भर धाव रस्त्यावर ती बेधुंद धावत चाललेली आहे आणि दोन गुंड तिचा सारखा पाठलाग करत आहेत. ती धावता धावता एका इमारतीत शिरते आणि जाऊन एका ठिकाणी लपून जाते. तिचा पाठोपाठ ते गुंड सुद्धा त्या इमारतीत जाऊन शिरतात. ती आता एका ठिकाणी लपून बसलेली असते जेथून तिला सगळ काही स्पष्ट दिसत असते. ते दोन गुंड आतमध्ये येऊन थांबतात, त्यातील एक जण म्हणतो, “ कुठे गेली आहे रे ती तुला दिसते आहे काय?” तर दुसरा त्याला म्हणतो, “ नाही मला नाही दिसत आहे.” मग पहिला म्हणतो, “ जाऊन जाऊन कुठे जाणार ती असेल इथेच, आता हि संधी हातातून आपण जाऊ देणार नाही. आज आपण तिचा अध्यायचा समापन करूनच येथून जाऊ. चल आता तिचा शोध घेऊ तू तिकडे जा मी इकडे जातो. तुला जर दिसली तर तू तो आपला गुपित इशारा मला कर आणि मला दिसली तर मी तसे करतो.” असे म्हणून दोघेही इकडे तिकडे तिला शोधण्यासाठी वेगळे झाले. ती त्यांचे सगळे बोलने ऐकत होती आणि आता जरा जास्तच सावध झाली होती.
त्या दोघांतील एकजण तिला शोधत शोधत तिचा लपण्याचा स्थानाचा जवळ येऊन ठेपतो. तो स्वतःशीच बोलतो, “ कुठे लपली आहे रे ती साली, फार डोक्यात जाऊन बसली आहे. आज तिचा गेम करून टाकतो आणि तीचामुळे आमचा डोक्यावर जे टेन्शन आले आहे त्यापासून मुक्त होतो.” त्यानंतर तो बोलला, “ ऐ सावली कुठे आहेस तू, बर बोला ने बाहेर गुमान निघून ये नाही तर तुझी खैर नाही.” असे बोलून तो पुढे पुढे सरकतो तोच सट असा आवाज आला आणि त्याचा माणेतून रक्त निघू लागले. मग एका क्षणातच तो रक्तबंबाळ होउन तेथेच कोसळतो. ते बघून सावलीचा तोंडून किंचाळी निघते आणि ती त्या ठिकाणातून निघून बाहेर येते. तो तेथे रक्तबंबाळ होऊन पडलेला असतो आणि सावली ते अत्यंत भयानक दृश्य बघून फारच घाबरून जाते. सावलीचा आवाज ऐकून त्याचा दुसरा साथी त्या आवाजाचा दिशेने पडत सुटतो. त्या दुसऱ्या गुंडाचा येण्याची चाहूल सावलीला येते आणि ती आणखी दुसऱ्या ठिकाणी लपून जाते. त्या ठिकाणाहून ते ठिकाण जेथे त्या गुंडाचा मृत देह पडलेला आहे ते स्पष्ट दिसत असते. त्या गुंडाचा दुसरा साथी तेथे येतो तर काय बघतो त्याचा साथीची हत्या गळाकापून केलेली आहे. मग तो म्हणतो, “Oh My God! कोणी केले आणि कसे केले आहे. नक्कीच हे तिने सावलीने केले आहे कारण कि तिचा शिवाय आणखी कोण होत येथे.” मग तो त्याचा खिशातून फोन काढतो आणि नंबर डायल करतो.
फोनची रिंग वाजते आणि समोरील व्यक्ती फोन उचलतो, तेव्हा तो गुंड बोलतो, “ जय हिंद साहेब, साहेब मी शिर्के बोलतो आहे. साहेब येथे फार मोठा घात झालेला आहे. आपले कदम साहेबांची हत्या करण्यात आलेली आहे. आम्ही दोघेही त्या अपराधीचा पाठलाग करत होतो. ती येथे एका इमारतीत येऊन लपली आहे. आम्ही तिचा पाठोपाठ तिला शोधण्यास आणि पकडण्यासाठी येथे आलेलो होतो. आम्ही दोघेही तिला स्वतंत्र वेगवेगळ्या ठिकाणी शोधत असतांना माझा कानावर तिचा ओरडण्याचा आवाज आला म्हणून मी धावत येथे आलो आणि बघतो तर साहेब येथे मृत अवस्थेत पडलेले आहेत.” मग समोरची व्यक्ती बोलते, “ तुम्ही तेथेच थांबा मी रुग्ण वाहिका आणि आपल्या कार्यालयाची गाडी तेथे पाठवतो.” “ ठीक आहे साहेब” म्हणून तो दुसरा गुंड न म्हणता पोलीस शिपाही फोन ठेवतो. सावलीला आता कळले कि ते गुंड नसून पोलीस आहेत. एकवेळ तिला वाटले कि येथून बाहेर निघावे आणि त्यांचा पुढे जाऊन त्यांना सत्य काय ते सांगावे परंतु, ते तिला पूर्वीसारखेच अपराधी समजून तिला अटक करतील आणि मागचा प्रमाणे या सुद्धा तिने न केलेल्या गुन्हयाचा आरोप तीचावर लावतील म्हणून ती तेथेच लपून बसून राहिली तेथून बाहेर पडण्याचा योग्य संधीचा शोधात. थोड्या वेळाने तो शिपाही त्या रूममधून काही काळासाठी फोनवर बोलत बाहेर पढला आणि सावली संधी मिळताच तेथून पसार झाली.
ती त्या इमारतीतून बाहेर पडून दूरवर एका निर्जन अशा ठिकाणी जाऊन थांबली. तेवढ्यात तिला कोमलचा फोन आला, तर सावलीने फोन उचलला आणि म्हणाली, “ हेलो कोमल”, समोरून कोमल बोलली, “ ताई कुठे आहेस तू आणि काय झाले तू अशी धापा का बर टाकतेस.” तेव्हा सावली म्हणते, “ अग मी एका निर्जन अशा ठिकाणी थांबली आहे आणि पूर्वीसारखेच येथे सुद्धा.....” असे म्हणून ती रडू लागली होती. तेव्हा समोरून कोमल बोलली, “ ताई काय झाले तू काय केलेस.” तेव्हा सावली बोलली, “ अग मी आज हि काहीच केले नाही मी त्या कदम साहेबांची हत्या नाही केली.” तेव्हा कोमल बोलते, “ काय ! ताई तू आणखी एक खून केला आहे.” तेव्हा सावली म्हणाली, “ नाही ग खरच आई शपथ मी त्यांना नाही मारले मी तर फक्त लपून बसले होते आणि अचानक कुणीतरी त्यांची हत्या करून टाकली. हे तर मला तेव्हा कळले जेव्हा त्याचा दुसरा साथी म्हणजे शिपाही त्याने पुढे त्याचा साहेबांना फोन करून याची माहिती दिली तेव्हा मी हे सगळ त्याचा तोंडून ऐकले. त्यानंतर मला कळले कि ते गुंड नसून ते पोलीस होते. आता मागील प्रमाणे या सुद्धा हत्येचा आळ माझ्यावरच येणार आहे.” मग कोमल बोलली, “ काय ताई वारंवार तुझ्यासोबत असे का बर घडते आहे आणि नेमकी तू त्या ठिकाणी आणि त्या निश्चित वेळेत तेथे उपस्थित असतांना हे सगळ का आणि कसे घडत हे मला कळत नाही आहे.” शेष पुढील भागात ................