मल्ल प्रेमयुध्द
दोघे बराच वेळ फक्त बसून होते.
"वीर थँक यु..." तिच्या डोळ्यात दिसणारे भाव वीर वाचत होता. बराच वेळ तिच्या डोळ्यात तसाच बघत होता. तिला लाजल्यासारखे झाले तिने उगीचच खाली बघून स्वतःच्या ओढणी हातांच्या बोटाना गुंडाळू लागली.
"का खाली बघताय??? लै दिवस झाले सांगीन म्हणतोय... तुमच्या डोळ्यात जादू हाय... तुमच्या डोळ्यात अस काय हाय की मी स्वतःला सुद्धा ओसरून जातो." क्रांतीने एक नजर वीरकडे बघितलं. तिच्याकडे यापूर्वी अनेक मुलांनी बघितलं होत पण वीरच्या बघण्यानं ती विरघळून गेली होती. तिला समजतच नव्हते की काय बोलावे.
"निघायला पाहिजे... घरी वाट बघत असत्याल... " क्रांती
"काय म्हणालात का? " वीर
"म्हंटल निघायला पाहिजे... घरी वाट बघत असत्यात." क्रांतीने परत एकदा सांगितले.
"लगेच...?" वीर
"हो म्हणजे पोहचायला अर्धा तास लागल ना?" क्रांती
"व्हय... पण इथं पाणीपुरीचा गाडा हाय लय भारी बनवतो तो पाणीपुरी खाऊन जाऊ.." वीर
"इथं दिसत गाडीवाला...? कुठं???" क्रांतीला काहीच कळत नव्हते. वीरने तिचे डोळे बंद केले. क्रांतीला पुन्हा त्याच स्पर्श जीवघेणा वाटला. थोडं पुढे गेल्यावर क्रांतीचा पाय अडखळला आणि ती पडणार एवढ्यात वीरने तिला पकडले आणि उचलून त्याच्या दोन्ही हातामध्ये घेतले.
"डोळे उघडू नका..." वीरच्या मनामध्ये वाईट विचार नव्हता तो तिला अलगत उचलून नेत होता. पण तिचा चेहरा पाहून तो थबकला आणि तिच्या चेहऱ्यावरची नजर हटवू शकत नव्हता. क्रांतीला समजले.
"का थांबला?" डोळे न उघडताच ती म्हणाली. वीर भानावर आला.
"काही नाही... खूप मोठा दगड होता वाट शोधत होतो." वीर चालायला लागला. पण नजर तिच्यावरच होती. तिच्याकडे किती बघू अन किती नको असं झालं होतं. त्याने तिला खाली उतरवलं.
"आता उघडा डोळे..." वीरने सांगितल्यावर क्रांतीने डोळे उघडले. समोर पाणीपुरी, भेळचा गाडा होता.
"बापरे एवढ्या आडबाजूला ही गाडी...?" क्रांतीला एवढे लोक बघून आश्चर्य वाटले.जास्तीत जास्त जोडपी होती तिथे. कोणी एकमेकांना भरवत होते तर कोणी खाण्यात मग्न झाले होते तर कोणी गप्पांमध्ये कोणाचं कोणाला काही घेणं देणं पडलेलं नव्हतं.
"काय खाणार???पाणीपुरी की भेळ? " वीरने विचारले. क्रांतीचा त्याच्याकडे लक्ष सुद्धा नव्हते ती आजूबाजूला सगळीकडे बघत होती. वीरला तिची अवस्था समजली.
" अहो काळजी नका करू तिकडे सगळे अशीच मंडळी येतात फिरायला पण तुम्ही लक्ष नका देऊ तुम्ही काय खाणार ते सांगा मला?" वीर
" मी पाणीपुरी खाईन पण कमी तिखट सांगा मला" क्रांती म्हणाली. वीरने मान हलवली आणि हसला.
" दादा एक तिखट आणि एक कमी तिखट पाणीपुरी दे."
"काय वीर साहेब माहिती कि आम्हाला तुम्हाला तिखट पाणीपुरी लागती ताईंना देतो कमी तिखटाची." पाणीपुरीवाला म्हणाला.
" बाकी काय म्हणतोयस घरचे बरी हायत ना सगळी आईचं ऑपरेशन झालं नीट सगळं." वीर
" वीर साहेब सगळी तुमची कृपा डॉक्टरांना ओळख करून दिली नसती तर त्यांनी फी कमी केली नसती. बाकी आई आता एकदम टकाटक हाय बघा" पाणीपुरीवाला खुश झाला. त्यांच्या हातात पाणीपुरीच्या डिश दिल्या. एक पाणीपुरी खाल्ली आणि क्रांती म्हणाली बापरे एवढी भारी ही..."
" मग दादाच्या हाताला चवच लय भारी हाय आव..." वीर म्हणाला . पाणीपुरी खाऊन तिथून दोघी बाहेर निघाले. गाडीजवळ येऊन उभे राहिले.
" क्रांती थँक्यू बर का." वीर म्हणाला.
थँक्यू तर मी म्हणायला पाहिजे तुम्हाला माझं म्हणणं ऐकून तर घेतलं आता फक्त आबांबर बोला म्हणजे झाल." क्रांती
"त्याची काळजी नका करू मी बघतो काय करायचं ते चला सोडतो मी तुम्हाला आता." वीर
"एक सांगू मी जाईन आता माझी मी, तुम्ही जा..." क्रांती
" असं काय करताय मला त्याच रस्त्यावरून जायचे मी सोडतो तुम्हाला.."
"वीर हेच लई केले तुम्ही माझ्यासाठी, जाईन मी" क्रांती जायला निघाली.
"अर्ध्यातून हात नाही सोडणार असा जिथून आणले तिथे परत सोडणारच, अजून परक म्हणताय म्हणजे तुम्ही मला," वीर ने तिचा हात पकडला.
"खरं सांगू का मला अजूनही कळत नाही मी काय कराव माझं वय लहाने , लग्न करणं हे आत्ताच झेपत नाही , मला मला करिअर करायचे. वाट वेगळी असली तरी मला हेच करायचे आणि त्यात माझ्या नवऱ्याची मला साथ असेल तर मी अजून लय पुढे जाईन वीर..."क्रांती
"व्हय मला माहितीये म्हणूनच म्हणतोय एकदा बोलतो मग तुम्हाला काय घ्यायचा घ्या मी तुम्हाला... दोन महिन्यात ... अजून आपल्याकडे दोन महिने पण नाही राहिले, थोडेच दिवस हाय आपल्याकडे तुम्ही तुमचा निर्णय घ्यायला रिकामे... पण मी कुठे कमी पडणार नाय हे आधीच सांगून ठेवतो. चला बसा." गाडीत वीर ने क्रांतीला गाडीचा दरवाजा उघडून दिला.
क्रांती शांतपणे गाडीत बसली खरं तर तिला मनापासून परत एकदा आभार मानायचे होते. त्याच्या नजरेत तिला खरं प्रेम दिसत होत, "हा पोरगा बोलतो तसा हाय का?" ह्याचा प्रश्न मोठा पडला होता तिला ती मनातल्या मनातच बोलत होती. " ह्यांनी उचललं मला तेव्हा काय झालं मला ? मला कुठले पोराचा स्पर्श नाय झाला पण यांनी उचलल्यावर काहीतरी वेगळीच शिरशिरी आली अंगात."
वीरला जणू तिच्या मनातलं सगळं कळतच होतं.
" क्रांती मी उचलत तुम्हाला पण माफ करा बरं माझ्या मनात काही असं वाईट नव्हतं, डोळे बंद करायला लावले आणि तुम्ही पडला असता म्हणून असं वाटलं ते उचलून घ्याव तुम्हाला, राग आला असेल तर खरंच माफ करा मला" वीर म्हणाला क्रांतीने नजर खाली केली आणि परत मनातच म्हणाली.
