वर आकाशात पांढराशुभ्र चंद्र उगवला होता. परंतु कधी कधी मोठ मोठे काळे ढग मध्ये येऊन चंद्राचा तो प्रकाश लपवत होते.काळे ढग चंद्रासमोर येताच जमिनीवर अंधार पसरत होता. रक्तपिपासु अंधार. रातकिंडयांच्या किर्रकिर्रण्याचा आवाज चौही दिशेना प्रेतयात्रेत वाजणा-या टाळांसारखा ऐकू येत होता.कधी- कधी एक घुबड घुत्कारत होती, कसल्यातरी अनाहुतपणाची चाहूल देऊन जात होती.अंधारात पाहताच कोणीतरी काळे कपडे घालुन, त्या अंधारात उभा आहे ,वावरत आहे असं भास होत होता.
एक एक पाऊल वाढवत हातात पिवळ्याजर्द विजेरीचा प्रकाश घेऊन धुक्यातुन वाट काढत धाऊ पुढे पुढे निघाला होता.लक्ष जरी विजेरीच्या प्रकाशाने उजळून निघणा-या पायवाटेवर असल, तरी मनात मात्र वेगळेच विचार चालू होते.काहीवेळां अगोदर आपण स्व्त:च्या डोळ्यांनी जे पाहिल ते खर होत का? की आपल्याला भास झाला होता. तो आकार ते रुप खरच डोळ्यांसमोर नक्की काय दिसल होत. काय होत ते , आणी ते जे काही होत नक्कीच मानवीय नव्हत.काहीतरी वंगाळ होत ते. परंतु ते नक्की आस्त्तीत्वात होत की नाही हे मात्र मनाची घाळमेळ वाढवणार प्रश्न होता. धाऊच्या मनात वेग वेगळे भीतीदायक विचार उत्पन्न होत होते. ज्याच कनेक्शन थेट मेंदूमध्ये जाऊन ,डोळ्यांभोवती आप्ल्या कल्पना शक्तीने वेगवेगळे भयरंजित दृष्य साकारले जात होते.मानवाची कल्पनाशक्ति जरी देवाने दिलेली एक उत्तम लाभदायक देणगी असली. जिच्यावाटे मणूष्य हव तस देखाव निर्माण करु शकतो , हव ती कल्पना करु शकतो. मित्रांनो खर पाहता नाण्याला नेहमी दोन बाजु असतात.प्रथम चांगली आणि दुसरी म्हंणजेच वाईट.कल्पनाशक्तिने जशी चांगली गोष्ट आप्ल्या डोळ्यांसमोर आपण रेखाटू शकतो . त्याचप्रकारे एक वाईट गोष्ट सुद्धा रेखाटली जाऊ शकते.नाही का? .समजा आपण कुमकुमत मनाच्या मानवाने रसत्यावर, स्टेशनवर अपघात पाहिला.तर रात्री निद्राव्स्थेवेळी ती दिवसाढवळ्या अपघाती घटनास्थळावर जमलेली गर्दी , नी त्या घोळक्यात मधोमध रक्तबंबाळ अवस्थेतल प्रेत.ह्या सर्व द्र्ष्यांची चित्रफित एका विशिष्ट प्रकारच्या भयरचनेतून डोळ्यांसमोर सादर होते नाही का? मनात त्याचक्षणी घाळमेळ सुरु होते,डोक बधीर होत.छातीत धडधड वाढते, नी शेवटी छातीत चमकु लागत नी शेवटच्याक्षणी ती छातीत जाणवणारी कळ वाढत वाढत जात ह्दयाततीव्र झटका येतो नी पुढच्याचक्षणाला डोळे मिटतात ते कायमचे.
म्हणुनच माझ्यामते ही कल्पनाशक्ति जितकी चांगली आहे, तितकीच
वाईट सुद्धा. श्रापीतलेल्या निळ्याभोर आकाशातल्या टीमटिमणा-या
चांदण्यांमध्ये आज , अजून एका चांदणीची भर पडणार होती. मानव अस्ं म्हंणतो, की मणुष्य मेला की तो एका चांदण्यात रुपांतरीत होतो.
मग समजा आज धाऊमेला तर त्याच सुद्धा चांदण्यात रुपांतरीत होईल का? की ह्या सर्व मानवाच्या भाकड कथा आहेत. विज्ञानानुसार मणुष्य
मरण पावताच त्यास अग्नी, दफन कराव.मग त्याच पुढे काय होत?
