1 Taas Bhutacha - 20 in Marathi Horror Stories by jay zom books and stories PDF | १ तास भुताचा - भाग 20

The Author
Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

१ तास भुताचा - भाग 20

भाग 20

॥ मल्हारी मार्त्ंडय...येळकोट येळकोट...जय मल्हार.. ॥


सदर कथानक सत्य घटनेवर अधारित आहे!
कथेतली वातावरण निर्मिती..मनावर ताण निर्माण करु शकते.
ह्या कथेत वर्तवणारे दृष्य सत्य घटनेवर आधारीत आहेत.
लेखक कथेद्वारे समाजात कोणतीही अंधश्रद्धा पसरवू इच्छित नाही..
उलट कथेवाटे समाजात देवाविषय एक चांगली देव भावना निर्माण व्हावी- हा लेखकाचामुळ हेतू आहे..

धन्यवाद 🙏🏼😊

कथा आरंभ

सन ..डिसेंबर 2005

मल्हार सोनटक्के वय चाळीस. पेशाने ते एक हॉटेलचे मालक होते.
त्यांच्या परिवारात पत्नी सुशिला ,व एकुलती एक मुलगी आनिशा
असा सुखी परिवार होता.

मल्हाररावांच स्वभाव म्हंणायला देवधर्म मानणा-या इसमांपैकी एक होत. त्यांच मुंबईत एक छोठस हॉटेल होत. त्यांच्या हॉटेलमध्ये येणारा कोणीही कधी उपाशी जात नसे , गरीब गरजू, भुकेजलेल्या मानवाची भुक ते पुण्य म्हंणुन भागवायचे. त्यांनी कधी हॉटेलमध्ये जेवन मागायला आलेल्या भिका-याला हाकलून लावल नव्हत किंवा , कधी अपशब्द वापरले नव्हते. उलट ते मोठ्या मनाने म्हंणायचे " तुझ्या घरी कोणि अजुन असल तर त्याच्यासाठी सुद्धा जेवण घेऊन जा " त्या गरीब मांणसांच आशिर्वाद नेहमीच त्यांच्या पाठीशी असायचा..त्याचंच हे पुण्य फळ म्हंणा की आणखी काही पन त्यांच्या हॉटेळला नेहमीच नफा व्हायचा.पैश्यांची कमी म्हंणाल तर कधीच लाभली नव्हती. देवाच्या कृपेने सर्वकाही सुरळीत सुरु होत.

सुशिलाबाई तश्या शिकल्या सवरलेल्या , जराश्या मॉडर्न विचारांच्या किंचीतच देवांवर विश्वास असलेल्या स्त्री होत्या. .घरात पैश्याची कधी कमी नव्हती , नाहीतर त्यांनी सुद्धा काहीतरी सरकारी नोकरी केली असती.
( अस त्या नेहमीच म्हंणायच्या. अलीकडेच गेल्यावर्षी त्यांच दिर्घ आजाराने निधन झाल- असो! )

ह्या दोन जोडप्यांना एकच पुत्रीरत्न प्राप्त झालेली.
अनिशा मल्हार सोनटक्के वय १२ ! आनिशा सध्या पाचवीत शिकत होती.

अशातच एके दिवशी :
11 डिसेंबर 2005

वेळ सकाळी अकरा वाजता.

आज रविवार असल्याने हॉटेल बंद होत. आनिशाला सुद्धा शाळेतून सुट्टी होती.बंगल्यातल्या भल्यामोठ्ठया हॉलमध्ये सोफ्यावर मल्हारराव बसलेले, त्यांच्या बाजुलाच त्यांची लेक आनिशा सुद्धा बसली होती.त्या बाप लेकीची काहीतरी चर्चा चालू होती. तर हॉलमध्येच असलेल्या किचन ओट्यापुढे सुशिलाबाई चहा कपात ओतत होत्या. दोन कप भरुन...त्यांनी बशी सहित ते ट्रे मध्ये ठेवले.

" बाबा , मला सुद्धा जाऊद्या ना सहलीला ! आमच्या वर्गातली सर्व
मुल जाणार आहेत!" आनिशाच्या शाळेतुन मूरुड जंजी-याला आणि अजुन ब-याच पाच सहा ठिकाणी सहल जाणार होती. त्याकरीताच आनिशा तिच्या वडिलांची परवानगी मागत होती.

" सहल वगेरे काही नाही हं!" सुशिलाबाईंनी ट्रे-मधुन एक कप उचलून
मल्हाररावांना दिल.

" बघा ना बाबा आई नको बोलतीये! " अनिशा तिच्या वडिलांकडे पाहत म्हंटली.तिच्या तोंडावर दयनीय भाव होते.

" अनु तू अजुन लहान आहेस ना बाळ, तुझी काळजी वाटतीये म्हंणुनच तर आई नको बोलतीये ना " मल्हारराव म्हंणाले.

" नाही ! मी आता लहान नाहीये बाबा , मी आता मोठी झालीये..! प्लीज जाऊद्या ना मला सहलीला नाहीतर मी कोणाशीच बोलणार नाही हा !"
आनिशाच्या नाकावर राग जमा झाला. पाठ वळवून ती एकटक पुढे पाहत गप्प बसली.

मल्हाररावांनी एकवेळ सुशिलाबाईंकडे पाहील. व हळूच डोळे मिचकावले.

" अनु तु माझ ऐकणार नाहीस का बाळ!" मल्हाररावांचा आवाज.

" नाही ऐकणार मी!" आनिशा जरा रागातच म्हंटली. तिला खरच राग आला होता.

" बर ठिक आहे , जा तू . बस्स " मल्हाररावांच्या इतक्याश्या वाक्याने
आनिशाने गर्रकन वळून तिच्या आई वडीलांकडे पाहील व खुद्दकन हसला.

" ठीके कधी जाणार आहे सहल आणि किती पैसे हवेत?" सुशिलाबाई म्हंणाल्या.
शेवटी आईच काळीज होत..त्यात एकुलती एक लेक होती.
विरोध तरा कसा करावा?

" दोन दिवसांनी मंगळवारी आणि फी दोनशे रुपये !"
आनिशा खळखलत हसत म्हंणाली. तिच्या आनंदाला सिमा नव्हती.

(सोमवार )डिसेंबर 12 2005

शाळेत जातांनी सुशिलाबाईंनी अनिशाला सहलीची फी दिली ,जी आनिशाने लागलीच जमा केली. शाळेतल्या मित्र-मैत्रिणींनी समवेत
हस्त-खेळत वेळ कस निघुन गेला व शाळा केव्हा सुटली कळलंच नाही !
पाठिवर दफ्तर घेऊन आनिशा घरी यायला निघाली होती.
वाट ओळखीची असल्याने घाबरण्यासारख काहीही नव्हत.
सूर्य मावळतीला झुकायला सुरुवात झाली होती. ज्या वाटेने अनिशा निघाली होती ती वाट म्हंणजे काहीशी झाडाझुडपां वेढलेली होती.
आजुबाजुला पाच मिनिटांवर झाडांव्यतिरिक्त काहीही नव्हत.
आनिशा एकटक स्व्त:शीच गणूगूणत चालली होती. की तेवढ्यात तिच्या कानांवर पंखफडफडल्यासारख आवाज आला.
तिच्या बाळमनात त्या आवाजाकरीता एक जिज्ञासा निर्माण झाली.

"कसला आवाज आहे हा ?" ती स्वत:शीच म्हंटली. डाव्या अशुभ बाजुने तो आवाज येत होता. झाडांच्या उभ्या गर्दीतुन आवाज येत होता.

आनिशाने त्या आवाजाचा पाठलाग केला. दहा-बारा पावल चालून ती त्या झाडांच्या इलाक्यात आली. तिथे जरासा गारठा आणि सावली होती.. तिथल्या खालच्या जमीनीवर पत्रावल्यांच्यात लाल-पिवळा कुंकू - त्यावरच टाचण्या टोचलेले पिवळे लिंबू, काळ्या बाहूल्या , तर कुठे काळ्या बिबव्यांची माळ, तर झाडांच्या खोडांवर मांणसांचे फोटो टाचण्या टोचून अडकवले होते. आणि त्यांपुढेच अगरबत्या लावल्या होत्या. वशीकरण-जारण, मारण असल काहीतरी अभ्द्र प्रकार होता का हा ?
तिथे बाजुलाच एक मान कापलेला कोंबडा शेवटची घटका मोजत बसला होता. त्याच्या देहातुन शेवटची हालचाल होत होती.
फडफड आवाज करत त्याने पंख फडफडवले...त्याच्या हालचालीने
काहीस लाल रक्त आनिशाच्या शर्टावर उडाल. करणी, भानामती -जादू-टोणा करणा-यांच क्षेत्र होत ते. त्या इलाक्यात नुस्ते श्रापित नैवेद्य त्या अभद्र सैतानी शक्तिस दाखवले होते. मानवाच्या पापी विवेक बुद्धीचा एक नमुना होता तो.

