काका, मावशी आणि अनिकेत दोघेही हसू लागले.सगळे झोपायला गेले. अनिकेत झोपायला आला पण त्याला झोपच येईना. रुचिरा ची आठवण येत बसली. रुचिरा चा फोटो काढून बघत बसला.खूप वेळाने त्याला झोप लागली. इकडे रुचिरा ची पण् तीच अवस्था होती. कधी एकदा उद्याचा दिवस उजाडतो असं दोघांना पण झालं होतं. दुसरा दिवस उजाडला दोघेपण आज खूप फ्रेश मुड मध्ये होते. रुचिरा आज खूप सुंदर दिसत होती. तिने अनिकेत ला फोन केला.
रुचिरा," हॅलो अनिकेत"
अनिकेत," हा बोल रुचिरा."
रुचिरा," येताना साखरपुड्याची साडी घेऊन या.म्हणजे कलर च मॅचिंग बरोबर होईल."
अनिकेत," ओके घेऊन येतो. "
रुचिरा," बाय "
अनिकेत," बाय"
अनिकेत ऑफिस ला पोहोचला आणि घाईघाईने त्याची कामे अ करू लागला.कालण संध्याकाळी त्याला लवकर निघायचं होतं. रुचिरा पण आपली कामे पटापट करत होती. संध्याकाळ कधी होते याची दोघेपण वाट बघत होते. हातातलं काम पटापटा आवरत होते. संध्याकाळचे ६:३०वाजले होते. अनिकेत ऑफिसमधून निघाला.स्कुटी घेऊन रुचिरा च्या ऑफिस जवळ यायला त्याला ७:३० वाजले.रुचिरा ऑफिस च्या खाली त्याची वाटतं बघत उभी होती.
अनिकेत," हाय रुचिरा"
रुचिरा , " हाय कसे आहात तुम्ही?"
अनिकेत,"कसा दिसतो आहे?"
रुचिरा ," हिरो"
दोघेही हसू लागले.
अनिकेत,"" निघायचं का?"
रुचिरा," हो निघू या."
रुचिरा त्याच्या स्कूटी वर पाठीमागे बसली. सुरवातीला तिने मागे स्कूटी ला पकडले होते.
अनिकेत," पकडून बस"
रुचिरा,"पकडून च बसली आहे."
अनिकेत," अगं माझ्या खांद्यावर हात ठेवून बस. नाहीतर ब्रेक मारला तर पडशील. "
रुचिरा," नाही पडणार." तिला त्याला सतवायला मजा येत होती.
अनिकेत," ठिक आहे तुझी मर्जी. " असे म्हणून अनिकेत गुपचूप गाडी चालवू लागला. तो काही च बोलत नव्हता. पुढे असणाऱ्या खड्ड्यात गाडी गेली आणि रुचिरा ने पटकन अनिकेत ला पकडले.
अनिकेत ," सांगितले होते ना आधीच हात ठेव म्हणून बघितले ना किती खड्डे आहेत रस्त्यावर."
रुचिरा," हो खूपच खड्डे आहेत." रुचिरा गालात हसत बोलली. अनिकेत आणि रुचिरा आणि अनिकेत जॅकेट च्या दुकानात गेले. दुकानदाराला तिने तिची साडी दाखवली त्या साडीला मॅचिंग जॅकेट दाखवण्यास सांगितले.त्याने साडी ला एकदम परफेक्ट मॅच दोन तीन वेगवेगळ्या पॅटर्न मधील जॅकेट दाखवले.त्यातले एक एक करून जॅकेट अनिकेत नी घालून बघितले. त्यातला एक जॅकेट अनिकेत ला खूप आवडला. ते जॅकेट त्यांनी घेतले आणि दोघेही तिथून निघाले. जॅकेट खरेदी लवकर झाल्यामुळे त्यांच्या कडे भरपूर वेळ होता.
अंगठी ची पण खरेदी करायची होती पण दोघांच्या घरच्यांचे ज्वेलर्स ठरलेले होते. त्यामुळे ती खरेदी ते आपल्या घरच्यांसोबत च करणार होते. रुचिराची पर्स कानातले , क्लिप्स अशी छोटी मोठी खरेदी चालू होती. सगळ्या वस्तू घेताना ती सारखी त्याला विचारत होती त्याला त्यातलं काही च कळत नव्हते त्यामुळे तो गोंधळून गेला होता . त्याचा उडालेला गोंधळ बघून ती हसत होती. तो कंटाळला होता त्याला खरतर तिच्याशी खूप बोलायचं होतं आणि डोळेभरून तिला बघायचं होतं.
अनिकेत," चल ग लवकर मला खूप भूक लागली आहे. "
रुचिरा," ठिक आहे समोर त्या बाजू ला खाऊ गल्ली आहे तिथे जाऊ या का ?"
अनिकेत," जेवायला जाऊया".
अनिकेत तिला घेऊन एका रेस्टॉरंट मध्ये जातो. वेटर ने त्याला त्याचा टेबल दाखवला.
थोडंसं निवांत बसल्यावर रूचिराने त्याला विचारले.
रुचिरा," टेबल आधीच बुक केलं होतं का? "
अनिकेत ," हो आधीच बुक केलं होतं."
रुचिरा," किती पटापट झालं ना सगळं? "
अनिकेत," हो ना."
अनिकेत टक लावून तिच्याकडे बघतच बसला होता. गर्द हिरव्या रंगाच्या प्लाॅजो सेट मध्ये रुचिरा खूप च सुंदर दिसत होती. तीने सगळे मॅचिंग केले होते. हिरव्या रंगाचे कानातले, छोटीशी पण हिरव्या खड्याची टिकली, एका हातात हिरवा कडा, दुसऱ्या हातात स्मार्ट वॉच ,रेड कलरची लिपस्टिक लावली होती. तशी ती नेहमीच सुंदर दिसायची. पण आज ती खूपच ग्लो करत आहे. अनिकेत पण खुप छान दिसत होता.दोघांची जोडी खूप छान दिसत होती.
अनिकेत," आईला सांगितलं आहेस ना. उशीर होईल ."
रुचिरा ," हो पण जेऊन यायचं नाही सांगितले आहे. फोन करून सांगते."
रुचिरा आईला फोन करते.
रूचिरा ," हॅलो आई मी जेऊन येईन. "
आई," हो चालेल पण फार उशीर करू नकोस. "
रुचिरा," हो गं आई."