माझ होशील का❓ भाग ४
संजना ला आईने थांबायला सांगितले. संजना तिथेच थबकली. संजना चे कान आईच्या बोलण्याकडे लागले होते. सरीता ताईं नी फोन उचलला.
सरीता ताईं, " हेलो, "
वीणा ताई, " नमस्कार, सरीता ताईं. अशा आहात तुम्ही? "
सरीता ताईं, " मी मस्त आहे. तुम्ही कशा आहात? "
वीणा ताई, " फोन अशासाठी केला होता. आदित्य ला वेळ नव्हता खरतरं पण भेटेल तो तिला. मी त्याचा नंबर तुम्हाला सेंड करते तो संजना ला द्या. म्हणजे मग ते दोघे मिळून ठरवतील कधी आणि कुठे भेटायचं ते. "
सरीता ताईं, " बरं बरं देते तिला फोन? "
विणाताई , " अच्छा मग ठेवते हा फोन. "
सरीता ताईं, " हो हो . "
त्यांच्या शी बोलताना सरीता ताईं ना उगाच दडपण यायचं.
सरीता ताईं संजना ला म्हणाल्या , " संजू त्यांनी नंबर दिला आहे आदित्य चा तुला सेंड करते. संजना ला त्या नंबर सेंड करतात. संजना ठिक आहे म्हणून ऑफिस ला निघून जाते.
संध्याकाळी ती आदित्य ला फोन करते. सुरुवातीला दोनदा तो तीचे फोन कट करतो. तिसऱ्या वेळेस तो फोन उचलतो.
आदित्य, " हॅलो, "
संजना, " हॅलो आदित्य मी संजना बोलतेय. "
आदित्य, " संजना....(काहीतरी अचानक क्लीक झाल्यासारखं करून) ओके ओके ओके . ॲक्चुली माझ्या पटकन लक्षात नाही आलं. "
संजना, " इटस् ओके नंबर पण नवीन च आहे तर कसं लक्षात येणार? "
आदित्य, " काही काम होते का माझ्याकडे? "
संजना, " हो तुम्हाला भेटायचं होते. "
आदित्य, " कशाला भेटायचं होतं? म्हणजे माझ्या कडे काही काम होते का? "
संजना, " काम असं काही नव्हतं पण ज्याच्या बरोबर आपल्या ला संपूर्ण आयुष्य काढायचं आहे त्याला एका भेटीत थोडीना ओळखता येते. त्यामुळे जर एकदा आपण भेटलो असतो तर बरं झालं असतं. "
आदित्य, " असं तर कधी कधी अख्खं आयुष्य एकत्र काढले तरी माणसं ओळखता येत नाहीत. "
संजना, " पण एकदा भेटलो असतो तर थोड फार एकमेकांना ओळखू शकू असं मला वाटते. "
आदित्य, " पण मला नाही वाटतं तरी पण उद्या भेटू. "
संजना, " ठिक आहे. कुठे भेटायचं? "
आदित्य, " उद्या संध्याकाळी ७ वाजता . ॲड्रेस मी सेंड करतो तुला. पण बरोबर वेळेवर ये. बाय"तीचं बाय ऐकायच्या आधी च त्याने फोन ठेवला. "
संजना, " बा.. फोन कट झाला होता. आईला काय आवडला हा काय माहित कुस्का च दिसतोय. जाऊ दे बघू उद्या च उद्या. तिच्या मोबाईल ची मॅसेज टोन वाजली. तीने मॅसेज बघितला तर त्याने ॲड्रेस सेंड केला होता.
घरी आल्यावर तीने आईला भेटायला बोलावले. आई खूप खुश झाली.
आई, " संजू उद्या त्याला भेटल्यावर काय विचारायचे ते ठरव.
"
संजना, " आई अगं विचारेन गं.तू नको टेन्शन घेऊस"
आई, " बरं बाई नाही बोलत काही. "
संजना पटापट आवरून उद्या काय घालायचं त्याचा विचार करत बसते. कपाटातून एक भारीतला सलवार सुट ती काढून ठेवते . त्याच्या वर मॅचिंग ज्वेलरी काढून ठेवली. उद्या त्याच्याशी काय बोलायचे ह्याचा विचार ती करु लागली. तो काय बोलेल यावर पण तर डिपेंड आहे ना काय बोलायचे ते? "
त्याच विचारात कधीतरी तिचा डोळा लागला. सकाळी ती उठली तेच चांगल्या मूडमध्ये . आई फक्त तीला बघत होती. खूप दिवसांनी ती इतक्या चांगल्या मूडमध्ये होती.
पिस्ता कलरचा तो सलवार सुट तिला खूप खुलून दिसत होता. मेक अप ती जास्त ओवर करत नसे. हलकासा मेकअप तीने केला पण त्या हलक्या शा मेकअप मध्ये ती सुंदर दिसत होती.
आईला बाय करून ती ऑफिस ला निघाली. संध्याकाळी आशुतोष ला भेटायला जाणार असल्याचे तीने आईला सांगितले. ऑफिस मधलं कामं तीने भराभर आवरलं. संध्याकाळी ६लाच ती ऑफिस मधून निघाली.
आदित्य ने सांगितलेल्या ॲड्रेस वर ती पोहोचली. तेव्हा पावणे सात वाजले होते. ती बाहेरच त्याची वाट बघत थांबली होती. आदित्य अजून आला नव्हता.
७ वाजायला पाच मिनिटे असताना तो त्याच्या एम जी ग्लोस्टर या गाडीतून आला. त्याला भेटायची तिची ही पहिली च वेळ होती. त्यामुळे तिच्या ह्रदयात धडधडत होते. तीने त्याला हाय करण्यासाठी हात केला. उत्तरादाखल तो जरासा हसला. दोघेही आत हॉटेल मध्ये गेले. त्याने टेबल बुक केले होते तिथे ते दोघे बसले.
संजना, " हाय कसे आहात तुम्ही?
आदित्य, " मी मस्त आहे."
संजनाला त्याने काही विचारलं नाही. तिला ते थोडं ऑड वाटलं .
वेटर ऑर्डर घ्यायला आला. हॉटेल खूप छान होते.
आदित्यने तीला विचारले, " काय घेणार? "
संजना, " तुमच्या आवडीप्रमाणे मागवलं तरी चालेल. "
आदित्य, " दोन चिकन ससॅंडविच मागवले. दोघांसाठी ज्यूस मागवले. "
तो गप्प च बसून होता. तीला वाटलं तो काहीतरी बोलेल असं तिला वाटलं . पण तो काही च बोलत नाही हे बघून तीने च बोलायला सुरुवात केली.
संजना, " मी इथे तुम्हाला भेटायला बोलावलं कारणं त्या दिवशी घरी आपल्या ला जास्त बोलता आलं नाही. तेव्हा कसं आपली पहिलीच भेट होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे
घरच्यांच दडपण होतं त्यामुळे नीट बोलता आलं नाही. "
आदित्य फक्त ऐकत होता. तो त्यावर काही च बोलला नाही. संजना च मग पुढे म्हणाली, " तुम्हाला मी आवडली आहे ना? "
आदित्य, " मम्मा ने तुला सांगितले आहे ना.येत्या रविवारी पुढची बोलणी पण होणार आहेत. मग हा प्रश्न का विचारला? "
संजना, " मी सहजच विचारला प्रश्न. " इतक्यात वेटर चिकन सॅंडवीच घेऊन आला.
संजना, " तुम्हाला मला काही च विचारायचं नाही का? "
आदित्य, " नाही. "
दोघांनी सॅंडवीच संपवले.
आदित्य, " निघूया का? संजना तुला जर तुझ्या डिसीजन वर डाऊट असेल तर सांग. "
संजना, " नाही नाही तसं काही नाही. चालेल निघूया. "
संजना तिथून निघते तीची कॅब बुक करते. कॅब मध्ये बसते आणि तिथून निघते.
संजना घरी आल्यावर काय बोलणं झालं असेल ह्या चा अंदाज आई लावत असते. पण संजना च्या वागण्यातून त्यांना काही कळेना.संजना ने फक्त तीचं आवरलं आणि ती झोपायला गेली. ती त्याच्या बद्दल विचार करत होती . तीला तो थोडा रूढ वाटत होता. तीने आईशी बोलायचं ठरवलं.
दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्ट करताना आई समोर तीने विषय काढला.
संजना, " आई अगं काल आम्ही भेटलो होतो. पण तो जास्त काही बोलतचं नव्हता. "
आई, " अगं असतात काही लोकं त्यांना बोलायला नाही आवडत. आता आता तर ओळख झाली आहे लगेच बोलायला नाही जमत काही जणांना . ओळख झाली की, बोलणं होईल."
संजनाला आईच म्हणणं पटलं. संजना विचार करत बसली. असतात काही लोकं ज्यांना पटकन मिक्सअप नाही होता येत. बघू पुढचं पुढे.
कामाच्या गडबडीत कसे दिवस निघून गेले कळलेच नाही.
शनिवारी तिला सुट्टी असायची. म्हणून आज ती निवांत झोपली होती. आईनं तीच्या साठी मस्त नाश्ता केला होता. उद्या आदित्य च्या घरी जायचे होते .
हा भाग तुम्हाला कसा वाटला. ते तुमच्या प्रतिक्रियेतून नक्की सांगा. हा भाग तुम्हाला आवडला असेल तर स्टिकर्स द्यायला विसरु नका.