1 Taas Bhutacha - 26 in Marathi Horror Stories by jay zom books and stories PDF | १ तास भुताचा - भाग 26

The Author
Featured Books
Categories
Share

१ तास भुताचा - भाग 26

कथेचे-नाव एकवीरा-माऊली

समस्त कोळी,आगरी,कराडी,मराठी..बांधवांना ही कथा समर्पित 🙏🏼😊

कथेच नाव: कार्ल्याडोंगरावची एकवीरा-माऊली

(सत्यघटनेवर आधारीत)

वर्ष 2014 ...

माझ्या एकवीरे आईच नाव , तिची भक्तांवर असलेली माया सात समुद्रांपार पोहचली आहे.तिला भेटण्यासाठी...तिच्या पालखीच दर्शन घेण्यासाठी.. बाहेर देशातुन लोक कार्ल्याला येतात..! दगडांच्या पाय-या चढुन डोंगरावरच्या माझ्या एकवीरे आईच्या पायांपाशी डोक टेकवुन तीच दर्शन घेतात. दर्शन घेतल की मग तो प्रवासातला क्षीण,थकवा कसा लागलीच निघुन जातो, एकदम फ्रेश वाटु लागत! सर्व महिमा आहे हो तिची, आपल्या भक्तावर लेकावर कसा जीव ओवाळून टाकते ती सक्ख्या आईसारखी माया लावते ती. तु संकटसमयी एकदा हाक तर दे भक्ता.. मनापासुन हाक तर दे..! " एकवीरा..एकवीरा..! .."

दिनेश, सोमनाथ, विनायक तिघेही अगदी जिवाभावाचे मित्र आहेत.

ते तिघेही मुळ मुंबईचे आहेत.एकाच बिल्डींग मध्ये आप-आपल्या फैमिली समवेत राहणारे आहेत.त्या तिघांमधला विनायकच काय तो ऑफीसमध्ये कामाला जात आहे, तर बाकीचे दोघे इंजिनिअर स्टूडेंट आहेत. विनायकने ऑफिसमध्ये दोन वर्ष काम करुन एक चार चाकी गाडी घेतली.गाडी घेतली त्या दिवशी विनायकने ह्या दोघांनाही एका ढाब्यावर पार्टी दिली.चायनिज,दारु इत्यादी पार्टीत असण साहजिकच आहे.

" अरे भाईलोक ! मला ना आपली गाडी घेऊन कुठतरी देवदर्शनाला जावशी वाटतंय." विनायकने आपल्या दोन्ही मित्रांकडे पाहिल.

" अरे भाई, एकटाच जाणार का? आम्हाला नाय नेणार का?" सोमनाथने दिनेशकडे पाहिल व पुढे म्हणाला.

" बघ दिन्या , गाडी भेटली तर मित्रांना विसरला! उद्या ह्याच लग्ण झाल. तर आपण मेल्यावर फोटो घालायलाच येईल वाटत." दिनेश उर्फ दिन्या तसा कमी बोलणा-यां मधला होता..म्हणुनच त्याने फक्त होकारार्थी हो असा इशारा करत मान हळवली.

" ए गप रे सोम्या तुम्हाला दोघांनापन घेऊन जाणारे ना ! एकटा जाऊन काय करु !"

" बघ दिन्या , आपला विनायक किती चांगला आहे, नाहीतर तु साल्या..

दोस्तीच्या दुनियेतला शाकाल आहेस साल्या ..शक घेतो मित्रावर!" सोमनाथच्या ह्या वाक्यावर दिन्याला आपण अस कधी बोल्लो तेच आठवणा झाल...तो आपल्या स्वभावानुसार गप्पच बसला.

"ए बेवड्या, बंद कर तुझी नौटंकी! आता कुठ जायचा ते इचार करा."

" हिमाचल!" सोमनाथ उर्फ सोम्या एकदम मोठ्याने ओरडत म्हंणाला.

