1 Taas Bhutacha - 15 in Marathi Horror Stories by jay zom books and stories PDF | १ तास भुताचा - भाग 15

The Author
Featured Books
Categories
Share

१ तास भुताचा - भाग 15

भाग 15
फसगत 6
मध्यरात्रीचे अडिज वाजले गेलेले. त्यातच थंडीचा महिना असल्याने
काफर भरवणार धुक चौही दिशेना पडल होत. मध्यरात्रीची रातकिडयांची किर्रकिर्र अभद्रपणे कानांत वाजत होती. आकाशात काळ्या ढगांमुळे खाली जमिनिवर काळ अंधार पसरलेला, आणी त्या काल अंधारात दोन ढगांच घर्षन होताच, एक लक्ख असा निळा प्रकाश दिसुन येत धडाड धम आवाज होत-होता. रस्त्यांवरची भटकी कुत्री तो आवाज ऐकुन कुइकुई करत अंधा-या गल्ल्यांच्यात घुसुन, कालोखात भेदरलेल्या चेह-याने लपुन बसत होती. तर कुठे-कुठे शेतातली जमिनीवर खाली सरपटणारी जनावर तो आवाज ऐकुन व प्रकाश पाहून भीतीने आपल्या बिलांच्यात घुसत होती.घों-घो करत धुळ उडवत वाकड्या तिकड्या पारदर्शक हवेचे झोत ,चेटकिणी सारखे वातावरणात क्रुर हसत वाहत होते. दुर-कोठेतरी कब्रस्तानातल्या झाडावर बसलेली घुबड फड-फड करत पंख फडफडवत घुत्कारत होती. रात्रीचे वर आकाशात उडणारे रक्तपिशाच्च वटवाघळू वर आकाशात वीज चमकताच एका विशिष्ट प्रकारच्या भयरचनेत साकार होत होते, नरकातल्या अतृप्त आत्म्यांच्या काळ्या सावली सारखे ते भासत होते.वुडू बागेत असलेल्या त्या चार भिंतींच्या खोलीआड धाऊ आणि त्या अतृप्त आत्मा असलेल्या विग्यान नामक मुलाच सैतानाला कस हरवायच ह्यावर बोलन चालू होत.एकप्रकारे प्लानिंगच चालू होत अस म्हंणण पसंद करेल मी!
" त्या सैतानास्नी हरवायच कसं ?" धाऊने पाठमो-या विग्यानच्या आकृतीकडे पाहिल व म्हंणाले.त्यांच्या ह्या वाक्यावर विग्यानने हळूच एक गिरकी घेतली , विग्यानच सर्व लक्ष खाली होत.आणी त्या खाली पाहत असलेल्या चेह-यावर प्रश्नार्थक ,विचारमग्न भाव होते. जे की धाउंच्या नजरेतुन सुटले नाहीत.
" काय र! कसला इचार करतुस?" धाउंच्या ह्या वाक्यावर विग्यानने हळूच त्यांच्याकडे पाहिल व तोंड उघडल
" बाहुलीच !"
" काय बाहुलीच ?" धाऊ न समजल्यासारखे उच्चारले , त्यांच्या बोलण्यात प्रश्णार्थकपणा होता.
"अहो काका तीच ती बाहुली! जी त्या वुडू मांत्रिकावर मी हल्ला केल्यावर त्याच्या हातून खाली जमिनीवर पडली होती!"विग्यानच्या ह्या वाक्यावर धाऊला लागलीच ती बाहुली आठवली. त्यांनी खोलीत आजूबाजूला पाहिल, परंतु त्या पाण्याने भरलेल्या मडक्याच्या आणि त्या दोघांच्या शिवाय पुर्णत खोली रिकामी होती. की तोच धाउंच्या डोक्याच्या मेंदूतली एक तार छेडली गेली आणि डोळ्यांसमोर काहीवेळा अगोदरच घडलेल एक दृश्य दिसल.धाऊला ज्याक्षणी त्या गेटचा विद्युत अमानविय झटका बसला,त्याचक्षणी ती बाहुली धाऊच्या हातून सुटली जात एका अंधा-या झाडा आड उडाली होती.
" काका ? कुठे आहे ती बाहुली?" धाऊच्या कानांवर विग्यानचा आवाज आला , त्या आवाजाने धाऊची तंद्री भंग पावली व त्यांच्या तोंडून एक न समजल्या सारखा " आं काय?" उच्चार बाहेर पडला.
