□□□□□□□□□□□□□□□□□□□
सीजन 1
. ...भाग 12
.लेखक :जयेश झोमटे..
सदर कथा काल्पनिक आहे !
कथेत भुत ,प्रेत अमानविय शक्तिंचे उल्लेख आहे .
कथेत अंधश्रद्धा आहे परंतू लेखक तिला खतपाणी घालत नाही ... गरज असल्याने तिच वापर केल गेल आहे कृपया भयरसिकांनी कथा आन्ंद मिळाव ह्या उद्दीष्टाने वाचावी...
आज वर्षाचा शेवटचा दिवस होता, त्यानिमीत्ताने सोपान, निळ्या, अमोल असे रामपूर गावातली ही तिघे मुल पार्टीकरण्यासाठी एका ढाब्यावर निघाले होते.
हाईवेवरून गाडी वेगाने धावत होती, हाइवेच्या दोन्ही बाजुला जंगली भाग होता.
काहीवेळातच टूव्हीलर गाडी रामपुरच्या एका हायवेबाजुला असलेल्या ढाब्यावर थांबली.
प्रथम गाडीवरून अमोल उतरला, उतरताच त्याने आपली हाफ पेंट जराशी खाली खेचली.
त्याची नेहमीचीच स्टाईल होती ही.
अमोल उतरताच निळचंद्र उतरला , वाढलेले केस स्टाईलने मागे सारले!
गाडीची चावी काढुन घेत सोपानने इंजिन ब्ंद केल तस पुढची हेडलाईट आणि तो गाडीचा आवाज ब्ंद झाला.
ढाब्यापासुन थोडदूर हे तिघे उभे होते, तिघांच्याही पावलांखाली तपकीरी रंगाची वाळू होती.
तिघांनीही एकदमच ढाब्याकडे पाहिल...
ढ़ाबा म्हंणायला काही फाईव्ह स्टार हॉटेल नव्हता, पन छान होता.
रस्त्यावरून येणा-या जाणा-या वाटसरुंच लक्ष ढ़ाब्याकडे खेचल जाव, ह्यासाठी एक मोठा चौकोनी आकाराचा फळा ढाब्यापुढे लावला होता.
त्या पोस्टरवर ढाब्याच नाव रंगीबेरंगी लाईटने सजवलेली दिसत होत.
जय माता दी ढाबा , नावाला लाईटने सजवल होत ज्याने ते नाव , रस्त्यावरून कितीही वेगाने गाडी गेली तरी ड्राईव्हरला सहजच दिसुन येत असे .
नाव पाहताच समोरच्याला भुक जाणवायची म्हंणूनच की काय चार पाच गाड्या तिथे उभे होत्या.
ढाब्या बाजुलाच एक दहा x दहा चा छोठासा बार होता ...
बारच्या वर ओढलेल्या शटरवर सुद्धा - ढाब्या प्रमाणेच रंगीबेरंगी लाईटने नाव कोरल होत
पिले बार - जिथे सर्वप्रकारची दारु मिळत होती.
दिवाळीत ज्याप्रकारे रंगीबेरंगी लाईट ,आकाश क्ंदिल लावून घर सजवतात तसा ढाबा सजवला होता!
ढाब्याच्या चारही दिशेना छोठ-मोठ्या दिव्यांचा आणी फेशनेबल लाईटचा झगमगाट दिसुन येत होत पाहून मन प्रसन्न होत-होत.
आजुबाजुच्या वातावरणात चायनिजचा खमंग वास दरवळत होता,
तिथे येणारा प्रत्येकजण तो वास अधाशासारखा नाकपुडया फुगवून फुगवून गिळंकृत करत होता.
ह्या तिघांचीही म्हंणायला काही और नव्हत .
.तिघेही त्या चायनीज बनवणा-या बारीक डोळ्यांच्या चिनी मांणसाकडे टक लावून पाहत होते..
तिघांच्याही तोंडाला सुटलेल पाणी खाली पडत होत..
निळचंद्रने शर्टाच्या बाहीनेआपली लाळ पुसली
आणी पटकन म्हंणाला.
" चला सोपान शेट!" निळ्या सोपानला पुढे ढकलत म्हणाला.
शेट हे वाक्य ऐकून सोपानने कॉलर ताठ केली.. एका भाई सारखा ह्या तिघांपुढे चालत जाऊ लागला, त्याच्या मागोमाग हे दोघे येऊ लागले.
ढाब्याच्या एका बाजुला खुपसा-या लाल रंगाच्या टेबल आणि प्लास्टीकच्या खुर्च्या ठेवलेल्या दिसत होत्या.
तीन- चार टेबलांवर ग्राहक बसलेले दिसत होते.
खाण्याचा पुरेपुर आनंद घेत होते.
हे तिघे सुद्धा एका टेबलापाशी पोहचले.. एक-एक खुर्ची ओढुन मग त्यात आपल बस्तान मांडून बसले .
" ए वेटर?.....ए वेटर!" अमोल खुर्चीत बसला आणि ते दोघे बसणार की तोच असा काही मोठ्याने ओरडला, की त्या दोघांच्याही कानाचे पडदे फाटले गेले .
" अबे ए घोड्या?" निळ्याने अमोलच्या डोक्यावर एक टपली मारली, त्यासरशी डोके चोलतच अमोलने निळ्याकडे पाहिल व म्हणाला.
" काय झाल बे ? कशाला मारतो ?"
" अबे साल्या हलकट, फुकट खाव -लाज नाही वाटत तुला सोपान शेट ओर्डर देतील ना !"
निळ्याच हे वाक्य ऐकुन सोपानची छाती अशी काही फुगली की तो एकटक पुढे पाहून गाळात हसू लागला.
तेव्हाच त्याक्षणी निळ्याने गपचुप अमोलला पटकन डोळा मारल व उच्चारला.
" सोपान शेट ऑर्डर देताय ना ?"
निळ्याचा निर्मल संथ पाण्यासारखा आवाज.
निळ्याच्या वाक्यावर सोपानने लागलीच फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये आल्यासारख एक हात वर केल ..आनी7टिचकी वाजवली .
" वेटर..!"त्याच्या त्या हाकेवर कोणीच आल नाही.
तसा त्याचा अपमान झाला होता- पन ते त्याने दाखवल नाही.
काहीक्षण थांबुन त्याने पुन्हा दुसरी हाक दिली
" . वेटर ?"
दुस-या हाकेला, एक माणूस त्या तिघांसमोर भुतासारख हाजीर झाला.
की काहीक्षण तिघेही दचकलेच.
त्या वेटरच्या अंगावर एक सफेद रंगाची फाटलेली टी-शर्ट होती, खाली एक बरमुड्यासारखी काळी पेंन्ट होती.
" बोला साहेब काय पाहीजे?
" तो वेटर आपल्या घोग-या आवाजात म्ह्नाला.
त्याचा घोगरा आवाज ऐकुन अमोलने भीतच तोंडात बोट घुसवली ,
परंतू सोपान धीर दाखवत म्ह्नाला.
" तीन प्लेट फुल चायनीज! सहा मसाला लॉलीपॉप , आणी तीन टूबोर्ग , जा !" सोपानने ऑर्डर दिली , तसे तो वेटर निघुन गेला.
काहीवेळ हे तिघे असेच गप्पा मारण्यात बिझी झाले.
ढाब्यावर असलेल्या शेफने लागलीच चायनीज,लॉलीपॉप,रेसिपी अर्ध्यातासात रेडी करुन वेटर मार्फत त्या तिघांकडे सोपवली.
वेटरने दोन पांढ-या रंगाची प्लास्टीकची ताट आणून ती लाल टेबलावर ठेवली .