अग्नी देताच शरीराची राख होते, दफन केल्यावर प्रेताच शरीर सड़ायला सुरुवात होते.मग पुढे काय होत? मोक्ष अथवा मुक्ती मिळावी ह्या साठी केले जाणारे ते पुजा अर्चाचे तेरा दिवस. ज्यातुन आत्म्याला पुढे जाण्याची गती मिळते.मित्रांनो काही काही गोष्टींच गुढ साक्षात विज्ञानाला सुद्धा सोडवता आल नाहीये. कारण त्या बाबी मानवाच्या आणि विज्ञानाच्या दोघांच्याही बुद्धीला कलाटणी देणा-या आहेत.
साक्षात विज्ञान सुद्धा हे मानतो की अंधार फक्त अंधार नाही.त्या अंधारात एक वेगळच जग वसलेल आहे, एक वेगळीच मिती आहे त्यात.
त्या अंधारात मानवासारखच जग आहे, फरक पाहता इतकाच आहे की
त्या अंधारात वावरणा-या आकृती मानवीय नसुन अमानविय आहेत.सैतान , एव्हिल, डेव्हिल, जादू×टोणा, भुत,पिशाच्च ह्या सर्वांच आस्तित्व ह्या जगातुन आलेल आहे, एकाप्रकारे ऊत्प्त्तीच म्हंणा.
असो पुरे आता आपन कथा वाचुयात.
रातकिड्यांची किरकिर धाऊच्या कानांत वाजत होती.पांढरट धुक नी गारठा अंगाला झोंबत होता.वर आकाशात चंद्राच्या प्रकाशात एक दोन रक्तपिशाच्च वटवाघळू उडत जात होते. धाऊची पाऊले एकावर एक पडत होती.आतापर्यंत म्हणायला खुपच अंतर कापल होत त्याने. आता ह्याक्षणी डाव्या आणी उजव्याजुबाजूला आंब्याची झाडे दिसुन येत होती.धाऊ एकटक वाटेवर विजेरीचा प्रकाश मारत सरळ दिशेने निघाला होता.मनात आता एकच विचार येत होता.लवकरात लवकर फेरी मारुन घ्यायची .धाऊच लक्ष वाटेत पडणा-या विजेरीच्या प्रकाशावर होत, ज्याकारणाने त्या आंब्या च्या फांद्यांवर काय बसल आहे ह्यापासुन धाऊ अजाण होता. चंद्राच्या उजेडाने ते सर्व आंब्याचे झाड, काळे निळे पडले होते.झाडाची सावली खाली भेसूर रुप घेऊन ऊभी होती.त्या आंब्यांच्या झाडाच्या प्रत्येक फांदीवर एक चित्र विचित्र आकार बसला होता.त्यांची संख्या हाताच्या बोटांवर न मोजता न येण्या इतपत होती.प्रत्येकाच्या अंगावर सफेद रंगाचे वरुन ते खाली पायांपर्यंत लोंबणारे कपडे होते.चेहरा चुना पोतल्यासारखा पांढराफट्ट पडला होता. डोळ्यांची जागी रिकाम्या खोबण्या होत्या, तर कोणाचे डोळे पिवळ्याजर्द रंगाने काजव्या सारखे चमकत होते.काहीजण शुन्य नजरेने धाऊच्या पुढे पुढे जाणा-या आकृतीकडे पाहत होते.तर काहीजण वेड्यासारखे दात विचकत,जीभ बाहेर काढुन धाऊकडे पाहून हसत खिदळत होते.
" ये आणा रे त्याला इकड!" त्यातलाच एक म्हणाला.
" येऊ दे येऊ दे ! इकड येऊ दे!" दुस-याने त्याच्या स्वरात मिसळला.
ते हसण्याच खिदळण्याच, बोलण्याच आवाज धाऊच्या कानांवर पडत होत , नी अंगावर सर्रकन काटा उभा राहत होता.विजेरीचा प्रकाश झाडांवर माराव तर दिसत
काही नव्हत.परंतू आवाज मात्र येत होता. अमानविय लहरींची जाणीव निसर्गाला होताच तो काही संकेत देतो, तुम्ही कधी पाहीलत का?
स्मशानात लावलेली ट्यूब रोज संध्याकाळी का चरचरत असते.अनोलखी रस्त्यांवर रात्री-अपरात्री कुत्रे का भुंकत असतात.
मनुश्य मरण्या अगोदर वातावरणात बदल का होतो.कधी विचार केला आहे का! की ह्या सर्व अमानविय लहरींचे चिन्ह असतात.जे निसर्ग आपल्याला दाखवत असतो.आता ह्याक्षणी सुद्धा धाऊला तसंच काहीतरी जाणवत होत, आजुबाजुचा गारठा क्षणात वाढला होता.
आंब्याच्या झाडांवरच्या फांदया अनाकलनीय चाहूलेने हळत होत्या.
हसण्या खिदळण्याच्या, हेळ काढुन रडन्याचे आवाज वाढत होते.
धाऊ काही घाबरणा-यांना मधला नव्हता.गावात काहीबाही अमानविय चेष्टा झाल्यावर काय उपाय करावे आणि कात नाही हे थोडफार धाऊला ठावुक होत. धाऊने खाली पाहिल . विजेरीच्या प्रकाशात पायांन खालची जमिन ओळी झालेली दिसली.धाऊने खाली वाकून एका हाताने बाजुला पडलेला एक दगड उचल्ला, आणी त्या दगडाला मातीत माखवल.
आणी तो दगड तोंडाजवळ आणला व पुटपुटला.
" जय हनुमान, जे काय इपरीत असल त्यासनी घालव बाबा!"
शेवटच वाक्य बोलुन धाऊने हातात दगड असलेला हात वेगाने मागे घेतला, आणी पुढच्याक्षणाला त्यापेक्षा दुप्पट वेगाने पुढे घेऊन जात तो दगड हातातुन त्या आंब्याच्या फांद्यांच्या दिशेने असा काही भिरकावला.दगड भिरकावताक्षणीच त्या दगडाला लागलेली माती धाऊच्या डोळ्यांत गेली. डोळ्यांत थोड्याश्या वेदना झाल्या डोळे मिटले गेले.इकडे धाऊने
फेकलेला तो दगड हवेत अक्षरक्ष आगीच्या ज्वालाप्रमाणे चमकुन निघाला आणी त्या आंब्याच्या जाडजुड फांद्यांवर बसलेल्या मृतआत्म्यांच्या दिशेने निघुन जात . ज्यासरशी त्या आंब्याच्या झाडावर आदळला, की त्याचक्षणी आजुबाजूला असलेल्या झाडांवर बसलेली ती सैतानी ब्याद फट,फट करत फुटली.अर्ध्यांच्या नासलेल्या देहांचा नाका तोंडावाटे ज्वालारहिंत तांबडी आग दिसूण येत क्षणात कोळसा झाला.
धाऊने हळूच डोळे उघडले , डोळ्यात गेलेली माती निघून गेली असावी.
त्याच्या नजरेस त्या झाडांच्यावर फांद्यांवरुन दोन कावळे उडताना दिसले.
" आर कावळ हाईत व्हय!" धाऊ अस म्हंणतच स्व्त:शीच हसला.
काय विचार केल होत नी काय निघाल हे धाऊ मनात म्हंणत होता.
विजेरी हाती घेतली नी पुन्हा सरळ वाटेने तो अंतर कापु लागला. देवाच्या एका नावाने काय चमत्कार घडला होता, पाहीलंत ना? देव अशे चमत्कार घडवत असतो, जे मानवाच्या डोळ्यांसमोर प्रत्येक्षात कधीच घडत नाहीत, धाऊच एक उदाहरणच घ्या ते , त्याच्या डोळ्यांत तो अद्भत विलक्षण देखाव दिसणार तेवढ्यात माती गेली, दृष्टी काहीक्षण आंधळी झाली, नी मगच तो चमत्कार घडला.नी ज्यासरशी दृष्टी परत आली,न ते दृश्य ती शक्ति आकुंचित पावली होती. तो चमत्कार घडुन गेला होता. पाच सहा मिनिट चालून धाऊला शेवटी समोर
बागेची शेवटची सीमारेषा रुपी भिंत दिसली नी त्या भिंतीवर काळपट रंगात एक नाव लिहील होत.
" बाबा मला वाचवा !" ... .
क्रमश :