भाग ७
दुकानदाराने खूप सुंदर अशी जरी काठाची कांजीवरम साडी दाखवली. ती साडी दोघींना पण खूप आवडली. ती साडी त्या दोघींनी खरेदी केली. आणि दोघी अंगठी ची डिजाईन बघायला ज्वेलर्स कडे गेल्या. अंगठी ची डिजाईन बघतच होत्या इतक्यात आदित्य आला. एक सुंदर शी अंगठी ची डिजाईन तिने सिलेक्ट केली. मग आदित्य साठी पण अंगठी ची डिजाईन तिथेच आदित्य ने सिलेक्ट केली. ती विणाताईंना म्हणाली, " मी निघू का का की? "
विणाताईं, " अगं थांबना काहीतरी खाऊ या ना. मला तर बाबा खूप भूक लागली आहे. "
संजना, " नको तुम्ही जेवा. मी निघते मला उशीर होईल. "
विणाताईं, " अगं आदित्य सोडेल ना तुला. "
आदित्य, " मी सोडेन तुला घरी. "
संजना ला आता काही बोलता येईना. तीने आईला फोन केला.
सरीता ताईं, " हॅलो, हा संजू बोल गं काय म्हणत होतीस? "
संजना, " मी जेऊन येईन. तू जेऊन घे. आदित्य सोडायला येणार आहे, "
सरीता ताईं, " बरं ठिक आहे. "
आदित्य गाडी घेऊन आला होता.विणाताईं मागे बसतात.
संजना पण मागे च बसायला जाते तर विणाताईं तीला पुढे बसायला सांगतात.
गाडी मध्ये कोणी काही बोलत नाही. नेहमी संजना स्वतः हून बोलायची पण आता ती शांत बसली होती. हॉटेल आलं तिघेही खाली उतरले.
विणाताईं," संजना तुला काय आवडते ते तू मागवं."
संजना, "तुम्ही कायमागवाल ते चालेल मला. " आदित्य ने आणि विणाताईं नी जेवणाची ऑर्डर दिली.
जेवण येईपर्यंत विणाताईं तीच्या शी गप्पा मारत होत्या.संजना जेवढ्या स तेवढेच बोलत होती. आदित्य मात्र आज आपल्या आई समोर व्यवस्थित बोलत होता.जेवण झाल्यावर ते घरी जायला निघाले. आदित्य ने आधी विणाताईं ना घरी सोडले. विणाताईं नी संजना ला बाय केले. मग तो संजना ला सोडायला गेला .
आता फक्त गाडी त संजना आणि आदित्य होते. पण नेहमी त्याला बोलत करणारी संजना आज मात्र काही च बोलत नव्हती. त्याच्या ही ते लक्षात आले.
संजना, " आदित्य तुम्हाला खरच माझ्या शी लग्न करायचे आहे ना. "
आदित्य, " मग आता खरेदी कशासाठी केली. "
संजना, " मला असं कुठे तरी वाटतयं. तुम्ही जास्त बोलत नाही. "
आदित्य, " मला नाही आवडत जास्त बोलायला. "
इतक्यात तीचं घर आलं. ती गाडीतून खाली उतरली. आणि सरळ घरी निघाली. ती गेटजवळ पोहचली तेव्हा आदित्य ने तीला आवाज दिला.
आदित्य, " संजना .. " संजना मागे वळली आणि तीने त्याला विचारले.
संजना, " काय झालं? "
आदित्य, " बाय" आदित्य ने तीला बाय केलं.
त्यावर तीने फक्त हात हलवला जरास हसल्या सारखं केल आणि ती निघाली.
संजना घरी आली. आईकडे बघून स्माईल केले आणि बेडरूम मध्ये गेली. चेंज वैगरे करून ती तिच्या नाईट क्रिम , माॅइश्चुरायजर वैगरे लावत होती.
सरीता ताईं, " झाली काय गं खरेदी? "
संजना, " हो आई झाली. आदित्य साठी पण तिथेच अंगठी घेऊन टाकली. तो आलाच होता तिथे मग त्याच्या चॉईस नेच घेतली. "
सरीता ताईं, " बरं झालं घेतली स ते. परत परत कुठे भेटत बसायचे. साखरपुड्याची पण घाई च झाली ना. "
संजना, " आई तो जास्त बोलत नाही ग. मला काय कळत नाही कसं वागायचं ते त्याच्या शी. "
सरीता ताईं, " अगं काही काही पुरुषांचा स्वभावच तसा असतो ते नाही च बोलत जास्त. "
त्यावर संजना काही बोलली नाही.
_ _ __ __ ___ ___ ___ __ ___ ____ ___ _____ ____
संजना पण आपल्या कामात बिझी झाली होती . लग्नासाठी तिला सुट्टी घ्यायला लागणार होती. म्हणून आत ती बिझी होती . जेवढं होईल तेवढं काम ती आटपणार होती. आदित्य चा तीला एक ही मॅसेज आला नव्हता. उद्या त्यांचा साखरपुडा होता. आज आणी उद्या तीने सुट्टी घेतली होती. तीने मेहेंदी काढायला एका मुलीला बोलावलं होते. ती येऊन मेहेंदी काढून गेली. आई ने तीला भरवलं . दोघी मायलेकी च होत्या घरी .
" आई उगीचच मला सकाळी लवकर उठवू नकोस हा. साखरपुडा संध्याकाळी आहे. सकाळी नाही. तू उगीचच घाई गडबड करत असतेस. " संजना आईला म्हणाली.
सरीता ताईं, " बरं बाई . "
संजना झोपायचा प्रयत्न करत होती. पण झोप काही तिला येत नव्हती. उद्या चा विचार तीच्या डोक्यात येत होता. कॅटरिंग वाल्याला तीने फोन केला होता. दुसरं कोण करणारं पण नव्हतं ना. "
विचार करता करता कधीतरी तिला डोळा लागला . सकाळी आईने तीला उठवलं . आईने तीच्या डोक्यावरून मायेने डोक्यावरून हात फिरवला. तीला खूप बरं वाटलं. आईने असा हात फिरवला कि, तीला खूप बरं वाटायचं.
तीने आईच्या मांडीवर डोकं ठेवलं. आई मायेने तीच्या डोक्यावर हात फिरवत बसली. . संजना आवरून आली. हॉल तिच्या घराजवळच होता.दुपारी तीने एक पार्लर वाली बोलावली होती. हेअरस्टाईल, मेकअप करायला. नेव्ही ब्लू कलरची पैठणी ती नेसली होती. त्यावर साजेसा मेकअप, खूप छान दिसत होती ती.
तिच्या आईने बेबी पिंक कलरची गोल्डन किनारी ची साडी नेसली होती. संजना ने आईची पण हेअरस्टाईल करायला सांगितली. साखरपुड्याची आदित्य साठी घेतलेली अंगठी तीने आईजवळ दिली. अंकित आला.
अंकित, " अरे वा . खुप सुंदर दिसते आहे. "
घरातून निघताना तीने बाबांच्या फोटो ला नमस्कार केला.
आईचे डोळे पाण्याने भरून आले. पण तीने ते पाणी पटकन पुसुन टाकले. तिघे ही जायला निघाले. हॉलवर पौहचले तेव्हा फार कुणी आले नव्हते.
संजना नवरी साठी असणाऱ्या रुममध्ये आली. आई बाहेर पाहुण्याचं स्वागत करायला निघून गेली.
संजना एकटीच त्या रुममध्ये बसली होती. थोड्या वेळाने हॉल भरला. आदित्य आणि त्याच्या घरचे आले. सरीता ताईं नी त्यांचे स्वागत केले. संजनाला बाहेर बोलावले. सगळे तिला बघत होते. विड्याची पाने मांडली होती त्याच्या समोरच्या पाटावर बसून संजना ने पूजा केली.
थोड्या वेळाने आदित्य ला पण बोलावले.
आदित्य ने संजना च्या हातात अंगठी घातली. संजना ने आदित्य च्या हातात अंगठी घातली. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. दोघांनी एकमेकांना पेढा भरवला. मग ते दोघे आदित्य च्या मम्मी पप्पांच्या पाया पडले. माग सरीता ताईं च्या पाया पडले. मग दोघे स्टेजवर च थांबले. पाहुणे एकेक करून त्यांना भेटायला येऊ लागले तसेच आलेल्या पाहुण्यांबरोबर फोटो काढणे चालू होते. एकमेकांच्या नातेवाईकांची, मित्र मैत्रीणींची ओळख करून देणे चालू होते.
हळूहळू सगळे जायला लागले. आदित्य त्याच्या मित्रांबरोबर जेवायला गेला. विणाताईं तीला बोलवायला आल्या जेवणासाठी मग सरीता ताईं आणि संजना त्यांच्या बरोबर जेवायला बसल्या. संजना जेवली की नाही किंवा तीला जेवणासाठी विचारायला हवं. हे त्याच्या गावी पण नव्हते. विणाताईं च्या ते लक्षात आलं पण आता ह्या वेळी
त्यांनी तसं दाखवलं नाही. नंतर आदित्य शी बोलायचे त्यांनी मनोमन ठरवलं.
जेवण झाल्यावर सगळे निघाले. संजना हॉल चे पेमेंट करत होती. आणि कॅटरिंग चे पेमेंट करत होती. हिशोब वैगरे करत कॉन्फिडन्टली त्यांच्या शी डिल करत होती. ते बघून विणाताईं ना खूप बरे वाटले. आपलं घर ही व्यवस्थीत सांभाळेल आणि आपण आदित्य साठी योग्य मुलगी निवडल्या चा त्यांना अभिमान वाटला.
हा भाग तुम्हाला असा वाटला. ते आपल्या प्रतिक्रीयेतून नक्की सांगा.
हा भाग तुम्हाला आवडला असेल तर स्टिकर्स द्यायला विसरु नका.