एका प्लास्टिकच्या ताटात , तीन चायनिजच्या प्लेटस होत्या,
दुस-या ताटात सहा मसाला लॉलीपॉप ,बाजुला लाल रंगाची चटणी असलेली गोल वाटी होती.
वेटर टेबलावर ऑर्डर ठेवून आल्या पावळे निघुन गेला.. ह्या तिघांकडे एक कटाक्ष तरी टाकायला हव होता ना ? पन नाहीच !
आणी ह्या तिघांनाही त्या वेटरशी काय घेण देन होत.
ऑर्डर येताच तिघेही एका अधाशा राक्षसारखे चायनीजचा वास नाकपुडया फुगवून-फुगवून घेऊ लागले.
वेटरने पुन्हा दूसरी फेरी मारली, ह्या वेळेस त्याच्याकडे टूबोर्ग च्या तीन बॉटल होत्या.
ज्या की त्याने टेबलावर ठेवल्या आणि गपचुप पुन्हा निघून गेला.
प्रत्येकाने समोर असलेली एक-एक बॉटल हाती घेतली,झाकण उघडल.
आणि मग
" चियर्स " अस म्हंणत तीन बाटल्या एकमेकांना टच केल्या आणि मग हळुच तोंडाला लावल्या
आणी त्यांच्या आयुष्याची शेवटची पार्टी सुरु झाली.
काहीवेळातच तिघांच्याही टूबोर्ग संपल्या होत्या.
" अरे सोपान शेट टूबोर्ग मध्ये मज्जा नाय राव , एक नाइंटी मागवा ना !"
निळ्याने सोपानला फुल रिस्पेक्ट देत असा काही चण्याच्या झाडावर चढ़ावर चढवल होत..की त्याने पुन्हा एक हाक दिली...
आणि पुढच्याक्षणाला टेबलावर तीन नाइंटी दारुच्या बाटल्या हाजीर झाल्या .
बाटली फोडुन तिघांनीही एक एक करत तोंडाला लावली , चव जराशी कडवट होती..पन तिघांनाही सवय होती.
दारूचा आमळ हळु हळु तिघांच्याही डोक्यात जाऊ लागला...
नशेने मेंदूला मिठी मारायला सुरुवात केली तसा तिघेही पोपटा सारखे उडू लागले.
" अम्या सोप्पान..!" निळ्या बोबड्या स्वरात बोलू लागला.
दारूच्या नशेने आताच सोपान शेटच सोप्पान झाल होत.
" तुम्हाला शांगतो तुम्ही माझे खरे मित्र आहात!"
निल्याच्या वाक्यावर सोपान -अमोल दोघांनी एकमेकांकडे पाहत गाळात हसत मान हलवली.
" नाही नाही मित्र नाही !" निळ्या पूढे बोलू लागला
" भाऊ , सगे सोयरे, नाते वाईक , बहिन भौ , बाप सर्व आहात म्मझे !"
" अरे मामा -क्कका, आत्या; राहीले ना !"
सोपान मध्येच बोबड्या स्वरात म्हंणाला.
" ह्यां , मामा , क्क्क्क..आत्या..लेय चालू मांणस आहेत र्रे, मला नाही आवडत !" निळ्या..
" का ? .का?.."
अमोल ने नंदीबैला सारखी मान हलवत विचारल.
" का ? " निळ्या एकदम हूंदके देऊ लागला..
तस सोपानने त्याच्या पाठीवर गोंजारायला सुरुवात केली..
" एकदक मादरcxत मांणस ही, जमिनीवर डोळा असतो ह्यांचा ! "
" हो..हो ... बलोबर.. बलॉबर..आहे!"
सोपान..
" मित्रांनो मी फक्ट टूम्हाला सांगटो हा , दुषल्या कुणाला शांगू नका हं ....!"
" नाय ...नाय आईशप्प्थ !"
अमोलने गळ्याला हात लावायच्या ऐवजी नाकाल पकडून धरल..
" माझ आवडेवर लेय प्रेम आहे ! आई ल्ब आवडे !"
निळ्याच्या वाक्यावर सोपान - अमोल दोघांनी एकमेकांच्या चेह-याकडे पाहील ..
दोघांचेही चेहरे टमाटरसारखे लाल झाले होते .
" अरे निळ्या !" सोपान बोलू लागला..
" तो चिकाट वाण्या तुला त्याची पोपोर..देइल का रे , महा कंजूस आहे तो ! काल पाच रूपायांची उधारी वर एक कुरकूरे मागितली तर न्हाई बौळळ...मल्ला..
मल्ला..नाय बोलला..सोपान शेटला मना केल त्याने..त्याच्या आई.."
" सोपान पुढे बोलणार तोच अमोलने आपल्या हाताच एक बोट सोपानच्या तोंडावर ठेवल..
" शुश्स्स शुश्श्स ! शिव्या नको..देऊ..सासरा आहे ना निल्याचा ..! नीट..बोल जराक..!"
" हो हो हो ! सॉर्रिं ..सोर्री..!" सोपान जागेवर उभ राहून कान पकडून म्हंंटला. व पुन्हा खाली बसला.
ह्या तिघा बेवड्यांच्या गप्पा चालू असताना अचानक
"साहेब !" अशी हाक आली.
तस त्या तिघांनी स्प्रिंग सारख्या हळणा-या माना त्या दिशेला वळवल्या ज्या दिशेने हाक आली होती.
समोर तोच वेटर उभा होता.
अंगात पांढरट फाटकी बनियान, खाली काळा बरमूडा..
त्याच्या टपो-या डोळ्यानी तो तिघांकडे पाहत होता..तोच
" काय रे ?" निळ्या म्हाता-या सारखा त्या वेटरवर खेकसला..
त्याचा तो आवाज ऐकून वेटरची हवा लीक झाली..
" काय पाहीजे..मगाच पासून ...बगतूय ...
मूडद्यासारख फिरतोय आजुबाजुला...! "
" तुझ्या तर आईला.. " अमोलने रागातच बाजूची बाटली ऊचल्ली..
" घालू का..घालू डोक्यात ..तुझ्या आईxx तुझ्या ..! "
सोपानने पटकन अमोलला धरल..
" अमोल शेट अमोल शेट ..हळू हळू..! "त्याने कसतरी अमोलला खाली बसवल..
" काय आहे रे ...काय पाहीजे ..!"
सोपान त्या वेटरला जरा आडबाजुला घेऊन आला..
मागे निळ्या - अमोल दोघांची बडबड ऐकू येत होती.
" माxxxxत घाबरवतो मला...! मला घाबरवतो.." अमोलचा आवाज येत होता..
दारूच्या नशेत कुत्र्याचही वाघ होत हेच खर..
" बिल द्यायला आलो होतो साहेब , पन ते साहेब एवढे जोरात वरडले की..!"
" बर बर..किती बिल झालाय सांग !"
सोपानने मागे पेंटच्या खिशात हात घातला..
तस त्याची नशा खाडकन उतरली ..
" आईला पाकिट कुठ गेल..! " सोपान स्वग:शीच मनात म्हंणाला.
आणि लागलीच त्याला आठवल..सुद्धा की पाकिट तर आपण घरीच विसरलो होतो..
तेव्हाच भीतिने त्याला स्वप्न पडल...
की सोपान ढ़ाब्यातल्या स्वयंपाक घरात ताट, चमचे, प्लेट, अशी भांडी घासत आहे ..
त्याच्या अंगावर त्या वेटरचे फाटलेले कपडे आहेत..
आणि बाजुला उभ राहून निळ्या, सोपान दोघेही दात विचकत त्याच्याकडे पाहून जोर जोराफ हसत आहेत..
" नाहीssss!" सोपानने दोन्ही हात कानांवर ठेवले आणि तो किंचाळला..
क्रमश: