Punha Vivah - 1 in Marathi Motivational Stories by Shalaka Bhojane books and stories PDF | पुनर्विवाह - भाग १

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 52

    નિતુ : ૫૨ (ધ ગેમ ઇજ ઓન)નિતુ અને કરુણા બંને મળેલા છે કે નહિ એ...

  • ભીતરમન - 57

    પૂજાની વાત સાંભળીને ત્યાં ઉપસ્થિત બધા જ લોકોએ તાળીઓના ગગડાટથ...

  • વિશ્વની ઉત્તમ પ્રેતકથાઓ

    બ્રિટનના એક ગ્રાઉન્ડમાં પ્રતિવર્ષ મૃત સૈનિકો પ્રેત રૂપે પ્રક...

  • ઈર્ષા

    ईर्ष्यी   घृणि  न  संतुष्टः  क्रोधिनो  नित्यशङ्कितः  | परभाग...

  • સિટાડેલ : હની બની

    સિટાડેલ : હની બની- રાકેશ ઠક્કર         નિર્દેશક રાજ એન્ડ ડિક...

Categories
Share

पुनर्विवाह - भाग १

ही कथा पुर्णतर्ध: काल्पनिक आहे याचा वास्तव जीवनाशी काहीही संबंध नाही जर आढळला तर निव्वळ योगायोग समजावा.माझ्या कल्पना शक्तीला सुचलेली ही कथा आहे.
भाग १
रात्री चे दोन वाजले तरी अजय घरी आला नव्हता त्याची बायको स्वाती त्याची वाट बघत बसली होती. अजयची लेट येण्याच्यी ही काही पहिलीच वेळ नव्हती.मित्रां बरोबर पार्टी असली की, असाच त्याला उशीर व्हायचा .‌पण स्वाती त्याची वाट बघत बसायची. फोन लावून त्याला विचारावे असे तिला वाटलं पण तो विचार तिने झटकून टाकला कारण तो बाईक घेऊन गेला होता. अजय कधीतरीच घ्यायचा . वाट बघता बघता तिचा डोळा लागला.
अजय मित्रांना बाय करून निघत होता . चला रे निघतो आता खूप उशीर झाला आहे. पण मित्र च ते त्यांनी त्याला थांबवून ठेवले. "अरे जाशील रे , किती दिवसांनी भेटलो आहे . " रमेश म्हणाला. थोडावेळ थांबणं म्हणजे अजून थोडी दारू पिणे. अजयला मित्रांचा आग्रह मोडता आला नाही. अजय थांबला .पण खूप वेळ झाला तरी त्यांचं काही निघायचं नावं नाही ते बघून अजय जायला निघाला . मित्रांना बाय करून तो आपल्या बाईक जवळ आला. सगळीकडे शांतता पसरली होती. रस्त्यावर चिटपाखरूही नव्हते. त्याने बाईक स्टार्ट केली . तो बाईक वरून निघाला.नशेमुळे तो बाईक पण व्यवस्थित चालवू शकत नव्हता.त्याला गरगरल्यासारखे होत होते. त्यान ब्रेक मारला.ब्रेक मारल्या मुळे बाईक स्लीप झाली आणि तो पडला. तो तसाच रस्त्यावर पडून होता. खूप वेळाने त्याने डोळे उघडले .तर एक रिक्षावाला त्यालाच बघत होता. पण त्याला पडलेलं बघून पण त्याची मदत करत नव्हता तो कोणाशी तरी फोनवर बोलत होता. अजय ने त्यांच्या दिशेने हात दाखवला पण तो काही च प्रतिसाद देत नव्हता.

