1 Taas Bhutacha - 10 in Marathi Horror Stories by jay zom books and stories PDF | १ तास भुताचा - भाग 10

The Author
Featured Books
Categories
Share

१ तास भुताचा - भाग 10


फसगत 1


धाऊ एक गरीब माणुस, वय जेमतेम चाळीस-पंचाळीस च्या आसपास असाव. त्यांच्या परिवारात कोणी नव्हत, बायको होती ती कोरोना मुळे वारली होती,ज्याने होता नव्हता तो आधार सुद्धा गळून पडला होता. देवाने असा काही कप्टी खेळ खेळला होता.की बायकोच्या आंतिम क्षणाला तीचा चेहरा सुद्धा पहायला मिळाला नाही, कोरोना मुळे बायकोच प्रेत हॉस्पिटल वाल्यांनीच जाळल होत. बायको मरुन जेमतेम वर्ष झाला होता.पोटा-पाण्यासाठी धाऊ गावात नाक्यावर मिळेल ते काम करत होते.धाऊ यांच्या पत्नीच निधन झाल्यानंतर काही आठवडे गावातली मांणस जेवण देत होती, परंतु कलियुग वाढत चाललं आहे.शेवटी स्व्त:च- स्व्त:लाच पाहाव लागत.अन्न ,वस्त्र ,निवारा मनुष्याला जपायला हवा, अन्यथा मृत्यु अटळ आहे. जो तो स्व्त:च पाहत असतो.तू तुझ बघ मी माझ बघतो. जी काही मांणस धाऊना जेवण खावन देत होती.ती कालांतराने जेवन द्यायची बंद झाली.
काळजावर दगड ठेऊन धाऊंनी पुन्हा काम करावयास सुरुवात केली.
दिवसावर दिवस सरले पत्नीच्या आठ्वणी मेंदू व मनाच्या कोप-यातुन पुसट -पुसट होत, कायमच्या पुसल्या गेल्या.
धाऊंच रोजच दिनक्रम पुन्हा एकदा पहिल्यासारख चालू झाल. म्हंणजेच दिवसभर काम करायच, रात्री स्व्त:पुरत अन्न शिजवून जेवण करुन झोपी जायच, मग हीच क्रिया पुन्हा पुन्हा घडत होती.
काही आठ्वडे झाले असतील धाउंना नाक्यावर काही कामच मिळेना, ज्याकारणाने होते ते पैसे संपु लागले.पैसे होते तो पर्यंत कसलीही चिंता नव्हती, परंतु पैसे पुर्णत संपले त्यासरशी कामाची जाणिव होऊ लागली.परंतु न जाणे का? की कांम काही मिळत नव्हत.
जणू देव त्यांची परिक्षा पाहत आहे की काय! नियतीने जणु त्यांच्यावर सुड उगवायलाच सुरुवात केली होती.होते नाही ते पैसे संपले गेले
जेवणाचे हाल होऊ लागले.अशातच एकेदिवशी धाउ नाक्याजवळ कामासाठी उभे होते, दोन तास झाले ते नाक्यावर उभे होते, परंतु काम काही केल्या मिळत नव्हत.काहीवेळाने एक इसम धाऊंच्या जवळ येऊन थांबला.
" काय रे काम पाहीजे का?" घोगरा आवाज.
एक घोगरा आवाज धाऊच्या कानांवर अचानक आल्याने अंगावर सर्रकन काटाच आला,. परंतु दुस-याच क्षणाला त्यांनी समोर पाहिल.
एक काले कपडे घातलेला माणुस उभा होता समोर, ऊंची जेमतेम सामान्य मणुष्या पेक्षा मोठी होती, अफ्रिकन असल्यासारखी. रंगाने तो माणुस काळा होता.त्याची धिप्पाड शरीरयष्टी पाहून मनात त्याच्याबद्दल एक भीती उत्तेजित होत-होती.एक विलक्षणदारक भीती. धाऊने त्या धिप्पाड मांणसाकडे पाहून फक्त होकारार्थी मान हलवली,जणू तोंडातुन शब्द बाहेर पडणार नव्हते, वाचा बसली होती ना त्याची!
" चल ए ..मागे..?"
तो धिप्पाड शरीराचा माणुस पुन्हा घोग-या आवाजात म्हणाला. आणि पाठमोरा काळ्या कपडे घातलेली त्याची आठ नऊ फुटी आकृती पुढे पुढे जाऊ लागली.धाऊ तर त्याच्या शब्दांवर एका मंत्रमुग्धींत , संमोहिंत झाल्यासारखा चालत जात होता. दहा-बारा पावल चालून तो धिप्पाड माणुस थांबला, समोर एक गाडी दिसत होती, काळ्या रंगाची.त्याने आपल्या हाताने गाडीच दार उघडल , " बस्स"! तो इसम इतकेच म्हणाला. धाऊ त्या उघड्या दरवाज्यात शिरला आणि हळूच सीटवर बसला.धाऊने एक कटाक्ष आजूबाजूला टाकल . त्या दोघांशिवाय गाडीत कोणिही नव्ह्त.
धाऊवच एकटा काय तो मागे बसला होता. तो धिप्पाड देहाचा माणुस ड्राइव्ह सीटवर बसला, दार बंद करुन चावी फिरवली, इंजीन चालू होताच क्ल्ज नी गियर शिफ्ट केल.नी गाडी चालू लागली. धाऊ गप्प गुमान मागे बसला होता.एक शब्द त्याच्या मुखातून बाहेर येत नव्हत.
अर्धा एक तास जी गाडी रसत्यावरुन पळत होती ती गाडी आता थांबली गेली.तो इसम गाडी बंद करुन, दरवाजा खोलून बाहेर आला, मागच दार उघडून " ए बाहेर ए.!" धाऊच्या कानांवर त्यांचा घोगरा आवाज पडला .धाऊ बाहेर आला त्याने समोर पाहिल .डोळ्यांसमोरएक फळा दिसला, फळ्यावर नाव होत- आंबो माळ्याची बाग.



आणी फळ्या पुढेच एक कंपाउंडची चौकोनी दूर दूर पर्यंत पसरलेली भिंत होती, मधोमध एक काळ्या रंगाचा मोठा गेट होता, ज्या गेटमधुन बागेत प्रवेश केला जाणार होता. धाऊला न जाणे का परंतु कसलीतरी वाईट घडण्याची चाहूल लागत होती, काहीतरी विचित्र घडणार आहे की काय असं मनात विचार येत होता. एक विशिष्ट प्रकारची नकारात्मकतेची भावना त्यांच्या मनात उसळी घेत होती. मनात विचार येत होता, " की नको हे काम..! सोडून दे! " धाऊच्या चेह-यावर चळबळ चालू लागली, डोक्यात विचारांनी काहूर माजवल, काम करु,की नको करु " डोळे डावीकडून उजवीकडे फिरु लागले. तेवढ्यात एक आवाज आला आणि त्या आवाजाने धाऊची विचारक्षीणतेची तंद्री भंग पावली.
" हे घे ?"
एक करकरीत दोन हजाराची नोट त्या धिप्पाड इसमाने धाऊसमोर धरली. पैसा आहे मोठा, माणुस झालाय छोठा! धाऊची नजर दोन हजाराच्या नोटेवर जाताच तोंडाचा आ वासला.दिवसाला साडे चारशे कमावणा-या धाऊला दोन हजार रुपये प्रथमच मिळत होते,आपला हात वाढवुन धाऊने ती नोट आपल्या हातात घेतली आणि उलटी पालटी करुन लागलीच खिश्यात कोंबली.
" पन काम काय हाय साहेब?"
" काम फक्त एकच आहे ! रात्री ठिक 12 वाजता ह्या बागेत असलेल्या सर्व झाडांना पाणी द्यायच.बस्स .."
" ठिक आहे साहेब ! पर मला उद्या इथन घ्यायला कोण येईल.!"
" कोणीच नाही!"
.." काय ..!" आश्चर्यकारकपणे धाऊ म्हणाला.
" नाही म्हंणजे मी येईन घ्यायला..!" तो धिप्पाड इसम प्रथमच गडबडल्यासारखा कसतरीच हसत म्हणाला,त्याच ते हसन त्याच्या काळ्या चेह-यावर जरा भयान भासत होत.
" ही घे किल्ली! गेट उघड नी जा आत..!" त्या इसमाने धाऊकडे एक
किल्ली दिली, व थोडवेळ थांबुन पुढे म्हणाला.
" चल येतो मी?"
" जी साहेब !" धाऊने किल्ली हाती घेतली, गेटच्या दिशेने निघाला.
इकडे तो अफ्रिकन इसम आपल्या चार चाकी गाडीत ड्राईव्ह सीटवर बसुन ,गेट उघडणा-या धाऊच्या पाठमो-या आकृतीकडे पाहुन कुत्सिकरीत्या हसत होता.
" आत जाशील खरा पन बाहेर कसा येशील..! हिहिहिही,हिहिही!"
ख्प्पड चेह-याच्या काळ्या तोंडावर सफेद रंगाचे दात विचकत तो इसम
धाऊकडे पाहून विकृतपणे हसू लागला, आणी मिरर वर जाऊ लागली,नी गाडीच इंजीन सुरु होऊन गाडी धुरळा उडवत निघुन गेली.
चावी टाळ्यात घुसवून गोल भिंगवुन धाऊने तो भलामोठ्ठा गेट कुलुपातुन मुक्त केला, नी त्याचवेळेस एक फटाका फुटल्यासारख आवाज झाला. आवाज मागुन आला होता , धाऊने हलकेच मागे वळुन पाहिल.मागे तीनशे चारशे मीटर अंतरावर एक स्मशान होत.
त्या स्मशानात माणसांची अंतयात्रा एक प्रेत घेऊन जाळायला निघाली होती,टाळ वाजत होते,फटाके फुटत होते. धाऊने त्या अंतयात्रेकडे पाहून एक भय आवंढा गिळला,आणी पुढे पाहून गेटला आपल्या दोन्ही हातांनी अलगद पुढे ढक्कल, हलक्याश्या स्पर्शाने ही तो दोन झापांचा गेट आपोआप पुढे पुढे जात कर, करत उघडला. आजुबाजूला मसान शांतता पसरला होती , त्या प्रेताच्या अंतयात्रेतले फटाकें फुटले चा आवाज काय तो कानांच्यात गरम तेळ ओताव तसे कानांच्या पोकळीत काहीक्षण घुमत आहे, आणी नंतर त्या पोकळीतुन थेट ह्दयात घुसुन मनात धडकी भरवत आहे . गेट उघडताच धाऊला आतल दृष्य दिसल.
अक्षरक्ष एक -एकरवर पसरलेली भलीमोठ्ठी बाग आणि बागेत सर्व प्रकारची झाड .पेरु, चिकू,केली,आंबे,अननस, चिकू, नारळ, लिंबू,आवळा, इत्यादी नाना त-हेची झाड लावलेली दिसुन येत होती. धाऊने आपल्या मागे गेट बंद करुन घेतल ,गेट बंद करताना त्याला जळणार प्रेत दिसल आणि प्रेताचा मांस जळाल्याचा काळा धुर वर वर जाताना दिसला. गेट बंद करुन धाऊ दोन चार पावल चालून पुढे आला.डाव्या बाजुला एक दोन खोल्यांच घर होत, भिंतीला पिवळा रंग दिला होता.खाली सादीशी फरशी होती. त्या फरशीवरच धाऊ आपली हातातली पिशवी बाजुला ठेवून बसला. खिश्यात एक बटणांचा फोन होता.तो काढून वेळ पाहीली.दिड वाजले होते. वेळ पाहुन फोन पुन्हा खिश्यात ठेवला.आणि पिशवीतुन डब्बा काढून जे काही होत ते खावून घेतल. आत खोलीत मडक्यामध्ये पाणी होत, ते पिऊन घेतल नी पुन्हा वेळ पाहिली.1:30 वाजला होता. बारा वाजता पाणि मारायच होत.
वेळ खुप होती.म्हणुन थोडस आराम करुन घेऊयात असं विचार करुन
धाऊ फरशीवरच झोपला. झाडांचा गार वारा अंगाला लागत होता, ज्याने धाऊवर निद्रादेवी प्रसन्न झाली.अशीकाही प्रसन्न झाली,
की तो थेट साडे सात वाजता उठला. प्रथम आपण कोठे आहोत हे कळायला त्याला जरा वेळच लागला.मग मेंदूने सर्व काही लक्षात आणुन दिल.धाऊने खिश्यात हात घालुन पाहिल दोन हजाराची नोट हाताला लागत होती.आनंद होत होता नोटीला हात लावताच.मड़क्यातल्या पाण्याने तोंड धुवुन घेतल.आणि धाऊ बाहेर आला. सांज झालेली, आकाशात निळसर चांदरात पसरली होती.आजुबाजूला रातकिंडयांची किरकिर वाजत होती.दिवसा चांगली भासणारी बाग आता सांजवेळेस एका विखारी जंगलासारखी भासत होती.चंद्राच्या उजेडात आतली झाड कालीनिळी पडली होती.आकाशातुन थव्या थव्याने वटवाघळू पुढे पुढे उडत चालले होते.थंडीचा माहिना असल्याने बागेत झाडांभोवती धुक पसरल होत.परंतु थंडी काहीकेल्या अंगाला लागत नव्हती.जणु सर्वकाही कृत्रीम असाव, कोणीतरी ते फसव दृष्य मानवाच्या डोळ्यासमोर उत्पन्न केल असाव.आणि हे काम मुळीच कोण्या सामान्य मणुष्याच नव्हत.हे काम होत एका पापी सैतानी अमंगळ, अघोरी शक्तिच.पाहता-पाहता वेळ सरत होती,आणी बागेतल धुक आणखी आणखी गडड होत जात होत.थंडी अंगाला मेलेल्या प्रेतासारखी मिठी मारु पाहत होती. एकदाचे बारा वाजले गेले.धाऊने पिशवीत असलेली शाल डोक्याला गुंडाळली आणि खोलीत असलेली एक विजेरी हाती घेतली , नी धाऊ मशीन चालू करण्यासाठी निघाला.दहा-विस पावल चालून समोर एक मशीन दिसली ,चौकोनी मशीन .त्या मशीनवर दोन बटन होते, हिरवा दाबताच पाणि चालू व्हायच,आणी लाल दाबताच पाणी थांबायच. धाऊने त्या मशीनवर असलेला हिरव गोल बटन आत दाबल.तसे दोन -एकरवर प्रत्येक झाडांसमोर एक ऑटोमेटिक वॉटर टेप बसवलेला जो की तो बटन दाबताच सुरु व्हायचा. आणि गोल गोल फिरुन त्या पाण्याला आपल्या जवळ असलेल्या झाडाखालपर्यंत ऊडवायचा. धाऊने स्वीच आत दाबताच फटाफट सर्व सर्व नळ सुरु झाले, आणि फवारे ऊडवत झाडांना पाणि देऊ लागले.धाऊने विजेरी हाती घेतली. आणी ती चालू केली
तीचा तो पिवळसर प्रकाश जमिनीवर पडला. तसे धाऊची पावले सरळ वाटेने चालू लागली. आजुबाजुला धाऊच्या छाती इतक्या लांबीच्या झाडांच्या काळ्या निळ्या पडलेल्या आकृत्यांना पाहत धाऊ एक एक पाऊल वाढ़वत सरळ दिशेने निघाला होता. धाऊच काम काय होत? फक्त दोन एकरवर पसरलेल्या झाडांना शेवटपर्यंत पाणि निट पोहचत आहे का हे पाहायच आणि मागे फिरुन यायच, मग मशीन बंद करुन पुन्हा झोपी जायच. ऑटोमेटिक गोल गोल फिरणा-या त्या नळामधुन फवा-या सारख पाणि बाहेर पडत होत. त्याचा तो स्प्प स्प्प आवाज थंड वातावरणात घुमत होता.
खालची जमिन जशी-जशी पाण्याने भिजु लागली: वातावरणात थंडी अजून चेव चढल्यासारखी वाढु लागली.इतकी की धाऊच्या तोंडातुन अक्षरक्ष वाफा निघु लागल्या.चालता चालता धाऊ कधी डावी तर कधी उजवीकडे विजेरी मारुन पाहत होता. की अचानक त्या फिर-फिरणा-या पिवळ्याजर्द विजेरीच्या पिवळ्याजर्द प्रकाशात काहीसेक्ंदापुरत धाऊला काहीतरी विचित्रच उभ असल्यासारख दिसल. टक्कल असलेल्या दोन शिंगधारी डोक्यांच ,सुळ्यासारख्या धारधार पिशाच्चमय दातांच,मेलेल्या पांढ़-या फट्ट प्रेताच्या चेह-यासारख , आठफुट अमानविय शरीरयष्टीच. टॉर्चचा प्रकाश त्या आकृतीवर पडून लगेच पुढे गेला.नी त्या आकृतीच्या जागी कालोखात क्षणार्धात दोन चिनी गोटिसारखे विस्तवाप्रमाणे दोन डोळे चमकले.सर्रकन अंगावर काटा आला धाऊच्या , विजेरी अक्षरक्ष हातातुन अक्षरक्ष गळुन पडली.नी ती खाली पडलेली विजेरी जमिनीवरुन एकाच जागेवर डावी-उजवीकडे फिरु लागली, तिचा प्रकाशही पुढे डावीकडुन उजवीकडे थयथय करत गोल गोल फिरु लागला.नी त्या प्रकाशात धाऊला धुक्या व्यतिरिक्त काहीच दिसल नाही. जणू ती आकृती विसावलि होती, नाहिशी झाली होती.
" हुश्श्श्श्श..!" आपल्याला भास झाल असेल अस समजुन धाऊने एक सुटकेचा निश्वास सोडला. खाली पडलेली टॉर्च अजुन सुद्धा जागगेवरच गोळ गोळ करय भिंगत होती.ती त्याने खाली वाकून आपल्या हाताने उचलली.नी पुढच अंतर कापु लागला.


क्रमश:






पाहुयात पुढच्या भागात..:
काय होईल धाऊच .?
धाऊला काय दिसल होत?
जे पाहील ते नक्की आस्तित्वात होत? की त्याचा भास होता?
पाहू पूढे.. !