भाग - २
ह्याचा विचार करता करता सावली हि तिचा जीवनाचा १० वर्ष पूर्वीचा काळात जाऊन पोहोचली. सावली हि एक सुशिक्षित आणि मध्यम वर्गीय घराण्यातील मुलगी आहे. तिने तिचे शिक्षण पूर्ण करून ती सध्या एका मोठ्या कंपनीत काम करते. सावली हि शिक्षणासोबतच खेळकूद, आत्मसुरक्षेसाठी मार्शल आर्ट मध्ये ब्लॅक बेल्ट मध्ये पारंगत आहे. शिक्षणात ती आजवर फारच उत्तम होती आणि आताही आहे. ती स्वभावाने एकदम शांत आणि सहयोगी वृत्तीची आहे. कुणी कसल्याही अडचणीत सापडला असेल तर त्याची मदत करण्यासाठी हि सदैव तत्पर असते. तीचा याच वृत्तीमुळे तिचा जीवनात तिचे अनेक शत्रू हे जन्माला आलेले होते. ती कुठल्याही परोपकारी आणि प्रोफेशनल कार्यात मोठ्या उत्साहाने आणि आपुलकीने सहभागी होत असते. तिचा या अत्यंत प्रामाणिकपणामुळे ती सगळ्यांची लाडकी होऊन गेली होती. ते मग घर असोत, ऑफिस असोत, मित्रमंडळी असतो किंवा आणखी कुठलेही क्षेत्र असोत जेथे तिने तिचा पाऊल टाकलेला असेल. हेच सद्गुण तिच्यासाठी चिंतेचे विषय बनलेले होते.
सावलीचा घरी तिचा आईबरोबर तिची धाकटी बहिण सुद्धा आहे. नशिबाचा कठोर अशा निर्णयामुळे ती बिचारी पायाने अपंग आहे, तिचे नाव आहे कोमल. कोमल सुद्धा सावली सारखी शिक्षणात हुशार आणि चपळ अशी आहे. सावलीचा आईला एकही मुलगा नाही आहे आणि या दोघींचा कर्तुत्वाने तर तिला कसलाही या गोष्टीचा पश्चाताप करण्याची आजवर वेळ आलेली नाही. तीचा दोन्ही मुलींनी तीचे मान आणि सन्मान हे सदैव उंचावर नेऊन ठेवले आहे. त्यामुळे त्या दोघांनाही तीचा दोन्ही मुलींवर अभिमान आहे. सावलीची बहिण कोमल हि जन्मतः अपंग नव्हती, ती एका दुर्दैवी अपघाताचा बळी पडली होती. ते संकट खर तर सावलीवर ओढवले होते परंतु नियतीला काही आणखीच मान्य होते तर त्या संकटाचा सापड्यात बिचारी कोमल आली आणि तिचे दोन्ही पाय निकामी झाले. या दुर्दैवी गोष्टीला आज जवळ जवळ 02 वर्ष होत आलेले आहेत. त्या अपघाताची सुरुवात अशी झाली होती कि सावली ज्या कॉलेजमध्ये शिकत होती तेथील एका मोठ्या घराण्यातील एका बिघडलेल्या राजकुमाराने तेथे शिकत असतांना पैशांचा जोरावर काहीच मेहनत न करता उच्च अति उच्च असे यश प्राप्त केले होते. म्हणजे त्याने पैशांचा जोरावर त्याचे शिक्षण आणि त्याची डिग्री हि खरेदी केलेली होती. त्यामुळे तो सगळ्यांचा वरचा दर्जावर जाऊन विराजमान होता आणि त्या अनुषंगाने सावली आणि तीचासारखे गरीब आणि सामान्य वर्गातील हुशार विद्यार्थी हे पुढचा वर्गाला जाण्यास अपात्र ठरले होते.
म्हणून सावलीने तेथे फारच मोठे धाडसाचे कार्य केले होते. तिने एकटीचा बळावर अख्ख्या कॉलेजला धार्यावर धरले होते. तिने वरचा अधिकार्याकडे जाऊन याची तक्रार केली आणि चौकशी करण्यासाठी त्यांना बाध्य केले. वरचा अधिकार्याचे वाढते दडपण बघून कॉलेजमढील निर्णायक मंडळांनी अखेर त्या राजकुमाराला भ्रष्टाचाराच्या आरोपावरून अनुत्तीर्ण केले आणि त्याच बरोबर त्याला त्या कॉलेजमधून बाहेरचा रस्ता दाखवत त्याला थेट पोलिसांची कोठडी दाखवली. सावलीचा त्या धाडसीपणामुळे तिचा सारख्या आणखी अनेक गरीब गरजू विद्यार्थ्याचा भविष्याचे जे नुकसान होणार होते त्याची भरपाई झाली होती. त्या प्रसंगा नंतर सावली त्या कॉलेजमधील एक नामवंत अशी व्यक्ती झालेली होती. त्याचाच परिणाम पुढे कॉलेजमधील विद्यार्थी संघटनेचा निवडणुकीत सावली हि पूर्ण पैकी पूर्ण मतांनी जिंकून आली आणि ती विद्यार्थी संघटनेची एक मुख्य आधारस्तंभ बनून गेलेली होती. ती त्या वेळेस कॉलेजमधील शिक्षक, विद्यार्थी आणि सगळ्यांचा नजरेत आणि मनात वसली होती. परंतु चांगल्या गोष्टींबरोबर जीवनात वाईट गोष्टी या बरोबरच चालत असतात. त्याच अनुषंगाने सावलीचा त्या चाहत्यांत काही तीचाबाद्द्ल वाईट विचार ठेवणारे म्हणजे तिचा शत्रूसोबत बसणारे वावरणारे लोक होते.
त्यानंतर सावलीचे आयुष्य आता सामान्य मनुष्या सारखे न राहता ते एका अति विशिष्ट व्यक्तीचे होऊन गेले होते. तिचा मित्रांबरोबर आता तिचे नवनवीन शत्रू सुद्धा जन्माला आलेले होते. त्या रांगेमध्ये सगळ्यात पहिला म्हणजे तो कॉलेजमधील राजकुमार सावलीमुळे त्याला कॉलेजमधून काढण्यात आलेले होते शिवाय त्याला पोलिसांची कोठडी भोगावी लागली होती. म्हणून तो काही दिवसांनी त्याचा बापाचा पैशांचा जोरावर कोठडीतून बाहेर आलेला होता. तो तेव्हापासून सतत सावलीचा माघारी होता. ती काय करते, कुठे जाते, कुणाशी भेटते वगैरे या सगळ्या बाबतीत तो तिची पाठ चौकशी करू लागला होता. त्याने या कामासाठी काही गुंड स्वरूपाचे मनुष्य सावलीचा मागे लावले होते. तर ते गुंड सावलीचा प्रत्येक हालचालीची त्या राजकुमाराला माहिती देत होते. असेच करता करता महिन्याभराने त्या राजकुमाराने सावलीचा अहित करण्यासाठी प्रथम तिला फोन करून धमकावण्याचा प्रयत्न केला होता. तो विशिष्ट अशा नंबर ने फोन करून सावलीला त्रास देऊ लागला होता. तो प्रत्येक वेळेस नवनवीन नंबर ने तिला फोन करू लागला परंतु काहीच बोलायचा नाही, म्हणजे तो फक्त blank कॉल करायचा.
शे शेष पुढील भागात...........