1 Taas Bhutacha - 17 in Marathi Horror Stories by jay zom books and stories PDF | १ तास भुताचा - भाग 17

The Author
Featured Books
Categories
Share

१ तास भुताचा - भाग 17

प्रेमाची ताकद 2 भाग 2 अंत मार्गक्रमण .

काल्पनिक कथा.सदर कथेत मृतांची विधी काल्पनिक आहे.
कृपया कथेवाटे कोणत्याही गैर प्रयोग , अंधश्रद्धेला लेखकाला खतपाणी घालायचं नाही. लेखकाने कथेत भीतीची उच्चांक सीमा गाठली आहे. म्हणूनच कथा आपल्या निर्णयावर ठाम होऊन वाचावित.🙏🏼😊!
अभीच्या घराच्या उघड्या चौकटीपुढे हॉलमध्येच अभी भुईवर पालथा पडलेला दिसत होता.
"अभी वाचव , वाचव मला ! अभी हैल्प !"अभीच्या बंद पापण्यांआड कानांवर अंशूचा आवाज येत होता. शेणाने सारवलेल्या भुवईवर तो दोन्ही हात पुढे करुन पालथा पडलेला, डोळ्यांच्या बंद पापण्यांवर दोन्ही गोलसर बुभळे डावीकडुन-उजवीकडे हलतांना दिसत होती, कानांवर तोच तो ओळखीचा आवाज पुन्हा पुन्हा घुमत होता.
" अभीऽऽऽऽ! अभी वाचव मला, अभीऽऽऽऽऽ!" कानांच्या पडद्यांवर तो आवाज मोठ्याने अगदी टिव्हीचा आवाज वाढवावा तसा वाढत जात होता.त्या आवाजाची तीव्रता आता सहन करण्या पल्याड झाली होती.
अभीच्या बुभळांची हालचाल वेगाने होऊ लागली होती . जणू तो आवाज हो तो आवाज त्याच्या बेशुद्धावस्थेच्या बंधन कवचाला भेदून काढत होता. तापवलेली सुई जशी चामड्यात घुसावी तसा त्या आवाजाच्या तीव्रतेने अभी बेशुद्धतेतुन बाहेर येत होता. त्याच्या डाविकडुन-उजवीकडे जाणा-या पापण्यांमधल्या बुभळांची हालचाल आता एकाच जागेवर थांबली, आणि खाडकन त्याने डोळे उघडले.
" हुह्हहहऽऽऽऽ" नाकातोंडातुन निघालेल्या श्वासाने खालून हलकीशी धुळ उडाली. हाताचा एक कोपरा जमिनीला टेकवत तो जागेवर उभा राहीला. प्रहार झाल्याने डोक्यात होणा-या वेदना जाणवत होत्या,पन अंशूला वाचवण्यासाठी तो त्या वेदनेला दुर्लक्ष करणार होता. मनात न जाणे का!पन एक भावना निर्माण झाली होती- इतकी वर्ष अंशूसोबत राहिल्याने त्याच तीच्यावर प्रेम तर झाल नव्हत ना? नक्कीच! नाहीतर इतकी काळजी ? तिच्या जिवनाच काही बर वाईट झाल तर? हा काळजीरुपी प्रश्ण त्याला आतुन खात होता? तसही तिच्या जिवाच काही बर वाईट झालंच तर त्याला हाच जबाबदार राहणार नव्हता का? त्यानेच तर तीला सोबत चलण्याचा आग्रह केला होता !
" अभीऽऽऽ, अभिहीऽऽऽऽऽऽ" एक हलक्या स्वरातला ओळखीचा आवाज आला. आवाज स्वयंपाक घरातुन येत होता. त्याने त्याच्या जड पावलांनी शेवटी स्वयंपाक घर गाठल. मनातल्या संदी कोप-यातून बुडाला लपलेली काळजीरुपी भीती आता वर येत होती. तो आवाज?
" दा..दा..दाईमा!!" उघड्या चौकटीत येऊन तो हलकेच म्हंणाला. त्याच्या आईची जिवन मरणाची वेळ होती ती, तो ते पाहू शकत होता का? दुखाच्या बांधाला भुकंपाचे तडे बसले पूर्णत पुर वाहून आल.
" माईऽऽऽ! माई ऽऽऽऽऽ" म्हंणत तो दाईमापाशी पोहचला. त्याची दाईमा
चुलीजवळ असलेल्या भिंतीला पाठ टेकवुन दोन्ही पाय पुढे पसरवुन पोटावर एक हात ठेऊन शेवटची घटका मोजत बसली होती. सु-याच्या वाराने पोट फाटल होत, त्यातुन लाल रक्त आजुबजुला पाण्यासारख सांडल होत! त्याचाच वास सुटला होता.
" माई..! " अभीच्यप डोळ्यांतुन अश्रु वाहत होते. गेल्या काहीतासांत असं काही विलक्षण घडल होत, की ते मन मानायला ही तैयार नव्हत. पन जे सत्य आहे ते नाकारता येण अशक्य होत का? नाही ना! मग?
" नको रडू पोरा! माझ पापाच घड भरलं, म्हंणुनच तर मृत्यु बी मिळत नाही हाई,. हुं,हुं,हुं,हुं ." दाईमाच्या तोंडून हुंदका बाहेर पडला.
" सुखाच मरण बी मिळना झालंय ,"
" काहीही बोलू नकोस दाईमा ! पापी हा शब्द फ़क्त नराधमांना लागू होतो, जे स्व्त:हाचा विचार करतात , ज्यांच्या मनात दया-माया प्रेम भावना आस्तित्वात नाही. " अभीच्य वाक्यावर दाईमाने एकवेळ मंद स्मित हास्य करुन पाहिल.
" लेय मोठा झालास रे पोरा !" दाईमा हसल्या , तस पुढ़च्याक्षणाला तिच्या तोंडून रक्ताची एक गुळणी बाहेर पडली.-
" दाईमा..!" जड स्वराने तो उच्चारला-त्याच काळिज हादरल होत, त्याच्या मातेच्या ह्या वेदनेला पाहून.
" अं,हा ,अं,हा !" दाईमाला जरासा खोकला आला, व ती पुढे म्हंणाली.
" बस्स! आता काय बी बोलू नको पोरा"
" नाही नाही, तू चल मी तुला हॉस्पिटलला घेऊन जातो! "
अभीने दाईमाचा एक हात खांद्यावर ठेवला.
" मला वाचवशील मग त्या पोरीच काय? जीच तुझ्याव पिरिम हाई."
दाईमच वाक्य अभीच्या छाताडाला टोचल-
" अंशू!" मनाने हाक दिली.अभीचे डोळे जरासे मोठे झाले,तीचा विचार तो त्या मातेच्या ममत्वे स्पर्षाने विसरला होता तोच विचार त्या मातेने स्व्त:हा त्याला आठवुन दिला होता.
" होय पोरा ती पोर तुझ्यावर लेय पिरेम करते, तिच्या डोळ्यांत ते भाव मला दिसलेत पोरा..!" दाईमाने अभिच्या एका गालावर हात ठेवला.
"माझ जिव आता वाचणार नाय रे !" अभीच्या डोळ्यांतुन टचकन एक दुख अश्रु बाहेर आला.
" पोरा माझी एक शेवटची इच्छा आहे ती पुर्ण करशील?" ओलावळेल्या डोळ्यांनीच अभीने होकारार्थी मान हलवली.
" माझ्या देहाला तुझ्या हातुनच माती देशील!" अभीच्या मनाला हे वाक्य ऐकतांना अस वाटलं, की प्रथम आपणच का मेलो नाही! नक्की नियतीच्या मनात होत तरी काय? दाईमाच्या गालावर ठेवलेल्या हाताला त्याने दोन्ही हातांत पकडल, डोळ्यांतुन आसवे आणि तोंडातुन एका लहान मुलासारखे हुंदके काढत तो रडू लागला. कोण काय बोलेल? वेडा समजेल? हे सर्व विचार सूचण्याची परिस्थिती नव्हती. आता ह्याक्षणाला फ़क्त भावनांना वाट करून देणे हेच आवश्यक होत.
" ठिक आहे दाईमा!" अस म्हंणत त्याने वर पाहिल, दाईमाचे डोळे त्याच्यावर स्थिरावले होते-ओठांवर स्मित हसू होत. ती शुन्यातली नजर सर्वकाही सांगून जात होती.तो समजुन गेला तिने प्राण त्यागले आहेत. शेवटी उज्व्या हाताने त्याने दाईमाच्या पापण्या बंद केल्या.मग तिच्या दोन्ही हातांना आपल्या हातात घेऊन एकवेळ आपल्या गालांवर हलकेच स्पर्श केले मग त्याच हातांचे चुंबण घेऊन. दाईमाच प्रेत दोन्ही हातांत पकडून त्याने घराबाहेर आणल,
आकाशात अर्ध गोल चंद्र दिसत होता, मंद हवा सुटली होती. बाहेर येताच त्याने प्रेत हलूच खाली जमिनिवर ठेवल.तो पुन्हा घरात निघुन गेला , येतावेळेस त्याने एक वाटीत रक्त आणि दुस-या हातात एक सफेद धागा आणला, प्रेताजवळ येऊन तो गुढघ्यांवर बसला, धागा बाजुला ठेवुन दुस-याहाताने प्रेताची एक पापणी हळकेच वर केली,तसे त्याला दिसल- आतला पांढरट बुभळ काळ्या रंगात परावर्तित झाला होता. पांढ-या रंगाला काळ्या विषारी रंगाने गिळंकृत केल होत. हळू हळू पुर्णत प्रेत पांढरट पडायला सुरुवात झाली होती, त्या पांढरट प्रेताच्या त्वचेवर काळ्या रंगाच्या वाकड्या तिकड्या नसा स्पष्ट उमटळेल्या दिसत होत्या. चेह-यावरचे ओठ जरासे काळसर झाले होते-हाता, पायांची नख वाढत चालली होती. प्रेतातुन कुजकट वास बाहेर येत होता. जणु ते प्रेत एका पिशाच्चात परावर्तित होत होत? हातात असलेली रक्ताची वाटी त्याने दुस-या हाताने उघडल्या डोळ्याजवळ आणली हलकेच वाटीतुन रक्ताचे थेंब काळ्या बुभळांत सोडू लागला, तसे त्या काळसर बुभळांचा रंग लाल होऊ लागला, आणि डोळ्यांतुन वाफा बाहेर येऊ लागल्या. दुस-या डोळ्यातही त्याने तसंच वाटीतल रक्त ओतल, फस्स आवाज झाला , वाफ निघाली.
वातावरणात स्मशान शांतता जाणवत होती, रातकिड्यांची किरकिर हाताची घडी घालून गप्प बसली होती. बाजुला थोड दुर एका झाडावरती घुबड बसली होती. नपट्या चोचीने, पिवळ्या डोळ्यांनी एकटक त्या प्रेताकडेच पाहत होती. की तोच घुत्कारत "व्हू,व्हू,व्हू," आवाज करत पंख-फडफडवत ती त्या प्रेताजवळ आली. अभी हे सर्व काय करत होता? हे कसल अघोरी कृत्य होत? कसल तंत्र होत का हे? हे सर्व प्रश्ण तुम्हा सर्वांच्या मनात नक्कीच आले असतील? आणि साहजिकच आहे ते.जस की सामान्य मानव मेल्यानंतर काही विधी करुन त्याला जाळल जात.तसंच ह्या माटळ्यावाडीत राहणारा एक नी एक माणुस सैतान होता, म्हंणुनच त्याच नित्यकर्म विधी मानवी विधी पेक्षा वेगळे होते. माटळ्यावाडीतला माणुस मेला की तो ठिक एकतासाने पिशाच्च योनित परावर्तित व्हायचा-जन्म मृत्यु-जिवन ही संज्ञा इथे लागु नव्हती.आजुबाजुला अंधार पड़ला होता-आणि त्यात ते भक्कास प्रेत मनाला चटका लावून जात होत. अभीला प्रथमच भीती वाटली.
त्या घुबडेला पाहूण त्याने हळुच दाईमाच्या केसांना आपल्या हातात घेतल, मग मुठभर केस जेवढे येतील तेवढे उपटून काढले, मग बाजूचा सफेद धागा घेतला -एक तिरकस कटाक्ष त्या घुबडेवर टाकला, ती एकटक पिवळ्याजर्द भेदक डोळ्यांनी त्या प्रेताच्य चेह-याकडे पाहत होती. हीच स्ंधी साधुन त्याने हातांची वेगवेगवान हालचाल केली दोन्ही हातांच्या मुठीत ती घुबड पकडली.
" व्हूऊ,व्हूऊ,व्हूऊ,व्हुऊ..." आपले पंख फडफडवत ती घुत्कारत होती.
तो अभद्र भेसुर आवाज अंतयात्रेतल्या टाळांसारखा होता, राम नाम सत्यहे च्य घोषणेसारखा होता. दोन्ही हातात पकडलेल ते ध्यान सुटकेसाठी धडपड करत होत. अभीने हातातल्या केसांनी त्या घुबडेच्या मानेला फास दिला,
" आऽऽऽऽ,बा ,बा,बा,बा,बाऽऽऽऽऽऽऽ आऽऽऽऽऽ बा,..बा,ऽऽऽऽऽ"
विचित्र आवाजात अभी ओरडू लागला.त्याक्षणाला त्याच्या डोळ्यांतुन आसवे बरसत होती.त्या घुबडेच्या गळ्याभोवती आवळलेला हात पकड अजुन घट्ट करत जात होता- जंगलातला एक नी एक झाड त्या आवाजाने थरथरुन उठला , शहारला गेला. भेदरलेल्या डोळ्यांनी रानटी जनावर आप-आपल्या गुहेत लपून बसली. थंड हवेत तो आवाज तरंग उठवत पुढे पुढे जात होता.शेवटी ती घुबड मृत झाली. भयाण मृत्यु, डोळे अक्षरक्ष खोबण्यातुन बाहेर आले होते. त्याने ती मृत तपकीरी केसांची घुबड दाईमाच्या छातीवर गुणाकार रुपात ठेवलेल्या हातांत, एका बाहुलीसारखी खोसून ठेवली, मग पुन्हा धागा हातात घेतला, आणि मृत दाईमाच्या पाठीपासून ते दोन्ही हातांना अस मिळुन पुर्णत संपेपर्यंत बांधला, जस वडाला बायका बांधतात.
" दाईमा माफ कर मला!" त्याने बाजूचीच एक कुदळ घेऊन एक साडे पाच फुट मोठा खड्डा खणुन त्यात ते प्रेत व छातीवर ती मृत घुबड दोन्ही प्रेत मातीत गाडले आणि मोठ्या अंत:करणाने खड्डा बुंजवुन त्यावर एक झाड लावल.व बाजुलाच घराच्या पायरीवर येऊन तो बसला .काहिवेळ असंच शांततेत निघुन गेला तस अभिला अंशूची आठवन होऊ लागली.
" अंशु! " अभी हळकेच म्हंणाला. " कुठे घेऊन गेली असतील माझ्या अंशुला ती मांणस? " स्व्त:हाशीच विचार करत तो म्हंणाला.
" शट!" त्याने हाताची मुठ खाली आपटली." मी दाईमाला विचारायला हव होत.पन आता कस वाचवु मी अंशूला? कुठे शोधू तिला? जर त्या सर्वांनी तिला काही केल असेल तर? नाही नाही माझी अंशू ठिक असेल! तिला कोणीच काही केल नसेल! " सर्व रस्ते बंद झाले होते.अंशुला ते सर्व कुठे घेऊन गेले असतील? हा मार्ग त्याला सापडत नव्हत! मग अभी अंशुला वाचवणार होता तरी कसा! आपल प्रेम तो कस पुन्हा मिळवणार होता? डोक्यात वाईट विचारांनी भुंग्यासारखी भुणभुण सुरु केली होती. तो विश्वास ,धीर, हिम्मत, सर्वकाही त्या भितीमुळे हरवुन बसला होता.
मनात खोल बुडाला असलेली भीती हळू हळू दबक्या पावलांनी चालत
खिखिखि हसत त्याचा आत्मविश्वास खात खात पुढे येत होती.
अभी खाली मान घालून गप्प बसला होता..तोच पुढुन एक आवाज आला. मंत्रमुग्धिंत,धीरगंभीर, लक्षवेधक आवाज. त्या आवाजाने अभीने गर्रकन वळुन पुढे पाहिल. समोर एक भगव्या वस्त्रातले वृद्ध योगपुरुष उभे होते. v आकाराचा चेहरा होता, त्या चेह-यावर एक रहस्यमय तेज झळकत होत.ज्या चेह-याला पाहताच निराशा,भीती, काळजी ह्या भावनेंचा मनातला ठाण बाहेर धुडकावला जात होता. डोक्यावर पांढरट केसांच्या जटा होत्या, वाढलेली खाली लोंबणारी दाढी होती.डोळ्यांतली बुभळे लहानसर होती. गळ्यात-हातांत रुद्राक्षांच्या माळा होत्या.
" तूम्ही?" अभी काहीतरी आठवू लागला. त्यांना कुठेतरी पाहिल्यासारख वाटत होत.पन कुठे? मेंदूतली आठवण क्षमता साथ देत नव्हती! लक्षात येत नव्हत.
" बस्स जास्त विचार करू नकोस!" तोच गंभीर हवाहवासा आवाज वातावरणात दूमदूमला, हवेत विशिष्ट ध्व्नी लहरी निर्माण करु लागला.
" मी सांगतो, एकदा लहानपणी तु माझी मदत केली होतीस! " ते योगपुरष हसले.
