The Wedding Annivarsary - 1 in Marathi Love Stories by Nagesh Dattatray Dange books and stories PDF | दि वेडिंग ऍनीव्हर्सरी - भाग 1

Featured Books
Categories
Share

दि वेडिंग ऍनीव्हर्सरी - भाग 1

आरती , एक पास्तिशीतली टिपिकल इंडियन हाऊस वाईफ. आज जरा ती लवकरच उठली.नेहमी प्रमाणे अंघोळ करून देवपूजा करून तिने स्वयंपाक करायला सुरवात केली. थोड्या वेळाने तिचे सासू सासरे पण उठून नेहमीच्या सवयीप्रमाणे मॉर्निंग वोक ला निघून गेले. नाही मनले तरी आज तीच सौंदर्य जरा जास्तच खुलले होते. अंगावर फेंट कलरची गुलाबी साडी आणि आतून पांढऱ्या कलरचा स्लीव्ह लेस ब्लॉऊज .केस टॉवेल ने बांदलेले आणि हलकासा मेकअप. तस तिला कधी मेकअप आवडत नव्हता कारण जन्मताच तिला नैसर्गिक सौंदर्य लाभलेले होत. पण आजचा दिवस वर्ज्य होता. ब्रेकफास्टची तयारी करून आरतीने गौरी आणि गौरव ला जरा घाहीतच झोपेतून उठवलं आणि त्यांची रवानगी वॉश बेसिन ला केली. गौरी आणि गौरव दोघे जुळे भावंडं , जेमतेम दिसायला एकसारखी. अकरा वर्षाची.नुकतीच कॉन्व्हेंट ची चौथी संपवून पाचवीला आलेली. गौरव ने जर केस वाढवून मुलींचे ड्रेस घातले तर तो गौरी वाटावी आणि गौरीने जर केस कापून बॉय कट केला तर ती गौरव वाटावा इतकी जुळी.अर्ध्या झोपेत का होईना पण तिने त्या दोघांना तयार करून ब्रेकफास्ट ला टेबल वर बसवलं. दोघांनाही दूध आवडत नसलं तरी आईच्या भीतीने का होईना दोघांनी नाक दाबून ते प्यायलं. स्कूल बस चा हॉर्न वाजतो ना वाजतो तोच दोघेही नाश्ता अपुरा ठेऊन घाई गडबडीत आपली स्कूल बॅग सावरत जिन्यातून पळत सुटले. हे रोजचे पाहून आरतीला थोडे वाईट वाटायचे पण इलाज नव्हता त्या मुळे ती नेहमीच त्यांच्या डब्यात एक्सट्राच जेवण देत असायची. एव्हाना मुले जिना उतरून स्कूल बस मध्ये चढत होती आणि आरती हे सर्व आपल्या बाल्कनीतून पाहत होती. मुले स्कूल बस मध्ये बसल्यावर तिने बाल्कनीतूनच त्यांना बाय केले.का कुणास ठाऊक पण आज तिला खूपच वाईट वाटत होत. बाल्कनीत विचार करत असताना कधी तिच्या डोळ्यात पाणी आले तिलाहि कळले नाही. स्वतःला सावरून तिने परत आपला मोर्चा कीचेन कडे वळवला.थोड्या वेळाने तिचे सासू सासरे आल्यानंतर तिने त्यांना नमस्कार केला. त्या दोघांना हि वाईट वाटत होत पण तेही तिला आशिर्वादाशिवाय दुसरे काहीही देऊ शकत नव्हते. आरतीच्या हिरमुसलेल्या चेहऱ्या कडे बगून तिच्या सासूला पण स्वतःचे अश्रू रोखता आले नाहीत. दोघीही अगदी आई आणि मुलीच्या नात्याने खूप वेळ रडल्या. हे पाहून सत्तरी ओलांडलेल्या आरतीच्या सासर्याच्या डोळ्यात पण पाणी आले. साठलेल्या भावनांना मोकळी वाट करून दिल्या नंतर दोघींनीही घर आवरायला घेतलं.साधारणता ११ च्या सुमारास सकाळची जेवणे उरकून सासरे आपल्या बेडरूम मध्ये निघून गेले. सासूने सर्व आवरा आवर आपल्या हातात घेऊन थोडेसे दर्डाउनच  आरतीला तिच्या बेडरूम मध्ये पाठवले. नाखुशीने का होईना पण ती तिच्या बेडरूम मध्ये आली. आपल्या वॉडरोब मधून तिने एक बॉक्स बाहेर काढला त्यातुन एक सुंदर असा रेड कलर चा वन पीस बाहेर काढला . त्यावर एक नजर टाकून आणि हाथ फिरवून तो तिने आपल्या अंगावर चढवला आणि जेमतेम १० मिनिटातच ती तयार होऊन पार्किंग मध्ये आली. तिने आपली पर्स खांद्याला अडकवली आपली स्कुटी काढून मुख्य रस्त्या ला आली. ११ च्या आसपास ची वेळ असल्यामुळे रस्त्यावर ट्रॅफिक नव्हते परंतु नुसत्याच पडून गेलेल्या पावसामुळे रस्त्याची अवस्था कुठे शोधिसी अशी झाली होती. आरती थोडी पुढे आली कि मागूनच एका व्यक्तीने तिला इशाऱ्या ने टायर पंचर झालय म्हणून सांगितले. पहिल्यांदा तिला वाटले कदाचित कोणीतरी मस्करी करत असेंन कारण मागचे दोन वर्षे झाली ह्याच दिवशी ह्याच वेळी हीच स्कुटी याच ठिकाणी पंचर होयची. तिने गाडी थांबवली टायर खरंच पंचर झालं होत. दररोज गाडी चालवायची सवय आणि एरिया माहित असल्यामुळे तिने गाडी तशीच चालवत पंचर च्या दुकानात आणली. नेहमी प्रमाणे आजही पंचर मालक पंचर च दुकान आपल्या मुलाच्या हातात सोडून पंचर काढायला बाहेर गेला होता. तिने आपली गाडी तिथे लावून आत येऊन बसली. नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे त्या लहान मुलाने अतिथं देवो भव: मानून  तिला एक चहा आणून दिला. त्या चहा कडे आणि मुलाकडे बगुन तिने तो घेतला तोच समोरच्या शाळेची ११. ३० ची घंटा वाजली अन पंचर वाल्याच्या मुलाने आपले दप्तर उचलल आणि पळत त्याने एका दमात रास्ता क्रॉस केला आणि शाळेच्या गेट मधून आत गेला. चहाचे चसके घेत घेत अन शाळेकडे बघत बघत आरती कधी विचारत गुंग होऊन गेली तिला कळलंच नाही…!

आरतीने नुकतीच १० वी संपऊन ११ वी ला प्रवेश घेतला होता. नेहमीप्रमाणे तिचे वडील तिला रोज शाळेला सोडायला यायचे तसे ते आजही कॉलेज ला सोडायला आले होते. त्यांचा हा रोजचाच दिनक्रम असायचा कारण आरतीचे वडील सर्कल इन्पेक्टर होते.जवळ एक जीप असल्यामुळे त्याचा त्यांना फायदा होता आणि एक पोलीस ऑफिसर आपल्या मुलीला कॉलेज मध्ये सोडायला येतोय त्यामुळे तिच्या कडे कोणी वाकड्या नजरेने बघायची कोणाची हिम्मत होत नव्हती. त्यात आरती एक कब्बडी प्लेअर. कॉलेजे मध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर तिने पुढच्या २ आठवड्यातच मुलींची एक कब्बडी टीम उभी केली. दररोज सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० परेंत कॉलेज आणि दुपारी १२.३० ते संद्याकाळी ६ परेंत कब्बडी प्रॅक्टिस असा रोजचा दिनक्रम. मुलींच्या कब्बडी टीम बरोबर मुलांची हि टीम प्रॅक्टिस करायची. मुलींची टीम उभी राहिलीय हे जरा मुलांना जरा रुचलं नाही त्यामुळे काही ना काही कारण काढून पोरं आरतीला सोडून बाकी सर्व पोरींना कंमेंट पास करायची. आरती या सगळ्या गोष्टींना इग्नोर करून आपल्या खेळाकडे आणि आपल्या टीम कडे लक्ष्य द्यायला पोरींना सांगायची.

आज मात्र विवेक ने हिम्मत केली आणि आरती वर कंमेंट पास केली तशी सर्व मुले फिदी फिदी हसायला लागली.आरतीने तरीही इग्नोर केलं.हे बगुन विवेक ची आजून हिम्मत वाढली परत पोर फिदी फिदी हसायला लागली.विवेक आणि आरती तसे एकाच पोलीस क्वार्टर मधले होते. विवेकचेहि वडील हि आरतीच्या रँक चे पोलीस ऑफिसर होते परंतु त्यांची बदली झाल्यामुळे आरतीचे वडील त्या जागी आले होते.पोराच्या शिक्षणावर बदलीचा परिमाण होऊ नये म्हणून त्याच्या वडिलांनि वरिष्ठांचे उंबरे झिजवून पोलीस क्वार्टर वाचवले होते.त्यामुळे या गोष्टीचा विवेक च्या मनामध्ये राग होता.त्याचा वचपा असा काढायचा हे त्याने ठरवले होते. विवेक तिसऱ्या वेळा कंमेंट पास करणार तशी आरती त्याचा समोर उभी राहिली.१० सेकंद विवेकलाही काय बोलायचं ते सुचले नाही परंतु पुढच्याच क्षणी दोघानांमध्ये असा कलगीतुरा रंगला कि त्याच पर्यवसान मुलं आणि मुलींमध्ये कब्बडी खेळून करायचं असे ठरलं.

खेळाचे सातपुते सर अजून आले नव्हते त्यामुळे मुलांना तर मुलींना छेडायची आयती संधी मिळणार होती. पुढच्याच क्षणी कब्बडी मॅच सुरु झाली आणि हा हा म्हणता हि बातमी सगळ्या कॉलेज मध्ये पसरली आणि एकच तुडुंब गर्दी मैदानाच्या बाजूला जमली. मॅच सुरु झाली आणि बगता बगता पोरांनी साम दाम दंड भेद वापरत सगळ्या पोरींना अगदी निर्दयी पणे ग्राउंड च्या बाहेर टाकलं. कित्तेक पोरींना उठता सुद्धा येत नव्हतं. कोणाच्या हाताला खरचटलं होत तर कोणाच्या पायाला तर कोणाच्या डोक्याला. हे पाहून आरतीला आपला निर्णय चुकला असे वाटले परंतु पुढच्याच क्षणी तिने निर्धार केला आणि चढाई करायची आपली वेळ आहे हे पाहून तिने पांढऱ्या फक्कीला स्पर्श करून आणि पाया पडून पुढे गेली. कारण आता ती एकच या खेळामध्ये राहिली होती. हिमतीने तिने चढाई केली आणि  पुढचे १० सेकंड तिने हिम्मतीने पोरांचा सामना केला परंतु पुढच्याच क्षणी विवेक ने तिला घेरले आणि अश्या प्रकारे तिला बाहेर फेकले कि परत ती कब्बडी खेळणार नाही. विवेक ने जसे तिला बाहेर फेकले तशी सर्व पोरे जोरात जल्लोष करायला लागली पण पुढच्याच क्षणी ती मावळली कारण आरतीला साधं खरचटले हि नव्हते कारण जेंव्हा विवेक ने तिला बाहेर फेकले त्याच वेळेस एका मुलाने तिला वाचवले होते.

हे पाहून विवेक चा पारा चढला. तो त्या मुलापाशी आला आणि आहे नाही तेवढी सगळी ताकद वापरून त्याला खाली पाडणार तोच त्या मुलाने गिरकी घेऊन विवेक ला खाली पाडले आणि पुढच्याच क्षणी कब्बडीच्या ग्राउंड मध्ये आला. हे पाहून जमलेलं सगळं कॉलेज पोट धरून हसायला लागलं.विवेक ला आपली झालेली हि फजिती सहन झाली नाही.हे असं त्याला खाली पाडून त्या मुलाने विवेक ला खुललं चॅलेंज दिलं होत. पुढच्याच क्षणी विवेक ते स्वीकारलं आणि स्वतःला सावरत त्याने आपल्या टीम सहित मैदानात प्रवेश केला. जसा त्याने प्रवेश केला तसं कॉलेज च्या मंडळींचा आवाज आणखी वाढला. आवाज वाढलेला पाहून काय झालाय हे पाहण्या साठी सातपुते सर मैदानाकडे निघाले. विवेक ने पहिल्यांदा आपला हुकमी एक्का सुदेशला चढाई ला पाठवले पण विवेक चा पुढच्याच क्षणी भ्रमनिरास झाला जेव्हा त्या पोराने सुदेशला अश्या प्रकारे घोट्याला पकडले कि तो धाड करून खाली आपटला आणि तो बाहेर पडला तसं त्याने आरतीला ग्राउंड मध्ये बोलावले. हे पाहून सगळ्या पोरींना पण एक हुरूप आला आणि त्या आपले खरचटलेल्या अंगाकडे नं बगता खेळाकडे लक्ष्य देऊ लागल्या. एव्हाना आरतीला एवढे कळाले कि हा कोणी साधा सुद्धा प्लेअर नाही नक्कीच कोणीतरी अनुभवी प्लेअर आहे. चढाई ची बारी मुलींची असल्या मुले त्याने आरतीला फक्त दोन बोटांनी तबला कसा वाजवतात तसा इशारा केला आणि चढाई करायला सांगितले. हा इशारा आरतीला कळला आणि पुढच्याच क्षणी तिने जोरात मुसंडी मारून अक्षरशा शंकर चा पाय तुडवला आणि वापस आली. जशी ती वापस आली तशी लक्ष्मी आतमध्ये आली आणि कॉलेज च्या मंडळींनी एकच जल्लोष करायला सुरवात केली. हे पाहून विवेक ची आग तळपायातून मस्तकात गेली आणि त्याने स्वतःतच चढाई करायची ठरवली. पुढच्याच क्षणी त्यांने कब्बडी कब्बडी बोलत चढाईला सुरवात केली आणि एक जोरात उसळी घेत त्याने चीटिंग करत लक्ष्मीला कानात मारली त्यामुळे लक्ष्मीला खूप वाईट वाटले कारण अक्ख्या कॉलेज समोर त्याने हे असे केले होते. लक्ष्मी बाहेर जाणार हे पाहता त्या मुलाने लक्ष्मी ला ग्राउंड मधेच थांबायचा इशारा केला आणि उलट विवेक वर धावा बोलायला सागितलॆ होत कारण नियमाप्रमाणे विवेक त्याच्या जागेवर वापस गेलेला नव्हता आणि तो आता आरती वर धावा बोलणार होता. लक्ष्मी वजनाने थोडी हट्टी कट्टी असल्याने त्या मुलाने लक्ष्मीला इशाऱ्याने विवेक ला कसे उचलून फेकायचे हे सांगितल. आपल्या झालेल्या बेइज्जतीचा तिला बदला तर घ्यायचाच होता त्यामुळे ती लगेच तयार झाली. जसा विवेक ओव्हरकॉन्फिडेन्स मध्ये डाव्या बाजूने बोनस लाईन च्या जवळ आला तस लक्ष्मीने अगदी स्पीड ने आणि आपल्या चपळाईने त्याला वरच्या वर उचलले आणि जमलेल्या पोरात फेकून दिले तसं पोरं आणि पोरी चेकाळळया आणि त्यांच्या आवाजाने सगळं जुनिअर कॉलेज दणाणून गेलं. स्वतः प्रिंसिपल सर सुद्धा आपल्या मददनीसाह ग्राउंड कडे धावत आले. विवेक ची तर पाचावर धारण बसलेली होती. एव्हाना सर्व पोरांनीं आणि पोरींनीं त्या पोराला वरती उचलले होत. सातपुते सर आणि प्रिन्सिपल सर येताच त्यांनी त्या मुलाला खाली उतरवलं.

सातपुते सर ग्राउंड वर पोहोचताच त्यांना सगळ्या परसस्थितीचा अंदाज आला होता. या जल्लोश्याच्या माघे आपल्याला दिसणारा मुलगा केंद्र स्थानी आहे हे पाहून त्यांना हायसं वाटलं.कारण त्यांचा पासा बरोबर आणि अचूक ठिकाणी पडला होता. सातपुते सरांनी सर्व मुलं आणि मुलींना शांत केलं. सर्व मुले आणि मुली शांत झाली. आरतीने पुढे येऊन त्या मुलाला कोण आहेस हे विचारलं कारण याआधी तिने त्याला कधीच पाहिलं नव्हतं. मग सातपुते सर पुढे आले आणि त्यांनी त्या मुलाची ओळख सर्व कॉलेज आणि प्रिंसिपल ला करून दिली. हा दीपक ,दीपक जाधव. कब्बडीच्या डिस्ट्रिक्ट लेवल चॅम्पियन टीम चा कॅप्टन. आजच त्याने आपलं कॉलेज जॉईन केलं आहे. सरांच्या तोंडून हे आईखल्यावर मात्र विवेक चक्रावला त्याला आपली चूक लक्षात आली. आरतीही थोडीशी आश्चर्यचकित झाली पण तिला अगोदरच कळाले होते कि हा कोणी तरी एक्सपेरियन्सड खेळाडू आहे पण हे माहित नव्हतं कि हा डिस्ट्रिक्ट चॅम्पियन टीम चा कॅप्टन होता.

विवेक अजूनही शॉक मध्ये खाली बसलेला होता. खेळभावना जपत दीपक ने आपणहुन पुढे होऊन आपला हात पुढे केला आणि विवेक ला उठवलं. दीपक ने हात पुढे केल्यावर तर त्याला अजून मेल्यागत झालं. त्याला आपली चूक कळाली होती त्यामुळे त्यानेहि पुढे होऊन दीपक ची माफी मागितली. दीपक त्याला आरती आणि मुलींच्या टीम कडे घेऊन गेला. विवेक ने त्यांचीही माफी मागितली. त्या दिवसापासून मात्र एक झालं आरती दीपमय झाली. कधी दोघांचा सहवास वाढला हे त्या दोघांनाही कळाले नाही. दीपक च्या टीम मध्ये सामील झाल्या मुले पहिल्यांदाच जुनिअर कॉलेज ने पहिले तालुका लेवल आणि नंतर डिस्ट्रिक्ट लेवल कब्बड्डी चॅम्पनशिप जिंकली आणि याचा परिणाम असा झाला कि दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडली. आधीच कोवळे वय आणि पहिले प्रेम कोणाला नको असतं.भेटीगाठी वाढल्या. कॅफेच्या चकरा वाढल्या. मित्रांबरोबरच्या छोट्याश्या का होईना लॉन्ग ड्राईव्ह वाढल्या. आणि एक कोमल, सालस,निरागस प्रेम फुललं.

क्रमश :