" काका ती बाहुली?" विग्यान पुन्हा म्हणाला.
" ती बाहुली..तर !" धाऊने अस म्हंणतच सर्व प्रकार त्या विग्यान समोर कथन केला. त्यांच्या प्रत्येक वाक्यावर विग्यानच्या चेह-यावर एक निराशजनक छटा उमटली जात होती .शेवटी सर्वकाही ऐकल्यानंतर विग्यान बोलु लागला.
" शट.. मग तर ती बाहुली, त्या मांत्रीकाला मिळण्या अगोदर आपल्याला लवकरात- लवकर शोधावी लागेल. !" विग्यान पटकन म्हणाला, त्याच्या ह्या वाक्यावर धाउंनी फक्त होकारार्थी मान हलवली.तसे विग्यान पुढे बोलू लागला.
" ती बाहुलीच ह्या सर्व खेळाची मुळ सोंगडी आहे,आणी त्या वुडू मांत्रीकाची शक्ति सूद्धा त्याच बाहुलीत आहे. एकदा का जर ती बाहुली आपल्याला मिळाली,की तीला लागलीच आग्नित भस्म कराव लागेल! ज्याने त्या मांत्रिकाने दिलेले सर्व बळी मुक्त होतील,आणि ती विद्या त्या मांत्रिक़ा वरच पलटेल! " विग्यानने अस म्हंणतच धाउंच्या दिशेने एक हात उंचावला व म्हणाला.
" तुमच्या खिश्यात माचिस आहे ना? " धाउंसाठी हा प्रश्न एक चमत्कारीक धक्काच होता, त्यांनी विग्यानला हे सांगितल सुद्धा नव्हत की आपल्या खिश्यात माचीस आहे म्हणुण.
" हो हो " अस म्हंणतच धाऊने ती खिशातली माचीस काढून विग्यानच्या हातावर ठेवली, नकळत विग्यानच्या हाताचा थंड स्पर्श धाऊच्या हाताला झाला, आणि त्यांच पुर्णत शरीर शहारल गेल.
मानवाच्या शरीरात जो पर्यंत आत्मा -जिवंत आहे, जो पर्यंत शरीराची हालचाल नी रक्तभिसरण सुरु आहे.पांढ-या पेशी लढण्यात सक्षम आहेत, तो पर्यंत मणुष्याचा देह जिवंत असतो. परंतु एकदा का पांढ-या
पेशी मरण पावल्या(कमी कमी होत गेल्या) , की मानवाच्या जीवनाच्या चक्राची गती मंदावली जाते.शरीरातले अवयव नियंत्रणाखाली जातात आणि मग शरीर खचत जात ,व शेवटी मानवाचा मृत्यु ओढ़ावतो.!मानवाच्या शरीरातुन प्राण निघुन जाताच निर्जीव (प्रेतरुपी ) शरीर थंड-थंड पडत जात. पेलोर मोर्टिस प्रक्रियेने शरीर गुलाबी पडल जात.मेलेल्या प्रेताच शरीर हलक पडत, सर्व नसा रिलेक्स झाल्याने तोंडाचा जबडा वासला जातो.हि सर्व लक्षण प्रत्येकाला ठावुक असतीलच. म्हणूनच मी काहीतरी वेगळ सांगणार आहे, विचित्र आणि भयानक! हदयाच थरकाप उडावणार सत्य. परंतु हे कितपत खर ह्याची वाच्यता-किंवा पडताळणी करु नये. काही जाणकार मांणसांच्या सांगण्या नुसार अस म्हंटल जात की मानवाचा मृत्यु झाल्यावर प्रेताला एकट सोडू नये. प्रेताजवळ एकदोन जण असावीत. ज्याने कोणतीही अमंगळ शक्ति त्या शरीरात मार्गक्रमण करु शकत नाही.माणुस मेल्यावर - त्या माणसाच्या प्रेताला(शरीराला) जास्तकाळ आस्तित्वात ठेऊ नये.अन्यथा पृथ्वीतळावर भटकणा-या अन्य वाईट आत्मा ह्या संधीचा पुरेपुर लाभ उठवु शकतात.त्या रिकाम्या शरीरात आपल बस्तान मांडू शकतात, जे की मानवाच्या जिवावर बेतु शकत.एकदा का त्या खाली शरीरात त्या आत्म्याने बस्तान मांडल,की काही अल्टीमेट्रीक्स बदलाव त्या निर्जीव शरीरात होतात.निर्जीव प्रेत ऊठून उभ राहत. हाता पायाची त्वचा अगदी चुना पोतल्यासारखी पांढरीफट्ट पडली जाते. सामान्य बुभुळांचा रंग जाऊन त्या जागी पिवळेजर्द,लाल रक्तरंजित, पांढरट रंग उमटत. हाता पायाची हाड कधीही हालचाल न केल्या सारखी वाजु लागतात.शरीर बर्फाच्या लादी सारख थंड जाणवत, कारण ते शरीर त्या अमानवीय शक्तिने हालचाल करत असत. मानवीय शक्ति म्हंणजे काय? रक्तभिसरण , हदयाची धडधड, दुस-या प्रती जाणवणारी भावना बस्स! परंतु अमानवीय शक्तिच्या हुकूमा खाली फिरणा-या त्या शरीरात ना हदय सुरु असत, नाही रक्तभिसरण सुरु असत, नाही त्या मनात कसली भावना शिल्लक राहिलेली असते. असते ती फक्त आणि फक्त एक रक्त मांसाची, कधीही न संपणारी भुक. (असो पुरे झाल माझ बोलण वाचक मित्रांनो ! नाहीतर किती बडबड करतो हा असं म्हणाल.!)
