Kouff ki Raat - 13 in Marathi Horror Stories by jay zom books and stories PDF | खौफ की रात - भाग १३

The Author
Featured Books
Categories
Share

खौफ की रात - भाग १३

कोहराम कब्रस्तान भाग 13 ( रात्र अवसेची, चाहुल मृत्युची..

लेखक -जयेश झोमटे



महत्वाच संदेश- सदर कथेत उच्चार केलेल्या गावाच नाव आणि तिथली परिस्थिती हे सर्वकाही काल्पनिक असून .. वाचकांनी ही कथा ,त्यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत सर्वच्या सर्वच परिस्थिती काल्पनिक नजरेने पाहावी- आणी

फक्त मनोरंजन व्हावा ह्या हेतूने कथा वाचावीत🙏

ह्या कथेत लेखकाने गरज असल्याने भूत,प्रेत, अंधश्रद्धा दाखवली आहे - पन, लेखकाचा ह्या कथेवाटे समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही. जर कोणी लेखकाला पर्सनल मेसेज करून आक्षेपार्ह मेसेज आणि वागणूक दिली- तर कायद्यानूसार कारवाई करून कडक, एक्शन घेतली जाईल!

सदर कथेत शुद्धलेखनाच्या चुका असू शकतात तर कृपया करून लेखकास समजून घ्या !

लेखक चुका सुधारण्याचा प्रयत्न करत आहे ..

धन्यवाद..





भाग 13

कथा सुरु ...

रामपुर गावचा तांबड्या मातीचा रस्ता संपताच , पुढे एक हायवे होत.

सरळमार्गी हायवे..

हायवेच्या दोन्ही तर्फे घनदाट जंगल होत...
आजच्या अमुश्याच्या रात्री पुर्णत जंगलातली झाडे
काळी निळी जहरीली सर्पासारखी फणा काढून जागेवर उभी होती.

झाडांच्या अवतीभवती मंडराणारा थंड विषारी धुका फिरत होता.

चार फुट उंचीच्या झुडपांवरच्या पानांवए थंड धुक्याने बाष्प साचल होत...

ह्याच श्रापीत जंगलात , हायवेच्या रस्त्या बाजुलाच कोहराम कब्रस्तान स्थित होत.

कोहराम कब्रस्तानच दोन झापांच आठ फुट उंच आणी आठ फुट रुंद गेट दिसत होत.

गेटला मोठ मोठ्या सळ्या होत्या,ज्या की गंजुन
लाल - चौकलेटी झाल्या होत्या..

गेटमधुन

ती भयाण जागा , मृत्युचा जबडा उघडून बसली आहे अस वाटत होत.

सावजाची वाट पाहत होत.. आणि आज सावज मिळणार ही होत ना ? हे खर होत.


कोहराम कब्रस्तानाला इंग्रजांनी भारत स्वतंत्र होण्यापुर्वी बांधल होत, ज्याकारणाने कब्रस्तानच बांधकाम जुन होत ...

मोठ-मोठ्या काळ्या दगडांचा वापर करुन कब्रस्तानाला चौहीदिशेने भलामोठ्ठा लांबच्या -लांब दिसणारा,

काळ्या कपड्यासारखा कंपाऊंड घातला होता ...

एकप्रकारे इंग्रजांनी तो कंपाऊंड बनवल होत ते चांगलंच केल होत ...

नाहीतर रात्री अपरात्री रस्त्यावरून जाणा-या
वाटसरुंनान जाणे काय काय दिसल असतं ?


अंधा-या रात्री पांढ-या कापडातले ते इंग्रज आत्मे , आपल्या प्रेताड थंड पांडूरक्या चेह-यांनी आपल्याकडे एकटक पाहतांना दिसले असते !

कोणी हात वर करून झपाटण्यासाठी आपल्याकडे बोलावल असतं !

गाडी समोर येऊन अपघात घडवले असते .

चेष्टा-चकवा , काय काऊ दाखवल असत त्या.. अतृप्त मेलेल्या आत्म्यांनी , ते देवालाच ठावूक !


ह्यावरून इतकच कळतं की दहा फुट उंचीचा तो कंपाऊड खरच जर बांधला नसता ,तर ?

किती भयाण प्रश्ण ? विचारच करवत नाही!

कब्रस्तानाच्या आत पांढुरक्या कबरांवरून पांढरट धुक वाहत होत.

आजुबाजुला असलेल्या हिरवी झाडांवरची पाने सळसळत होती. जणु काही बसल होत त्यावर ?
किंवा त्या सजीव झाडाचा सुद्धा , त्या कब्रस्तानातल
ते भयान द्रुश्य पाहून थरकाप उडत होता !

