Mall Premyuddh - 25 in Marathi Love Stories by Bhagyashali Raut books and stories PDF | मल्ल प्रेमयुद्ध - भाग 25

Featured Books
Categories
Share

मल्ल प्रेमयुद्ध - भाग 25

मल्ल प्रेमयुध्द

वीर घरी आला, तेव्हा आबा नोकरांना कोणाला किती गोण्या द्यायच्या कशाच्या गोण्या द्यायच्या हे सगळे सांगत होते.
वीर आत मध्ये आला आणि विचारले, "आबा हे काय करताय?"
तेव्हा आबांनी सांगितले, "अरे कांद आलेत, ज्वारी, तांदूळ हायत म्हंटलं दोन्ही सुनांच्या घरी पाठवून...आता तसं काय मोठ्या सूनच्या घरी काय कमी न्हाय पण तरीपण पाठवाव दरवर्षाला आपण पाठवतो. तर यंदा क्रांती च्या घरी पण पाठवाव. दहा पाच पोती भरतील. एवढी पाठवून देतो."
"दादाना फोन करून आधी विचारात्यांना पटणार हायका, ती माणसं साधी त्यांना हय पटल की नाही मला जरा शंका हाय, तरीपण फोन करा एकदा विचारा." वीर म्हणाला.
आबा म्हणाले मी पाठवलं म्हंटल्यावर ते नाही कसं म्हणत्याल. मी आणि दादा बघून घीण, तू काही मध्ये बोलू नकोस." वीर काहीच म्हणाला नाही.
तेजश्री खाली येत असताना दिसली. तेजश्री चेहऱ्यावर शांतता होती. टेन्शनमध्ये होती. हे वीरला माहित होतं. " तिच्या जवळ गेला आणि म्हणाला वहिनी तुम्हाला बोलायचं होतं ना बोला."
"भाऊजी हे कुठे गेल्यात माहिती आहे का तुम्हाला?"तेजश्री म्हणाली.
"नाही मला काहीच माहित नाय, तो कुठ गेलाय मला सांगितलं सुध्दा नाय. भाऊजी मला माहिती देताना टेन्शन आले ते नक्की..."

" नाय, नाय... वहिनी असं काही म्हणू नका दादा परत असं चुकीचं वागणार नाय... तो तुम्हाला आता फसवणार नाय...
दोघ हळू बोलत होते. त्यांच्या जवळ आले आणि म्हणाले काय झालं संग्राम कुठे बाहेर गेलाय का? चर्चा चालली का? त्याला मीच पाठवले बाहेर बँकेत पासबुक भरायच व्हत अन बँकेतून पैसे काढायचे म्हणून पाठवला आहे मी त्याला आज दिवसभर यळ लागणारे . आबा
"आबा ते फोनच उचलत नाहीत. किती वेळ झालं फोन केला पण फोन उचलत नायात ते... तेजश्री म्हणाली, तेवढ्यात वीर ने फोन काढला आणि संग्राम ला फोन लावला संग्राम ने फोन उचलला.
" हा बोल... की रे अरे किती वेळ झाला फोन करतोय तू फोन का नाय उचलत? वीर म्हणाला
" अरे फोन गाडीत राहिला होता, मी बघितल तेजश्रीच मिस कॉ, तिला फोन करणार तेवढ्यात तुझा फोन आला. संग्राम म्हणाला.


"बर ठीक हाय, घरी मग आल्यावर बोलू" आबा निघून गेले. आणि तेजश्री वीरला म्हणाली, "भाऊजी त्यांच्यातच प्रॉब्लेम हाय, अजून थोड्या टेस्ट कराव्या लागणार हायत त्यांना सांगितलं तवा त्यांचा चेहरा पडला. माहित न्हाय प्रयत्न करून काय व्हणारे की नाय ते पण त्यांची मला नाय वाटत त्यांची इच्छा हाय की पुढच्या टेस्ट करून घ्याव्यात म्हणून...

" इतकच ना वहिनी मी बोलतो त्याच्याशी तो नक्की तयार व्हईल तुम्ही अजिबात काळजी करू नका.."
तेजश्री तरीपण टेन्शनमध्ये होती.
"वहिनी आता काय झालं? का टेन्शनमध्ये हाय?
"भाऊजी काय भयानक प्रॉब्लेम निघाला तर हे परत तिच्याकडं तर जाणार नाहीत ना? "
"असं का म्हणताय वहिनी? देवावर विश्वास ठेवा असं नाही होणार... नक्की डॉक्टर काहीतरी करतील आणि नक्की आपल्या घरात बाळ गोपाळ किंवा लक्ष्मी येणार..." तेवढ्यात आबांनी वीरला आवाज दिला.



क्रांती आनंदात होती. जरी ते दाखवत नसली कोणाला किंवा कोणी बोलून दाखवत नसली तिला तरी सगळ्यांना समजत होतं की आज क्रांती आनंदात हाय. चिनू येऊन तिला अधून मधून चिडवत होती.
"मग काय कसं काय गेला आजचा दिवस?" नकळत का होईना क्रांती पुन्हा त्या त्याच गोष्टीचा विचार करत होती.
" ज्या पोराच्या प्रेमात सुद्धा पडायचं नाय असं ठरवत व्हते मनाशी तोच पोरगा आवडायला लागला की काय? चिनू तिच्याकडे बघत होती. " काय तायडे अजून हरवलीस काय दाजींच्या इचारात?"
" खरं सांगूका तुला चिनू मला ना कळतच नाय काय आज मला काय होतय, आजचा दिवस फारच भारी होता मी कधीच कुठल्या पोरासोबत एवढा वेळ एकत्र घालवला नव्हता. महत्त्वाचं बोलायला गेले आणि त्यांनी माझा दिवसच बदलून टाकला. आता त्यांनी परमिशन दिली पण आबा काय म्हणत्यात.
" पण तायडे तुझा विश्वास बसला ना की दाजी मी तुझ्यावर प्रेमामुळेच फक्त लग्न करत्यात... असं नाही की तुझा बदला घ्यायचा होता आणि हे काय कारण का बदला घ्यायचं, बदला घेतील पण लग्न, लग्न आयुष्याचा खेळ हाय का? असं कोणाचं आयुष्य दाजी पणाला लावतील असं तुला वाटते का ? दोन महिन्याची वाट नको बघत बसू...तुला समजल ना की दाजी एक नंबर माणूस हाय त्यांना आत्ताच सांगून टाक की, मी तुमच्या प्रेमात पडली... आग हायत ते दिवस भारी घालवा की नाहीतर ते टेन्शनमधी तू टेन्शनमधी..." चिनू मोठ्या माणसासारखी तिला समजावत व्हती.
" नाय अजून मला तर ही गोष्ट त्यांना सांगायची नाय, खरं तर पहिल्यांदा भेटलो प्रेमात बिमात लगीच न्हाय... मी पहिल्यांदाच त्यांना भेटली म्हणून असल पण माहिती नाय ही गोष्ट आत्ता सांगणार नाय दोन महिन्याचा वेळ हाय ना... आम्ही दोन महिने घेऊ आण मग त्यांना सांगेन की मी त्यांच्या प्रेमात हाय की नाय... आता फक्त एकच गोष्ट प्रॅक्टिस आबांनी परमिशन दिली किंवा नाय दिली तरी मी जाणार थेट मुंबईला..." क्रांतीच्या डोळ्यात स्वप्न होते.

"पण तायडे तुम्हाला में गोष्ट सांगितलीच नायस काय काय केलं तुम्ही? सांगा की मला पण..." चिनु तिला चिडवायला लागली. "काय केलं???" क्रांतीला वीर ने उचललेला डोळ्यासमोरील आला आणि ती स्वतःशीच हसायला लागली. त्याचा स्पर्श अजून तिला जाणवत होता.
" तायडे एकटीच काय हसतीस मला पण सांग की काय झालं? मी पण तुझ्याबरोबर हसते.... चिनू तिला चिडवत म्हणाली.
"गप्प चीने काय नाही झालं, त्यांनी मला पाणीपुरी खायला घातली... बस एवढच तुझ्या चेहऱ्याकड बघून वाटत नाय एवढंच झाल असल म्हणून.... खरं सांग, खरं सांग... काय झालं??? मी शप्पथ सांगतीय मी कुणाला काय सांगणार नाय..." तेवढ्यात क्रांतीचे व्हाट्सअपची रिंगटोन वाजते, मेसेज... हाय... लिहिलंय, डीपी दिसत नाय, चिनूनेल नंबर बघितला आणि तिला समजलं...कोणाचा नंबर हाय.


"आबा... मला तुमच्याशी बोलायचंय..." जेवण झाल्यानंतर वीर हॉलमध्ये बसला आणि आबांना म्हणाला, "बोला की वीर साहेब काय म्हणताय लग्नाची तयारी जय्यत करायची बरं..आता दोनच महिने राहिलेत, दोन काय??? दोन पेक्षा कमी महिने राहिल्यात... थोरल्या सुनबाईना सांगून यादी करायला सांगतो. अन तुमचं मित्र दिसत न्हाईत भूषण कुठ गायब झालत? आबा म्हणाले तेवढ्यात वीर परत म्हणाला, "आबा मला तुमच्याशी बोलायचय महत्त्वाचं..."
" बोला वीर..."
"आबा क्रांती ना आणि आम्हाला मुंबईला जायचं तिकडे पैलवान की कोचिंग ऍडव्हान्स मधी शिकवत्यात, अन तिथेच त्यांना पुढच्या शिक्षणासाठी जायचं कारण त्यांना नॅशनल लेवल खेळायचं अन आम्हाला सुद्धा..." आबांचा चेहरा पडला.
" वीर तुम्हाला जायचे तर तुम्ही जा, सुनबाईनी इथन पुढ खेळायचं नाय."

आबा लहानपणापासन त्यांचे स्वप्न हाय त्यांना पुढे जाऊन खेळयायचं, नॅशनल लेव्हल पर्यंत खेळायचय आणि लग्नामुळे मी त्यांची स्वप्न मोडू नाय शकत मला सगळ्या गोष्टी माहिती हायत आत्तापर्यंत सगळ्या घरातल्या बायका उंबरा ओलांडून भायर गेल्या नाय, सगळ्यांनी तुमचा ऐकलं माझ्या बायकोने सुद्धा ऐकावं पण ती गावात आल्यावर आणि त्या ऐकतील सुद्धा हा माझा शब्द हाय पण त्यासाठी त्यांनी स्वप्न तिथे सोडून द्यावीत असं मला नाय वाटत... मला सुद्धा वाटते त्यांनी खेळावं आत्तापर्यंत सगळ्या बायका मन मारून जगल्या, आपली प्रतिष्ठा, घरंदाजपणा सगळं क्रांती जपत्याल पण उंबऱ्याच्या आत, याच्यात गावाच्या आत.... त्यांना न्हाय नका म्हणू नायतर हे लग्न मोडलं म्हणून समजा, तुमची स्वप्न पूर्ण करायची म्हणून मी खेळत होतो म्हणून मुलगा आणि मुलगी हा भेदभाव करायचा... तुमचा पोरगा खेळणार आणि सुनेने डोक्यावर घेऊन आत राहायचं... त्यांची स्वप्न पदराआड घेऊन जगायचं... कशासाठी आबा,??? मी क्रांतीला शब्द दिला व्हता.
" मग आमच्या घरंदाजपणाच काय? आतापर्यंत कुठलीच बाहेर पडली नाय, अन तुम्ही म्हणताय तिला कुस्तीला बाहेर पाठवा. नाय हे व्हणार न्हाय, मी म्हणलो होतो ते पण तुमची इच्छा व्हती म्हणून लग्न ठरावल आणि त्याच पोरी बरोबर... म्हणूनच आम्ही म्हटलं होतं की आपण पुढं बघू खेळायचा की नाय पण तुम्हाला माहीत होतं की आम्ही ह्या गोष्टीवर ठाम व्हतो की, क्रांती लग्नानंतर खेळणार नाय, पाटलांच्या घरात आलं की हेच असतं का चूल आणि मूल... बाकी स्वप्न, इच्छा बायकांच्या चुलीत असत्यात, लक्षात ठवा क्रांती जाणार नाय..."
" मग लग्न मोडला म्हणून समजा... मी कळवतो दादांना उद्या तसं , मी कोणाची स्वप्ने तोडून, तिला घरात येऊन देणार नाय न
आबा ह्या जागेवर तुमची लेक असती तर तुम्ही असच म्हणाला असता का? ह्याचा विचार फक्त करा..." वीर रागाने निघून गेला. आबा हाताच्या मुठी घट्ट करत होते. त्यांना काय करावं सुचत नव्हतं. आतापर्यंत कुठलीच बाई, बाहेर गेली नव्हती आणि आता क्रांतीला बाहेर पाठवायच गाव काय म्हणाल? गावातील इब्रत काय राहील ? याचा विचार करून आबांना रात्रभर झोप लागली नाही.


वीर घराच्या बाहेर आला आणि भूषणाच्या घराच्या अंगणात
भूषण शेकोटी पेटवून शेकत बसला होता.हवेत गारवा होता. अंगाला थंड हवा स्पर्श करून जात होती आणि अंगावर बारीक थंडी भर होती इतका गारवा होता. झाड वाऱ्याने हलत डुलत होती. शेगडीची गरमपणा अंगाला उब देत होता. वीरच्या चेहऱ्यावरचं टेन्शन बघून भूषण ला लक्षात आल काही तरी बिनसलय साहेबांच भूषण एकटाच विचार करत उभा होता.वीर त्याच्याजवळ आला.
"भूषण माझं लग्न मोडणार बहुदा." भूषणला प्रश्न पडला, आता काय झालं? वीरने घडलेली घटना एका दमात भूषण ला सांगितली. भूषणच्या कपाळावर आठ्या पडल्या. दोघे शेकोटी शेजारी शेकत विचार करू लागले जर आबांनी परमिशन नाही दिली तर काय????




इकडे क्रांती रात्रीचे बारा वाजले तरी मोबाईल जवळ घेऊन झोपली होती वीरचा काहीतरी मेसेज येईल.... ऑनलाइन दिसत होता ना मेसेज होता तिला काही समजायला मार्ग नव्हता. वीर बोलला असल का आबांबर? आबांनी परमिशन दिली असल का आणि जरी दिली असती तरी वीरचा लगेच मेसेज आला असता पण मी नाही तसा काही मेसेज केला नाही ना गुड नाईट चा नेहमीप्रमाणे...


भूषण विचार करत बसला होता.आबांनी परमिशन नाय दिली तर लग्न मोडणार आणि हे जर लग्न मोडलं तर वीर च्या मनावर जोराचा आघात होणार आणि आपल्या मित्राच्या बाबतीत हे भूषण ला नको होतं. " वीर आबांनी जर परमिशन नाही दिली नाय तर तू क्रांतीला सांगायचं मी तु जा म्हणून आणि थोड्या दिवसांनी पळून जाऊन लग्न करायचं...
क्रांतीची स्वप्ने तोडायची नाय, तुझं तिच्यावर असलेलं प्रेम ते महत्त्वाचं... माझ्या मित्राला दुःख झालेल मी सहन करू शकत नायआणि त्यासाठी काहीही कराव लागल तरी चालल, आबांचा राग सहन करावा लागला तरी चालल... पण हे लग्न होणार आणि क्रांती मुंबईला जाणार... क्रांती काय तिच्याबरोबर तू सुद्धा मुंबईला जाणार...." भूषण म्हणाला


"भूषण मी असा विचार सुद्धा केला नाय आणि क्रांती पळून ईल शक्यच नाय, क्रांतीची तत्त्वनिष्ठा, संस्कार या सगळ्यांशी जोडली गेली. भूषण एवढं तर नक्की मी त्यांचे स्वप्न मोडून देणार नाय, पळून जायचं लांबची गोष्ट आबांना कसं पटवायचं हे मला चांगलंच म्हायती हाय,आबांनी परमिशन नाय दिली तरी सुद्धा क्रांतीला मी मुंबईला पाठवणार अन तिच्याबरोबर मी सुद्धा जाणार प्रॅक्टिसला... आता ठरवलय आयुष्य दोघांच तर दोघांनी पुढ जायचं. मी त्यांना एक पाऊल सुध्दा माग घेऊन देणार नाय मग त्यासाठी घराचा काय कोणाचाही विरोध असला तरी हेच व्हाईल फक्त क्रांतीसाठी.... क्रांतीच्या प्रेमासाठी...

क्रमशः

भाग्यशाली अनुप राऊत