विग्यानने हळूच धाऊच्या हातुन माचिस बॉक्स घेतला,त्या माचीस बॉक्सवर शंकराच त्रिनेत्र रौद्र अवतार रुप धारण केलेल चित्र होत.आणी माचिसच नाव रौद्रआग्नि होत.विग्यानने हळुच तो माचिस बॉक्स उघडला .तसे त्या दोघांनीही एकदाच त्या माचिस बॉक्स मध्ये पाहिल.आत फ्क्त एक कांडा शिल्लक होता बस्स! आता त्या एक कांड्याने काय इतिहास घडणार होता? असो पुढे पाहुयात काय करतात ते दोघ , काय विचार आहेत त्या दोघांचे!
" आर देवा ! एकच कांडा शिल्लक हाय ! " धाऊने एकवेळ विग्यान मग त्या माचीस बॉक्सकडे मग पुन्हा विग्यानकडे पाहिल व पुढे म्हणाला.
" आता काय करायचं? आण तसंही ह्या एक कांड्यांन काय ती बाहुली जलाची न्हाय! "
" हो खर आहे तुमच काका , आणि तसंही आपल्याकडे दुसरा पर्याय सुद्धा नाहीये !" विग्यानच्या ह्या वाक्यावर धाऊच्या चेह-यावर जरा निराशा पसरली .काहीवेळ त्या दोघांमध्ये कोणीही एक शब्दही उच्चारला नाही, दोघेही फक्त कसल्यातरी गहान विचारात बुडाले होते.
माझ्यामते काहीतरी उपाय ते दोघे ह्या संकटावर शोधत अशणार ! असं मला वाटत! तुम्हाला ही हेच वाटत असेल बरोबर ना ?ठीके पुढे वाचा.
काहीवेळ त्या दोघांमध्येही पसरलेली विचारमग्न शांतता दुभागली गेली .
विग्यानने आपल तोंड जे उघडल होतं.त्याने काहीतरी युक्ती ह्यावर शोधुन काढली होती.
" काका एक आईडीया आहे!" विग्यानच्या चेह-यावर हसु उमटल.
ज्या हास्याला पाहुन,धाउंच्याही चेह-यावर एक हास्य पसरल.
" कसली ,आयडीया!" धाऊ जरा पटकन आतिउत्साहाने म्हणाले.
" काका ! ती वुडू बाहुली ह्या साध्या माचिसच्या कांड्याने कधीही पेट घेणार नाही.कारण त्या काळ्या बाहुलीवर काळ्या शक्तिच कवच आहे.आणी तसंही आंतिम युद्ध हे तुम्हाला स्व्त:लाच लढायच आहे .मी त्यात तुमची कोणतीही मदत करु शकणार नाही .आणी म्हणुनच मी असं ठरवलय .....!" विग्यानने एक दम भरला, व श्वास सोडत पुढे म्हणाला.