अजय उठून उभा राहिला . त्याला वाटले की त्याला फार त्रास होईल उभं राहायला. पण त्याला तर काही च त्रास होत नव्हता.त्याला वाटले की, एवढे पडून सुद्धा त्याला लागलं नाही म्हणजे चमत्कार च झाल. तो रिक्षावाल्या जवळ गेला.तो बोलत होता पण रिक्षावाला त्याच्या कडे बघत पण नव्हता. इतक्यात पोलिसांची गाडी तिथे आली तो रिक्षावाला त्यांना हाता ने काहीतरी दाखवत होता. त्याने त्या दिशेने बघितले तर तो अजूनही ति‌‌थेच होता. हे कसे शक्य आहे. अजयने जवळ जाऊन बघितले तर त्याचे शरिर खाली निपचित पडले होते . हेल्मेट न घातल्यामुळे त्याच्या डोक्याला खूप मार लागला होता. त्याला आता हे कळून चुकले होते की तो आता या जगात नाही आहे. त्याला आठवले की, स्वाती त्याला नेहमी हेल्मेट घालायची आठवण करायची आणि तो नेहमी तिला हसत बोलायचा" काय होत नाही ग मला. " आता त्याला ते आठवून फारच वाईट वाटत होते. पोलिस त्याच्या बॉडी चा पंचनामा करत होते एक फोटोग्राफर त्याच्या मृत शरिराचे वेगवेगळ्या अॅन्गल ने फोटो काढत होते. पोलिसांना त्याचा मोबाईल मिळाला पण पडल्याने तो बंद झाला होता. त्याच्या जवळ त्याचे आधार कार्ड मिळाले होते. त्याला आता फार रडायला येत होतं. ॲम्ब्युलन्स आली आणि त्याचे मृत शरीर घेऊन निघाली. तो पण त्या ॲम्ब्युलन्स मध्ये होता . त्याची बॉडी पोस्टमोर्टम साठी घेऊन चालले होते. आता रडण्या शिवाय तो काही करू शकत नव्हता.
पहाटे पाच वाजता स्वाती ला जाग आली. तीने घाईघाईने अजय ला फोन लावला. पण अजयचा फोन स्वीच ऑफ लागत होता. ती सतत त्याला फोन लावत होती. पण फोन लागतच नव्हता. तीला आता ‌खूपच टेन्शन आले होते. तीने त्याच्या मित्रांचे फोन नंबर शोधले आणि त्यांना फोन केला ज्यांना तो रात्री भेटायला गेला होता. पण त्यांनी तिला सांगितले की, तो तर रात्री च निघाला होता. ते ऐकून तर तिला खूपच टेन्शन आलं. काय करावे तिला कळेना. तीने त्याच्या मित्राला रमेश ला फोन केला.
स्वाती,"रमेश भाऊजी अजून अजय घरी आला नाही आहे. "
रमेश, " अहो वहिनी, काय बोलताय ?तो तर रात्री च निघाला होता . अजून कसा काय आला नाही."
स्वाती," रमेश भाऊजी, तुम्ही येता का इथे ? मला खूप भीती वाटते.?
रमेश," मी येतो वहिनी तुम्ही टेन्शन घेऊ नका.
स्वाती," ठिक आहे. "
स्वाती ला काही च सुचत नव्हते ती ने बाजूला राहणाऱ्या तीच्या मैत्रीणीला रिनाला सर्व सांगितले.तिची घाई गडबड बघून चाळीतले इतर पण लोक आले बघायला काय झाले? अजय काल रात्रीपासून घरी आला नाही ही गोष्ट सगळ्या चाळीला समजली. सगळेजण मिळून स्वाती ची मदत करायला धावले. चाळी मध्ये हे एक बरं असतं सगळे जण एका कुटुंबा सारखे राहत असतात. कोणाच्या ही कुटूंबात काही अडचण आली की, सगळे लगेच एकत्र येतात. आता पण सगळे स्वाती च्या घरी जमले होते. काय करता येईल याचा विचार करत होते.
अजय चा मित्र रमेश पण आला. त्याने सांगितले की, अजय रात्री दोन वाजताच निघाला होता. बाकी चे मित्र माझ्या बरोबरच होते. तरीपण स्वाती च्या समाधाना साठी त्याने सगळ्या मित्रांना कॉल केला. शेजारचे जाधव म्हणाले की, आपण पोलीस स्टेशन ला जावूया का❓ त्यावर सगळ्यांचे असे मत झाले की, अजून थोडावेळ थांबू. मग जावू पोलीस स्टेशन ला.
आधार कार्ड वरून अजय ची ओळख पटली होती. पोलीसांनी तो राहत असलेल्या विभागातील पोलीस ठाण्याला कळवले. पोलीसांनी मग एक हवालदार त्यांच्या घरी पाठवला. हवालदार घर शोधत अजय च्या घरी पोहोचले .
घरात चाळीतले लोक होते. पोलिसांना बघुन सगळ्यांच्या ‌हृदयाचा ठोका चुकला.
पोलिसांनी विचारले अजय सरदेसाई चे घर हेच आहे का?
स्वाती अधीरपणे म्हणाली,"हो हो हेच घर आहे त्यांचं कसे आहेत ते ठिक तर आहेत ना? पोलिसांनी सांगितले की आम्हाला एक डेडबोडी मिळाली आहे. त्या बोडीचा पंचनामा करताना आम्हाला आधार कार्ड मिळालं आहे . त्यावर इथला a ॲड्रेस होता. त्यामुळे बॉडी ची ओळख पटवायला आमच्या बरोबर यावे लागेल.
त्यांचे हे बोलणे ऐकून स्वाती ला चक्करच आली.

पुढे काय होणार आहे हे बघूया पुढील भागात