" ए येड्या! हिमाचल मधी कुठ देवस्थान आहे रे !"

" नाई ए ! जाऊडे चल!" सोम्या अर्ध्या नशेत बोबड्या भाषेत म्हणाला.

" गणपतीपुणे!" सोमनाथ पुन्हा ओरडूनच म्हणाला.

" अरे ए,गणपतीपुणे नाय रे ..!गणपतीपुळे !" विनायकने ह्यावेळेस सुद्धा नकार दर्शवला.

दिन्या एकटक गप्प बसुन एकावर एक प्याग जिरवत होता.की तेवढ्यात त्याच्या नजरेस ढाब्याच लाईटिंगनी सजवलेल नाव दिसल.

तोच तो उच्चारला.

" एकवीरा!" नाव उच्चारताच दोघांनीही वेगाने वळुन दिन्याकडे पाहिल.

" आईला दिन्या, कडक ना भावा! एकवीरेला जाऊन लेय वर्ष झाली रे

आणी ऑफीस मधल्या कामामुळ पन गेलोच नाय !" विनायकने आपली बाजु मांडली.

" हो ना भाई ,खरये ! म कधी निघायचा."सोम्या दारुच्या नशेतही फुल जोश मध्ये येऊन म्हणाला.

" आताच जाऊ चल ! बस्स गाडीत!" विनायक सोम्यावर खेकसला त्याने सोम्याच्या पाठणात एक रट्टा बसवला.

"आई ,आई कशाला मारतो !" सोम्याने पाठण चोल्ल.

"मारु नको तर काय करु! मी काय तुमच्या सारखा रिकामटेकडा स्टूडेंट हाई का! मला ऑफिस मधुन सुट्टि घ्यायला लागल,त्यासाठी बॉस ला मनवाव लागल.मग बघु!"

" ठिक ये भाई, काई प्रॉब्लेम नाय!" सोम्याने होकार दर्शवला..दिपक ने ही मान डोलावली.

दिवसांवर-दिवस चढत गेले, दिवसाचा आठवडा झाला-आठवड्याचा महिना झाल .मग अशातच एकेदिवशी सोम्या आणि दिपकला विनायकचा कॉल आला.

" की परवा आपण एकवीरेला चाल्लो आहोत भाईलोग .घरुन म्हंणजेच मुंबई हुन संध्याकाळी निघायच आहे ,म्हंणजे सकाळपर्यंत एकवीरेला पोहचले ही जाऊ., मग कुठेतरी रुम शोधुन काहीवेळ रुम मध्ये आराम करु ..मग दुपारीच ..एकवीरा आईच दर्शन ही घेऊ .आणि रात्री मस्त पार्टी करुन ..सकाळी बारा-साडेबारा वाजता परत यायला निघु "

विनायकचा प्लान दोघांनाही आवडला होता -त्यातच ते दोघे बिनकामी दोघांचाही लागलीच होकार आला.शेवटी जायचा दिवस उजाडला. सकाळीच आप-आपल्या बैग त्यात कपडे, साबण,टॉवेल अस काही-बाही थोड खायच सामान घेऊन तिघेही चार-पाचच्या सुमारास मुंबई हुन एकवीरेला जाण्यासाठी निघाले. तिघांचीही घरातली मांणस

त्यांना सोडायला खाली जमली होती.

" ए विनायक ! रात्री घाटात कुठ गाडी थांबु नको! आणि अजुन उद्या रात्री काहीही झाली तरी परत येऊ नका , याच्या तर पर्वाच या!"

सोमनाथचे वडील पेशाने ज्योतिष होते , तेच म्हणाले.

" का बाबा ! उद्या का परत यायला नको!"

" अरे सोम्या , कस आहे ना बाळा!"

" ओ अन्ना ! आम्ही उद्या नाय याचो , नका टेंसन घेऊ!"