असो पुढे पाहूयात.

गेटच अस होत , की जो कब्रस्ताना आतील ते भयानक द्र्ष्य वाटसरुंन दिसण्यापासुन रोखत होता. नाहीतर त्या लांबच्या पसरलेल्या लहान -मोठ्या कबरी पाहुन मनात कशी भीती दाटुन यायची.

पन पाहणा-याच्या मनात एक प्रश्ण यायचांच की नक्की ह्या मोठ-मोठ्या शवपेट्यांमध्ये ब्रिटिशांनी मांणसच पुरली होती का?

की काही वेगळच सैतानासारख काहीबाही पुरुन गेले होते?

जे आता कलियुगात अखंड निद्रेतुन उठुन, आत येणा-याचा फडशा पाडणार होते.? कब्रस्तानात आत घुसण्यासाठी इंग्रजांनी कंपाउंड मधोमध एक मार्ग ठेवलेला , त्या मार्गावर एक दोन झापांमध्ये विभागलेला भलामोठ्ठा लोखंडी गेट ठेवलेला. आणि आता ह्याक्षणी
त्या भल्यामोठ्या लोखंडी गेटसमोर एक टूव्हीलर येऊण थांबली.

भुर्र भुर्र भुर्र भुर्र आवाज करत , गाडीच इंजिन सुरु होत.

हेडलाईटचा पिवळा उजेड गेटच्या सळयांमधुन कब्रस्तानात घुसला होता.. आणि आत असलेल्या कबरींवर पडला होता.

पन तो प्रकाश जस आत घुसला होता .. तेवढ्यावेळेत..त्या कबरींजवळून काहीतरी वेगाने निसटल होत - बाजुला झाल होत.

ज्याची खबर कोणालाच नव्हती !

टूव्हीलरवर ड्राइव्हसीटवर बाल्या बसला होता आणि मागे पांडूबुवा हातात कूदळ घेऊन बसला होता.

आपण कब्रस्ताना जवळ पोहचलो आहोत ! ही भावना ,तो विचार , करून त्या दोघांच भीतीने पाणी पाणी झाल होत.

" प..प..पांड्या!" बाल्याने एक भीत्री नजर , कोहराम कब्रस्तानच्या आठफुट उंच गेटमधून पुढे टाकली !

गाडीच्या पिवळसर उजेडाने गेटची मोठी सावली
तैयार झालेली, आणी आत असलेल्या कबरांवर चिकटून बसली होती..

बाल्याने काफ-या स्वरात पांडूला आवाज दिल होत. पांडूने गाडीवर बसूनच होकारार्थी हूंकार भरला.

" हं..जी!"

" हं..जी कय? उतर हारामच्या ! इथ बसून खड्डा तैयार व्हील का आत ?" बाल्या एकदम खेकसला.


" जी..जी..!" म्हंणत पांडूबूवा खाली उतरला.

पांडूबुवाच्या हातात कुदल होती,जी त्याने दोन्ही हातांनी गच्च पकडलेली.

गेटबाहेर उभे राहून ते दोघे आतील दृष्य पाहत होते.शेकडोने मेलेल्या माणसांच्या वेग-वेगल्या प्रकारच्या कब्र होत्या,
गरीब प्रेतांची लहान लाकडाची सफेद कबर होती ,

तर श्रीमंत लोकांच्या कबरी अक्षरक्ष सात -आठ फुट इतक्या मोठ्या होत्या.

टाईल्सच्या त्या कबरांवर मेलेल्या
मांणसांची नाव, जन्मतारीख ते मृत्यु दिनांक दिसून येत होती.

रेंचो डीसोजा, मायकल रेंन्स, टोबे मार्क्स, मीचल जैकसन, अशा विविध मृतांची नाव आणि जन्मापासुन ते मृत्यू दिनांकाची संख्या लिहिली होती. लांब-लांब पर्यंत जिकडे पाहाव तिक्डे प्रेतांच्या कब्र दिसुन येत होत्या.


" ए पांडू? !" बाल्याने गाडीवर बसूनच हाक दिली ,

पांडूने हलकेच बाल्याकडे पाहिल.

" जी मालक !" पांडू म्हणाला.

" जा ख..ख..खड्डा खणून टाक !" बाल्याने एक आवंढा गिळला .

त्याची ती भिरभिरती भीत्रि नजर चौहीदिशेना फिरत होती.

अंधारात रातकीड्यांचा आवाज मरण स्पर्शकरीत होत..

थंडावा अंगाला झोंबून आत्मा बाहेर काढत होता .

" म..म..मालक तू .तू.. तुम्ही...?"

पांडूबूवाने आजपर्यंत स्मशानात रात्र-रात्रभर प्रेताला जलेपर्यंत लाकड व्हायली होती, परंतू आज न जाणे का! त्याचे हात पाय थर-थर काफत होते.

अंगावर शहारे येत होते.

जर काही अनपेक्षित दिसल तदभीतीने त्याची बोबडी वळण्याची वेळ आली येणार होती!

" मी..मी .मी....!" बाळ्या काफ-या स्वरात म्हंणाला.

परंतु पुढच्याक्षणाला त्याचा बोलण्याचा पवित्रा एकदम बदल्ला

" ए पांड्या प..प पैसे दिलेत ना तुला ? मग आता काय काम पन माझ्याकडुन करुन घेतो का? !"
बाल्या खेकसत म्हणाला.

त्याच्या ह्या वाक्यावर पांडुबूवाने फक्त
" माफ करा मालक" म्हंणत डोक हलवल.

पांडूबूवाने भीत-भीतच त्या भल्यामोठ्या काळ्या लोख्ंडी गेटकडे पाहून आपली पावले वाढवली.

त्याच्या पायातल्या निळ्या चपलांचा चालतांना
चट,चट आवाज होत- होता.

वातावरणात गुंजत होता.

पाच सहा पावलांत तो त्या गेटजवळ पोहचला.

मागुन बाल्या उभ राहून पांडूबुवाच्या हालचाळी एकटक भेदरलेल्या चेह-याने पाहत होता.

बाळ्याची भीतिने हवा लीक झाली होती..
पाहण्या शिवाय अजुन तो काही करणार तर ते म्हंणजे राम नाम चा जप..!

पांडूबुवाने गेटला कुलुप लावलेल आहे की नाही ह्याची खात्री करुन घेतली , तर त्याला अस दिसल ..की

गेटला कुलुप वगेरे काही लावल नव्हत, बस्स कडी घातली होती.

पांडूने एक हात वाढवुन कडी खोलायला सुरुवात केली...
न जाणे कित्येक महिने ,की वर्ष उलटून गेल्या नंतर ती कडी खोलली जात होती?

की त्या कडीचा कुई,कुई,कुई आवाज संपुर्णत गुंजत होता...

थंड वातावरणातली हवा तो आवाज, कब्रस्तानात,आत पसरलेल्या धुक्यातून, झाडांच्या फांद्यांवरून आनंदात हिंडत फिरत आपल्या समवेत नेहत होती.

' चक'आआज करत

कडी खोल्ली गेली.

तस पांडूने तो गंज लागलेला लोखंडी गेट एक धक्का देत उघडला , धक्का देताच गंजलेल्या गेटचे दोन्ही फाटक आतल्या दिशेने पुढे सरसावले, तसा गेटचा कर,करण्याचा जो आवाज झाला, विचारूच नका.

इकडे गेट उघडताच

बाल्याने डायरेक्ट गाडीवरून उडी घेतली.. आणि दोन पायांवरबसून सीटवरून डोक वर काढत वटारलेल्याl डोळ्यांनी , पांडूला आत जातांना पाहू लागला.

पांडूच्या एका धक्क्याने

पुढील दोन्ही झाप आपोआप पुढे-पुढे जात उघडल्या गेल्या... जणू पांडूच स्वागत झाल होत?

शिका-याने सावजाच स्वागत केल होत.

पांडूबुवाने एकवेळ मागे वळुन पाहिल.
तसा बाल्या सीटमागून खाडकन उठला !
पांड्या आपल्याला भित्रा म्हंणेल ह्या लज्जास्पद कारणाने त्याचा अहंकार दुखावला गेला असता ना !

बाल्या कसतरीच गाळात हसत पांडूकडे पाहत होता. जणू काही झालंच नाही अस , पांडू कितीतरी वेळ तसंच बाल्याकडे पाहत होता .

" आर जा की लेका ? मला गाड़तो का आत ?"

बाल्या पुन्हा खेकसला .

बाल्या ने दोन्ही हात विशीष्ट प्रकारे हालवत पुढे जा-जा म्हणुन त्या खुणावल .

तसा पांडूबुवाने माण हलवत होकार दर्शवत त्याच्या कडे पाहिल मग पुन्हा उघडलेल्या गेटमधुन पुढे पाहत एक पाऊल हळुच कब्रस्तानात ठेवला.
..की तेवढ्यात मागुन एक......





क्रमश :