" हो आठवलं! " अभीला ती आठवण आठवली, एकदा शाळेचा तास संपवुन, नेहमीप्रमाने अभी डोक्यावर लाकड घेऊन घरी यायला निघाला होता-तेव्हा वाटेतच अभीला हे योगपुरष बेशुद्धावस्थेत सापडले होते. त्यावेळेस अभीनेच त्यांची मदत केली होती- त्यांना एका झाडाखाली बसवुन , शुद्धीत आणल होत-मग आपल्याच जवळचं पाणि ही पाजल होत!
" त्याक्षणाला मृत्युदेवता आली होती. पन माझी वेळ नाही.अमृत अवतार म्हंणून तु स्वत:हा आला होतास , आठ्वत?" त्या योगपूरुषांनी
अभीला म्हंटल.त्यावर त्याने फ़क्त मंद स्मित हास्य करत, मान हळवली.
" बाळ आज तुझ्यामुळेच मी आहे! त्यावेळेस मी तुला काही देऊ शकलो नाही! पन मी म्हंटल होत!" अभीला ते बोल आठवले.
" तुला कधीही कसलीही मदत लागली, तर हमखास आमची आठवण काढ-आमच नाव आहे, समर्थ !"
" समर्थ !" अभी म्हंणाला.
" होय बाळ! आणि आज तो योग ख-या अर्थाने जुळून आला आहे. त्या नियतीने तुझ्या मदतीसाठीच आम्हाला इथे पाठवल आहे."
" माझी मदत ? !" अभी :
" होय बाळ! आम्हाला सर्व ठावुक आहे,की तु एका संकटात सापडला आहेस !तुझ प्रेम आहे ना त्या मुलीवर ?" समर्थांचा हा प्रश्न त्याला मोठ आश्चर्यकारक धक्का देणारा होता. पन वेळ धक्के खाण्याची नव्हती.
" होय समर्थ ! " अभी जागेवरुन उठला-आपले दोन्ही हात जोडले व म्हंणाला.
" प्लीज समर्थ! तुमची काही मदत झाली तर खुप उपकार होतील."
" उपकार !" समर्थ जरासे हसले , व त्याच्या बाजुलाच पायरीवर बसले ." बैस्स बाळ ! " त्यांनी अभीला बसण्यासाठी आग्रह केला.
तस अभी बाजुलाच बसला. एकटक त्यांच्याकडे पाहू लागला. तो मंद स्मित हास्य करणारा हसरा चेहरा,जणु समर्थांना कसलीच चिंता नव्हती.अस भासवत होता-आणि पाहणा-याच्या चेह-यावरही आपसुकच हसू यायचं.
" हे बघ बाळ घाबरु नकोस ! . मी फ़क्त मार्ग आणि उपाय सांगेल ! कारण नियतीच्या मार्गात अडथळे निर्माण करण माझ्या हाती नाही म्हंणुनच सर्व तुलाच करायचं आहे.. " समर्थ तर्जनी आकाशात दाखवत म्हंणाले.
" ठिक आहे समर्थ, मला काहीच प्रॉब्लेम नाही. तूम्ही फ़क्त मला हे सांगा की ते लोक अंशूला कुठे घेऊन गेले आहेत. !"
" उत्तम !" समर्थांनी मंद स्मित हास्य केल.
" आता ऐक !" ते सांगू लागले. व अभी गंभीर होत ते ऐकू लागला.
" गरुड पुराणानुसार, मानवाच निधन होताच आत्मा स्वर्ग किंवा नरकात जातो ! " अभीने होकारार्थी मान हळवली ऐकू लागला. आजुबाजूला माटळ्यावाडीत भक्कास काळपट ,उदासवाण वातावरण पसरल होत. आजुबाजुच्या उघड्या चौकटींची घरे, एका अज्ञात सीमेवरील दैत्याच्या आ-वासलेल्या मुखासारखी भासत होती.समर्थांचा आवाज तिथे पसरलेल्या त्या शांततेला बुडापासुन पोखरुन उपटून काढत होता दुर फ़ेकत होता. त्या पुर्णत वाडीत ह्या दोघांशिवाय कोणीही नव्हत. आजूबाजूचा काळअंधार जर समर्थ तिथे नसते, तर केव्हाचंच त्याला आपल्या विषारी गर्भात सामावुन गेला असता-पन समर्थांच्य शरीरातून निघणार ते असीम त्रिवेदी तेज त्या अंधाराला आव्हान देत होत. एक संघर्ष दृष्टीआड घडत होत. जे अभी पाहू शकत नव्हता -त्याकरीता दिव्यदृष्टी हवी होती.


क्रमश:
पुढील भाग आंतिम ..🙏🏼😊!..