" शी ऽऽ काय आहे हे !" शर्टावर उडालेल्या रक्ताने आनिशा भानावर आली.
" बापरे आईने हे डाग पाहिल तर ओरडेल!" तीने तो रक्त हातानेच पुसला. व लागलीच तिथून पळ काढला.
परंतु त्या जागेतून ती एकटीच बाहेर पडली नव्हती...तिच्या मागे काहीतरी आल होत. बिनापरवानगीने ..? मुळीच नव्हे त्या रक्तामार्फत
तीच्या आत्म्याशी त्या अमानविय शक्तिचा संबंध प्रस्थापित झाला होता.
काहीवेळातच आनिशा घरी पोहचली. आल्या-आल्याच तिने कपडे काढले उद्या हाच युनिफोर्म घालून सहलीला जायचं होत ना? वॉशिंग मशीन मध्ये सुशिलाबाईंनी कपडे धुवत टाकले. - हात पाय धूऊन आनिशा अभ्यासाला बसली. अभ्यास झाल्यावर जेवण खावन करुन ते सर्व झोपायला निघुन गेले. उद्या आनिशाला लवकर उठायचंय होत ना ?
सहलीला जायच्या आनंदाने आनिशाला लवकरच झोप लागली.
त्याच रात्री मल्हाररावांच्या बंगल्याबाहेर काहीतरी घिरट्या घालत होत.
मध्यरात्रीच्या तीनच्या प्रहाराला .. अचानक त्या स्मशान शांततेत घुबडेचा घुत्कारण्याचा आवाज ऐकू येत होता.
" व्हू,व्हू,व्हू!" अशुभ संकेत आपटे छायाचित्र उमटवाणारा हा काळ प्राणी घुबड ह्या वेळेस ओरडण! म्हंणजे नक्कीच त्याला काहीतरी दिसत होत का? किंवा कोन्या अशुभाची तो चाहूल लावून देत होता? त्या रात्री सुशिलाबाईंनी तो घुबडेचा आवाज ऐकला होता.परंतु सकाळी लवकर उठायचं ह्या विचाराने त्या पुन्हा झोपी. गेल्या काळ्या आकाशात उमटलेला चंद्र मात्र ते अघोरी प्रकार पाहत होत. शेवटी एकदाची सकाळ झाली.

सहलीचा दिवस मंगळवार 12 डिसेंबर 2005 ...

सकाळी-सकाळीच सुशिलाबाईंनी आनिशाला उठ्वल.
अंघोळ धूतल्यावर , आनिशाने शाळेचेच कपडे घातले. नीट तैयार होऊन ती बाहेर बसली.तिच्या वडिलांच्या गाडीत बसुन ती शाळेत जाणार होती. मल्हारराव नेहमीप्रमाणे सकाळी सकाळी देवांसमोर दिवा लावत होते. देवघरात श्री स्वामी समर्थ, श्र्रीसाईबाबा, श्रीलक्ष्मी , आणि खंडरायाची तसबीर होती. देवांसमोर दिवा तेवत होता.

" अनु बाळ इकडे ये!" मल्हाररावांनी अनुला बोलावल. ती चालत त्यांच्यापाशी आली.

" अनु तू आज फिरायला चालली आहेस ना ? " अनुने शहाण्या मुलासारखी मान हलवली.

" मग बाप्पाच्या पाया पड पाहू! "

अनुने दोन्ही हात जोडले डोळे बंद केले. तेवढ्यात न जाणे कोठून हवा आली ? झपकन देवांसमोरचा दिवा विझला....दिवा विझताच लाईट सुद्धा गेली. देव कालोखात बुडाले , काहिवेळा अगोदर प्रसन्न चेह-याचे देव आता अंधारात बुडाले होते. काय अशुभ घडल होत हे ?मल्हाररावांच्य काळजात कळ उठली.

