भाग २
संजना ला तर आदित्य आवडला होता. पण औ
तिला वाटले होते ह्यांचा बिझनेस आहे म्हटल्यावर त्याची आई स्वतः हून च नकार देईल. पण त्या बोलल्या की चालेल आम्हाला. तू कर जॉब. संजना विचार करू लागली आता तर नाही म्हणायला काही चान्सच नव्हता. अंकित ने त्याला मोजके पण महत्त्वाचे प्रश्न विचारले. त्या दोघांना एकमेकांशी थोडे बोलता यावे म्हणून अंकित च संजना ला म्हणाला की आदित्य ला घर दाखव . संजना त्याला बेडरूम मध्ये घेऊन गेली. आदित्य गप्प च होता. संजना नेच मग बोलायला सुरुवात केली.
संजना,"हाय आदित्य "
आदित्य, " हाय "
संजना, " तुम्हाला मला काही विचारायच नाही का? "
आदित्य, " नाही."
संजना, " ठिक आहे . जाऊया का बाहेर ?
तो काही जास्त बोलला नाही. संजना ला वाटलं तो कमी बोलत असेल. दोघेही बाहेर आले. नंतर सांगू च आमचा निर्णय असं म्हणून आदित्य ची मम्मा आणि ते सगळे जायला निघाले.
ते गेले तसे संजना चे नातेवाईक पण जायला निघाले. अंकित मात्र थांबला. तो संजना च्या आईला म्हणाला, " काकी मुलगा चांगला आहे. बघू चौकशी करून बघतो.
अंकित होता म्हणून ती थोडं निर्धास्त होती.
संजना ची आई खूप खूष होती. आईच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून संजना ला बरं वाटलं बाबा गेल्यानंतर ती फार कमी हसायची . हसली तरी फॉरमॅलिटी म्हणून हसायची. पण आज तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून संजना ला असं वाटत होते की, हा आनंद नेहमी असाच राहावा. ती खूप खूष होती.
आईच्या चेहऱ्यावर चा आनंद बघून संजना पण खूप खूष झाली. आई जेवणाचं बघायला गेली. संजना अंकित ला म्हणाली, " दादा त्याने मला काही च प्रश्न विचारले नाहीत. तो खुप कमी बोलतो. "
अंकित, " अगं असतो एखाद्या चा स्वभाव. पुरुष काही मुलींसारखे बडबडे नसतात. मुलींची आपली सतत बडबड चालू असते. " अंकित तिला चिडवत म्हणाला.
संजना पण म्हणाली, " हो हो पुरुष जसे काही तोंडाला टाळं लावून च बसतात. अगदी गुड बॉय सारखे. "
बहिण भावाचा असा संवाद चालू च होता तेवढ्यात आई त्यांना जेवायला बोलवायला आली. आईच्या हातचं जेवण त्याला खूप आवडायचं. जेवून झाल्यावर अंकीत त्याच्या घरी निघाला. तेव्हा सरीता ताई त्याला म्हणाल्या "अंकीत तु आहेस आमच्या बरोबर म्हणून काही टेन्शन नाही. "
अंकीत, " अगं काकी मी नेहमी च असणार आहे तुमच्या बरोबर. "
संजना दुसऱ्या दिवशी ची ऑफिस ला जायची तयारी करत होती.
आई, "संजू चल ग नाश्ता थंड होईल. "
संजना, " आलेच "
संजना नाश्ता करायला आली तेव्हा तीने बघितले की आईने तिच्या आवडीचे समोसे बनवले होते.
संजना, " आई काय गं सगळ माझ्या आवडीचे बनवते आहे स हल्ली. "
आई, " जसं काही ह्याच्या आधी कधी तुझ्या साठी बनवलचं नाही. "
संजना घाईघाईने नाश्ता करते आणि ऑफिस ला जायला निघते. आईला तिच्या शी काहीतरी बोलायचे असते पण तिची घाई बघून त्या काहीच बोलत नाहीत. संजना त्यांची एकुलती एक मुलगी होती. त्यामुळे त्या जिवंत असेपर्यंत तीचं सगळं व्यवस्थित झालेल त्यांना बघायचं होते. त्यांचं काही जास्त वय नव्हतं पण हल्ली च्या जगात मरण कधी पण येऊ शकते म्हणून त्यांना असे वाटत होते. संजना ला योग्य जोडीदार मिळावा असे त्यांना वाटत होते.
संध्याकाळी संजना आल्यावर तिचा मूड बघून तिच्या कडे त्यांनी विषय काढला.
सरीता ताई, " संजू कसा वाटला तुला मुलगा? "
संजना, " जसे इतर मुलं असतात तसा"
सरीता ताई,"मी सिरियसली विचारते आहे तुला आवडला का मुलगा? "
संजना, " दिसायला तर छान आहे च पण पर्सनॅलिटी पण छान आहे. मला आवडला आहे. अगं हौ अंकीत चा फोन आला होता तो पण म्हणाला की, मुलगा चांगला आहे.
सरीता ताई, " त्यांचा फोन आला तर त्यांना होकार कळवू ना? "
संजना, " हो कळव"
चार दिवसांनी
दुपारी सरीता ताई ना आदित्य च्या आईचा म्हणजेच विणा ताईंचा फोन आला. त्यांनी त्यांचा होकार असल्याचे कळवले.
विणा ताई," हेलो, सरीता ताई मी विणा बोलतेय आदित्य ची आई. "
सरीता ताई, " होहो ओळखलं नंबर सेव्ह करून ठेवला आहे तुमचा. बोलाना काय म्हणत होतात. "
विणा ताई, " आदित्य ला संजना आवडली आहे त्याचा होकार आहे या लग्नाला. संजना ला आवडला आहे का आदित्य ? "
सरीता ताई, " हो हो तिच्या कडून पण होकार आहे
विणा ताई, " मग लवकरच भेटून पुढची बोलणी करू . आदित्य शी बोलून सांगते मी तुम्हांला तुम्ही पण संजना शी बोलून घ्या. दोघांना पण सोईस्कर होईल असा दिवस बघू. रविवारी वैगेरे भेटू. "
सरीता ताई, " हो हो मी बोलते संजना शी. "
विणा ताई, " मला असं वाटतं होतं की पुढची बोलणी आमच्या घरीच करू. म्हणजे त्या निमित्ताने तुम्ही आमचं घर तरी बघालं. "
सरीता ताई, " हो चालेल. "
विणा ताई, " ठिक आहे फोन ठेवते. "
सरीता ताई, " बरं"
सरीता ताईंनी देवापुढे साखर ठेवली. मनोमन देवाला प्रार्थना केली माझ्या लेकीचा संसार चांगला होऊ दे. "
कधी एकदा संजना ला गोड बातमी देते आहे असं त्यांना झालं होतं. संजना घरी आली तेव्हा त्या शांतपणे बसल्या होत्या. चेहऱ्यावर प्रसन्न भाव पसरले होते. त्यांना असं बघून ती खर तर काय समजायचे ते समजून गेली. पण तसं चेहऱ्यावर काहीच न दाखवता ती ने मुद्दाम विषय काढला .
संजना, " आई काय गं काय झालं? "
सरीता ताई, " काही नाही गं सहजच आपलं"
संजना, " असं कसं काही नाही. काहीतरी तर आहे जे तूला मला सांगायचे आहे पण तू ला कसं सांगायच ते कळत नाही असं काही आहे का? "
सरीता ताई, " संजना मुला कडच्या लोकांचा होकार आलाय. "
संजना नाचायची ॲक्टिंग करत आईला म्हणाली, " काय सांगतेस काय आई. किती गोड बातमी आहे ना. "
सरीता ताई समजल्या संजना आपल्या ला चिडवत आहे.
सरीता ताई, " संजू असा बालिश पणा सासरी नाही करायचा बर का? "
पण संजना त्यावर काही बोलली नाही. तीचे डोळे पाण्याने भरून आले. ते बघून सरीता ताईंनी तिला कुशीत घेतलं.
सरीता ताई, " काय झालं गं माझं बाळं असं का रडायला लागलं. "
संजना, " आई तू खुप दुष्ट आहेस. आपल्या बाळाला दुसऱ्या च्या घरी पाठवायची घाई झाली आहे तुला. "
सरीता, " काय करणार पोरी. बाईचा जन्म च असा असतो. आपल्या लेकराला ५ मिनिटे पण नजरे आड होऊ न देणाऱ्या आईला आपली मुलगी कायमची कोणाच्या तरी हवाली करावी लागते. तीच्या मनाला किती यातना होतात ते शब्दात नाही सांगता येत. पण हे सगळं त्या बाळाच्या सुखासाठी असतं गं. ही जगाची रीतच आहे."
संजना, " कोणी काढल्या ग या रिती आई? मुलीलाच का जावं लागतं तिच्या सासरी मुलगा का नाही येत. "
सरीता ताईंना कळेना संजना ला कसं समजवावं.
हा भाग तुम्हाला कसा वाटला ते आपल्या प्रतिक्रियेतून नक्की सांगा. हा भाग तुम्हाला आवडला असेल तर स्टिकर्स द्यायला विसरु नका.