"की ह्या मचिसच्या एका कांड्यात मी माझी पुर्णत शक्ति ओतणार, ज्याने ह्या एका कांड्यात एका स्फोटका सारखी शक्ति निर्माण होईल.नी ज्यासरशी ह्या कांड्याच स्पर्श त्या बाहुलीला होईल, त्याचक्षणी त्या बाहुलीच्या वर असलेल्या काळ्या शक्तिंच्या कवचावर आघात होऊन त्या बाहुलीच्या चिंधड्या उडाल्या जातील.व त्या बाहुलीत असलेले सर्व आत्मे मुक्त होऊन जात,त्या मांत्रीकाचा आणि त्या सैतानाचा अंत होईल." विग्यानच्या ह्या वाक्यावर धाऊच्या चेह-यावर प्रसन्नहिंत हास्य पसरल.विग्यानने एकवेळ त्यांच्याकडे पाहुन होकारार्थी मान हलवली, नी पुढच्याचक्षणाला विग्यानने हळुच आपले दोन्ही डोळे मिटले .विग्यानने आपला माचिस बॉक्स असलेला डावा हात पुढे केला.आणी त्याचक्षणी तो माचिस बॉक्स अमानविय शक्तिने विग्यानच्या हातुन वर हवेत उडाला आणि एकाच जागेवर स्थिरावला. धाऊंच तर हे आकळन क्षमतेच्या पलिकडच चमत्कारीक दृष्य पाहुन डोळे मोठे झाले होते, तोंडाचा आ वासला होता. साहजिकच होत ते, तसंही सामान्य मणुष्याच्या तर्कापल्याड होत हे सर्व.नाही का? कोणत्याही आधार किंवा बळाशिवाय माचिस बॉक्स हवेत एका जागेवर स्थिरावला होता. की तोच विग्यानच्या शरीरातुन निघणार पांढरशुभ्र तेज , आता ह्याक्षणी आणखी प्रखर होऊ लागल.
इतक की धाऊंचे डोळे अक्षरक्ष दीपले गेले,नी त्रास सहन न झाल्याने त्यांनी डोळ्यांवर एक हात ठेवला. विग्यानच्या शरीरातुन निघणारा पांढराशुभ्र प्रकाश झोत आणखी-आणखी वाढत जात, पुर्णत खोली पांढ-या रंगात दिपुन गेली.नी पुढच्याक्षणाला त्याच्या तेजमय शरीरातुन विजेसारखे चारपाच गुलाबी रंगाचे वाकडे-तिकडे प्रवाह
निघाले जात थेट त्या माचीस बॉक्समध्ये घुसले.तसे ती माचीस बॉक्स
तांबड्या रंगाने चमकुन निघाली, नी त्या माचिस बॉक्सबाजुला वर हवेतच ठिंणग्या उडू लागल्या. लाईटच्या खांबल्यावर दोन वायर एकमेकांना घासताच जस चर,चर विशिष्ट प्रकारचा आवाज होतो, तसा आवाज त्या ठिंणग्या उडताच होऊ लागला. जणु ती अमानविय शक्ति त्या कांड्यात चेपुन-चेपुन भरली जात होती. काहीवेळानंतर विग्यानच्या शरीरातल तेज कमी-कमी होऊ लागल, ज्याप्रकारे एक ट्यूब बिघडण्या अगोदर चर-चरावी आणि पुढच्यावेळेला तीचा प्रकाश एकदाच मिटुन जावा.त्याचप्रकारे विग्यानच पांढरशुभ्र शरीरातल तेज मंद-मंद होत गेल.
काहीक्षणापुर्वी विग्यानच्या शरीरातुन निघणार पांढरशुभ्र तेज आता पुसट-पुसट झाल होत.त्याने आपली पुर्णत शक्ति त्या सैतानाच्या अंतासाठी त्या कांड्यात टाकली होती. ज्याने त्याच शरीर आता काजळी फासल्या सारख काळ दिसुन येत होत. विग्यानने हळुच आपले दोन्ही डोळे उघडले.त्या डोळ्यांत पाहता अशक्तपणा दिसुन येत होती, कारण त्याने आपली पुर्णत मायावी शक्ति एकदाच जी वापरली होती.म्हंणजेच त्या कांड्यात जी ओतली होती.विग्यानचे डोळे उघडताच हवेत तरंगणारा तो तांबड्या रंगाने उजळुन निघालेला माचिस बॉक्स हवेतुन मंद गतीने खाली त्याच्या हाती आला. विग्यानने एकवेळ त्या माचीस बॉक्सकडे आणी हळूच पुन्हा समोर धाऊंकडे नजर वळवली .धाऊंच लक्ष तर विग्यानकडेच होत. विग्यानने आपला माचिस असलेला हात, धाऊंच्या पुढे सरकवला नी त्याचक्षणी तो तांबड्या रंगाने ऊजळून निघालेला तो माचिस बॉक्स हवेत उडाला..तसे धाऊ समजुन गेले.त्यांनी आपला एक हात समोर वाढवला त्यासरशी प्रखर मायावी शक्तिच्या तांबड्या रंगाने उजळून निघालेला तो माचिस बॉक्स धाऊंच्या हाताच्या पंजावर आला.