मल्हाररावांनी खस्सकन माचिसची कांडी ओढली..समोरचा दिवा पून्हा पेटवला. तांबडसर प्रकाशात देवांच्या मुर्त्या मल्हाररावांना भेसुर दिसल्या..जणु-जणू देव नाराज झाले असावेत.

" देवा...खंडराया...! माझ्याकडून काही चुकी झाली असेल तर माफ कर मला ! माझी एकूलती एक लेक आहे ..! ती सहलीला चालली आहे तिला सुखरुप परत आण ..! वाटलं तर तुझ्या दर्शनाला जेजूरीला घेऊन येईन मी पोरिला..!"
मल्हारराव दोन्ही हात जोडत म्हंणाले. त्यांच्या मनात वाईट विचार येत होते. एकवेळ तर अशी आली की मल्हाररावांनी अनिशाच सहलीला जायच केंसल केल . पन सुशिलाबाईंच विश्वास नव्हत ह्या असल्या गोष्टींवर ..म्हंणुनच आनिशाच जायच ठरल. मल्हाररावांनी
आपल्या मारुती गाडीतुन आनिशाला शाळेत सोडल. लाल परी सारखी दिसणारी बस तिथे थांबली होती. मुल मुली बसमध्ये चढतांना दिसत होते.

" अनु " मल्हाररावांनी अस म्हंणतच त्यांच्या गळ्यातुन एक काळदोर काढल..जे की खंडरायाच चित्र असलेल लॉकेट होत.

" बाळा हे लॉकेट गळ्यात घालून ठेव काढु नकोस! हं?"

" हो बाबा !" आनिशाने होकार दर्शवला. दुडु दुडू धावत ती बसपाशी पोहचली व पाय-यांवरुन चालत जात बस मध्ये बसली. शेवटी बसचालू होईपर्यंत मल्हारराव तिथेच थांबले होते.मुलांनी बस भरताच इंजीनचा घर्रघर आवाज झाला. लालबस निघुन गेली.

मुलांच्या दंगा मस्तीत, प्रत्येक ठिकाण फिरुन, सहल शेवटी रात्री साडे आठ पर्यंत फिरुन झाली.रात्रीच जेवण मुलांनी एका हॉटेलमध्ये केल, तर काहींनी घरुन आणलेल्या डब्यावर ताव मारला.

नऊ वाजता बसचा परतीचा प्रवास सुरु झाला. दुपारी मुलांच्या दंगा मस्तीने गजबजलेली बस,आता शांत होती. बसच्या खाली असलेला तो चंदेरी पत्रा सकाळी मुलांच्या आवाजाने कमी वाजत होता तोच आता बस खड्डयांतुन जाताच, खड-खड अभद्र आवाज करत वाजत होता.
काचेच्या खिडक्या सुद्धा थरथरुन वाजत होत्या. उघड्या खिडक्यांतुन थंड हवा आत येत होती. कानांत शिल घालून पुन्हा बाहेर जात होती.
बसच्या आत असलेले चंदेरी दिवे सुद्धा विझवले होते. बसमध्ये अंधार पसरला होता. सात - आठ मुल मुली व शिक्षक सोडुन .बाकी सर्व मुल
झोपेच्या आधिन झाली होती.

बसची वाट आता घाटातुन सुरु झाली होती. वेड्यावाकड्या रस्त्यावरुन नागमोडी वळण घेत लाल बस वर वर जात होती. दोन्ही तर्फे कधी खोलदरी लागत होती तर कधी एक डोंगर ! अशातच चालकाच नियंत्रण सुटल तर ? किती भयानक विचार .
छोठ्या गाड्यांना ओव्हरटेक करत बसने तो चढणीचा घाट पार केला..
घाटातल्या वेड्या-वाकड्या थरारक वळणांना पाहून जिव कसा खालीवर होतो नाही? मानवाच्या मनात कुठेतरी सुप्तवस्थेत लपलेली भीती न जाणे कोणत्या विचाराने , दृष्याने डोकवर काढेल..! त्याच काहीच नेम नाही!

रात्रीचे 11:45 pm झाले होते.
वेगाने घाट कापणारी बस न जाणे कशी? पन ड्राईव्हरने थांबवली.
इतकवेळ चालू असणार इंजीन, एक मोठा फुस्स आवाज सोडून बंद झाला. त्या आवाजाने झोपलेल्या मुलांना जाग आली. सरांनी बसमधली लाईट लावली होती. घाटात एकेबाजुला बस थांबलेली.

" काय झाल रे बसला ?" मुलांच्यात कुजबूज सुरु झाली.

" मुलांनो शांत रहा ! हे पहा , बसच चाक पंक्चर झालय ते काढव लागेल
तो पर्यंत कुणाला एक नंबर किंवा दोन नंबरला जायचं असेल तर जाऊन या !" सर म्हंटले व दरवाज्यातु निघून गेले.

" अनु ? " अनिशाच्या सीटवर तीची मैत्रिण रिया बसली होती.

"काय ?" अनु खिडकीतुन बाहेरच दृष्य पाहत म्हंणाली.

" मला एक नंबरला जायचं?" रिया म्हंणाली.

" मग नंदिनी मैडमना सांग ना! " अनु म्हंणाली.

"पन तू पन. चल ना!" रिया म्हंणाली. दोघीही नंदिनी मैडमजवळ आल्या . गो-यापान, देहाच्या परीसारख्या दिसणा-या नंदिनी मैडम मनाने सुद्धा चांगल्या होत्या. त्या मुलांना कधी मारत नसत! म्हंणूनच मुलांच्या फेवरेट होत्या. आवडत्या होत्या. दोघींनी मैडमची परवानगी घेतली . त्या दोघींसोबत मैडम सुद्धा बाहेर आल्या होत्या. ह्या अध्या अंधा -या वातावरणात मुलींना बाहेर एकट जाऊ देण कितपत चांगल होत.

बसमधुन बाहेर येताच आनिशाच्या अंगावर हवा धावून आली..त्या थंड हवेने तिच्या अंगावर मुळाच्या देठापासून शहारा उमटला. बसच मागच चाक काढून ड्राईव्हर दुसर चाक बसवत होता. त्याच्या बाजुलाच विजेरी हाती घेऊन पवार सर उभे होते.
मैडम त्या दोन मुलींना घेऊन बसपासुन जरा अंतरावर आल्या..
समोर घाटातली झाडझुडपांची बाजू होती. आकाशातल्या चंद्राच्या उजेडात त्या झाडांच्या सावल्या अंगावर धावून आल्यासारख्या भासत होत्या. डिसेंबरची नवखीच थंडी हळकस पांढर धुक घेऊन आली होती.
रातकीड्यांची किरकिर मंद गतीने वाजत होती..त्याच झाडाझुड़पांवर न जाणे कोठे ते अभद्र घुबड बसुन घुत्कारत होत. "व्हूऊ,व्हूऊ,व्हूऊ" कमरे इतक्या झुड़पांत न जाणे कसली"सल,सल, " ऐकू येत होती? कुणास ठाऊक!
आपल नित्यकर्म आटोपून रिया आणि मैडम एकेठिकाणी येऊन उभ्या राहिल्या. आनिशा अजुन आली नव्हती.
आनिशा हळकेच उभी राहीली ..बरोबर आणलेल्या सेनिटायझरने तिने हात स्वच्छ केले व मैडमकडे जायला निघणार तोच.
हे
" आ...नि..शाऽऽऽऽऽऽ!" अवतीभोवती पसरलेल्या धुक्याच्या पातळ रेशमी पडद्याला चिरत तो आवाज आला. आनिशाची पावले जागीच थांबली. तिने वळून मागे पाहील. पुढे पांढ-या धुक्याच्या वलयांतुन निलगीरीच्या झाडांच्या ती तमाम गर्दी उभी होती. जिकडे पाहाव तिकडे निलगिरीची ती पांढ-या खोडांची भुतासारखी झाडे उभी होती. आणि तिथूनच तो आवाज आला होता ना ?

" कोण आहे ऽऽ?" आनिशाने आवाज दिला. त्या अंधा-या स्मशान शांततेत आवाज घुमला. एकक्षण आनिशाच्या अंगावर सर्र्कन काटा उभा राहीला. दिलेल्या ओ आवजास प्रतिउत्तर आल नाही हे पाहून
आनिशा पुन्हा माघारी वळली.

" खिखिखिखी,हिहिहिह! आ..निशाऽऽऽऽऽऽ"

आनिशाच्या कानांत ते अभद्र , हिडिस हसू आण ती हाक, कानांतुन थेट काळजास भिडली. त्या गर्द अंधाराला पाहून मोठ्या मांणसाची सुद्धा पाचार धारण बसेल, तर ती आनिशा -तेरा -चौदा वर्षाची पोर काय चिज होती?

" को..को..कोण आहे?" तीचा थरथरता आवाज .

" मी !" एक घोगरा खर्जातला आवाज.

" म..म...मी कोण?"

" पाहायचं मला, हिहि,...हिहि!" त्या आवाजात आमंत्रण होत.

त्या वाक्यावर अनिशा काहीही बोल्ली नाही. तिच्या बाळ मनाला सुद्धा त्या धोक्याची चाहूल लागली होती..हो म्हंणालो आणि काही वेगळच समोर आल तर?हिडिस, कृल्प्ती, अमानविय,अनैसर्गीक काहीतरी.
जे बाहेर येताच न जाणे काय करेल? लढा देन म्हंणजे निव्वळ मुर्खपणा! ते विचार तर सोडाच पन तीच ते लहानग मन त्या कुरुप, अभद्र रुपाच ! काया स्वरुप दृष्य तरी पेलू शकणार होत का?

" अऽऽऽऽनुऽऽऽऽऽ! ये...ऊऽऽऽऽऽ काऽऽऽ मी ! हिहिहिह!"
त्या पुढे असलेल्या निलगिरीच्या झाडांवर, विस्फारलेल्या नजरेने अनिशाची नजर टिकली होती. तिच्या कपाळावरुन तो एका रेषेत खाली येणार द्रव बिंदू सर्रकन एकदाचा खाली येऊन जमिनीवर पडला.
त्या पांढ-या फट्ट निलगिरी झाडावरुन हलकेच एक राखाडी प्रेताड रंगाचा पंज्या बाहेर आला -त्या हाताची पांढरीफट्ट त्वचा आण काळी नख, एका लयीत फिरत होती. हळूच त्याच हाताजवळून एक अर्ध बिभत्स आकाराच डोक बाहेर आल. डोक्यावर चकचकीत टक्कळ न कपाळावर एक लाल रंगाचा रुपया एवढ़ा गोल टिकळा, बिन भुवयांच्या त्या वटारलेल्या डोळयात पिवळ्या रंगाच बुभळ, आणि टोकदार नाक , जबडा विचकून ते ध्यान हसला. त्याचे ते काळपट दातांच हिडिस हास्य पाहून .. ! त्या लहानग्या आनिशाच्या मणक्यातुन थंडगार भीतीचा लाट पसरली, जणु कोणीतरी बर्फ सोडला अंगावरुन .. !

" येऊ मी..? त्या दिवशी मी कोंबड खाताना कशी बघत होती मला..हिहिहीई!" कोंबड हा शब्द ऐकून एका क्षणात आनिशाच्या डोळ्यांसमोर ती काळची घटना दिसली.

" अनिशाऽऽऽऽऽ! मी तुला घेऊन जाणार माझ्याबरोब,मला तु आवडलीयेस खुप येशील माझ्याबरोबर! "
अस म्हंणतच ते ध्यान झाडामागून पुढे आल. साडे पाच फुट उंची ,
प्रेताड रंगाच हाडकूल देह , त्याच्या अंगावर वस्त्र नव्हत. अंधाराच पुत्र ते, कलियुगाच वंश ते ! निर्लज्ज , वासनेने भरलेले मलवट ध्यान होत ते. त्याचे पिवळेजर्द डोळे अनिशाच्या काळजाच ठाव घेत होते.

" ना...ना...ना..नाऽऽही!च" त्याच ते किळसवाण रुप पाहून आनिशाच्या
छातित श्वास अडकला. पोटात भीतीने खड्डा पडला. शरीरावरचा एक नी
एक केस ताठरला होता. भीतीने अशी काही वाचा बसली होती. की डोळ्यांतुन बुभळ बाहेर येतील.

" आनिशाऽऽऽऽ! काळपासुन मी तूझ्यासाठी थांबलोय..चल माझ्याबरोबर , आपण दोघ खेळू मस्त! हिहिही!" साडे तीन फुट उंचीची
आनिशा..आण समोर साडे पाच फुट उंचीच अभद्रध्यान पुढे येत होत.
त्याच्या तोंडावर पसरलेल विचकट वासनांधीश हास्य.. त्याच क्प्टी हेतू साध्य झाल होत ह्याची शाश्वती देत होत .