सोमनाथचे वडील पुढे काही बोलणार तोच मध्ये विनायक म्हणाला. कारण त्याला माहीती होत , की अन्ना एकदा बोलायला लागले तर अर्धातास इथेच थांबाव लागणार.आधीच तिघांनाही निघायला ऊशीर झालेला ..त्यातच अजुन ऊशीर नको होता. तिघांनाही आप-आपल्या

घरातल्यांचा निरोप घेतला ." एकवीरा आईचा उदो-उदो "म्हंणत विनायकने गाडी स्टार्ट केली.मुंबई हुन कार्ल्याला पोहचण्यासाठी वीस तासांचा प्रवास होता. गप्पा-गोष्टी मज्जा मस्ती करत वेळ पुढे सरकत चाललेली.जर हायवेवर कधी पुढे गाड्या नसतील तर विनायक गाडीचा ताशी वेग शंभर ठेवत होता. हवेला कापत जशी बंदुकीतुन धुर उडवत गोळी निघावी तशी गाडी हवेला चीरत रस्ता कापत होती. झाडे गाडीच्या मागे पळत होती तर कुठे रस्त्यावरच्या खांबल्यांवरच्या काळ्या वायर गाडीचा पिच्छा करत होते.. दिन्या-सोम्या दोघेही गाडीच्या काचेच्या खिडकीतुन ह्या सर्व घडणा-या बाहेरच्या देखाव्याचा मनसोक्त आनंद घेत होते.विनायकने दोन तास गाडी चालवली मग ड्राइव्ह सीटवर सोमनाथ बसला, मग तो थकल्यावर दिन्याने गाडी चालवायली घेतली ती थेट साडे अकरा वाजता एका धाब्यावर थांबली.मग जेवन खावन करुन एक दोन सिगारेटचे झुरके मारुन गाडी पुन्हा एकवीरेला निघाली. ड्राइव्ह सीटवर आता पुन्हा विनायक बसला.सोम्या-दिन्या दोघेही झोपेच्या आधीन गेले.मध्यरात्री केव्हा तरी दिन्याला विनायकने ऊठवल .. मग दिन्या ड्राइव्ह सीटवर बसला. सकाळी नऊ-साडेनऊ वाजता सोमनाथला जाग आली. त्याने हलकेच किल-किले करुन डोळे उघडले.

" दिन्या, भावा पोहचलो का आपण!"

" लोणावळा पार केलाय भावा, आता पोहचुच!" दिन्या इतकेच म्हणाला.

" हो का ,मग तु आता आराम कर मी चालवतो गाडी!"

दिन्याने गाडी रस्त्याबाजुला थांबवली.आता सोमनाथ गाडी चालवु लागला.काहीवेळाने वीस तासांचा प्रवास संपवुन गाडी एकदाची एकवीरेला पोहचली.तिघांनाही मोठ्या कष्टाने एक रुम मिळाली.

मग रुम मध्ये मस्त तीन चार वाजे पर्यंत आराम करुन तिघेही साडेचार पर्यंत तैयार होऊन एकवीरा आईच दर्शन घ्यायला निघाले.

काही भक्तांच्या अंगी एक सवय असते.की ते भक्त जेव्हा केव्हा एकवीरेला जातात तेव्हा त्या दगडी पाय-यांच्या प्रथम पायरीच दर्शन

घेऊन थेट शेवटची पायरी गाठतात.ते ही न थांबतात. तसंच ह्या तिघांचही होत.प्रथम पायरीच दर्शन घेऊन , पायरींवरच्या बाजाराच निरीक्षण करत..ह्या तिघांनीही शेवटची पायरी गाठली.मग हार,नारळ घेऊन एकवीरा आईच मनोभावे दर्शन घेतल.

एकवीरेच दर्शन घेऊन सोमनाथ,दिन्या विनायक यायची वाट पाहु लागले.

" काय रे विन्या! इतका ऊशीर का लावला?"

विनायक आला हे पाहुन सोम्याने प्रश्ण केला.

" अरे, एकवीरा आईच दर्शन घेतल ना ! तवा एक बाबा ह्या पुडीत

एकवीरा आईचा अंगारा देत व्हता. तर मला अचानक अस काय वाटल काय माहीती मी पन ती पुडी घ्यायला थांबलो."

" हा बर ठीके चल!" सोम्या म्हणाला. तिघेही रुमवर परतले तो पर्यंत संध्याकाळ झालेली,विनायकने दारु,चकना आणला होता.तिघेही घोळका करुन प्यायचा कार्यक्रम सुरु करणार तेवढ्यात विनायकचा फोन वाजला.विनायकने फोन हाती घेत स्क्रीनवर पाहिल.

" बॉस!" विनायकने फोन उचल्ला व रुम बाहेर निघुन गेला.

वीस-पंचवीस मिनीटांन नंतर विनायक पुन्हा रुम आत आला.

समोर दारुच्या पाच बाटल्या होत्या.त्यातल्या तीन आता रिकाम्या झालेल्या.

" काय झाल विन्या ,काय बोलला बॉस!" सोम्याला अद्याप चढली नव्हती. दिन्याही शुद्धित होता.

" अरे एक मोठा पोब्लेम झालाय भाई!" विनायक त्रासिक सुरात म्हणाला.

" काय रे,काय झाल.?" सोमनाथ म्हणाला.

" अरे ,उद्या कंपनीत संध्याकाळी एक अर्जंट मिटींग आहे. पाच राज्यातुन पाच क्लाइंट येणार आहेत, पुर्णत पन्नास कोटींचा प्रश्ण आहे. त्यासाठी बॉसने मला उद्याच्या उद्या तु कस पन करुन ऑफिस मध्ये पायजे म्हंणजे पाहिजेच अस सांगितलय."

" मग आता?" सोमनाथ तोंडाचा आ वासुन म्हणाला.

" आता दुसरा काय मार्ग नाय भावा !आताच्या आता निघाला लागल आपल्याला!" विनायकने त्या दोघांकडे पाहिल.

" ठीके भाई चल!" एवढ वेळ गप्प असलेला दिन्या म्हणाला.तसंही दुसरा काही मार्ग नव्हता .पंधरा वीस मिनिटात आवरा आवर करुन, रुम वाल्याला भाड देऊन तिघेही परतीच्या वाटेला लागले. आकाशात

चंद्राची कुठेही खून दिसत नव्हती, समंद आकाश ह्या हिडिस काळोखी बागुलबुवाने व्यापून टाकल होत.रातकिड्यांची किरकिर मृत्युची धुन वाजवत होती. रात्र असल्याने विनायक गाडी जरा हळु चालवत होता.

गाडीची एसी सुरु असल्याने सोम्या-दिन्या दोघांचीही नशा वर मेंदूत घुसली होती. नशेत दोघांचीही अखंड बड-बड सुरु झालेली, कधी कोणि येड्यासारख हसायच तर कधी मुसमुसत रड़ायच.अर्ध्यातासातच घाट लागला. वळणा-वळनाचा घाट चुकवत विनायक गाडी चालवत होता.

आजुबाजुला सहज नजर गेली तर,भक्कास अशी अंधारातली सैतानाच्या अजस्त्र आ -वासलेल्या तोंडासारखी मृत्युची खोल दरी दिसत होती.जी पाहुन अंगावर सरसरुन काटा येत होता.

" एइ इनो गारी थांबव ना!" सोम्या नशेतच म्हणाला.

" अर झोपना आ××या ! काय जिव द्यायच्या का दरीत ?" विनायक जरा खेकसुनच म्हणाला.

" आले नाय ले ! मला एक नंबल ला जायचे!" सोम्याने एक हात दाखवल.

" हा.. थांब, थांबवतो !" विनायकने गाडी घाटातल्या रस्त्यावर आडबाजूला थांबवली. दिन्या-सोम्या दोघेही मागच दार उघडून बाहेर पडले.घाटातल्या रसत्यावर एक मिनमिनता पिवळा दिवा जळत होता.