" ह्याला काय मनातलं कळतं काय सगळं मला मनातलं..."
"नाही कळत पण तरी असं वाटतं तुम्ही त्याचा विचार करत असाल म्हणून म्हटलं, की माझ्या मनात काय नव्हतं."
रस्त्यान जाताना एक दुकान दिसलं आणि त्याला असं वाटलं की आज पहिल्यांदाच भेटलो एखादी साडी क्रांतीला घेतली तर पण त्याला वाटलं की क्रांतीला अजिबात नाही आवडणार मी असं परत परत गिफ्ट केलेल म्हणून त्याने विचार झटकला पण लावलेली साडी मध्ये त्याला क्रांती दिसत होती. वीर ने विचारलं "क्रांती ही साडी कशी वाटती तुम्हाला?" क्रांतीला काय उत्तर द्यावं आहे कळत नव्हतं. तिने एक वेळ त्यासाठी कड बघितले आणि म्हटले
"हो छान आहे की..."
वीरने स्पष्टच विचारलं," घ्यायची का मग तुम्हाला?"
"मला...? नको थोडे दिवस थांबा, मला वेळ द्या ,ठीक होऊ द्यात, माझ्या मनाने एकदा तुम्हाला मान्य करू द्यात, मग घ्या माझ्यासाठी साडी. वीर शांत बसला त्याचं मन दुखावलेलं क्रांतीला समजलं. " वीर वाईट वाटून घेऊ नका खरंच मला अजून कळत नाहीये की मी काय करती.
" काय हकरत नाही क्रांती...तुम्ही एकदा हो म्हण ना मग साड्या काय दुकानात विकत घेईन की .." क्रांतीला वीरच्या बोलण्याचे हसू लागलं ती हसायला लागली.
" वीर मला तुमचा स्वभावच कळत नाही एकीकडे ती पोरगी स्वप्नाली तुमच्या मागे लागली आहे आणि तुम्ही स्वप्न माझी बघत हाय, पोरगी तुम्हाला अजून हो सुद्धा म्हटली नाही तिच्यावर तुमचं किती प्रेम आहे हे मला समजते,असं नाही कि मुद्दाम वागती तुमच्याशी अस, एवढा वेळ दिलाय आता थोडा वेळ द्या वीरने गाडी स्टार्ट केली आणि पुढे निघाला.
"क्रांती मी तुम्हाला उद्यापर्यंत कळवतो जे काय असेल ते मग ठरवा तुम्ही काय करायचं काय नाही ते, तुमच्या सगळे निर्णय मला मान्य हायत." घरापाशी गाडी थांबली. तिने दरवाजा उघडला गेली आणि धडपडणार तोच वीर गाडीतून उतरला आणि तिला पकडलं. "
सारखं काय पडता ? आत्ता लागला असत तुम्हाला." वीरच्या बोलण्याकडे तिचं लक्षच नव्हतं त्याने पकडलेल्या त्याच्या कमरेचा स्पर्श तिला हवाहवासा वाटत होता. तेवढयात चिनू धावत बाहेर आली आणि दोघांकडे बघितलं तर तिच्या नजरेत पूर्णपणे हरवला होता आणि क्रांती सुद्धा त्याच्या नजरेत दोघांनाही कळत नव्हतं की काय होतंय चिनू एकदम शांत बघत होती दोघांचं प्रेम, हे प्रेमात पडतायेत नक्की... हे तिला कळत होतं. तिला असं वाटत होतं यांना कोणी बघू नये हे असेच रहाव. एकमेकांचे प्रेम समजाव यांना चिनू शांत बसली.
तेवढ्यात आई ओरडत बाहेर आली.
" गप्प बस आई..." आईने समोर बघितलं. जावई आणि पोरीला बघून भारी वाटल मला असं वाटलं की हे दोघांची जोडी अशीच राहावी. वीरच्या लक्षात आला आपल्याला कोणीतरी बघतय म्हणून त्यांनी सावरलं आणि दिला तसेच उचलून सरळ केल. त्याच्या डोळ्यात हरवलेली होती क्रांतीला कळत नव्हतं.
" हे आयुष्यातलं पहिलं प्रेम इतक भारी असतं मी त्याच्या नजरेत हरवली ती हरवली असे तिच्या डोळ्यासमोर चुटकी वाजवली आणि दिला जाग केल. चिनू पळत आली.
.
"आहा ! काय भारी होत हे सगळं, आपल्याला आवडलं.... असच रोज फिरायला जा, लवकर तुमच्या प्रेमात पडल आईने तिच्याकडे बघितलं आणि हसली क्रांती पटकन आत गेली. तिने वीरला समोर आला आणि आशाच्या पाया पडला. "आत मध्ये या चला चहा घेऊन जा," आशा म्हणाली.
" नाय उशीर झाला मला घरी गेलं पाहिजे."
" आता असं कस दाजी आता चहा घेऊन गेलं पाहिजे गोडाला सुरुवात झाली आता..." चिनू म्हणाली आणि वीरचा हात धरून तिला घेऊन गेली.
क्रांती आत मध्ये उभी होती आईने सांगितलं "
क्रांती जावई बापुंसाठी चहा ठेव बरं..." क्रांतीने चहा ठेवला. आणि चिनूला हाक मारली " घेऊन जातेस का तेवढा चहा तू?" नाही... म्हणाली स्पष्ट "तू ठेवलास ना तू घेऊन जा"
क्रांती चहा घेऊन केली पण तिला वीरच्या त्या नजरेला नजर देत येत नव्हती.
तिची घालमेल कळत होतं होता चहा पीत होता झाला एकदम गोड वीर ये चहा प्यायला आणि निघाला.
"येतो मी..." गाडी स्टार्ट केली क्रांती त्याला आईच्या मागून बघत होती निघताना तेवढ्यात चिनू आली म्हणाली, "काय ताई पडलीस की नाही दाजींच्या प्रेमात...?"
" अजिबात नाही." क्रांतीला हे मान्यच नव्हतं.
काहीतरी होतं हे नक्की होतं पण हे प्रेम आहे की नाही हे तिला कळत नव्हतं ती म्हणाली, "गप्प चीने थांब जरा..." मला कळत नाहीये नक्की प्रेम होतं की नव्हतं ते क्रांती आत मध्ये गेली. तेवढ्यात फोन वाजला चा फोन आला होता हॅलो क्रांती म्हणाली.
" हॅलो..." वीर
"असं का बघत होता माझ्याकड? क्रांती काहीच बोलत नव्हती. "तुम्ही काय बोलला नाहीत ना तरी आज तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचल्या, क्रांती तुम्ही नाही बोलला तरी चालल पण आज मी सुखावलो. क्रांती आजचा माझा दिवस लई खास होता." क्रांती लालबुंद झाली होती. वीरला समजत होतं की क्रांति जवळजवळ आपल्या प्रेमात पडायला लागली पण त्याला दुसरीकडे हे पण टेन्शन होतं की आबा या सगळ्याला परमिशन देतील का? जाऊन बोललंच पाहिजे. फोन ठेवला. क्रांती मात्र इकडे तिला काय कराव तिला काही कळत नव्हते. तिच्या छातीची धडधड वाढत होती. यापूर्वी कधीच नव्हत झालं , "आता मला असं का होतंय? तिला काहीच कळत नव्हतं खरंच मी वीरच्या प्रेमात पडायला लागली तर मला आवडायला लागलाय माहित नाही, त्याचं वागणं, बोलणं सामान्य माणसासारखा आणि छान वाटलं मला म्हणजे काय म्हणजे मी प्रेमात पडली...?वीरच्या...?
क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत