1 Taas Bhutacha - 23 in Marathi Horror Stories by jay zom books and stories PDF | १ तास भुताचा - भाग 23

The Author
Featured Books
Categories
Share

१ तास भुताचा - भाग 23

कॉपी पेस्ट करुन आपल्या नावे कथा करून घेणा-या

चोरांवर दया दाखवली जाणार नाही.!

ऑनलाइन कारवाई केली जाईल.

नव्या कथेचे नाव - झपाटलेली टेकडी (2022)

रात्रीचे साडे अकरा वाजले गेलेले! त्यातच आकाशात अमावस्या असल्याने खाली धरतीवर अंधार पडला होता.त्याच अंधारात एका लाल मातीच्या टेकडीवरुन एक दुचाकी अगदी वेगाने दगड-गोटे-खड्डयातुन बेडकासारखी सपाकसर असल्याने टुन टुन उड्या मारत वेगाने रस्ता कापत निघाली होती. गाडीवर एकुण दोन जण बसले होते.ड्राईव्ह सीटवर बसलेला भावर्ष नुकताच एकवीसाव्या वर्षात पदार्पण केलेला मुलगा होता. त्याचे वडील एकेकाळी गावचे सरपंच होते- आपल्या भारत देशात असा नियमच आहे म्हणा ! कोणी एकदा गावच सरपंच झाल की त्याच्या पुढील सात पिढ्या बसुन खाणार. तसंच इथेही लागु होत.त्याच्या वडीलांनी ग्रामपंचायत मध्ये सरकार कडून येणारा पैसा खाल्ला होता-साठवुन ही ठेवला होता. म्हंणजेच ब्लैक मनी होय.असो पुढे वाचा. एकुलता एक असल्याने भावर्षचे लाड जरा जास्तच होत-होते.बारावी पास होऊन पठ्या घरातच बसला होता.बापाने एक टूव्हीलर गाव चपाटायला दिली होती.तिच गाडी घेऊन हा पठ्या आपल्या आवडत्या मित्रासोबत म्हंणजेच राजसोबत एका दुरच्या मित्राच्या वाढदिवसाला गेला होता.त्याची आई तिकडे नकोस जाऊस ! आज अमावस्याची रात्र असल्याने तो रस्ता चांगला नाही. म्हंणुन त्याला सांगत होती.परंतु आताची स्व्त:च्या नियमावलीनुसार वागणारी पोर ती ऐकणार तरी कशी? काय तर म्हणे " माय लाईफ माय रुल्स " आईच न ऐकता तो आपल्या राज नामक मित्राला घेऊन दूरच्या एका बर्थडे पार्टीसाठी जायला निघाला.

राज आणि भावर्ष तसे म्हणायला दोघेही अगदी मिळती -जुळती क्वालिटी होती .

बर्थडे पार्टीत जेवण खावन करुन मग मित्राचा निरोप घेऊन दोघेही दोन तासा नंतर परतीच्या बाटेला लागले होते. आताच युग कस! बदलत चाललं आहे! नाही का? एन बारा -तेरा वर्षाची मुल

सिगारेट पित आहेत! मी का भले खोट बोलु, स्वत:च्या डोळ्यांनी पाहिल आहे मी ! परंतु त्यांना अशा कमी वयात हे सर्व असले धंदे का करत आहात? तुमच्या आई-वडीलांनी तुम्हाला हेच शिकवल आहे का? अस विचारु मात्र मी शकलो नाही ! का तर माझ्यात हिम्मत नव्हती का? अस प्रश्ण तुमच्या मनात आला असेल? परंतु तस नाहीये! मी एकदा-दोनदा त प्रयत्न केला होता! परंतु त्यांनीच मला एक दोन बाता सूनावल्या.

" तुला काय करायचय रे! तुझ्या बापाच्या पैशातुन पितोय का!"

तेव्हापासुन ते संत महात्मासारखे अनमोल विचार ह्या कलियुगात मी वाटण्याच सोडून दिलय.असो कथेकडे पाहूयात.

राज-भावर्ष दोघांनीही पोटात एक दोन दारुचे पैग जिरवले होते.

आता गाडीवर ते दोघे तोंडात चिंगम टाकुन सिगारेटचे झुरके मारत निघालेले. भावर्ष गाडी चालवत होता, तर त्याच्या मागच्या सीटवर

राज बसलेला.त्याच्या तोंडात एक पेटती सिगारेट होती.जी की अर्धीच राहीली होती-दोन तीन झुरके घेतले की संपली बस्स.

" राज ..? " भावर्षने गाडीचा तिसरा गियर टाकला ,एक्सीलेटर पिल्ल.

" हा काय, रे ?"

" अरे आई आज आपल्याला अडवत का होती?"

" अरे काय नाय रे भावा ! ह्या टेकडीवर म्हंण बुटांचा राजा राहतो!"

राज नशा चढल्यासारखा बोबडा बोल्ला.

" काय कोण राहतो?"

" अरे बुतांचा राजा रे!"

" अरे तुला भुतांचा राजा म्हणायच का !"

" हो -हो भाई !" राजने तोंडातली सिगारेट हातात घेऊन फेकून दिली.

काहीसेकंद ती जळणारी सिगारेट हवेत भिंगरी प्रमाणे भिंगली , मग हलकेच जमिनीवर पडली.त्या सिगारेट मागुन हे दोघे बसलेली गाडी मागची लाल लाईट पेटवत अगदी वेगाने पुढे निघुन गेली.

ती सिगारेट अद्यापही लाल मातीवर तांबड्या निखा-यांसहीत जळत पडलेली.. त्या सिगारेट पासुन ठिक चार पावलांवर एक छोठीशी देऊळी दिसुन येत होती.त्या देवळीत एक दिवा तेवत होता, त्या तेवणा-या दिव्या पुढे एक पाषाणाची काळ्या मस्तकाची दोन भेदक डोळ्यांची,धार -धार नाक असलेली, व एक रुबाबदार मोठी मिशी असलेली वेताळाची मूर्ती होती.ती वेताळाची करडी,रागिट ,भेदक नजर त्या सिगारेटवर रोखुन पाहत होती अस भास होत-होत.की झपकण न जाणे कोठुन एकदमच एक हवेचा झोत आला, ती सिगारेट विझवुन गेला.

जमिनीवर चौही दिशेना लाल माती पडलेली दिसत होती -जणु लाल मातीची टेकडीच असावी ती.त्याच लाल मातीच्या रस्त्यावरुन एक काळ्या रंगाचा विंचु,मागचा विषारी डंख मोठ्या रुबाबात वर उचलुन तुरु-तुरु छोठ्या पावलांनी रस्ता क्रॉस करत होता.की अचानक दुरुन एक पिवळ्या रंगाचा हेडलाईटचा प्रकाश त्या विंचावर पडू लागला..मग इंजीनचा घर्रघर्र आवाज जवळ ज्वळ येत हवेच्या वेगाने टूव्हीलरची दोन चाक त्या विंचवा जवळून लाल-माती हवेत उडवत पुढे निघुन गेली.

" हा भुतांचा राजा म्हंणजे कोण? " भावर्षने प्रश्ण केला. राजने त्याच्या ह्या वाक्यासरशी काहीक्षण विचार केला व म्हणाला.

" वेताळ!" त्याच्या तोंडून जस हे वाक्य बाहेर पडल.त्या टेकडीवरुनच एक आवाज आला.धम्मऽऽऽऽऽऽऽऽऽ

" वेताळ? म्हंणजे!"

" अरे तुला वेताळ नाही माहीत!" राज म्हणाला.

" का रे परिक्षेत प्रश्ण येणार होता का त्याचा?"

" अबे तस नाही रे ! गावातली सगळी मांणस घाबरतात ना त्याला!

का तर म्हंणे ,त्याच्याशी वाईट वागल्यावर कोप बसतो,तो रागावतो आपल्यावर! "

" अच्छा! अजुन काय म्हंणतात!" भावर्ष उत्सुकतेनं म्हणाला.

" अस म्हंणतात . की ह्या लाल मातीच्या टेकडीच्या तीन किलोमीटरच्या सर्व भागात त्याच आस्तित्व आहे! ह्याच माळरानात त्याचे दोन मंदिर ही आहेत . एक मंदिर रस्त्यावर आहे .(हा तोच मंदिर आहे मित्रांनो ज्या मंदिरा पुढे राजने सिगारेट फेकली होती) दुसरा मंदिर माळराणातच कोठेतरी आत आहे ! गावातली लोक अस म्हंणतात की दर अमावास्याला ह्या दुस-या मंदिरात वेताळाची भुतांची जत्रा भरते.

पंचक्रोशीतली सर्व प्रजातीची भुत ,ह्या पालखीत पाहायला मिळतात.

आणी अजुन एक, मी एका गावक-याकडून ऐकलय ! की ह्या माळरानात आपल्या गावच जुन आता वापरात नसलेल एक स्मशान आहे ज्या स्मशाना भूमितुनठिक रात्री बारावाजता वेताळाची पाळखी निघते.

मयत एका प्रेत यात्रेत जसे अपशकुनी स्वरांची मैफिल रंगते ! तसेच ह्या वेताळाच्या पाळखीत भुत ढोलताशे वाजवतात! कोणी नाचत असत ,तर कोणी हसत असत,कोणी रडत ,विव्हळत नाना त-हा.

पण एक मात्र आहे जो कोणी ही पालखी पाहतो.तो पुढच्या अमावास्येला ह्या पाळखीत दिसतो." राजच्या ह्या शेवटच्या वाक्यासरशी

गाडी धक्के खात बंद पडली. काहीवेळा अगोदर जो इंजीनचा घर्र,घर्र आवाज येत होता-तो आवाज बंद झाला.आता आजुबाजुला कुठेही वस्ती दिसत नव्हती. जिकडे नजर जाईल तिकडे लाल माती,तर काहीबाही झाड पसरली होती.त्याच झाडांचा आसरा धरुन लपलेला अंधार आपल्या गर्भात लपवुन ठेवलेल्या रातकीड्यांना विव्हळण्यास भाग पाडत होता. राज गाडी वरुन उतरला .त्याच्या मागोमाग भावर्षही उतरला.

" शीट ह्या गाडीला पन आताच बंद व्हायचं होत." भावर्षने अस म्हंणतच

गाडीला लात मारली.

" काय ? गाडी बंद झाली! आता काय करायच" राज आपल तोंड मोठ करत म्हणाला.

" आता ?"भावर्षने एक भुवई उंचावली पुढे म्हणाला." दोन पाय

काय भिक मागायला दिले आहेत का? भें×××त!" भावर्षचा स्वर शेवटच्या वाक्याला जरासा उंचावला.राज ने शिवी ऐकुन निर्लज्जपणाचा आव आणत हास्य दिल .तसा भावर्ष गाडीला धक्के देत पुढे-पुढे घेऊन जाऊ लागला. कारण गाडीला ह्या मालरानावर सोडन धोक्याच होत,गाडी कोणि चोरी वगेरे केलीतर?

राज भावर्ष दोघे गप्पा गोष्टीकरत पाया खालची लाल माती तुडवत निघालेले तसे मागे गाडीचे टायर-त्या दोघांच्या बुटांचे ठसे लाल मातीवर उमटलेले दिसत होते.

" भावर्ष ! काय पन बोल भावा , पन पार्टीत खुप मज्जा आली !"

" हो ना !" भावर्षने गाडीच हँडल राज कडे दिल, तस आता राज गाडी ढकलु लागला" आणि तु मला त्या वेताळ बदल अजुन काहीतरी माहीती सांगत होतास ना ?"

" माहीती म्हंणजे? तुला काय ते सर्व खोट वाटत का? " राजने गाडी जागीच थांबवली,तो उत्तराची अपेक्षा ठेवुन भावर्षकडे पाहु लागला.

परंतु झाल उलटच,भावर्ष दात दाखवत हसु लागला.

" हसतोस काय ? खर आहे ते ! माझ्या आजोबांनी सांगीतलय मला!

आणि अनुभव घेतलेली मांणस ,भले खोट का बोलतील ?"

" अनुभव !हाहाहाहा " भावर्ष मनसोक्त हसला मग काहिवेळाने थांबुन

पुढे म्हणाला." मीठ मसाला लावुन सांगितलेल्या गोष्टी नेहमी ख-या नसतात रे!"

" आई शप्पथ सांगतो भाई! मी जेवढ काही सांगितल ते खर आहे!"

राजने एका हातात हेंड्ल धरला व दुसरा हात गळ्याला लावला.त्याच्या गळ्यात एक काला धागा त्यात एक हिरवी तावीज होती..आणी

राजच्या हातात एक काळ्या रंगाच घड्याळ होत.आपसुकच नकळत

भावर्षची नजर त्या घड्याळाकडे गेली. घड्याळात अकरा वाजून पंचावन्न मिनिटांची वेळ दिसत होती.

" अच्छा ! तु हे सगळ खर सांगतोयस ना तर ठेवतो मी विश्वास ! पन एका अटीवर?"

" अट . कसली अट?"

" बघ हं ! जस की तु म्हणालास , की दर अमावस्याला जुन्या स्मशानातुन रात्री वेताळाची पालखी निघते ! तर आता बारा वाजायला पाच मिनीट शिल्लक आहेत , आणि ते स्मशान इथुन फक्त दहा मिनीटांवर आहे."

" हा तर ?" राज ने प्रश्ण केला.

" तर मग अस ,की आपण त्या स्मशानात जायच आणि पाहायच की

खरच वेताळाची पालखी निघते का! आणि जर पालखी वगेरे तिथे निघत नसेल, तर तु मला पाचशे रुपये द्यायचे ! "

" आणि जर पालखी निघली असेल तर?" राज पटकन म्हणाला.

" तर मग ! " भावर्ष काहीक्षण आकाशात पाहत राहिला व पुढे म्हणाला.

" तर मी तुला दोन हजार रुपये देईन! मान्य आहे ?"

भावर्षने पैज लावण्यासाठी हात पुढे केला.काहीक्षण राज विचार करत राहिला.काहीक्षण त्याच्या ही मनात विचार येऊन गेले! आपण आजपर्यंत कधी भुत पाहिलच नाहीये तर ते आस्तित्वात तरी असेल का? लोक सांगतात! पन आपण पाहील आहे का? नाही! तसही भावर्षचे पाचशे रुपये आपल्यावर उधारच होते-हरलो तर हरलो.

" ठिक हे !" राज ने भावर्षच्या हातावर हात ठेवला.

रातकीड्यांची किरकिर उभ्या आसमानांत गाजत होती-जणु अंधारात ह्या रातकिड्यांची मैफिल जमली असावी.गाडी रस्त्याबाजुला स्टँडवर लावून , दोघेही मोबाईल टॉर्च चालु करुन स्मशानाच्या दिशेने निघाले.

आजुबाजुला मोठ-मोठी झाड झुडपे होती. -खाली उन्हाने वाळलेली सोनेरी गवत होत.त्या गवताला तुडवत दोघेही स्मशानाच्या दिशेने जायला निघाले होते.खाली गवतातुन कधी सळ-सळ करत काही साप वगेरे वाकड तिकड शरीर फिरवत ह्या दोघांच्या चाहुलीने दूर पळत होत.

परंतु त्या मुक्या जनावाराची कमी आणि ह्या दोघांची जास्त फाटत होती. स्मशानात पोहचताच भावर्ष राज दोघांनीही एक कटाक्ष समोर टाकला. पुढे चार गंजलेले लोखंड होते. ज्यावर प्रेत -चिता लाकड ठेवुन

जाळल जात. कोणि ह्या जागेस पवित्र मानत असत ! का तर हीच ती जागा आहे ज्या जागेतुन मानवाच्या आत्म्याला शांती मिळते-पुढ़ची गती मिळते.परंतु काही जण ह्या जागेला अपवित्र ही मानतात..कारण ह्या जागेत ज्या आत्म्यांना मुक्ती-मोक्ष मिळत नाही ! ते इथेच भटकतात- आपला बस्तान मांडून बसतात ! काळ्या निल्या पडलेल्या झाडांच्या आकृत्यांमधोमध हे स्मशान होत.त्या चार लोखंडावर खालच सोनेरी गवत मिठी मारुन बसलेल.

" बघ राज आल स्मशान ! " भावर्षच्या ह्या वाक्यावर राजने एकवेळ घड्याळात पाहिल. बारा वाजुन बारा मिनीटे झाली होती.

" झाल समाधान! ह्या जगात भुत ही गोष्ट आस्तित्वात नाहीच ए रे चु××या! तु ज्या झोमटे क्रिएशन च्या स्टोरीज वाचतोना खोट असत ते सर्व!" राजने निराश होत , पेंटच्या खिशात हात घातला , दोन पाचशेच्या नोटा बाहेर काढल्या...पैसे बाहेर काढतावेळेस नकळत त्याचा हात मोबाईलच्या की बटणवर दाबल गेला..अचानक स्क्रीन डीस्पले ऑन/झाला.त्याच लक्ष त्या चालु स्क्रीनवर गेल...त्या स्क्रीनवर वेळ होती.

अकरा वाजुन अठ्ठावन्न मिनीटे .

" चल पैसे दे " भावर्षने हात पुढे केला.

" थांब! अजुन बारा वाजले नाहीत ! माझ घड्याळ पुढे आहे. "

" काय !" म्हंणत भावर्षने स्क्रीनवर पाहील , त्यालाही आश्चर्यकारक धक्काच बसला. कारण मोबईल मध्ये अजुन बारा वाजले नव्हते.

" ठीके दोन मिनिट थांबूयात! ते पैसे हवेतर माझ्याकडेच देऊन ठेव!"

भावर्षने हरवटल्यासारखा हात पुढे केला. राजने दोन्ही नोटा त्याच्या हातावर ठेवल्या. दोघांनीही आप-आपला फोन काढला वेळ पाहू लागले.

अकरा वाजुन एकोणसाठ मिनीटे वेळ स्क्रीनवर दिसत होती.

दोघांच्याही नजरा बारा केव्हा वाजतात ह्यासाठी फोन स्क्रीनवर केंद्रित झालेल्या.की तेवढ्यात एकोणसाठ मिनीट बदलुन तिथे दोन शुन्य आले.

आणी तास काट्यावर बारा.

" झाल ? वाजले बारा ! चल निघुयात?" भावर्ष पटकन म्हणाला.

" ए भाई थांब जरा दोन मिनीट! " राज म्हणाला. त्याच्या ह्या वाक्यावर

भावर्ष खांदे हळवत हसु लागला,खिदळू लागला व म्हणाला.

" अरे येड्या तुझा अजुन विश्वास नाही का बसत ! की भुत वगेरे काही नसत ! "भावर्ष च्या तोंडून जस हा शब्द बाहेर पडला..त्याचक्षणी

वातावरणात एक ढोल बदडवण्याचा आवाज घुमला.

"धम्म! "आवाज येताच भावर्षचे डोळे विस्फारले. शरीर गोठल गेल..हात पाय शरीराला चिटकले गेले.तेवढ्यात पुन्हा तो आवाज आला.

" धम्म, धम्म,ढम्म,ढम्म्म!" एकापाठोपाठ ढोल बदडवण्याचे आवाज घुमले.त्या प्रत्येक आवाजासरशी वातावरणातला गारवा वाढु लागला..

अंधारातुन कोणीतरी आपल्याला चोरुन पाहत आहे!अस क्षणा-क्षणा भास होऊ लागला.मनावर भीतीचा हातोडा घाव घालु लागला.

राजने भावर्षचा हात-हाती घेत बाजूच्याच एका झुडपाचा आसरा घेतल.म्हंणजे एका कालोख्या झुडपा आड ते दोघे लपुन समोरच दृष्य पाहत बसले.पुढुन अंधारातुन जेमतेम शंभर मीटर दुरुन , मशाली -टिटव्या नाचवत भुतावळ येत होती-अंधारात कोण्या मेलेल्या मांणसाची प्रेत यात्रा राम-नाम च्या घोशात निघावी तशी वेताळाची पालखी ह्या दोघांच्या दिशेने येत होती.पालखीतली भुतावळ कोणि रडत होत,लागलीच हसत होत! कोणि हेल काढून ओरडत विव्हलत,लगेच येड्यासारख खुदकण हसत होत.हडळ,सवाशीन, वाढलेले केस गरागरा डोक फिरवत पुढे येत होत्या.

" राज आता काय करायच? ही सगळी तर आपल्याच दिशेने येता आहेत! जणु ...जणु...त्यांनी आपल्याला पाहिल असाव !"

भावर्ष ने आपली बाजु मांडली.

" पाहिलस ! ह्या जगात भुत असतात ! आणि मी वाचणा-या झोमटे सरांच्या स्टोरीज खोट्या नसतात !"

" हो रे बाबा हो ! माफ करा मला ,पन आता ह्या संकटातुन कस वाचायच

ते शोध!" भावर्ष पटकन म्हणाला.मागुन विचित्रपणे हेळ-काढुन ओरड़त

विव्हलत भुतावल पुढे सरकत होती-कोणत्याही क्षणी ते इथे पोहचणार होते.

" थांब ! मी जयेश झोमटे यांच्या एका झोमटे क्रिएशन स्टोरीमध्ये वेताळापासुन कस वाचता येईल, हे वाचल आहे !"

राज म्हणाला.

" अच्छा..! अच्छा .! काय आहे ते ?" भावर्ष:

" थांब मला आठवु दे!" राजने आपले दोन्ही हात डोक्याला लावले तो आठवू लागला त्याने काय वाचल होत.मागुन ढोल बदडवत-ताशा वाजवत भुत प्रेत येत होती.रातकीड्यांची किरकिर ह्या असल्या अभद्र सैतानांना पाहुन गप्प लपून बसलेली.

" आठवल ! " राज मोठ्याने म्हंणाला.

" काय आहे तो उपाय ?"

"एकच उपाय आहे ! आपल्याला वेताळाच्या पालखीच दर्शन घ्याव लागेल. आणी पुढे जे काही करायचं आहे मी करेल!" राजने अस म्हंणत पुढे पाहिल. तसा त्याचक्षणी त्यांना तो दिसला वेताळ!

एका शाही पालखीत बसला होता-तो ! दोन जल्लाद सारख्या काळ्या भुतांनी त्याची पालखी धरली होती. आणि त्यात हा लुकड्या पांढ-या फट्ट देहाचा,डोक्यावरचे केस मोकळे सोडुन...आरामात दोन्ही पाय पुढे सोडून -एक पाय वर करुन त्या पालखीत बसलेला वेताळ.

अखंड पंचक्रोशीतल्या भुतांचा राजा -पाताळाचा राजा वेताळेश्वर!

खुद्द सैतान.

" भावर्ष उठ! त्या पालखीच दर्शन घ्यायचंय आपल्याला!"

" ए राज तु वेडा झालायेस का! ती भुतावळ आपल्याला तिथ पर्यंत पोहचुन देइल का?"

" भावर्ष आपल्याकडे दुसरा मार्ग नाहीये ! उठ?"

" अरे पन राज !" भावर्ष इतकेच म्हणाला असेल की तोच राजने त्याचा हात हाती घेऊन त्या पालखीच्या दिशेने पळ काढला .पळ काढतावेळेस

त्याने त्याच्या गळ्यात असलेल्या हिरव्या तावीजला उपटून हाती घेतल..

तो हात त्याने पुढे केला.तसा त्या हिरव्या तावीजीमधुन एक प्रखर दिव्य प्रकाश बाहेर निघाला..जो त्या भुतावळीस असहनीय होऊ लागला.