धाऊ तर एकटक काहीक्षण त्या मानवी बुद्धीपलिकडच दृष्यपाहतच बसले , म्हंणजेच त्या माचिस बॉक्सला न्याहाळतच बसले असंच म्हंणा.
" काका !" विग्यानच्या मुखातुन एक खोल गेलेला आवाज आला.
काहीक्षणापुर्वी विग्यानचा जो आवाज चौही दिशेना भारदस्तपणे घुमत होता, तोच आवाज आता अशक्त झाला होता. हे ते कारण होत.
" काय र? तुझ्या आवाजाला काय झालंय.! "
धाऊंनी आपली चिंतीत भावना व्यक्ती केली.
" ते सांगण्यासाठी आता वेळ शिल्लक नाही काका, तुम्हाला लवकरात लवकर ती बाहुली शोधुन तीला नष्ट करावी लागेल! "
त्याच खोल गेलेल्या अवस्थेतल्या आवाजात पुन्हा विग्यान उद्दारला .
धाऊंनी त्यावर फक्त होकारार्थी मान हळवली.व एकवेळ त्या माचिस बॉक्सकडे पाहुन आपली पाऊले थेट दरवाज्याच्या दिशेने उचलली.
पाच सहा पावल चालून धाऊ दरवाज्यापाशी पोहचले ,तसे त्यांच्या कानावर विग्यानचा पुन्हा आवाज ऐकू लाला .
" काका?" धाऊंनी हळूच मागे वळुन पाहिल.तसा विग्यान पुढे म्हणाला.
" एक गोष्ट लक्षात ठेवा ! तुम्हाला त्या बाहुलीला नष्ट करण्याचा फक्त आणी फक्त एक चान्स मिळेल! कारण कांडा एकच शिल्लक आहे! " अस म्हंणतच विग्यानने आपला एक हात उंचावुन एक बोट वर करत पुढील वाक्य पुर्ण केल ."
" एकच वार , एकच प्रहार !" विग्यानच्या मुखातुन शेवटच वाक्य निघाल त्याचे हे शब्द ऐकुन धाऊंच्या पोटात गोळाच आला,परंतु पुढीलसेकंदालाच त्यांनी स्व्त:ला सावरल एक आवंढा गिळला आणि दोन्ही डोळ्यांच्या भुवया ताणून अगदी लढाय्या पवित्रा स्विकारल्या सारखी धीरगंभीरपणे होकारार्थी मान हळवली, नी दरवाजा उघडुन बाहेर पडले.धाऊ बाहेर जाताच इकडे खोलीत असलेल्या विग्यानच्या आत्मरुपी शरीराच सफेद धुळीकणांत रुपांतर झाल , जणु तो अदृश्य झाला असावा! थंडीचा जोर त्वचेतुन आत जात मांस गारठावा तसा वाढला होता.रातकिडयांची किरकिर थांबली होती. जणु अंधारातुन कोणीतरी येत होत, ज्याची चाहूल किटकांना लागली होती.
वर आकाशात काळाकुट्ट सर्वहारक अंधार पसरला होता.त्या अंधारात
त्या ढगांचा मनभेदक आवाज होताच, गुलाबी रंगाची विज चमकत होती. सोसाट्याचा वारा कानात घों-घों करत मृत्युची शिळ वाजवत होता.अंधारातुन वाट काढत , आजुबाजुचा कानोसा घेत धाऊ वुडू बागे बाहेर पडल्या जाणा-या गेटजवळ आले.कारण ती डॉल जी तिथे शोधल्यावर मिळणार होती! ,परंतु नक्की मिळणार होती का?
धाऊंनी लागलीच आजूबाजूला शोध घ्यायला सुरुवात केली.
अंधा-या रात्रीत आजूबाजूची झाड काजळी फासल्यासारखी काळी-निळी पडली होती. नी त्या झाडांबाजुनी पांढरट धुक आपली ग्स्त घालत होता. हाड मांस गोठणारी थंडी अंगाला झोंबत होती. एक-एक काळ्या निळ्या पडलेल्या झाडाबाजुला धाऊ त्या बाहुलीचा शोध घेत होते.धाऊंची शोधक नजर अंधारात चौहिदिशेना फिरत होती.इतक्या थंडीतही त्यांचा चेहरा घामाने भिजला गेलेला.की तोच भिर-भिरणा-या त्यांच्या नजरेस ती एक फुटी मातीपासुन बनलेली चौकलेटी रंग असलेली, डोळ्यांच्या जागी सफेद गोल मनी लावलेली, तोंडाच्या जागी
लाल रक्त फासलेली वुडू बाहूली दिसली.त्या बाहुलीला पाहुन धाऊंच्या चेह-यावर मोठ खजाना-भगदाडच हाती मिळाल्या सारख हसू पसरल.
एका झाडाच्या फांदीवर ती बाहुली अटकली होती.जी धाऊने लागलीच घाई करत आपल्या हाताने काढुन घेत खाली जमिनीवर ठेवली.नी दुस-या हाताने खिशातुन तो माचिस बॉक्स बाहेर काढला.त्याचक्षणी रात्रीचा अमानविय काल अंधार त्या माचिसच्या लकाकणा-या तांबड्या प्रकाशाने बाजुला सारला गेला. धाऊने माचिस बॉक्स उघडून .आत पाहिल .आत तांबड्या रंगाने ऊजळून निघालेला एक कांडा धाऊंना दिसला.जो की त्यांनी लागलीच बाहेर काढला, नी क्षणार्धात तो कांडा हातात घेऊन वेगाने त्या माचिस बॉक्सवर ठेवुन घासणार आणि एक मोठा प्रकाशझोत उमटनार त्या सैतानाचा अंत होणार की तोच धाऊंच्या कानांवर एक ओळखीचा आवाज पडला.ज्याने तो हात कांड्यासहित जागेवरच थांबला.
" अहो .!" हवेच्या एक मंद झोतासरशी संमोहित करणारी आपुलकीचा आवाज असलेली हाक धाऊंच्या कानांवर पडली.तो आवाज ऐकुन धाऊंच भान हरपल.जे काम ते करायला आले होते , ते काम ते त्या आवाजाने विसरुण गेले.
" अहो! .." पुन्हा तो हलकासा मनमोहित करणारा आवाज धाऊंच्या कानांवर पडला.त्या आवाजासरशी धाऊ खाडकन आपल्या जागेवरुन
उठले, व अवस्थपणे धुक्यांत आजूबाजूला पाहू लागले.अस काय होत त्या आवाजात? की धाऊ आपल्या जागेवरुण ते काम विसरुण उठले होते.? आणि आजुबाजुला कोणाला शोधत होते ते?
धाऊंच्या डोळे पाणावळे होते, आणि ती पाणावळेली नजर आजुबाजुला अधाशासारखी फिरत होती.की पुढच्याचक्षणाला धाऊंच्या मागे असलेल पांढरट धुक फुंकर मारल्या सारख गायब झाल, आणी त्या धुक्यातु एक हिरवा लुगडा नेसलेली स्त्री बाहेर आली.त्या स्त्रीच्या कपाळावर लालभडक रक्तासारखा रुपया येवढा कुंकू भरला होता.डोक्यावरचे केस.काळे असुन त्यावर पदर ओढ़ला होता. गळ्यात विविध प्रकारचे सोन्याचे दागीने नढलेले होते.हातात हिरवा चुडा होता.नाकात मोठी नथ होती.धाऊंना त्या स्त्रीचा थांगपत्ता लागला नाही.तसा त्या स्त्रीने धाऊंना आवाज दिला." अहो..!" नी आवाज देताक्षणी त्या स्त्रीचे डोळे पिवळेजर्द रंगाने चमकले , आणि त्या उघडलेल्या तोंडातुन सुळ्यासारख्या रक्तपिपासु खुनशी दातांच दर्शन घडल. सैतानाने डाव शेवटी टाकला होता, आता पाहायचं हे आहे की धाऊ फसतात की नाही त्यात? पाठीमागुन आवाज आला तसे पाणावळेल्या डोळ्यांनी धाऊंनी गिरकी घेत मागे वळुन पाहिल. मागे त्यांची धर्मपत्नी ऊभी होती.मेलेल्या मांणसाच्या आत्म्याला दुखावण्याचा काम ह्या सैतानाला बरोबर जमत असतं!नाही का?
" पुष्पे ! पुष्पे..!"
धाऊ आनंदात म्हणाले, त्यांच्या पत्नीला पाहुन त्यांच्या भावना उफाळून आल्या होत्या.
