मराठी भयकथा..
भाग 9
आकाशातुन रात्रीचा किरर्र अमानविय अंधार पसरला होता, त्या अंधारात न जानो कित्येक सावळ्या मानवाच्या रक्त, मांसाच्या च्या लालसेने फे-या मारत होते .जे सामान्य मनुष्य आप्ल्या डोळ्यांनी पाहु शकत नव्हता.एन हिवाळ्याचा माहिना सुरु असल्याने चौहुकडे दाट धुक पसरल होत . जंगलातला कोल्हा - आपल्या विचित्र भेसूर आवाजात कोल्हेकुई करत रडगाण गात होता.ज्याने वातावरण भितीदायक होत - होत . मगाचपासून झाडावर बसललेला तो अपशकुनी घुबड आप्ल्या विचित्र मोठ मोठ्या वटारलेल्या डोळ्यांनी रात्रीच्या ह्या भयान वातावरणाचा पुरेपुर मनसोक्त आनंद घेत होता .अभद्र कुठचा.
जंगलातल्या सुनसान हायवेवरुण एक मोठा कंटेनर असलेला ट्रक त्या दाट धुक्याला चीरत पुढे पुढे येत होता.हे त्या ट्रकच्या हेडलाईट ने समजुन येत होत .त्या ट्रक मध्ये दोन माणस बसली होती.एक ड्राइव्हर ज्याच नाव रघुवेंद्र सिंह होत.आणि एक त्या ड्राइव्हरचा सोबती ज्याच नाव शामलाल.होत.
" अरे भाई ! आज तो बहुत थंड है यार ?" ट्रक ड्राइव्हर च्या बाजुला बसलेला तो मध्यम शरीरयष्टीचा शामलाल म्हणाला.
" हा भाई बहुत धुक पन पडलय ....!" तो ट्रक ड्राइव्हर रघुवेंद्र उर्फ रघु हिन्दी- मराठी मिक्स करत म्हणाला.जणू त्याला निट मराठी बोलता येत नव्हती पण निट समजत होती.
" अरे महेंद्र पुढे बघ....!" शाम रसत्याकडे पाहत म्हणाला.
थोड दुर रस्त्यावर एक लाल रंगाची साडी घातलेली स्त्री ऊभी होती.
" आईशप्पथ ..! येवढ्या थंडीत ही कोण ..? आणि येवढ्या वेळेला ..?
" आईला काय भुत- बित नाय ना...!" रघु ने एकवेल शाम कडे तर कधी पुढे रस्त्यावर उभ्या असलेल्या त्या स्त्रीकडे पाहत हे वाक्या उद्दारल.
" ये रघु ..येड भो....च्या ! तु डोक्याव पडलाय..का ? गाडी थांबव गप्प लिफ्ट देऊ बिचारीला...! " शाम रघुवर खेकसत म्हणाला .
" अरे पन...?" रघु इतकेच म्हणाला असेल, की तोच शामने त्याच वाक्य तोडल व म्हणाला .
" तुला माझी शप्पथ रघुवेंद्र..." ह्या वाक्यासरशी रघुवेंद्रने ट्रक त्या स्त्रीच्या बाजुला थांबवली .
" अहो मेडम इतक्या रात्री कुठे निघालात ..? सोडू का आम्ही तुम्हाला ?"
शाम तिच्या शरीराकडे पाहत म्हणाला. तस त्या खाली मान घातलेल्या स्त्रीने आपल डोकवर केल आणि शाम कडे हास्य करत पाहुन म्हणाली.
" सोडाल मला....?" तिचा आवाज थोडा वेगळा होता, जस की एकप्रकारे घसा खाकरुन बोलत आहे .....! " शाम एकटक तिच्या चेह-याकडे पाहत होता, तिचा चेहरा खुपच पांढराफट्ट होता, सामान्य माणसापेक्षा जास्तच पांढराफट्ट.
" सोडाल मला...?" पुन्हा त्या स्त्रीचा आवाज आला. शामच लक्ष तिच्या शरीरावरुन हटल गेल. म्हणजेच त्याची तंद्र भंग पावली.
" हा आईये..ना....!"
शाम म्हणाला . तस त्या स्त्रीने आपला हात पुढे केला , तिचा तो गौर वर्ण हात पाहुन शाम पुर्ण वेडा झाला होता, काहीक्षण शाम तर त्या हाताकडेच पाहत राहीला.
" अहो...! येऊ मी आत..!" ती स्त्री म्हणाली . तस शाम पुन्हा आपल्या तंद्रीतून बाहेर आला. व त्याने त्या स्त्रीचा हात आपल्या हातात घेतला.
शामला त्या स्त्रीचा हात खुपच थंड जाणवला होता, पन त्याने त्या गोष्टीवर जास्त विचार केला नाही .लाल रंगाची साडी नेसलेली ती स्त्री शामच्या बाजुला बसली .तस रघुवेंद्र ने त्या स्त्रीकडे पाहिल व आपली ट्रक चालू करत पुन्हा रसत्यावर पळवायला सुरुवात केली.
शाम एकटक त्या स्त्री कडे पाहत होता, परंतु तिच लक्ष पुर्णत पुढे होत.
" बहनजी! आप इतनी रात को यहा ..क्या कर रही थी..?"
रघुने हिंदी भाषेत प्रश्ण विचारला, तस त्या स्त्रीने रघुकडे पाहिल.
" माझ्या माम्या बाहिणीच लग्न होत..! म्हणुन आले होते मी ! आत घरी जायला निघाले होते पन वाटेतच माझी स्कुटी बिघडली, .! "
ती स्त्री आपल्या विचित्र आवाजात म्हणाली .
"बहन जी मेंने आपकी स्कुटी नही देखी......वहा...? " रघु ड्राइव्हिंग करत पुढे पाहत म्हणाला .परंतू त्याच्या ह्या वाक्यावर त्या स्त्रीने कसलेही प्रतिउत्तर दिले नाही. तस रघु पुन्हा म्हणाला.
" बहन जी आपकी स्कुटी ...?"
" ये रघुवेंद्र गप्प बस ना यार...! असेल त्यांची स्कुटी कुठे तरी..! काय स्कुटी - स्कुटी लावलय, आपण सोडू त्याना..!"
शाम थोड रागावत म्हणाला.
" जी तुमच नाव काय आहे..? " शाम त्या स्त्रीकडे पाहत म्हणाला.
" अनामिका...! नाव आहे माझ ...!"
अच्छा तर मित्रांनो त्या स्त्रीच नाव अनामिका होत..!
"wow खूप छान नाव आहे...!" शामअनामिका कडे पाहत म्हणाला.
" साला नौटंकी...!"
त्याच्या ह्या वाक्यावर रघु मनातच म्हणाला.
" तस तुम्ही ह्या साडीमध्ये खुप छान दिसता...! लग्न झालय तुमच " शाम अनामिका कडे पाहत म्हणाला.
" हो झालय....!" अनामिका इतकेच म्हणाली असेल की तोच रघु जोरात हसू लागला.
" हाहाहाहा.....हा....हा ! "
" काय जोक झाला का..? " शाम रघूकडे एक भुवई उंचावुन पाहत म्हणाला.
" हो मग लय मोठा जोक झालय...!हाहाह,आ! रघु पुन्हा हसत उच्चारला.
" हा वेडा आहे..! असच हसत असतो पाहाव तेव्हा...!"
शाम अनामिका कडे पाहून कसतरीच हसत म्हणाला. परंतू तिच लक्ष एकटक पुढे होत.पांढ-याफ़ट्ट चेह-यावर शुन्य भाव होते.
परंतु शामच्या ह्या वाक्यावर रघु मात्र रागाने आगबबुळा होत शाम कडे पाहत होता, असाच काहीसा वेळ निघुन गेला असेल, तस रघु पुन्हा म्हणाला.
" ओ बहनजी ! एक बात तो आपको पुछी ही नी मैने ..? आपको ड्रॉप कहा करना है जी .?"
" इथून 30 - 40 मिनिटांतच माझ घर येईण...!" अनामिका शाम कडे पाहत म्हणाली.
त्या ट्रक शिवाय जंगलातल्या रस्त्यावर काहीही नव्हत, अगदी निर्मनुष्य भाग होता तो. त्या निर्मनुष्य भागाला अंधाराने एका अजगरासारखी मिठी मारली होती, ज्याने तो जंगल आणि आजुबाजुचा परिसर भयान भासून येत होता.रातकिड्यांची किर्रकिर्र नेहमीप्रमाणे आजसुद्धा आपल कर्तव्य पार पाडत होती . जस- जस ट्रक पुढे जात होती न जाणे झाडांच्या फांद्या आपोआप का हलत होत्या , जणू कोणी सफेद रंगाचे कपडे घालून त्या झाडांवर बसुन झुलत आहे,आणि वखवखळेल्या विचित्र नजरेने त्या ट्रक कडे पाहत आहे.रघुवेंद्र आपल्या तंद्रीतच ट्रक चालवत होता , की तोच ट्रकला एक हादरा बसला.आणि त्याचवेळेस अनामिकाचा हात शामच्या हातावर पडला शामने अनामिका कडे पाहिल, दोघांची ही नजरा- नजर झाली , आणि अनामिका काहीक्षण थोडी लाजली गेली.5 - 10 मिनीटां नंतर ट्रकमध्ये काहीतरी
प्रोब्लेम झाल. तस रघुवेंद्रने ट्रक थांबवली .
" काय रे काय झाल ?. " शाम रघुकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत म्हणाला.
" कुछ तरी प्रोब्लेम झालाय..मी बघते...? अस म्हणतच रघु खाली उतरला, शामने हलकेच अनामिका कडे पाहील,
तस त्याला एक झटकाच बसला, कारण समोरची सीट रिकामी होती .
" अरे ही कुठे गेली ,?" शाम स्व्त:शीच म्हणाला . व आजूबाजूला पाहु लागला, त्यातक्ष त्याला थोड़ दुर जंगलात ऊभी असलेली अनामिका दिसली , जी शाम कडे लाडीकपने हस्य करत ,
त्याला आपल्या कडे येण्याचा इशारा करत होती.अनामिकाच्या सभोवताली एक अभासी धुक पडल होत.जे एक अनाहुतपणाची चाहूल देत होत.हे काहीतरी अपरिचीत ,अमानवीय , अम्ंगळ आहे . ज्यापासून तू दुर राहिलेलच बर .त्याच्या जवळ जरी गेलास तरी ते तुझ्या नरडीचा घोट घ्यायला कमी पाहानार नाही.परंतू वासनेच्या अधिन गेलेल्याला शामला ह्या सर्वांशी जणू काही घेन देन नव्हतच.वासनेची नशा अशीकाही मेंदूत भिनभिनलेली की शामचा स्व्त:वर कंट्रोलच नव्हता.ट्रकची पायरी उतरुन तो खाली आला, त्यासरशी अंगाला थंडीची जाणीव होऊ लागली .पण ती थंडी वासनेपेक्षा कमी होती.आजुबाजूची झाडझूडप बाजुला सारत शाम जंगलात घुसला, लाल रंगाची साडी नेसून असलेली अनामिका त्याच्या पासुन 20- 22 पावलां इतकी लांब होती .तिच्या पुढे -पुढे जाणा-या पाठमो-या आकृतीकडे शाम लालसेने पाहत होता, पन एक गोष्ट मात्र त्याच्या लक्षात येत नव्हती , की अनामिकाच्या मागे-मागे चालता चालता तो जंगलाच्या मध्यभागी आला होता . एकप्रकारे महाभयंकर चकवा लागला होता त्याला, ज्या चकव्यातून सुटन म्हणजे एकच मार्ग होय.
मृत्यु.
□□□□□□□□□□□□□□□
" ए शाम जरा स्कृड्राइव्हर..लाना...!" रघुवेंद्र ने जोरात हे वाक्यउदारल परंतु त्याच्या ह्या वाक्यावर ना शाम आला, आणि नाही त्याचा प्रतिउत्तर .
" ए शाम्या....????? ए शाम .....???"
रघुने पुन्हा शामला एक आवाज दिला , परंतू कसलेही प्रतिऊत्तर येत नव्हते.
" साला क्या घटीया इसांन है ! " शामला एक शिवीहासडतच रघुवेंद्र स्व्त स्कृड्राइव्हर आणण्यासाठी जाऊ लागला.ट्रकच्या दाराजवळ पोहचताच त्याने पुन्हा एक आवाज दिला व आत पाहिल पन आता तर कोणीच नव्हत.दोन्ही सीट रीकामे होते.
" यार हे दोनो कुठे गये.?" स्व्त:शीच म्हणतच त्याने स्कृड्राइव्हर हाती घेतला आणि निघुन गेला.
□□□□□□□□□□□□□□□□□
" ए अनामिका जान ! थांबना किती दुर घेऊन जातेस कोणी नाही बघणारा इथे ..!" शाम अनामिका कडे विचित्र हास्य करतपाहत म्हणाला . त्याच्या ह्या वाक्यासरशी अनामिका थांबली गेली, तस शाम च्या चेह-यावए एक छद्मी हास्य पसरल , व तो तिच्याकडे जाऊ लागला .
" काय अनामिका जान..! इकडे बघ ..ना..! " शामने तिच्या खांद्यावर हात ठेवला व तिला पाठीमागुन मिठी मारली.
मिठीमारताच त्याच्या नाकातोंडात एक सडका वास गेला.वास सहन न झाल्याने त्याने तिला बाजुला ढकलून दिल ,
" शी ..काय घान वास येतोय ...!" शाम अनामिका कडे पाहत म्हणाला .त्याच्या ह्या वाक्यावर अनामिकाने वळुन त्याच्या कडे पाहिल.
ज्याक्षणी शामने अनामिका चा चेहरा पाहिला, त्याक्षणी शामच्या अंगावर एक सर्र्कन काटा उभा राहिला .मगाशी पाहिलेल्या त्या सोज्वळ रुपाने आता हिडिसपणाच भयानक रुप घेतल होत . तिचा पुर्ण चेहरा भाजलेला होता , व शरीर एखाद्या म्हातारी सारख अशक्त झाल होत, डोळे अंधारात चमकत पिवळे झाले होते.त्यात एक टीपका होता. हाता - पायाची नख चेटकीणी सारखी वाढली होती , केस पांढ-या रंगाचे झाले होते , आणि त्यासोबतच सफेद रंगाचे दात काळ्या रंगात परावर्तित झाले होते.त्या दातांमधुन काळ्य रंगाच विशिष्ट द्रव लाळे प्रमाणे बाहेर येत होत.त्या भयानक पिशाच्चीनी ने आपला फसव्या सुंदर रुपाचा मुखवटा काढून फेकून देत आपल खर रुप शाम ला दाखवून दिल होत.जे रुप पाहुन एन थंडीत त्याला हे असल आपल्या आकलन क्षमतेच्या बाहेरच रुप पाहुन घाम फुटायला लागला होता. शरीरातल्या रक्त भिसरण करणा-या नसा टराररुन फुगल्या होत्या.
" को...को...को...ण आहेस...तू...?" अनामिकाच ते भयान हिडिस रुप पाहुन त्याची वासना एका क्षणात उडून गेली होती , वासनेच्या जागी आता भिती उत्पन्न झाली होती, भीतिने जिव कासावीसा झाला होता .
" मला नाही ओळखलस..? ! " एक भयानक खोल खर्जातला आवाज ऐकताच कानांतले पडदे फाटावे असा.
" मी तिच अनामिका ...! तुझी... जान येना मला मिठीत घे.." अनमिका आपले काले दात दाखवत तोंडातुन लाल गाळत, दोन्ही हात पुढे करत विचित्र गड-गडाटी हस्य करत म्हणाली.!हिहिहिहिही, खिखिखी,ये ये ये...."
भयानक घोग-या आवाजात ते पिशाच्च शाम ला म्हणाल . आणि हलके- हलके त्याच्या दिशेने पुढे -पुढे येऊ लागल.
" ए नाय , ए नाय ..! माझ्या जवळ येऊ नको....!" शामने अस म्हणतच धाव घेतली ,.उठत धड़पडत काट्या कूट्यातुन तो धावत होता. पाठीमागे पाहायची हिम्मत काही केल्या होत नव्हती
ते भेसूर , कुरुपमय रुप पाहुन मनात अक्षरक्ष धडकी भरली जात होती. ह्दयामधुन धड, धड आवाज येत अंगघामाने भिजल होत. 10 -15 मिनिट धावल्यानंतर त्याला थोड दुर रघुवेंद्र दिसला , जो त्यालाच शोधत होता .
" ए रघ्या .....ए रघ्या....... !. शामलाल ने रघुवेंद्रला जोरात हाक दिली, आवाज ऐकून रघुवेंद्रने त्याच्या कडे वळून पाहिल.
" अरे काय रे कुठे होता तू....?" रघुवेंद्र म्हणाला.
" अरे बाबा तू चल लवकर...इथून... ट्रक मध्ये सांगतो तुला सर्व....!" शाम व रघुवेंद्र ट्रक च्या दिशेने जाऊ लागले , 10 - 12 मिनिट चालून झाल असतील की शामला हायवेवर पुढे एक मोठी कंटेनर असलेली ट्रक दिसली, आणि दुसर म्हणजे ड्राइव्हिंग सीटवर बसलेला रघुवेंद्र.
" हा रघू इथ आहे मग हा कोण आहे...?मनात म्हणतच शामने एक गिरकी घेतली मागे वळुन पाहिल.त्याच्या नजरेस खाली मान घालून एकटक जमिनीकडे पाहत असलेला रघुवेंद्र दिसला. पन सत्य हेच होत की तो रघु नसुन साक्षात सैतान होता , शामचा काळ होता, मृत्युला नजरेसमोर पाहताच प्रत्येकाची पाचावरण धारण बसली जाते , त्याच प्रकारे शाम ची सुद्धा पाचावर धारन बसली . हातपाय भितीने लटलट कापू लागले , भीतिने आवाज बसला गेला. घशातुन ब्र...सुद्धा बाहेर येत नव्हता अशी त्याची अवस्था झाली गेली .आणि त्याच अवस्थेत एक - एक पाऊल पाठीमागे टाकत तो पाठी-पाठी सरकू लागला .आणि इकडे त्या रघुरुपी पिशाच्चाने आपली मान वर- वर करण्यास सुरुवात केली, त्याचे ते पिवळेजर्द दोन काले टीपके असलेले डोळे अंधारात काजवा सारखे चमकले.एक दोन पाऊले मागे सरकणा-या शामच्या पाठीमागे काहीतरी लागल गेलत्याने पाठीमागे वलुन पाहिल, पाठीमागे एक मोठ झाड होत.
रात्रीच्या अंधारात फीरणा-या कुत्री मांजराचे डोळे ज्याप्रकारे प्रकाशाच्या अधिन आल्यास एक विशिष्ट भयरचनेने चमकले जातात त्याच प्रकारे त्या रघुच रुप असलेल्या पिशाच्चाचे डोळे पिवळ्या रंगाने चमकत होते.
हातपाय कट- कट आवाज करत वाजु लागलेले.जणू ते भयान आपल आकार उकार शरीर रचना वाढवू लागल होत, वेडेवाकडे हातपाय फिरवत त्या पिशाच्चाने आपल रुप, काया 10 - 12 फुटां पर्यंत वाढवली, जे एका सामान्य मणुष्याच्या तर्कवितर्क बुद्धीच्या पल्याड होत. आणि तेच अमानविय प्रकार शाम आपल्या उभ्या डोळ्यांनी आवासून पाहत होता. एक शेवटच प्रयत्न म्हणुन शामने ट्रकच्या दिशेने पाहिल , आणि जोरात ओरडणार की तोच, त्याच तोंड एका हाताने कोणीतरी दाबून ठेवल.
" पळतो काय....? पळतो माझ्या तावडीतून कोणि सुटत नाही...! हिहिही, हिहिही, खीखी, " शाम च्या कानात एक भरडा खोल खर्जातला आवाज घुमला व त्यासोबत एक विचित्र हास्य घुमल. आणि ह्या वाक्यासरशी त्याच्या पोटात त्या पिशाच्चीनीने आपली धारधार नख घुसवली. त्यासरशी शामच्या नाकातोंडातुन व घशामधुन सुद्धा लाल रंगाच जाड-अस रक्त बाहेर येऊ लागल. रक्ताच्या न जाणे कित्येक चिलकांड्या उडाल्या गेल्या .वार इतका आतिशक्तिशाली होता. की शाम एकावारानेच
मृत्युमुखी पडला.
" जीभ लय चालते तुझी...! "
शामच्या प्रेताकडे पाहत ती पिशाच्चीनी म्हणाली .आणि बाहेर आलेली शामची जिभ तिने आपल्या तोंडाने उपटून टाकली, व मजेने खात खात दुस-या जिभेची वाट पाहू लागली.
□□□□□□□□□□□□□□
दुसरा दिवस .....! हायवे पोलिस स्टेशन
रघुवेंद्र आप्ल्या मित्राची मिसिंग केस घेऊन पोलिस स्टेशन मध्ये आला होता .
तिथे त्याला एक विचित्रच माहिती मिळाली .
" साहेब...! मेरा दोस्त मिसिंग झालाय हो...! " अस म्हणतच रघुने पुढे बसलेल्या त्या हवालदाराला सर्व हकीकत जशीच्या तशी वर्तवली, त्या हवालदाराने जास्त काहीन बोलता एक फोटो रघुच्या समोर ठेवला व म्हणाला
" ही भेटलेली का?" हवालदाराच्या वाक्यावर रघुने तो फोटो आपल्या हाती घेतला व म्हणाला
" हो साहेब हीच थी वो...! साली ...! साहेब सोडु नका इला...!"
रघुपुढे काही बोलणार की तोच मध्ये तो हवालदार म्हणाला
" अरे ए बाबा पकडायला ती जीती तर पाहीजेल.10 वर्षा अगोदर मेलीये ती बाई ! रेप झाल होत तिच्यावर...! म्हणुन दर अमावस्याला तिचा आत्मा कोणाकडून तरी लिफ्ट मागतो जर लिफ्ट देणा-याची नजर आणि प्रवृत्ती चांगली असली तरच तो वाचतो. नाहीतर ती खुनी दुल्हन ."
अस म्हणतच तो हवालदार बोलायच थांबला,
" नही तो काय साहेब...?" रघु उत्सुकते पोटी म्हणाला.
" पाठीमागे बघ...! ते फोटो लावलेत भिंतीवर 10 वर्ष झाली पन त्यातला एकपन भेटला नाही अद्याप सुद्धा आणि आता तुझा मित्र पन गेला समज..!" त्या हवालदाराच्या ह्या वाक्यासरशी रघुने पोलीस स्टेशच्या एका भिंतीवर पाहिल तस त्याला 100 पेक्षा जास्त मिसिंग फोटोज दिसुन आले.
बोध..- परस्त्रीला माते समान असते..! तीचा आदर करा.
💫..राजे..शिवाजी महाराज 💫
समाप्त ...
कंमेंट आणि रेटिंग देऊन कथा आवडली का ते नक्की सांग