त्या प्रकाशाने त्या भुतावळीचे डोळे दीपले-तर कोण्या प्रेताच शरीर भाजून निघाला..सर्व प्रेत विविध प्रकारची भुत त्या दोघांच्या रस्त्यातुन बाजुला झाली.दहा-बारा पावल चालुन राज भावर्ष दोघांनीही पालखी गाठली....पालखीच्या गोंड्यावर हळकेच दोघांनी डोक टेकवल.

" वेतोबा ! माफ कर आम्हाला !" राज मोठ्याने ओरडलाच.भावर्ष तर

एकटक वेताळाकडे पाहत बसलेला...काय ते रुप ! काय तो सोंग.

" भावर्ष पळ!" राजचा मोठ्याने ओरडण्याचा आवाज आला.त्या आवाजाने भावर्षची तंद्री भंग पावली. दोघेही पुन्हा भुतावळीतुन

बाहेर पडले- वीस पावल चालुन थांबले.

राजने एक कटाक्ष भुतावळीवर टाकला , प्रत्येकाच्या डोळयात अंगार भरला होता. इस्त्वासारखी क्रोधित नजर दोघांवर खिल्ली होती.

राजने बाजूचा एक दगड उचल्ला तोच दगड वर हवेत उंचावुन खाली

आणत थेट तर्जनीवर मारला. भीतीपोटी त्या वेदनेच त्याला काहीही वाटल नाही. त्या तर्जनीतुन निघणा-या रक्तातुन त्याने लाल मातीवर ॐ

काढला.तसा त्याच क्षणी त्या ॐ मधुन एक स्फटीका सारखा सफेद प्रकाशीत गोळा जमिनीतुन बाहेर निघाला व थेट हवेत उडत पुढे-पुढे जाऊ लागला.

" भावर्ष चल!" राज भावर्ष काट्या कुट्यातुन पळत त्या सफेद प्रकाशित गोळ्या मागे धावु लागले-पाच सहा मिनीटे गोळ्या मागे धावून तो गोळा भावर्षच्या गाडीसमोर येऊन आपोआप हवेतच फुटला.भावर्ष

गाडीवर बसला , त्याच्या मागोमाग राज ही आला.त्याने एक कटाक्ष

मागे टाकला.मागुन चार-पायांवर चालत तर हवेत उडत वाकुल्या दाखवत.भुत,प्रेत ह्या दोघांच्या दिशेने येत होती.

" भावर्ष गाडी चालु कर ते आले !"

भावर्षने एक कटाक्ष मागे टाकला,भीतीपोटी त्याने शरीरात होती नाही तेवढी ताकद पणाला लावली..आणि एक जोरदार कीक मारली.

पुढच्याक्षणाला गाडीचा इंजीन घर-घर करत चालु झाला...मागच्या नळीतुन पांढरत धुर बाहेर पडला.भावर्षने एकाचवेळेस दोन गियर शिफ्ट केले..क्ल्ज सोडला..तसा वा-याच्या वेगाने गाडी, मागची टायरला लागलेली लाल माती हवेत उडवत पुढे निघुन गेली.

दोघेही त्या संकटातुन सुखरुप वाचले.

पैजे प्रमाणे भावर्षने राजला दोन हजार रुपये ही देऊन टाकले ! ..

 

××××××××××

पुढच्या अमावस्येला.:

 

तीच अंधारी रक्तपिपासु रात्री झाली होती.एक चार चाकी गाडी एका लाल मातीच्या टेकडी वरुन वेगाने पळत येताना दिसत होती.गाडीत एक म्हातारा-म्हातारी बसलेली दिसत होती. की अचानक गचके खात ती

गाडी रसत्याबाजुला थांबली. गाडीच दार उघडून एक म्हातारा बाहेर आला.

" अरे इस गाडी काय हो गया !"

" क्या हो गया ! हमको जलदी पोहचना मंगता हाई !"

त्या ख्रिश्चन क़म्हातारीने अस म्हंणतच ! " घड्याळात वेळ पाहीली."

वेळ होती..बारा वाजुन शुन्य मिनीटे. आणि तेवढ्यात एक आवाज आला.

 

धडाड,ढम्म......!

 

समाप्त: