God, don't you want to be a man? in Marathi Short Stories by Vishakha Rushikesh More books and stories PDF | पुरुषार्थ नको रे देवा....?

Featured Books
Categories
Share

पुरुषार्थ नको रे देवा....?

एक समीर नावाचा मुलगा होता. अत्यन्त हुशार आणि कर्तृत्वान तो रोज .अशा ठिकाणी बसायचा तिथे कोणी ये जा करत नसे कारण त्याला एकांत बसायचं होत. एके दिवशी तिथून एक साधू जातो त्याने त्याला पाहिलं तो त्याच्या जवळ जाणार तितक्यात त्याच्या डोक्यात एक विचार आला हा मुलगा आजच आलाय कि रोज बसतो इथे म्हणून त्याने ठरवलं कि पाहूया कि उद्या पण येतो का असं बोलून तो तिथून निघून जातो आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी तिथे येतो.असं करता करता तो एक महिना त्याची गंमत पाहत असतो, शेवटी त्या साधुला करमेना तो त्या मुलाजवळ जातो आणि विचारतो बेटा तुझं नाव काय रे? तू इथे का बसला आहेस तो मुलगा त्याच नाव सांगतो पण तो इथे का बसला आहे याच उत्तर नाही देत साधू पुन्हा त्याला तोच प्रश्न करतो बेटा तू इथे का बसला आहे मी तुला गेले महिनाभर पाहत आहे तू रोज संध्याकाळी इथे बसलेला असतो तू जरी मला काही सांगितलं नाही ना तरी तुझा हा चेहराच सर्व काही बोलून जातोय. अरे तू जर तुझं मन मोकळ नाही केलंस ना तर तुला खूप त्रास होईल.आतून तू खूप खचून गेलास आणि तुझी घुसमट देखील होत आहे बोल काय कोणत्या अडचणी मध्ये आहेस तुझ्या मनामध्ये ज्या प्रश्नांनी जे काही थैमान घातलं आहे ना त्याची उत्तर शोध, असा शांत राहू नकोस. हे साधूचे बोलणं ऐकून समीर चे डोळे पाणावतात तो बाबा ला प्रश्न करतो बाबा मुलगा असणे म्हणजे गुन्हा आहे का हो? साधू त्या वर उत्तर देतो नाही रे बेटा का काय झालं असा प्रश्न का केला समीर बोलतो म्हणजे बघा ना जेव्हा पहिला मुलगा जन्माला आला कि तो वंशाचा दिवा मानला जातो का तर मुलगा हा घरचा वारस असं जाहीर केल जात. आणि तो दिवस खूप आनंदाने साजरा केला जातो.बरोबर ना साधू बोलतो हो बरोबर मग त्याच काय समीर त्यावर बोलतो कि जेव्हा मुलगा लहान असतो तेव्हा त्याच्या साठी सर्व काही केल जात. त्याच्या आवडी निवडी जोपासल्या जातात. जसजसा तो मोठा होऊ लागतो, शिक्षण पूर्ण होत. आणि मग त्याच्यावर जबाबदारी टाकली जाते.ती म्हणजे कुटुंबाची जबाबदारी मग त्याच्या खऱ्या अर्धाने आयुष्याला सुरुवात होते.एकदा का तो नोकरीला लागला कि घरचांच्या अपेक्षा वाढायला लागतात. त्यांच्या अपेक्षा पूर्ण नाही होत तो पर्यन्त त्याच्या लग्नाचा विषय मग त्याच लग्न लग्न झालं कि मुलं मग त्यांच्या अपेक्षा पूर्ण करत बसाव लागत या सर्वाचं करता करता स्वतःच्या अपेक्षा काय आहेत त्यांचं ड्रीम काय आहे. पुढे आयुष्यात काय करायच आहे.हे कधी विचारलं देखील जात नाही.शेवटी कोणी समजूनच नाही घेत. आयुष्य हे माणसाला एकदाच मिळत मग त्याला देखील हवं तस जगू दया ना ! का आमच्या वर इतका प्रेशर का आमच्या कडून अपेक्षा जो पर्यंत प्रेत्येकाचे हात पाय सलामत आहेत तो पर्यन्त प्रत्येकाने प्रत्येकाचं केल पाहिजे आणि हा कुटूंबाची जबादारी असो वा इतर काही जेव्हा वेळ येईल तेव्हा करणार ना?आम्हाला आठवड्यातून एक दिवस सुट्टी असते तर तो तरी जगू दया,आम्हाला त्या वर देखील बंधन, असं बोलतात कि सर्व मुलींना त्याच्या अपेक्षा पासून दूर ठेवलं जात पण असं नाही राहील आता, आता हीच वेळ मुलांवर देखील आली पण मुलांना होणारा त्रास सहजा सहजी बाहेर काडत नाही,आणि दाखवत ही नाही म्हणून मुलांचं छान आहे असं बोललं जात.या सर्व गोष्टी ला मी त्रासलो आहे बाबा आणि समीर चे डोळे भरून येतात. साधू त्याला धीर देत असतो तो समीर ला बोलतो कि बग बेटा जिथे माणूस म्हटलं कि या सर्व गोष्टी होतच असतात. अशा परिस्थिती ला आपण सामोरे गेले पाहिजे कारण आपण परिस्थिती पासून जेवढे पळणार ना परिस्थिती तुमच्या मागे येणार. बग माणसाला जन्म हा एकदाच भेटतो. पुनःरूपी जन्मास न येणे, त्यासाठी आपल्याला शांत डोक्याने विचार केला पाहिजे. तू असा एकटा नाही आहेस ज्याला त्रास आहे जगामध्ये हजारो शेकडो लोक राहरात त्यांना पण काहींना काही त्रास आहे हे होतच असतं रे त्याच्यातुन आपण मार्ग काढला पाहिजे. आज तूझी वेळ वाईट आहे दिवस तर नाही ना, मग का इतका खचून जातोय.प्रत्येक दिवस खूप आनंदाने जागाचा. कारण माणसाला जन्म हा एकदाच मिळतो. दुसऱ्या साठी नाही निदान स्वतःसाठी जगायचं. एक ना एक दिवस तुझा ही चांगला येईल तेव्हा तुझी परिस्थिती बदललेली असेल. म्हणून कोणत्या ही कारणास्तव खाचायच नाही खंबीरपणाने उभे राहायचं, आणि प्रेत्येक परिस्थितीला सामोरे जायचं. तुला जर कोणी विचारलं जन्माला आलास पण आयुष्यात तू काय केलास तू तुझं असं आयुष्य जगलास कि नाही. कि तो माझा आणि तो तुझा करत राहिलास याच तुझ्या कडे उत्तर असलं पाहिजे. स्वतःच एक ध्येय ठरलेलं असेल तर ते पूर्ण करायची मी स्वतःमध्ये धमक असली पाहिजे उंच शिखरावर तुला जायचं आहे पण तुला खूप अडचणी येतात तुझ्या मनामध्ये धाकधूक होतेय म्हणून तू माघार नाही घ्यायची तर एकच निःशय करायच कि मी करेन एका मतावर ठाम असला पाहिजे तरच तू उंच शिखर पर्यंत पोहचू शकतो. असं बोलून त्यावर बाबा समीर च्या पाठीवरून हात फिरवतात. समीर मध्ये एक वेगळीच एनर्जी येते बाबा चं बोलणं ऐकून समीर ठरवतो माझं जे स्वप्न आहे ते मी पूर्ण करेन भले कितीही अडथळे आले तरी चालेल. समीर बाबा ला धन्यवाद करून निघून जातो. दुसरा दिवस आला समीर च्या मनामध्ये सारखे विचारांनी थैमान घातलं होत विचार समीर ची पाठ सोडायला तयारच नाही. असं करता करता दिवस जात होते समीर त्याच्या पद्धतीने त्याचे ध्येय पूर्ण करण्याच्या मागेच लागला होता. त्याला काही वेळा यश ही आले आणि अपयश देखील आले, पण त्यांनी कधी माघार घेतली नाही.त्याने त्याचा छोटासा बिजनेस चालू केला. त्याला त्याचा बिजनेस खूप मोठा करायचा होता. बिजनेस मध्ये त्याची आर्थिक परिस्थिती ठसळली . तरीही तो खचून गेला नाही.असं करता करता तीन वर्ष झाली आज त्याने छोटासा चालू केलेला बिजनेस आज खूप उंच शिखरावर नेऊन ठेवला आहे त्यांनी. आज माझा बिजनेस खूप उंच शिखरावर पोहचला आहे याचा आंनद त्याला गगनात मावेना. समीर त्याच्या कामात यशस्वी झाला. आज त्याच्या मोठा बंगला आहे. आणि घरासमोर गाडी प्रत्येक मुलांची स्वप्न असतात त्याच्यातलं समीर च स्वप्न पूर्ण झालं.तसाच तो ज्या ठिकाणी त्याला बाबा भेटले होते तिथे तो गेला आणि त्या साधू बाबा च्या पायाखाली लोटांगणा घातली आणि म्हणाला बाबा तुमच्या मुळे आज मी खूप मोठा बिजनेस वाला झालोय आता माझ्या कडे कोणत्याच गोष्टीची कमी नाही. असं बोलून तो बाबाला बोलतो बाबा पुरुषार्थ पाहिजे पण असे जे पुरुष आहेत त्यांना समजून घेणारा व्यक्ती पाहिजे. तरच त्याच्या जीवनाला अर्थ येईल आणि पुरुषार्थ नको बोलणारे पुरुष आज पुरुषार्थ पाहिजे असं बोलले पाहिजेत. पुरुष जन्मास खूप त्रास सहन करावा लागतो. मनुष्य जन्म लाख मोलाचा आहे. अशा लाख मोलाच्या जन्माला सहजा सहजी सोडू नका. तात्पर्य :-अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. विशाखा ऋषिकेश मोरे (विलास सावंत ) दापोली भोपण ) 9137853889