगून ट्रक थांबवली, आणि तो लागलीच त्याच्यासोबतच लागोपाठ राम्या सुद्धा उतरला,
" राम्या काय बी बोलू नग फक्सत माझ्या बरोबर चल ? " राम्या कडे पाहतच रघ्या म्हणाला , आणि ह्या वाक्यासरशी रघ्याने राम्याचा हात आपल्या हातात घेत तेथुन पळ काढ़ला....

□□□□□□□□□□□□□□□□□□□□□□
ही ही ही हिहि , खीखीखी ..., पळाले साले ! पन जातील कुठे ..? अस म्हणतच त्या ट्रक ड्राइव्हरने पुन्हा आपल्या ट्रकची चावी फिरवली . आणि ती ट्रक पूढे जात धुक्यात विरुन गेली.....

क्रमश :

भाग 5 आंतिम....लवकरच