रातकीड्यांची किरकिर कानांत ऐकु येत होती. गाडी घाटात असल्याने थंड हवेचे झुळुक अंगाला स्पर्श करुन जात होते.अस म्हंणतात की थंड हवेमुळे दुर-दुरचे आवाज ही हवेमार्फत वाहत कानांवर पोहचतात.गाडी त्या पिवळ्या खांबल्यापासुन सोम्या दिन्या दोघही जरा आडबाजुला आले, जिथे अंधार माजलेला.कालोखाच्या मितीत वावरणा-या सैतानांच्या दुस-या दुनियेच द्वार ज्या स्थळावर उघडत तो व्याघ्रकोपी अंधार .

पेंटची चैन खोलुन दोघही आप-आपला कार्यक्रम उरकू लागले.समोर जंगलासारखा भाग दिसत होता, हिरव्या झाडांच्या काळ्या निल्या पडलेल्या आकृत्या दिसत होत्या...आणि तिकडूनच एक आवाज आला.

" ए, येऊ का रे ,इथ मुततो का येऊ का! " घोगरा-भरडा मिश्रित आवाज.

" ए दिन्या तुला आवाज येतो का ?" सोम्याने चैन लावली.

" हा येतो ना, कोणतरी म्हातार-म्हातारु वरडते आपल्याला! मुतु नका म्हंणुन इथ ! हिहिहिही, शेवटला दिन्या जरा दात विचकत हसला.

" ए भडव्या काय हसतो रे आं,काय असतो आं! येऊ का येऊ येऊ !"

पुन्हा तोच आवाज आला, परंतु जरासा वेगळा दरडावुन दम देणारा भांड्यांवर भांडी आपटावी तसा, गंजलेल्या बिजाग-यांचा कर-करत आवाज व्हावा तसा खोल खर्जातला आवाज. तो आवाज ऐकुन सोम्याची झटक्यात उतरली- दिन्याच्या मेंदुत मात्र जरा जास्तच दारु घेतल्याने त्याला त्या आवाजाचा राग आला , चवताळून उठला तो.

" अरे ए , हिम्मत आहे तर समोर ए ना " दिन्या मोठ्याने ओरडलाच.

सोम्याला तो आवाज जरासा विचीत्र वाटला .सामान्य मानवाच्या आवाजाची जोड त्या आवाजाला नव्हतीच.

" ए दिन्या चल बस्स झाल चल!" सोम्याची पावल थर-थर कापतच गाडीच्या दिशेने जायला लागली.पाच -सहा पावल चालून

सोम्याने मागे वळून पाहिल मागे दिन्या दोन्ही हात शरीराला चिकटून खाली मान घालून उभा राहिलेला.एवढ वेळ झाल अद्याप दोघेही आले नाहीत हे पाहुन विनायक त्या दोघांना आणण्यासाठी निघाला.

" ए दिन्या, ! आ..आर काय झाल ? चल ना !"

सोम्या जागेवर उभ राहूनच म्हणाला. पुढे जाण्याची त्याची हिम्मतच होत नव्हती.सोम्या एकटक दिन्याकडे पाहत बसलेला,त्याच्या घशातुन एका जुन्या पंख्यासारखी घर्र,घर्र बाहेर पडत होती..अचानक

सोम्याच्या खांद्यावर एक हात पडला ,सोम्या किंचाळला.

" आऽऽऽ"

"अरे ए पागल ,मी आहे रे." मागे विनायक उभा होता.ज्याला पाहुन सोम्याच्या अंगात धीर आला.

" आणि ह्याला काय झालं ?" विनायकने खाली मान घालून उभे असलेल्या दिन्याकडे पाहिल.

" आ..आ..आर विन्या!" सोम्याने अस म्हंणतच विनायकला सर्वकाही सांगितल.

" आईशप्पथ, सोम्या ! ह्याच्या अंगात भुत तर नाय आला ना !"

विनायक म्हणाला,आणि त्याच वाक्य पुर्ण होताच..

" खिखिखी,खिखिखी!" एक विकृत हास्य दिन्याच्या कालपट मुखातुन

बाहेए ,,पडल. जे हास्य ऐकुन त्या दोघांच्याही अंगावर सरसरुन काटा उभा राहिला.

" ए, को..कोण हाई तु! आणि माझ्या मित्राला का धरलय! सोड त्याला सोड!" विनायक जरा मोठ्यानेच बोल्ला.

" ए मा××त ! त्याने माझी जागा घाण केले. मी त्याला असंच सोडणार नाय .जर तुला तुझ मित्र पाहिजे तर एक कोंबडी आणि एक चप्टी आणुन दे !" दिन्याच्या अंगात आलेल ते ध्यान आपल्या घोग-या खोल गेलेल्या आवाजात म्हणाल.

" विन्या आता काय करायच ? "सोम्या लगबगीने म्हणाला.

" अर..गप्प ! मुताच्या अगोदर इचार कराचा व्हता ना! नय त्याच झंजाटात आडकावून ठेवलाय तुम्ही!" विनायक जरा रागातच म्हणाला.

की तेवढ्यातच मागुन एक आवाज आला.

" काय रे दादा काय झालं! "आवाजासरशी विनायकने मागे वळुन पाहिल. मागे एक दहा बारा वर्षाची मुलगी ऊभी होती..तिच्या अंगावर एक हिरवी साडी,नाकात नथ -कपाळावर एक गोल लाल टिळा होता.आणी चेह-यावर एक मंद स्मित हास्य होत.

विनायकने जस त्या मुलीकडे पाहील न जाणे का परंतु एक सूटकेची भावना त्याच्या मनात उफाळून आली.साक्षात एकवीरे आईच रुप जणु त्याला काहीक्षण त्या मुलीत दिसुन आल.

" काय ग पोरी !तु इतक्या रात्री इथ घाटात काय करते!"

विनायक ने प्रश्न केला.. साहजिकच होत ते.

"दादा माझ नाव रेणु! इथ घाटाजवळच आमच घर आहे ! माझी आई आणि मी कार्ल्या डोंगरावर हार विकतो ! तर मी आता इथ नेहमीप्रमाणे फुल शोधायला आली होती,तर मला रसत्यात हे भेटल!"

त्या मुलीच्या डोक्यावर एक छोठीशी टोपली होती त्यात हिरवी,भगवी अशी फुल होती..त्या फुलांमध्ये त्या मुलीने आपला हात घातला..आणि एक पुडी बाहेर काढली.

" अरे ही तर एकवीरा आईच्या अंगा-याची पुडी आहे !" विनायकने ती पुडी हाती घेतली.त्याला आठवल भूत,प्रेत,पिशाच्च,देवाच्या अंगा-याला घाबरतात . त्याने लागलीच दिन्याकडे पाहील.दोघांचीही नजरा नजत झाली.दिन्याच्या आतल ध्यान त्या पुडीकडेच पाहत होत. त्याच्या डोळ्यांत भीती स्पष्टपने दिसत होती.

" सोम्या ! दिन्याला पकड?" दिन्या आणि सोम्या दोघेही विनायकच्या दिशेने धावले.सोम्याने मागुन दिन्याचे दोन्ही हात गच्च धरुन ठेवले.विनायक दिन्याच्या समोर उभा राहिला,त्याने ती पुडी खोल्ली...साधारण शी पांढरट अगबरत्तीची राख होती..ती..

परंतु त्या राखेत..अखंड पंचमहाभुत शक्तिचा ठेवा..ठोसूण-ठोसूण भरला होता..तिमीराच्या कालोख्या सैनिकांच्या अतृप्त आत्म्यांच्या मनात धडकीभरवली जाईल इतकी असीम शक्ति होती त्या अंगा-यात...

त्या अंगा-याला पाहुन दिन्याच्या शरीरात शिरलेल्या अभद्र हिडीस ध्यानाने ओरड़ायला, विव्हळायला ,सुरुवात केली.एक-एक क्षण जणु वेळेची गती मंदावल्या सारखा पुढे पडत होता.विनायकने अंगठा त्या

अंगा-यात बुडवला..

" ए..न्हाय...ए न्हाय.....ए.! हात नको लावु...हात नको लावु मला.!"

दिन्याच्या अंगात आलेल ते पाश्वी,हिडीस,प्रेत गळा फाडुन घोग-या आवाजात ओरडू लागल.की त्याचक्षणी विनायकने आपला अंगठा दिन्याच्या कपाळावर टेकवला... काहीक्षण तो अंगठा एका दैवी शक्तिचा प्रहार जसा एका तिमीराच्या कालोख्या भिंतीवर व्हावा...आणि एक तांबडा उजेड सेकंदाकरीता बाहेर पडावा तसा..उजेड दिन्याच्या कपाळावर उमटला. दिन्याच्या तोंडून एक आर्त किंकाळी बाहेर पडली...काहीक्षणात तिचा आवाजही कमी-कमी होत गेला..! तसा दिन्या बेशुध्द झाला. विनायकने जाऊन गाडीतुन एक बॉटल आणली..

पाण्याचा मारा दिन्याच्या तोंडावर होताच त्याला शुद्ध आली.

त्याच्या देहातुन ती तामसी शक्ति निघुन गेली होती..एका द्रुष्टचक्रातुन त्या तिघांचीही सुटका झाली होती. विनायकने मागे वळून पाहिल..

"ती मुलगी..? ती मुलगी कुठे गेली?" विनायक जागेवर उभा राहिला..मागे रस्ता रिकामा होता.ती मुलगी न जाणे कुठे कशी गायब झाली होती?की नक्की ती मुलगीच होती का? ..

दुस-या दिवशी सर्वजन घरी परत आले.काल घडलेला प्रकार ह्या तिघांनीही घरच्यांना दोन आठवड्यां नंतर कळवला..

काहीवेळ बोलणी खायला लागली..परंतु नंतर सोम्याच्या वडिलांकडून मात्र एकभयान सत्य समोर आल.

त्या दिवशी अमावास्या होती म्हंणूनच ते अस म्हणाले होते..की आज गेलात तर उद्या परत येऊ नका.पर्वाच या! ..घाटात रोज एक दोन एक्सीड़ंट होतात त्या मांणसांची काही मरण्या अगोदर अतृप्त इच्छा राहिल असेल तर त्यांचे आत्मे ..ती पुर्ण करुन घेतात..परंतु तुमच नशीब बलवत्तर..की तुमच्याकडे एकवीरेचा अंगारा आणि साक्षात देवाची...साथ होती..आणि म्हंणुनच म्हंटल जात

 

!!देव तारी त्याला कोण मारी!!




संकटकाळी कलियुगात नाही भेटेल ,

कधी आपुल्या मांणसाची साथ,

तेव्हा मुखातुन निघते..एकच हाक...

एकवीराऽऽऽ..एकवीराऽऽऽऽऽ ...!



क्रमश :





आमचे आई माऊलीची मानाची पाळखी निघाली कार्ल्याला..





1] ॥ ह्या कथेवाटे समाजात कोणतीही अंधश्रद्धा किंवा अफवा पसरवण्याचा लेखकाचा हेतु नाही! ह्या कथेवाटे एक चांगल संदेश पसरवण्याचा.आणि एक देवभावना जागृत व्हावी हेच लेखकाच मुळ हेतु आहे."

 

धन्यवाद:

 

चला तर मी तुम्हा सर्वांचा निरोप घेतो..🙏🏼😊❤