" ये ..ये..ये!हिहिहिहिही!" त्याने त्याच ते काडीसारख पांढरफट्ट हात हात वाढवल.

मागे मागे सरणारी आनिशा दगडाला ठेच लागून खाली पडली.
आणि तेवढ्यात घुंगरांचा व एक मानवी आवाज आला.

" काय रे ए ऽऽऽ ?" त्या आवाजात कमालीची जरब होती.
जाड राकीट आवाज होता तो. त्या आवाजात एक पाठीराख्याची भावना होती. एक सुखरुपतेची उब होती.
आणि तो आवाज आनिशाच्या मागून आला होता.

" बारीक पोरीस्नी एकटी गावून घाबरवतो व्हंय र रां×××च्या !"
आनिशाने गर्रकन वळून मागे पाहील.
एक पिलदार शरीरयष्टी असलेला, डोक्यावर गोल पिवळाधमक फेटा, कपाळावर भंडारा, ओठावर पिळदार मिशी, खांद्यावर काळी घोंगडी-आणि पायांत सफ़ेद धोतर -त्याच्या हातात एक दंडगोल घुंगरी काठी होती . पायात तोडा आण कमरेत करगोडा होता..
त्या आकृतीच्या डोक्या मागून प्रकाश किरणे पूढे येत होती..ज्याने आनिशाला त्याचा चेहरा दिसत नव्हता.

"तू..तू...? कशाला आला आहेस इथ !" ते ध्यान दोन पावल माग सरकल.

" ह्या पोरिस्नी वाचवाया !"

" नाय , मी हीला घेऊन जाणार ! .आवडलीये मला ही."

ते ध्यान गरजल , दोन पावल पूढे टाकत त्याने आपले हात आनिशाच्या दिशेने वाढवले तोच त्या दैवी पुरुषाने काठी आपटली घुंगरांचा आवाज झाला. सह्स्त्रो हजारो टाळांचा घंटानांद घुमला. आजुबाजुला वाहणारा विषारी वारा, दैवीशक्तिच्या प्रचितीने न्हाऊन निघाला. हजारो -लाखो सुर्यासारख्या तप्त दैवी शक्ति कणांची उर्जा त्या काठीतुन बाहेर निघाली..व त्या ध्यानाच्या अंगावर पडली.
" आऽऽऽऽऽऽऽ!" त्या ध्यानाच्या मुखातुन एक विचित्र गर्जणारा आवाज अंधाराला भोक फाडत बाहेर पडला. विचित्र सडका , कुजकट वास
बाहेर येत त्या अशुभ, अमानवीय शक्तिचा क्षणात नायनाट झाला.
आनिशा तिथेच बेशुद्ध होऊन कोसळली. काहीवेळाने तिथे मैडम आल्या व त्यांनी खांद्यावएर उचलून आनिशाला बस पर्यंत नेहल.
रात्री दिड वाजता बस शाळेत पोहचली.

दुस-या दिवशी:
....
आनिशाला जाग आली ! तेव्हा तिने सर्वकाही तिच्या वडिलांना सांगितल. आनिशाने ज्या ठिकाणी तो अर्ध मृत कोंबडा पाहीला होता..
तो एका आत्म्यावरुन उतरवला होता. आणि आनिशा ज्या जागेत गेली होती ती करणी, जादू करणा-यांच एक ठिकाण होत.
देवाने केलेली मदत मल्हाररावांनी ओळखली होती . साक्षात मल्हारी मार्तंड त्यांच्या मुलीच्या रक्षणाकरीता आला होता.

समाप्त :

अगड धूम नगारा सोन्याची जेजुरी,
देव गेले जेजुरा निळा घोडा…
..
पाव मे तोडा… कमरी करगोटा,
बेंबी हिर, मस्तकी तुरा…

खोबर्‍याचा कुटका.. भंडार्‍याचा भडका
बोल अहंकरा, सदानंदाचा येळकोट…

येळकोट येळकोट जय मल्हार.....

जयेश झोमटे.....
thanqu अनिशा सोनटक्के mam...🙏🏼😊...