Kouff ki Raat - 11 in Marathi Horror Stories by jay zom books and stories PDF | खौफ की रात - भाग ११

The Author
Featured Books
  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

  • मोमल : डायरी की गहराई - 47

    पिछले भाग में हम ने देखा कि फीलिक्स को एक औरत बार बार दिखती...

  • इश्क दा मारा - 38

    रानी का सवाल सुन कर राधा गुस्से से रानी की तरफ देखने लगती है...

Categories
Share

खौफ की रात - भाग ११

भाग 11

.लेखक :जयेश झोमटे..

सदर कथा काल्पनिक आहे !
कथेत भुत ,प्रेत अमानविय शक्तिंचे उल्लेख आहे .
कथेत अंधश्रद्धा आहे परंतू लेखक तिला खतपाणी घालत नाही ... गरज असल्याने तिच वापर केल गेल आहे कृपया भयरसिकांनी कथा आन्ंद मिळाव ह्या उद्दीष्टाने वाचावी .



कथा प्रारंभ...






रामपुर गावच्या उत्तर दिशेला घनदाट जंगल होत.


झाडा झुडपांच्या आसुरी छाया काळ्या अंधारात
अभद्र सावजाची वाट पाहत उभ्या होत्या..


त्याच जंगलातुन एक टूव्हिलर मंद गतीने पुढे जात होती.

टूव्हीलरच्या इंजिनचा खर,खरता आवाज आणि पुढची हेडलाईट चालू होती.



त्या हेडलाईटचा पिवळा उजेड धुक्याला आणि अंधाराला चिरून पुढे जात होता.

जंगलातल्या निरव शांततेत गाडीचा आवाज एका पाश्वी शक्तिच्या खोल खर्जातल्या आवाजासारखा भासत गुंजत होता,

आणि जंगलातली ती निरव शांतता अक्षरक्ष मुळापासून मोडुन काढत होता.



त्या दोन चाकी गाडीवर दोन माणस बसलेली , एक होता सावकाराचा माणूस जो की गाडी चालवत होता,

त्याच नाव बाळूराम होत.

पन गावातली सर्व त्याला बाल्या म्हंणत.
बाल्या सावकाराच्या हाताखाली काम करत होता.
एकप्रकारे सावकाराचा पाळलेला कुत्राच म्हंणूयात आपण..

गाडीच्या मागच्या सीटवर गरीब पांडूबूवा बसला होता..

त्याने थंडीपासुन वाचण्यासाठी अंगावर काळी घोंगडी गुंडाळले आणि डोक्यावरही काहीतरी फेट्यासारख गुंडाळल होत.

तो डोक्याला बांधलेला कपडा मळुन गेला होता..
जनू कित्येक महिने धूतळच नसाव !

त्याच्या हातात एक कुदल सुद्धा दिसत होती..
जी की त्याने प्रेतासाठी खड्डा खणन्यासाठी घेतली होती.

गाडीचा फट फट फट .. आवाज पुर्णत जंगलात गुंजत होता.

गाडीची चाके धुक्यातून वाट काढत वेगाने पळत होती...

झाडावर घरट्यात झोपलेले पक्षी डोक वर काढून त्या गाडीला पुढे जातांना पाहत होते..

गाडीवर मागच्या सीटवर बसलेला पांडूबूवा भीतिने गर्भगळीत ..होऊन आजुबाजुला अंधारात पाहत होता..

त्याच्या मनात जंगलातला तो अंधार पाहून.. कोहराम कब्रस्तानच्या आत घडलेल्या विळक्षण अघोरी किस्स्यांचा गाभारा हळुच उघडायला सुरुवात झाली होती.

त्या जंगलात पसरलेला गुढ अंधार आणि त्या अंधाराला शेवाळासारख चिकटलेल्या धुक्यास पाहता पांडूबूवाच्या मनात धड-धड करत धडकी भरत होती.
न जाणे केव्हा त्या भयानक आठवनींत त्याची तंद्री लागली... ते त्यालाच समजल नाही.

गाडीच्या पुढे बाल्या बसला होता...

तो गाडी जो चालवत होता.

जस पांडूबूवा भ्यायला होता..

तसंच बाल्याचही

कारण बाल्याला सुद्धा गावात ऐकलेल्या कोहराम कब्रस्तानच्या काहावती आठ्वत होत्या,

एके रात्री दुस-या गावातून भजनाच कार्यक्रम ऊरकून कोहराम कब्रस्तानातून शार्टकट रस्त्याने येताना ... त्यांच्या गावातली मांणस परत अचानक कशी गायब झाली होती....

त्याच त्या अमानवी ,शक्तिप्रदर्शनाच्या भयंकर,अघोरी, चेष्टा त्याला आठ्वत होत्या.


आणी गावातल्या एक दोन टपोरी मांणसांनी अजुनच तिखट मसाला लावून ऐकवलेल्या त्या गोष्टी आता त्याच्या उरावर येऊन बसल्या होत्या..

मज्जा म्हंणून ऐकलेल्या त्या गोष्टी आता का ऐकल्या ह्याच पश्चात्ताप होत होत.

स्पीडमीटर मध्ये गाडीचा स्पीड चाळीस दिसत होता ,

वेगाने पळणा-या गाडीमूळे
रात्रीची थंड हवा दोघांच्या अंगाला विषासारखी झोंबत होती.

त्या थंड हवेत सुद्धा बाल्याच्या कपाळावरुन एक घामाची ओघळती रेश भीतीने खाली येत आहे हे दिसुन येत होत.

भीतिने त्याची अशी काही फाटली होती..की जर रस्त्या मध्ये अचानक काही ..विचीत्र आडव आल..

तरी ड़ायरेक्ट गाडीच तोळ जाईल..

कोहराम कब्रस्तान यायला अजुन पाच दहा मिनिटे बाकी होती..


म्हणूनच वाटसरण्यासाठी थोड्या गप्पा मारुन वेळ रस्ता सरावा ह्या करीता त्याने पांडूबूवाला आवाज दिला.

" पांडूबुवा ? " बाल्याने प्रथम हाक दिली.

परंतु मागून कसलाही प्रतिसाद आल नाही.
कारण पांडूबूवा एकटक त्या अंधारात पाहत होता.

मागून आवाज आला नाही तसे बाल्याने पुन्हा हाक दिली.

" पांडू ?

"द्वितीय हाक परंतु पुन्हा कसलाही प्रतिसाद आल नाही.


आता

बाल्याच्या अंगावर सर्रकन काटा आला..

एवढ आवाज देऊन सुद्धा पांडू होकारार्थी प्रतिउत्तर देत नव्हता ..

त्याला वाटल पांडू अर्ध्या रस्त्यात आपल्याला एकट सोडून पळून गेला की काय ?

"पांडू "

बाल्याने ह्या वेळेस आवाज दिला ,तो पुढे हेडलाईटच्या प्रकाशात दिसणा-या धुक्यामध्ये बुडालेल्या रस्त्याला पाहत .

परंतू मागुन काही केल्या प्रतिउत्तर येत नाहीये !हे पाहून बाल्याची खात्रीच पटली.. की पांडू जणु मागे सीटवर बसलाच नाहीये ! तो पळून गेला..

म्हंणजे ह्या अशा निर्जण जंगलातल्या रस्त्यात... अमावास्याच्या रात्री ,आपण एकटेच ह्या अमानुष जागेत आहोत.

हा विचार त्याच्या मनात येताच त्या थंड हवेच्या तापमानात बाळयाच्या शरीरावर एक काटा येऊन गेला.

शेवटी त्याने पांडूबुवाला अशी काही मोठ्याने एक शिवी हासडली..

" ए पांड्या मा××× त! लक्ष कुठ हाय तुझ भो#×××च्या.!"


एक मोठा आवाज आला आणि त्या आवाजासकट पाठीमागे बसलेलुआ पांडूबूवाची तंद्री भंग पावली , काहीक्षण डोक्यात उभ्या राहिलेल्या कोहराम कब्रस्तानाच्या वाईट गोष्टींचा थर क्षणात पुं

खर मारुन दिवा विझवावा तसे विझला गेला.

" काय झाल मालक?" पांडूबूवा जरा नम्र आवाजात म्हणाला.


पांडूची ऐवढी ऐपत नव्हती ...की तो बाल्याला तोंडवर करुन बोलू शकेल.

" अरे तुझ्या आ... " बाल्या शिवी देणार होता पन ते शब्द त्याने घशातच ठेवले व पुढे म्हणाला

" अर कव्हा पासून आवाज देतोय तुला ? आण तू हाय की बहि-यावाणी हा नाही! हुं नाही..!"
"

माफ करा मालक ! म्या जरा त्या कब्रस्ताना बदल इचार करत व्हतू! गावातली माणस काय काय म्हंणत्यात ..! की कब्रस्तान ले मोठ हाय, त्यात म्हंणे सरळ गेलेल्या मार्गान जर तीस मिनीट चालत गेलो, तर त्यांच देऊल काय ते" पांडू काहीक्षण थांबून ल्क्षात येताच पुढे म्हणाला " " हां काय तर चर्च बी हाय म्हंण.! आण त्या देऊळाबाजुला एक दूमजली बंगला बी हाय. गावातली माणस बोलत व्हती की एक पादरी आण एक त्यांच्या देवाची दासी त्या बंगल्यात राहायची, पण एकेदिवशी म्हंण त्या पादरीन दारुच्या नशेत त्या दासीवर बलात्कार केला , आण त्यातच त्या बाईचा जिव गेला.
काहीदिवसात म्हंण त्यो पाद्री भी चर्च मध्येच फास लावुन मेला. की त्याला त्या दाशीन भुत..! "

" ए गप्प की म्हाता-या ? कीती -ती बड़-बड करतुस .. तुझ्या तर आईला.. !" बाल्या अचानकच मोठ्याने ओरडून म्हणाला .

तसेही त्याला ही ह्या कोहराम कब्रस्तानातल्या सर्व घटना ठावुक होत्या,

आणी त्याच गोष्टींची भीती त्याला वाटत होती.

जी की पांडूबूवाच्या बोलण्याने आता अंगात घुसली होती,


आता जर बाल्याने पुढे काही ऐकल असतं, तर त्याला नक्कीच एक अटेक आला असता.

म्हणुनच तो त्या पांडूबूवाला जोरात ओरडत खेकसतच म्हणाला.

"पट,पट,पट खड्डा खणायचा? आण लगेच बाहेर यायच .! ना माग ना पुढ बघायच ? शिदा बाहेर यायचं समजल का? " बाल्या म्हणाला.

तसे त्याच्या ह्या वाक्यावर पांडूबुवाने फक्त मागुन एक हुंकार भरला.

" हुं....!" ..

क्रमश :


पुढील भाग लवकरच...

रेटिंग नक्की द्या !