Objection Over Ruled - 9 in Marathi Detective stories by Abhay Bapat books and stories PDF | ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड - 9

Featured Books
Categories
Share

ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड - 9

प्रकरण 9
पाणिनी व सौम्या बाहेर पडले.
“ मी तुला तुझ्या घरी सोडतोय.आणि तू निमूटपणे झोपणार आहेस.”पाणिनी म्हणाला.
“ वेडेपणा करू नका सर. मला तो गर्ग आवडलाय.त्याचं बोलणं ऐकत रहावं अस होत. तुम्ही ती पत्र कधी वाचणार आहात ?” सौम्याने विचारलं
“ उद्या ऑफिस ला आल्यावर, अर्थात ! ”
“ छे ! एवढा धीर कुणाला आहे इथे? आपण आपल्या गाडीत बसून गाडीतील दिव्यातच वाचून काढू.” सौम्याम्हणाली.
त्या दोघांनी ती सर्व पत्रे वाचून काढली.साहसचे आडनाव बेलवलकर होते., सात आठ पत्र होती.मागच्या दीड-दोन महिन्यातच हा पत्र व्यवहार झाला होता.प्रत्येक पत्रात दोघांतील जवळीक वाढत गेल्याचे लक्षात येत होते.
“ चांगला वाटतोय पोरगा.” सौम्याम्हणाली.
“ पोरगा ? ” पाणिनीने आश्चर्याने विचारले.
“ मग काय तर ! आशा प्रकारात नवखा आहे अस दिसतंय!” सौम्या उद्गारली. “ तो भाबडा आणि आदर्शवादी आहे.दिव्व्या ला तो नाही योग्य ठरणार.त्यांचा संसार सुखी होणार नाही हा सम्यकगर्ग चा अंदाज बरोबर आहे. ”
“ त्याला स्वत: बद्दल काय म्हणायचंय ते जाणून घेऊ आपण.सौम्या त्याला फोन लाव. त्या पत्रावर फोन आहे होटेल चा.पोलिसांच्या पुढे एक पाऊल जाऊ आपण या बाबतीत.”पाणिनी म्हणाला.
तो होटेल रॉयल मधे असल्याचे समजल्यावर सौम्या ने घरी जाऊन झोपण्याचा विचार रद्द केला. “ आपण लगेच जाऊ त्याला भेटायला जवळच आहे इथून ते होटेल. हे प्रकरण म्हणजे खुनाचे आणि रोमान्स चे एकत्रित आहे. मला मजा वाटते आहे.” सौम्याने पाणिनी ला स्पष्ट सांगितले.
साहस बेलवलकर हा उंचपुरा, पाणीदार डोळ्यांचा पण हडकुळा असा माणूस होता.केस अस्ताव्यस्त पसरलेले होते.बाजूच्या रक्षापात्रात अर्धवट जळलेल्या सिगारेट चा खच होता.कोणतीच सिगारेट अर्ध्या पेक्षा जास्त ओढलेली नव्हती.
त्याच्या आवाजात त्याला असलेला मानसिक ताण जाणवत होता.
“ काय हवय तुम्हाला? ”
“ तुम्हाला मिसेस दिव्व्या बद्दल विचारायचे आहे. ” पाणिनी म्हणाला.
पोटात अनपेक्षित पणे एक ठोसा बसावा तसे साहस बेलवलकर ला झाले.
“ कोणा बद्दल .......” तो अडखळला.
“मिसेस दिव्व्या बद्दल ” पाणिनी म्हणाला. त्याने आपल्या मागे दार लाऊन घेतले.सौम्याला बसायची खूण केली.
“ पण मला मिसेस दिव्व्या बद्दल काहीच माहीत नाही.” तो म्हणाला.
“ पद्मनाभ पुंड माहीत आहे? ” पाणिनी ने विचारले.
“ त्याला भेटलोय मी.”
“ व्यावसायिक भेट ? ”
“ हो.”
“ त्याच्या बायकोला कधी भेटलास ? ” पाणिनी म्हणाला..
“ मला वाटतंय मी एकदा भेटलोय तिला. .... तुमचे नाव काय म्हणालात तुम्ही ? ”
“ मी काहीच म्हणालो नाही , माझ्या नावाचा उल्लेखच मी केला नाहीये आल्या पासून. ”
“ ...”
“ तरीही सांगतो, नाव आहे पाणिनीपटवर्धन.”
“ मला तुम्ही असे प्रश्न का विचारताय माझ्या घरात घुसून समजत नाही. तुम्ही पोलीस आहात का? किंवा पोलिसांशी संबंधित आहात का? ” त्याने विचारले.
“ पोलिसांशी संबंध आणू शकतो मी तुमचा. ” पाणिनी म्हणाला. “ तिच्या नवऱ्याचा खून झाला आहे हे तुला कसे कळले? कधी कळले? ”
“ तिनेच सांगितले मला.”
“ याचा अर्थ तू तिला नंतर भेटला होतास.”
“ मी पद्मनाभ शी बोलायला म्हणून त्याच्या घरी फोन केला होता तेव्हा तिने घेतला फोन आणि सांगितले की तो मेलाय म्हणून.”
“ तुझं म्हणणं आहे की त्याची बायको तुझी मैत्रीण नाही.? ” पाणिनी म्हणाला..
“ मिस्टर पटवर्धन मी वारंवार सांगतोय की तिला मी एकदाच बघितलय. ती आहे आकर्षक पण तिच्या बाबत भरोस नाही देता येत कुठलाच.”साहस बेलवलकरम्हणाला..
“ छान.! मला एक परिपूर्ण असा खटला मिळाला .पाणिनी म्हणाला.
“ काय म्हणायचय तुम्हाला? ”
“” कोणावर तरी कारवाई करायला तुम्हाला संधी आहे,आणि मी तुझी केस घ्यायला तयार आहे.” पाणिनी म्हणाला.
“ तुम्ही वकील आहात होय? मला वाटलं की पोलीस आहात.”
“ पोलीस तुमच्या कडून अपेक्षा करतील की फसवणुकी प्रकरणी तू संबंधित माणसावर फौजदारी करावीस.” पाणिनी म्हणाला.
“ माझी कोणी फसवणूक केली आहे? ”साहस बेलवलकर ने विचारलं.
“ तुझं नाव आणि सही करून ही पत्र कोणीतरी पद्मनाभ च्या बायकोला म्हणजे दिव्व्या ला लिहिली आहेत आणि ही प्रेम पत्र आहेत !”पाणिनीने आपल्या खिशातून ती पत्रे काढून त्याला दाखवली.
“ तुम्हाला कुठे मिळाली माझी पत्रे? ”साहस बेलवलकर ने विचारलं .त्याचा विरोधी स्वर आता नरमला होता.चेहेरा फुटलेल्या फुग्या सारखा झाला होता.
“तुझी कशी असतील पत्रे? तू तर तिला एकदाच भेटलास ना?” पाणिनी म्हणाला..
“ तुम्हाला कुठे मिळाली पत्र ?”
“ कोणीतरी दिली मला. माझ्या अशिलाने असतील, किंवा पोलिसांनी असतील किंवा वर्तमान पत्राच्या पत्रकारांनी असतील.”पाणिनी म्हणाला.
“ का....काय करणार आहात त्या पत्रांचे तुम्ही ?” साहस बेलवलकर ने घाबरून विचारले.
“ अर्थात पोलिसांना देणार मी. कोणताही पुरावा पोलिसांकडे सुपूर्त करावाच लागतो.
“ माझी पत्रे म्हणजे कसला पुरावा असू शकतो ?” साहस बेलवलकर ने दचकून विचारले
“ पद्मनाभच्या खुनाशी तुझा संबंध जोडण्यासाठी चा पुरावा. ” पाणिनी म्हणाला.
“ अहो काय बोलताय? वेड लागलं नाही ना तुम्हाला? त्या पत्रांचा आणि खुनाचा काय संबंध? ”साहस बेलवलकर ने चिडून विचारले.
“साहस बेलवलकर, तुम्ही जरा मोकळे पणाने का विचार करत नाही? मिसेस पुंडही तुमच्याच बरोबर पळून जाणार होती.एका मित्राने तिला अडवलं.” पाणिनी म्हणाला.
“ नाही ,नाही कुठल्या मित्राने वगैरे तिला अडवलं नाही.तिनेच मला फोन करून सांगितलं की तिचा विचार बदललाय.”साहस बेलवलकर म्हणाला. “ पटवर्धन, तुम्ही मला कुठल्या सापळ्यात तर नाही ना अडकवत ? ”
पटवर्धन फोन कडे बोट दाखवून त्याला म्हणाला,“ तिला फोन कर आणि विचार.”
तो फोन करायला उठला.पण विचार बदलून पुन्हा म्हणाला, “ नको, मी नंतर करीन तिला फोन आणि विचारीन.”
“ ठीक, तुला वाटेल तेव्हा कर.” पाणिनी म्हणाला. “ तर मग , तिच्या मित्राने तिला तुझ्या बरोबर पळून जाण्या पासून परावृत्त केले. मग तू इकडे आलास, तुला पद्मनाभ ला हे सगळ समजलं होत त्यामुळे तुला , त्याला भेटायचं होत.त्यासाठी तू त्या बोटीवर गेलास. तिथे तुमच्यात कुरबुर झाली, त्याचं पर्यवसन भांडणात झालं आणि तू त्याला मारलस.” पाणिनीने खुलासा केला.
“ गप्प बसा. माझा आणि पद्मनाभ चा काही संबंध नाही. तो एक अप्पल पोट्या स्वार्थी आणि पैशाला देव मानणारा माणूस होता. त्याच्या लेखी त्याची बायको कोणीही नव्हती.त्यांच्यात काहीही संबंध ही नव्हते. त्याने तिला कधी स्पर्श सुद्धा केला नसेल.”
“ बर,बर, तू पुन्हा तिच्याशी संपर्क केलास., काय म्हणाली ती तुला? ” पाणिनी म्हणाला..
“ तिच्या नवऱ्याचा खून झाल्याचं तिने सांगितलं, ती म्हणाली की मी तिला भेटता काम नये आता, कारण पोलिसांना संशय येईल. ”
“ कधी झाला हा संवाद?”
“ मी ट्रेन मधून खाली उतरल्यावर, मी तिला हॉटेलातून दहा वाजण्याच्या सुमारास फोन केला.”
“ आणि तिने सांगितलं का , की तिच्या नवऱ्याचा खून झालाय म्हणून ? ” पाणिनी म्हणाला..
“ नाही तेव्हा लगेच नाही, पहिल्याने फोनच नाही लागला तिचा.नंतर पुन्हा लागला तेव्हा तिने सांगितलं.”
“ ...की तिच्या नवऱ्याचा खून झाला असं ? ” पाणिनी म्हणाला..
“ अगदी त्याचं भाषेत नाही, पण ती म्हणाली की दुर्दैवाने एक अपघात घडलाय त्यात तो मारला गेलाय आणि पोलीस तपास करताहेत. तिनं मला सांगितलं की पुन्हा नेतोर्ली ला निघून जा मला भेटायचा प्रयत्न करू नका.”
“ तरीही तू तिचे न ऐकता शहरातच राहिलास आणि पुन्हा तिला फोन केलास बरोबर?”पाणिनी म्हणाला..
“ बरोबर.”
“ तेव्हा तिने तुला फोन वर अधिक माहिती दिली? ”
“ हो ती म्हणाली की प्रजापति च्या बोटीवर त्याचा मृतदेह सापडलाय.पण मी हे कोणाला बोलायचं नाही.”
“ तुला रेयांश प्रजापति माहीत आहे?” पाणिनी म्हणाला..
“ नाही.”
“ मी गरज वाटली तर भेटीन तुला पुन्हा . मी तुझ्या जागी असतो तर तिला पुन्हा भेटायचं प्रयत्न केला नसता.” पाणिनी म्हणाला.
“ पटवर्धन, तुम्ही तिला भेटलाय एवढ्यात, कशी आहे ती? बरी आहे ना? मला चैनच पडत नाहीये तिची खुशाली कळल्या शिवाय.”
पाणिनी पटवर्धन हसला. “ दारू पितोस तेव्हा तू खूप बडबड करतोस का नेहेमी? ”
“ नाही, उलट मी पितो तेव्हा मी अंथरुणात शांत पडून राहतो.” साहस बेलवलकर म्हणाला.
“ तर मग माझा सल्ला ऐक, आता दारू पी.” पाणिनी म्हणाला आणि सौम्या ला घेऊन बाहेर पडला.
( प्रकरण 9 समाप्त)