" अव, तिकड काय करताया ..ह्या की हिकड? मला तुमच्यासनी कायतरी .. बोलायचं हाय!"
धाऊंच्या पत्नीच क्प्टी-रुप आणि त्या रुपासहित घेऊन आलेल्या वाईट हेतुने ते पिशाच्चदेव म्हणाल.तो आवाज ऐकुन धाऊंच्या मनावरचा ताबाच सुटला नी त्यांनी लागलीच आपली पाऊले त्या सैतानाच्या दिशेने उचलली , धाऊंच्या शरीराची हालचाल होतात त्या सैतानाचे डोळे कसे खुनशीपणे चमकले.हेतु साध्य होतंय म्हंटल्यावर आनंद तर होणारच! नाही का? परंतु हा आनंद असुरी होता, क्प्टी, नीच, वासना, लोभ ह्या सर्वांनी भरलेला.
" थांबा काका , !" धाऊंच्या मागुन एक आवाज आला, जो की विग्यानचा होता.आवाज येताच धाऊंनी मागे वळून पाहिल.
"त्या तुमच्या पत्नी नाहीत! तो सैतान आहे ? तुम्ही त्याच ऐकु नका ! मागे फिरा आणि ती बाहुली जाळा ! " धाऊंनी एकवेळ विग्यानकडे पाहिल आणि पुन्हा एकवेळ आप्ल्या धर्मपत्नी समोर कटाक्ष टाकला.
" अहो तुम्ही त्याच ऐकु नका! तुम्ही या पाहू इकड!" धाऊंकडे पाहुन ते पिशाच्चदेव म्हणाल.
" नाही काका! तुम्ही त्याच ऐकु नका! तो तुम्हाला फसवत आहे! आठवा काका -काका आठवा ? तुमच्या पत्नीने आजपर्यंत फक्त तुमच्या सुखातच सुख मांडळय, मग त्यांच्या अंगावर इतक सोन , दाग-दागीने कोठून आले ?!" विग्यानने बरोबर नेम धरला,नी त्याचक्षणी त्या पिशाच्चाने आपल खर रुप समोर आणायला सुरुवात केली.ते दाग-दागीने, धाऊंच्या पत्नीच रुप सर्वकाही त्या सैतानाच्या मायावी शरीरावरुन अक्षरक्ष सडुन खाली पडल.आणि आता त्या जागी उभ होत
एक बिभत्स-अभद्र अकल्पित आकार. दोन काळ्या शक्तिंच्या देहांच मिळण झाल होत.त्या मांत्रीकाने सैतानाला आपल्या शरीरात प्रवेश दिला होता, ज्याने समोर अकार धारण केलेल सैतानी रुप, अर्धदेह
मांत्रिकाचा पांढरफट्ट चेह-याच झालेल, तर अर्धशरीर त्या सैतानाच्या पांढराफट्ट चेहरा नी धारधार सुळ्यासारख्या पिशाच्चमय दातांच झालतं,
त्या सैतानाच्या डोक्यावर एक शिंग उगवला होता, तर अर्ध डोक टक्कल स्वरुपात होत.डोळ्यांची छटा लाव्ह्यासारखी उकलत होती, बुभुळातुन
अक्षरक्ष ज्वालारहिंत वाफा निघत होत्या.
" ए कार्ट्या ..!" एक भयंकर अमंगळ शक्तिचा जोड असलेला, खर्जातला
आवाज त्या सैतानाच्या मुखातून निघाला.आणि त्याने आपला एक हात पुढे केला.त्याचक्षणी त्या सैतानाच्या पांढ-याफट्ट हातातुन एक स्फटीकासारखा तांबड्या आगीचा गोळा बाहेर निघाला, आणि अमानवी वेगाने त्या गोळ्याने विग्यानच्या दिशेने प्रस्थान करत शरीरावर आघात केला.काचेवर दगड लागताच खळखळ करत त्या काचेचे तुकडे व्हावे आंणि काच फुटावी तस विग्यानच शरीर फुटल. त्या सैतानाच आपल्याकडे लक्ष नाही हे पाहुन धाऊंनी आपल्या शरीराची वेगाने हालचाल केली.आणि त्या बाहुलीसमोर उभ राहून, हातात असलेला तांबड्या रंगाने चमकत असलेला कांडा, असा काही माचिसवर घासला, की माचिसचा कांड्याने सर्रर आवाज करत निळ्या रंगाच्या ठिंणग्या उडवत पेट घेतला, त्या निळ्या रंगाचा प्रकाश धाऊंच्या तोंडावर पडला.कांडा पेटला हे पाहताच त्या अमानवी देवतेने एक गगनभेदी किंकाळी ठोकली आणि एका कोळ्या सारखा चारपायांवर वेगाने धावतच धाऊंच्या दिशेने निघाला; त्याच मार्गक्रमण आपल्या दिशेन होत आहे हे पाहून धाऊंनी पटकन तो कांडा आप्ल्या हातुन थेट खाली बाहुलीच्या दिशेने सोडला नी थेट मागे वळून गिरकी घेत जागेवरुनच एक उडी घेतली. एक 25×चा व्हिडिओ प्ले व्हाव तसे सर्वकाही घडु लागल. सर्व काही स्लोमोशनने घडू लागल
इकडून त्या सैतानाने धावता-धावताच आपल्या चार पायांवर जबडा वासून, डोळे वटारुन त्या बाहुलीच्या दिशेने झेप घेतली.इकडे तो निळ्या प्रकाशाने ठिंणग्या ऊडवत तो कांडा हवेतुन थेट हलके-हलके खाली येत होता.धाऊंनी विरुद्ध दिशेने उडी घेतली होती , आणि मागुन त्या सैतानाने त्या बाहुलीच्या दिशेने उडी
घेतली होती.इकडे निळ्या प्रकाश झोताने पेटलेल्या त्या कांड्यामधुन चर-चरत ठिंणग्या
उडत होत्या, आणि तो मायावी शक्तिने नढलेला कांडा पाण्याच्या थेंबाचा सारखा त्या बाहुलीच्या दिशेने निघाला होता.
त्या सैतानाने घेतलेली झडप वेगाने त्या कांड्याच्या दिशेन आली होती, आणि कोणत्याही क्षणाला तो कांडा त्या सैतानाच्या हाती लागणार . की तोच त्या कांड्याचा स्पर्श ता बाहुलीला झाला , आणी त्याचक्षणी त्या मातीच्या बाहुलीला भुंकप येऊन जमिन फाटावी तश्या चिरा पडू लागल्या.आणी त्या चिरांमधुन तांबड्या रंगाची किरण वेगाने बाहेर पडू लागली. आणी ती मातीची बाहुली जमिनिवर तडफड करत पुढच्याचक्षणाला तीचा एक (धडाम्ं....) स्फ़ोट्क आवाज होत , तांबडा प्रकाश उडवत स्फोट झाला, बाहुली फुटताच त्या सैतानाच्या शरीराच विस्तवांत रुपांतर होऊन मग त्याची त्या धमाक्यात राख झाली.
त्या मायावी शक्तिचा स्फोट इतका त्रिफाट शक्तिशाली होता , की त्या धकक्याने धाऊ थेट बागेचा गेट तुटुन वुडू बागे बाहेर पडले.
धाऊंच्या डोळ्यांसमोर अंधारी येऊ लागली आणि त्या अंधारी येणा-या डोळ्यांसमोर पुढीलक्षणालाच एक भयंकर आगीचा लोट नी लोट उडावा तसे स्फोट झाला.ती बाग अक्षरक्ष नरकात रुपांतरीत झाली. चौहीदिशेंना
तांबड्या आगीने फैलाव घातला.नी त्याचक्षणी धाऊंच्या बंद होणा-या
डोळ्यांसमोर विग्यानची पांढ-या शुभ्र तेजात मंद स्मित हास्य करत, हात हलवत असणारी आकृती धाऊंना, हवेत विरुन जाताना दिसली. व
धाऊंच्या पापण्या जड झाल्या जात डोळे मिटले गेले.
.
कथेचा शेवट
वुडू बागेजवळ असलेल्या गावक-यांनी धाऊंना हॉस्पिटल मध्ये भरती केल.पोलिस तपासात पोलिसांना त्या दोन एकर बागेत दर जळालेल्या झाडाखाली एकुण एकहजार नऊशे नवव्यानऊ प्रेत
मिळाले , जे की मिसिंग केसेस मधली लोक होती.न्यूज वाल्यांमुळे ही घटना , पृथ्वीवरच्या काना कोप-यात पोहचली .आनी एकच थरथराटमय कल्लोळ उठाला.सरकारने धाऊंना ह्या कारनाम्या खातीर
वीस कोटी बक्षीस दिले..ज्याने धाउंच पुढील जीवन सुखी आनंदात गेल.

समाप्त: