Satva Pariksha - 5 in Marathi Love Stories by Shalaka Bhojane books and stories PDF | सत्व परीक्षा - भाग ५

Featured Books
  • रहस्य - 4

    सकाळी हरी आणि सोनू गुजरात ला पोचले आणि पूढे बस ने संध्याकाळ...

  • आर्या... ( भाग १ )

    आर्या ....आर्या ही मुलगी तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी...

  • गया मावशी

    गया मावशी ....    दिवाळी संपत आली की तिची आठवण हमखास येते…. ...

  • वस्तीची गाडी

    वसतीची  गाडी     

       
                 जुन 78 ते  जुन 86 या  का...

  • भुलाये न बने

                  भुलाये न बने .......               १९७0/८0 चे...

Categories
Share

सत्व परीक्षा - भाग ५

भाग ५
एप्रिल मध्ये साखरपुडा होता. त्यामुळे साखरपुड्याच्या तयारी ला सुरूवात केली. आज ते साखरपुड्याची साडीची खरेदी करण्यासाठी सगळे जाणार होते.
वॉटस्अप वर तर दोघांचे बोलणे चालूच होते. पण आज साडी खरेदीच्या निमित्ताने भेट होणार होती. त्यासाठी अनिकेत ची मामी आणि तिची मुलगी आले होते. संध्याकाळी ५ वाजता सगळे घाटकोपर ला भेटणार होते. ठरल्याप्रमाणे सगळे भेटले. मावशी काका, अनिकेत चे आईबाबा, त्याची मामी आणि तिची मुलगी मिनाक्षी असे सगळे आले होते.
रुचिरा कडून तीची आई आणि तीची काकी आली होती. बाकीच्या लोकांना रुचिरा आधी च भेटली होती. अनिकेत ने त्याच्या मामीची आणि तीच्या मुलीची रुचिरा बरोबर ओळख करून दिली. रूचिरा मामीच्या पाया पडली. पण त्या दोघीही नाखूष वाटत होत्या. रुचिरा ने ते बरोबर हेरले. पण असतो एकेकाचा स्वभाव म्हणून रुचिरा ने त्याकडे दुर्लक्ष केले.

सगळे साड्या घ्यायला दुकानात गेले. दुकानदार एक एक साड्या दाखवत होता. दुकानदाराने साडी दाखवली की रुचिरा अनिकेत कडे बघायची आणि त्याची पसंती नजरेनेच विचारायची तो पण तिला नजरेनेच नाही म्हणायचा. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे मध्ये जसा शाहरुख खान काजोलला नजरेने इशारा करतो. तसा अनिकेत रूचिरा ला इशारा करत होता. तशा तर सगळ्याच साड्या तिला छान दिसत होत्या.
डार्क हिरव्या रंगाची गुलाबी बॉर्डर ची पैठणी साडी
सगळ्यांनी मिळून सिलेक्ट केली. साखरपुड्यासाठी हिरवी साडी लागते म्हणून त्यांनी हिरवी साडी घेतली. साखरपुड्याची तिची साडी खरेदी झाली होती. आता तिच्या साडी ला मॅचिंग कुर्ता घ्यायचा होता. तो घ्यायला ती दोघ च जाणार होते.खरेदी झाली. आता थोडी पोट पूजा करायला ते गेले. जवळच असलेल्या हॉटेल मध्ये ते गेले. अनिकेत काका आणि बाबां बरोबर बसला लेडीज चा ग्रुप दुसऱ्या टेबलवर बसला . पण रुचिरा अनिकेत बरोबर दिसत होता.
रुचिरा मावशी बरोबर गप्पा मारत होती. सगळ्यांसाठी अनिकेत ने पावभाजी मागवली. पावभाजी खाता खाता रुचिरा चे लक्ष पटकन वर गेले तर अनिकेत च्या मामा ची मुलगी मिनाक्षी तिच्याकडे च बघत होती. रुचिरा तिच्याकडे बघून हसली. पण ती रूचिरा कडे बघून हसली नाही. ती बघत तर रुचिरा कडे च होती पण मनात विचार काहीतरी वेगळे च चालू होते. रुचिरा ला ते खटकलं पण तीने त्याकडे दुर्लक्ष केले. रुचिरा ने मग अनिकेत कडे बघितले त्याने तिला डोळ्यांनी च खुणवले की, लक्ष नको देऊस. त्याने बघितले होते आल्या पासून त्या दोघी कश्याप्रकारे रुचिरा सोबत वागत आहेत.
सगळ्यांचे आटोपल्यानंतर ते जायला निघाले. निरोपाची वेळ आली की दोघांना पण कसं तरी वाटायचं. मन नाराज व्हायचे. सगळे निघाले तसे अनिकेत ने तीला मागे थांबण्याचा इशारा केला. ती थोडी मागे रेंगाळली. काकांना दोघांच्या भावना कळत होत्या. काका बाकिच्या लोकांना घेऊन पुढे गेले.
अनिकेत, " काय झालं ? तुझा चेहरा का उतरल्या सारखा का वाटतो आहे. "
रुचिरा, " काही नाही. "
अनिकेत, " ठिक आहे. मी तुला रात्री मॅसेज करतो. मग बोलू आपण. "
रुचिरा, " ओके बाय. ".
अनिकेत, " बाय"
रुचिरा ची आई रुचिरा ला सारखी चल चल करत होती. पण रुचिरा चा काही पाय निघत नव्हता. पाचसहा वेळा बाय करून झाले होते. पण निघायचा पत्ता नव्हता. शेवटी आईने तिला चल म्हणून गुपचूप दरडावले. तेव्हा कुठे मॅडम निघाल्या. घरी पोहचल्यावर आई आपल्या कामात दंग झाली.
बाबा, " साड्या खरेदी ला गेलेला ना मग साड्या कुठे आहेत. "
रुचिरा ची आई, " अहो साड्या मुलाच्या घरी असतात. त्या साखरपुड्याच्या वेळी ओटीत देतात. "असे बोलून त्या आपल्या कामाला लागल्या. रात्री सगळे आवरल्यावर रुचिरा अनिकेत शी चॅटींग करत बसली.
रुचिरा, " हाय. "
अनिकेत, "हाय."
रुचिरा, " जेवणात का?
अनिकेत" हो तू जेवली का? "
अनिकेत, " तुझा चेहरा उतरल्या सारखा वाटला. काय झालयं? खरखरं सांग. "
रुचिरा, तुम्ही वाईट वरून घेऊ नका. पण तुमची मामाची मुलगी मिनाक्षी मला जरा विचित्र वाटली म्हणजे थोडी नाराज वाटली मला. "
अनिकेत, " मी बघितले ते . ती थोडी विचित्रच आहे. खरतरं मामीला तीचं आणि माझं लग्न लावून द्यायला होते. "
रुचिरा, " ओ, आलं लक्षात तरी च ती माझ्याकडे अशी बघंत् होती. "
अनिकेत, " तू तिच्याकडे लक्ष देऊ नकोस. ती तुझा मूड ऑफ करायचा प्रयत्न करते. चल बाय ?
रुचिरा, " बाय"