मैत्री आता उरली नव्हती...
आज पुन्हा वाट पाहत होतो तुझी मी,
वाटलं अजुन एक कविता ऐकविल मी,
माझ्या या अंतरंगातील भरले गेले रंग,
तु नाही आली म्हणून ते झाले भंग,
विचार करू लागलो मी, का आली नाही तू
कुठे गेली असशील तू
करत असताना विचार आठवले मला
माझ्यावर राग आलाय ना तुला
मी खरं सांगतो चूक झाली ग माझी
आता शपथ घेऊ का तुझी
नको करू या मित्रावर अत्त्याचार
नाहीतर दुखवेल मी फार
मी सायंकाळ पर्यंत वाट पाहिली
पण त्या दिवशी तू नाही आली
कुणीतरी सांगितल्यावर
समजले तू आहे मृत्यूच्या दारावर
ते ऐकून आली मला भोवळ
आणि उठली माझ्या हृदयात कळ
त्यातच वाढली माझी मजल
लावला तेव्हाच तुला कॉल
तुला विचारले फोन वरून रडता रडता
तू हळूच हसून म्हणाली
अरे वेड्या खरे मित्र थोडेच मरता
हीच आहे माझी अपूर्ण न संपणारी कविता
बोललो जेव्हा तुला
तू नाही आली
बंद माझ्या हृदयाची चावी
तेथेच ग हरवली
तु त्या दिवशी मरून सुध्दा
मेलीच नाही
जे माझ्या हृदयात तुझे घर होते
तेथून तू गेलीच नाही
मैत्री आता उरली नव्हती
तुझ्यात आणि माझ्यात
संपली होती सर्व नाती
होतो मी तुझ्या प्रेमात
हो मी तुझ्या प्रेमात
का माझ्याशी अशी खेळली
मी जीवनाच्या उजेडात
तू काळोखात निघून गेलीस
खरंच मी तुला
नाही कधी विसरलो
तू फोटो फ्रेम मध्ये
आणि बाहेर मी एकटाच राहिलो.
____________________________________________
सावळा रंग
काय सांगू मी कुणासाठी मजबूर आहे,
गोरा रंग मला आवडत नाही,
हे मात्र जरूर आहे,
सोडली मी ती गोऱ्यांची गुलामगिरी,
कळले कर्तुत्वाने गाजवता येते मक्तेदारी,
विश्वास आहे हिंमतीवर तुझ्या,
रंग नसला गोरा तरी हृदयात माझ्या,
गोड वस्तू मला आवडत नाही
हे खरं आहे,
पण तुझं हसणं कसं पचतं
हे नाही काही बर आहे,
तुझा तो कृष्णवर्ण,
त्यात तुझे ते केस मागे करणं,
तुझं ते किंचितस लाजणं,
आणि तू दिसताच
हृदयात माझ्या टिकटिक वाजणं,
खरंच तुझ्या प्रेमातच मला मरण आहे,
तुझ्यातल सर्व काही त्याच कारण आहे,
जीवनाची अतूट दोर बांधली तुझसंग आहे,
कारण फक्त तुझा हाच सावळा रंग आहे . . .
___________________________________________
स्वप्नपरी
पहिल्यांदा विचारले मला कुणीतरी,
घडले तुझ्या आयुष्यात काहीतरी,
सांग मित्रा काय झाले आहे तुला,
मी उत्तरलो,
कुणीतरी जगावेगळं भेटलं मला,
पाहूनच वाटत आहे तीच सुंदर तन,
पण खरच आहे तीच सुंदर मन,
तिच्याकडेच पाहत रहावेसे वाटते,
ती का माझ्यापासून लांब हेच खटकते,
केस आहेत तिचे खूप लांबच,
खेळते तिच्या गालावर फक्त लटच,
डोळे तिचे पाण्यातील मोत्यासारखे,
सतत तिला पहात राहण्यासारखे,
गालाला लागलेला मोग्र्यासारखा शुभ्रपणा,
त्याला स्पर्श करते लटचना,
ओठांची तिच्या गोष्टच निराळी,
जशी लाल लाल गुलाबाचे पाकळी,
स्पर्शाने तिच्या सुगंधली माती,
आवाजात तिच्या जसे सरस्वती,
तिच्या शरीरातील चंचलता,
इतरांशी दाखवते तिची विषमता,
तिच्या रंगात आहे चंद्राची शुभ्रता,
मी ही बघतो तिला कधी कधी नकळता,
पाण्यासारखी आहे ती अगदी शांत,
मी आहे अशांत हीच आहे खंत,
तिच्यासाठीच चालली चलबिचल माझ्या मनात,
मी अजुनही आहे तिच्याच विचारात,
पुन्हा प्रश्न आला मजवरी,
आयुष्यात आले तुझ्या कुणीतरी,
मी स्वप्नातच बघतो,
हो ती एक स्वप्नपरी...
___________________________________________
ती
एक खंत,
तु शांत,
सतत काळजीवाहू,
तु मनमिळावू,
धिराचा आदर,
तु चादर,
जेव्हा आली,
तुच सावली,
तु निडर,
तु सुंदर,
चित्र साकार,
तु कलाकार,
मैत्रीचं छत्र,
तु पवित्र,
मधुर मुखी,
तु सुखी,
मनी ध्यानी,
प्रत्येक क्षणी,
तु....
___________________________________________
प्रेम कुणाला ठावूक नसतं,
इसे जल्द से जल्द पेहचानो,
क्षणार्थात ते बदलते,
फिर मानो या ना मानो,
मला पण प्रेम झालं,
मनात खुप दाटून आल,
वाटलं आज कुछ तुफानी करते है,
छोड ना यार,
हर टाईम लडके ही बकरा बनते है,
जेंव्हा तिला मी पाहिलं,
झालं मला प्रेम पहिलं,
बोलून टाकतो तिला,
नाही करत काळजी,
Love Advertise
प्रेम कुणाला ठावूक नसतं,
इसे जल्द से जल्द पेहचानो,
क्षणार्थात ते बदलते,
फिर मानो But, What an Idea SirG?
मी तिच्या समोर गेलो,
तेव्हाच खुप भ्यालो,
म्हटलं कशाला तू भित आहे,
डर के आगे जीत है,
तिच्या डोळ्यांनी आणि केसांनी मला भुलवल,
नंतर बोलायचं काय ते आठवलं,
सर काय झालं तरी मला,
प्रेम इसको लगा डाला,
तो लाईफ झिंगालाला,
ती मला खुप आवडते,
ती खुप छान दिसते,
आमचं असेल परफेक्ट relation,
No confusion,
Great combination,
तिच्यासाठी काय मी करू,
एकदा सांगा जगू की मरू,
आवाज देऊ द्या फक्त,
तिच्यासाठी काही भी,
मी तिच्याबरोबर,
जिंदगी के साथ भी
जिंदगी के बाद भी,
वाटलं मी खुप केली घाई,
कारण म्हणाली ती मला नाही,
म्हणाली ती मला सस्ता,
पण आशिक खुप सच्चा,
सस्ता नहीं सबसे अच्छा,
माझ्या बरोबर असं कसं घडलं,
प्रेम माझंच पडलं,
आयुष्याचा माझा हा भाग,
कसला पडला डाग,
दिल कच्चे होते है,
डाग अच्छा होते है,
मी विचारलं देवाला काय चुकलं माझं,
देव म्हणाले,
खुप मागण्या येतील तुला,
आता yes or No करण्याची कर exersize,
पण मला ही आवडली तुझी love advertise...