भाग 6
विलासरावांच्या बाबतीत घडलेला तो काळरात्रीचा भयंकर प्रसंग त्यांच्या डोळ्यांसमोरुन जायला तैयार नव्हता,डोळ्यांची पापणी जरा लवली की त्या भयंकर स्त्रीचा चेहरा डोळ्यांसमोर येत आठ्वणीची चित्रफित सुरु होत - होती, त्या अघोरी स्त्रीचे ...धमकावणे, व भयंकर खिदळत हसने विलासरावांच्या कानावर अद्याप् सुद्धा ऐकू येत होत, ज्याने मेंदूला एक झटका बसला जात होता .
" म्हणजेच निता आतापर्यंत खर बोलत होती , तिने त्या सर्व घटना अनुभवल्या होत्या......!..... बापरे मला ह्या संकटावर वेळीच काहीतरी तोडगा काढायला हवा अन्यथा....परिणाम वाईट होतील...!"
विलासराव स्व्त:शीच म्हणाले, तसही
घरात हातावर हात ठेवुन बसण्याने काहीही होणार नव्हत , त्यापेक्षा त्या संकटावर मात कस करता येईल ह्या विचारावर विलासरावर लक्ष केंद्रीत करत होते , रामचंद्रशी ह्या विषयावर बोलुन काहीतरी तोडगा काढायला हवा ह्या हेतुने विलासरावांनी कामावर जाण्याच ठरवल,
कामावर पोहचल्यावर विलासरावांनी ही सर्व हकीकत माझ्या आजोबांना सांगितली, तस आजोबांना एकक्षण थोडा धक्का बसला, पर काहीवेळाने ते सावरले गेले , कारण वेळ धीर डगमगवण्याची नसुन, खंबीरपणे उभ्या राहाण्याची होती, शत्रुशी लढा देण्याची होती , रामचंद्र यांच्या ओळखीचे एक जगदीश शहा नामक इसम होते, ते सर्व भुत -विद्या जाणून होते, म्हणजेच भुत☠प्रेत = जादू × टोणा- उतरवण्याच काम ते करायचे, विलासराव व रामचंद्र त्याच दिवशी कामावरुन सुट्टि होताक्षणीच
जगदीश शहा यांच्या ............... घरी गेले, जगदीश शहा यांच घर तस म्हणाला प्रशस्त होत ,
दिसायला ते गृहस्थ कोणी बाबा वगेरे सारखे नव्हते, त्यांच राहणीमान साधारण माणसा प्रमाणेच होत,
" अहो भाऊ ..तुम्ही तर एकदम साधे माणूस वाटता . !"
विलासराव जगदीश रावांकडे पाहत म्हणाले .
" हो..! आश्चर्य वाटल असेल ना ..! की मी ...कोणि
मांत्रीका सारखे काले ..कपडे नाही घातले ...! किंवा भलीमोठ्ठी दाढी वाढून नाही बसलो ......हाहा हा.... "
ते इसम हसतच म्हणाले , जणू त्यांना विलासरावांच्या बोलण्याचा राग आला नव्हता, तस त्यांच्या ह्या वाक्यावर विलासराव सुद्धा किंचीत हसले, त्याचवेळेस जगदीशरावांच्या पत्नी ट्रे-मध्ये चहाघेऊन आल्या व एक-एक चहाने भरलेला कप त्या सर्वांना दिला , तस चहा पिता-पिताच ते इसम पुन्हा पुढे बोलू लागले
" अहो ...! माझ नाव जगदीश त्रिंबके शहा ..! तुमच्या सारखा साधारण मणुष्य आहे...! पैशांसाठी कपड्यांच दुकान चालवतो.. ..! आणि हे भुत-जादू टोणा उतरवायच काम मी माझ्या वडिलांकडुन शिकलो...! ते मांत्रिक होते ना!पन तो काल वेगळा होता, आता जग कस बदलत चाललय! ......नाही का? !
" हो ..-हो.." विलासशराव- रामचंद्र यांनी हूंकार भरला ..
तसे जगदीशराव पुढे म्हणालें.
"परंतु काळ जरी बदलत असल...! तरी सुद्धा कधी-कधी लोक माझ्याकडे भुत-जादू -टोना अशी समस्या घेवून येतात ...! मग होईल तस मी त्यांच निरुसरण करतो, ! तेवढच पुण्याच काम होऊन जात माझ्याकडून...." जगदीश राव आपली ओळख व विचार मांडत म्हणाले .
काहिवेळ त्या तिघांची अशीच इकडची तिकडची चर्चा झाली, मग गोष्ट जेव्हा मेन मुद्यावर येऊन ठेपली तस विलासरावांनी सर्व काही माहिती , पिढा जशास तस त्यांना वर्णनारहीत कळवली,
त्यासरशी सर्व काही ऐकल्यानंतर जगदीशरावांनी आपली बाजु मांडली.
" अच्छा अस आहे ..काय ..! मग विलासराव तुम्ही एक काम करा ...?..आजच्या दिवस घरी जाऊ......नका.. ?वाटलस तर तुमच्या मित्राच्या रामचंद्र यांच्या घरी जाउन झोपा ..! आणि हो...?..मी एक पाण्याची बोटल देतोय , ती पाण्याची बॉटल तुम्ही रामचंद्र च्या घरी जाऊन प्या ...! आणि दोन दिवसांन नंतर मी तुमच घर पाहायला येईण ,.....तेव्हा मी तुम्हाला हे विचारीन की हे पाणि पेउन तुम्हाला उलटी, मळमळ इत्यादी काही त्रास झाला .....की ...नाही....? "
अस म्हणतच जगदीशरावानी विलासरावांना एक आभिमंत्रीत केलेली बाटली दिली, त्यासरशी विलासराव व रामचंद्र त्यांच्या घरी आले, घरी आल्यावर विलासरावांनी जगदिशरावां च्या सूचनेप्रमाणे पाणि पिल, मग त्यासरशी अर्धा -एक तास असाच निघुन गेला आणि मग 1 तासनंतर मात्र विलासरावांच्या पोटात मळमळू लागल, उलट्या होऊ लागल्या, दर अर्ध्यातासाला पोटात मळमळत होत, आणि उलटी होत-होती, कशी बशी विलासरावांनी व रामचंद्र यांनी ती काळरात्र घालवली ,
2 दिवसानंतर .. विलासरावांच नव घर
जगदीशरावांनी विलासरावांच पुर्ण घर, व आजुबाजुचा सर्वकाही परिसर 30 -35 मिनिटांच्या अवधीत न्याहाळल ,मग त्या नंतर ते तिघेजन विलासरावांच्या नव्या घरात जमले, तस जगदीशराव बोलू लागले .
" विलासराव ..! मी तुमच घर आणि आजूबाजूचा परिसर न्याहाळला, तुमच्या घरापासुनच मला त्या झाडाझुडपांन पलिकडे स्मशान आहे हे समजल...!" जगदीशराव पुढे काही बोलनार की तोच मध्ये रामच्ंद्र म्हणाले
" तरी मी म्हणालो होतो ..याला...हे स्मशान घरा जवळ चांगल नसत ! पन हा मलाच चांगल्याच डोस पाजू लागला !" रामचंद्र राव थोडे रागातच म्ह्नाले. त्यांच्या ह्या वाक्यावर
विलासराव एकटक खाली मान घालून बसले होते, प्रतिउत्तरासाठी मनात किंवा मुखात..
शब्द नव्हते जे होत-होत ते सत्यच तर होत, आणि ह्यात आपलीच....चुकी
आहे हे समजून विलासराव गप्प बसले.
" अहो रामचंद्र...! मला काही बोलू द्याल का...!"
जगदीश राव म्हणाले.
" माफ करा.!" रामचंद्र इतकेच म्हणाले. तस जगदीशराव पुढे बोलू लागले ,
" विलासराव ...! मी तुमच्या घराच ....निरिक्षण केल, तर मला निरिक्षणात एक गोष्ट कळाली.....!की...तुमच्या घराची मांड़णी जी आहे.. !.....ती एकदम चुकीची ..आहे ..! आता त्याचा एक मुद्दाच पाहाना..! किचनची खिडकीच तोंड स्मशानाच्या दिशेने आहे.....: वास्तु शास्त्रानुसार हे चुकीच आहे...! आणि त्यासोबतक्ष सांगायच तर मला तुमच्या ह्या घरात खुप सा-या वाईट ..शक्तिंच्या लहरींचा भास सुद्धा .होतोय ..जणू तुमच्या ह्या घरातच काहीतरी.. रहस्य दडलय..!"
बारी-बारीन त्या दोघांकडे तर कधी आजुबाजूला घरात नजर फिरवत जगदीश राव म्हणाले.
" परंतु ...! हे काय आहे...आणी ह्या द्रष्ट सापळ्यातुन सुटण्याचा काही मार्ग आहे...का..?"
रामच्ंद्र म्हणाले.
" हो आहेना..! समस्या कितीही...कठिण असो .! .निरुसरण हे
असतच...! ज्याप्रकारे एका डॉक्टरला पेंशंट तपासुन झाल्यावर त्या रोग्याला कोणती समस्या आहे हे ... कळत .!..व त्या नंतर उपचारार्थी तो डॉक्टर योग्य ती गोळी देऊन पेशंटला त्या रोगामधुन सुखरुप बाहेरुन काढून ..बर करतो ! त्याच प्रकारे मला तुमच्या घरात काय प्रोब्लेम आहे..हे जेव्हा कळेल त्याच वेळेस मी काहीतरी ..करु शकतो...!"
" म्हणजे तुम्हाला अद्याप हे कळाल..नाहीये की...ह्या घरात कोणत्या
वाईट शक्तिचा प्रभाव आहे...! " विलासराव म्हणाले .
" वाईट शक्ति कोणतीये...! तिचे उद्देश्य काय आहेत...! तिच सामर्थ्य.
ध्येय..काय आहे ! ह्या सर्व बाबी कळण्या अगोदर मला एक साधना
करावी लागते .! .त्या शक्तिच आवाहन, करुन मला त्या शक्तिशी संपर्क साधावा लागतो ...! मगच मी योग्य तो पाऊल उचलू शकतो ...!"
" मग...! ती साधना कधी करणार आहात तुम्ही.... ?"
रामचंद्र म्हणाले.
" तस सांगायच तर मी आजच केली असती !....परंतु आज रात्रीपासुन अमावास्या सुरु होणार आहे...! आणि अमावास्येच्या दिवशी प्रेतांची
..शक्ति ही..द्विगुणीत कार्यरत असते...! त्याच कारणाने मी ही साधना 2 दिवसानंतरच करेल...!" आणि मग 3 चार दिवसांनी आपण भेटू....! तो पर्यंत तुम्ही.. विलासराव .?जगदीशजी विलासरावांना उद्देशून हे वाक्ये उदारले..=!> तुमच्या मित्राजवळच रहा...! ह्या घरात येऊ नका.....अन्यथा तुमच्या जिवास धोका निर्माण होऊ शकत ..."
जगदीश रावांनी अजुन काही-बाही...सुचना दिल्या व ते निघुन गेले.
त्यानंतर विलासराव 5 दिवस रामचंद्र यांच्या घरीच राहीले , विलासराव आणि रामचंद्र यांची मैत्री घरातल्यांना माहीती होती, व हे सुद्धा माहीती होत की बायको बाळ्ंतपणासाठी माहेरी गेलीये, पाहता-पाहता पाच दिवस सरले , आणि वेळ त्या दिवसावर येऊन ठेपली.
जगदीशराव, विलासराव , आणि माझे आजोबा रामचंद्र तिघे ह्यावेळेस
एका हॉटेल मध्ये बसले होते, जगदीशरावांनीच ही जागा सुचवली होती,
विलासरावांनी एक कटाक्ष जगदीशरावां वर टाकला, ते जरा चिंतेतच दिसत होते, त्यांच चिंताग्रस्त चेहरा पाहुन विलासरावांना सुद्धा थोड भीतीदायक फ़ील होऊ लागल होता , मनात एक वेगळ्याच प्रकारची भीती उत्पन्न होत-होती . काहीवेळ झाला असेल कोणीही काहीही बोल्ल नाही , तस विलासरावांनीच विषयाला हात घालायच ठरवल व बोलू लागले ,
" जगदीश जी ..! तुम्ही येवढे चिंताग्रस्त का दिसताय...? काही
भयंकर बाब आहे..का..! ही...."
विलासरावांच्या ह्या वक्तव्यावर जगदीशरावांनी त्यांच्या कडे पाहिल व एक उसासा टाकतच म्हणाले .
" विलासराव ...! कोणत्या श्ब्दांनी सांगू तुम्हाला कळंत नाहिये..!"
" अहो ! अस का ...बोलताय...तुम्ही...!" विलासराव म्हणाले .
" विलासराव..! मी आजपर्यंत खुप सा-या भुत -प्रेतांच्या घटना
पाहिल्यात व त्यातुन त्या पिडाग्रस्तांना बाहेर सुद्धा काढलय..पण .."
" पण ..............!......काय जगदीश जी.... पुढे....बोलाना....!"
" विलासराव ..! काही ..गोष्टी मनुष्याला...न कळलेल्याच ब-या
असतात ...! आणि सांगायच तर....ह्या अशा बाबीं बदल मी फक्त
मदतच करतो..., !बाकी ते भुत , पिशाच्च विद्या ह्यांचा ..खुलासा मी
करत नाही... ! परंतु तुमच्यावर ओढावलेल संकट हे खुप भयंकर आहे
आणि त्याचा उपाय व ती माणस कोण आहेत हे सुद्धा मला
कळालय ..!"
" काय....? कोण आहेत .ती माणस ..! "
विलासराव मोठ्यानेच म्हणाले .
क्रमश : ....
🙏🏾😊
समीक्षा प्लीज वाचकांनो😊