...भाग 10
लेखक :जयेश झोमटे..
सदर कथा काल्पनिक आहे !
कथेत भुत ,प्रेत अमानविय शक्तिंचे उल्लेख आहे .
कथेत अंधश्रद्धा आहे परंतू लेखक तिला खतपाणी घालत नाही ... गरज असल्याने तिच वापर केल गेल आहे कृपया भयरसिकांनी कथा आन्ंद मिळाव ह्या उद्दीष्टाने वाचावी .
कथा प्रारंभ...
आई - ह्या दोन शब्दांत संपुर्णत जग सामावल आहे .
आई - ह्या दोन शब्दांत मायेची उब आहे !
आई हे देवाचंच रुप , ज्या देवाने आईस जन्मास घातलं, त्या आईच्या प्रेमाला अंताची सीमा नाही..
मग ती मानव , प्राणी, पक्षी कोणत्याही देहात का नाही असो!
आपल्या लेकरावर तिची असीम माया असते जिव असतो...
त्या मायेच्या ममतेला अंत नसतो, मुळीच नसतो !
एका मुलासाठी त्याची आई सूपरहीरो असते !
आजारी असल्यावर डॉक्टर असते, अभ्यासात शिक्षिका असते , ह्या मातेचे इतके रुप आहेत की ते इथे वर्तवण सुद्धा कमी पडेल.
प्रत्येक मुलास अस वाटत की आपल्या आईने कायमच आपल्यासोबत रहाव , तिची साथ कायमच आपल्या सोबत असावी .
सावकारास सुद्धा अस वाटतच असणार! नाही का?
डोक्याला हात लावून सावकार खाली जमिनीवर बसला होता.
त्याच्या पूढ्यात खाली जमिनिवर एक चादर अंथरलेली आणि त्यावर त्याच्या मातेच प्रेत झोपवलेल..प्रेताच्या अंगावर पांढरट कपडा टाकला होता..
सावकार त्या पांढरट कापडात झाकून ठेवलेल्या प्रेताकडे एकटक पाहत होता.
की तोक्ष त्याने हळुच एका हाताने प्रेताच्या तोंडावरून तो कपडा बाजुला काढला.
तस प्रेताच तोंड दिसल...
प्रेताच तोंड आता ह्याक्षणी जरा जास्तच पांढरट पडत चालल होत,
डोळ्यांखाली काजळाने गोल आकार काढाव तसे कालवर्तुळ तैयार झाले होते.
घाणेरडा वास प्रेतातून येत होता.
खप्पड चेह-यावरचे गालफाड खाली लोंबत होते.
प्रेतात झालेला पाहून लोकांत कुजबुज सुरु झली होती...
कोनी म्हंणत होत.
" ही म्हातारी भुत होऊन परत येईल"
" तर कोणी म्हंणत होत प्रेताला लवकरात लवकर गाडाव लागेल , नाहीतर हे काहीतरी वंगाळच दिसतय."
लोकांची आप-अपसात हलुच कुजबुज सुरु होती.
की सावाकाराचा एक माणूस त्याच्या ज्वळ आला व कानांत म्हणाला .
" सावकार तुम्ही सांगितल्या प्रमाण काम झाळय बघा !
कोहराम कब्रस्तानात एका माणसाला जास्त पैशे देऊन एक खड्डा खणाया सांगितलय!" " सावकाराचा माणूस थोड वेळ थांबून पुन्हा म्हंणला.
" सावकार! अंत यात्रा काढून जमणार न्हाय , बघा ! " सावकाराने गर्रकन वळून आपल्या मांणसाकडे पाहिल..
सावकाराचा रागीट चेहरा पाहुन , त्या मांणसाला जरा भीतिच वाटली.
परंतू तो बोलू लागला...
बोलण भाग होत !"
" अहो सावकार अंतयात्रा काढली,
तर.. कब्रस्तान लय लांब आहे ! तिथ पोहचायला बारा वाजतील ! आण तुम्हांसनी माहीती हाय ना ती जाग ले वंगाळ हाय! म्हणुनच प्रेत एम्बुलेंस मधी घेऊन जाया लागणार हाय !" तो माणूस म्हणाला.
तसे सावकाराला त्याच म्हंणन पटल होत...
त्याने फक्त डोक होकारार्थी हलवल.
जणू सावकाराच्या मनात पुढे काही प्रश्न नसावेत . आणि ही युक्ती सुद्धा त्याला आवडली आवडली असावी.
□□□□□□□□□□□□□□□□□
रामपुर गावापासुन ठिक चाळीस मिनिटांच्या अंतरावर हायवेबाजुलाच एक कब्रस्तान होत.
इंग्रजकालीन बांधिव असलेल एक कब्रस्तान , असं म्हंटल जात की भारत ईंग्रजांपासुन स्वतंत्र होण्या अगोदर पासून ते आजपर्यंत ते कब्रस्तान जशास तस आहे.
लाखो संख्येने लहान-मोठ्या कबरी तिथे आस्तित्वात आहेत.
ह्या कब्रस्तानात रामपुर गावातल्यां मते , भुत, प्रेत , पिशाच्च आस्तित्वात आहेत.
जो कोणि भारतवासी रात्री त्या कब्रस्तानात प्रवेश करतो त्याला क्ब्रस्तानात वावरणारे आत्मे मारुन टाकतात,
कारण त्यांना आप्ल्या घरात शिरकाव करण आवडत नाही.
रात्री ते आत्मे आपल्या गाढ निद्रेतुन कबरेतुन ऊठून बाहेर येतात.
आणि जो कोणि सजीव त्या कब्रस्तानात दिसेल त्याच्या शरीराचा फडशा पाडतात , हाड,मांस चोखून-चोखून खातात.
रक्ताची रांगोळी काढतात...
त्याचंच एक अनुभव असा की रामपुर गावातले दहा-बारा गावकरी एका रात्रीत ह्या कब्रस्तानात गायब झालेले , कुठे गेले ? कसे गेले? आत सामावले? की जमिनीने गिळल ?
किती विलक्षण अबूद्धीमय, अकल्पित प्रकार घडलेला!
की त्या गायब झालेल्या माणसांमधल्या एकाही जणाचा शोध किंवा मृत शरीरासंबधीत हाड,मांस, कपडे काहीच काहीच मिळत जुळत मिळाल न्व्हत.
गावक-यांच्या मते रात्री जो कोणि त्या कब्रस्तानात आत जाईल तो पुन्हा कधी बाहेर येत नाही ,कधीच नाही.
गावक-यांच्या मनात त्या कब्रस्तानाबदल इतकी भिती पसरलेली आहे, की कोणी कुत्र सुद्धा दिवसा त्या स्मशाना बाहेर भटकत नाही.
अशातच त्या कब्रस्तानाच नाव कोहराम कब्रस्तान म्हणुन पहिल्यापासून प्रसिद्ध झाल ते अजुन ही प्रसिद्ध आहे.
आणि ह्या अमानवी ,अजाण सैतानाने लावलेल्या मृत्युच्या सापळ्यात आज एक बिचारा मणुष्य फसणार होता.
या पुढे पाहूयात कोण आहे तो =>
कुटूंबाच पाळण-पोषन करण्यासाठी पैसा हा खुपच महत्वाचा असतो .आणि त्यासाठी मणुष्यप्राणि जे मिळेल ते काम शक्यतो काहीही
करण्यास तैयार असतो.
आणी असाच पांडूबुवा होता.
पांडुबुवा रामपुर गावातच राहायचा.
त्याचं काम काय होत ? तर रामपुर गावच्या स्मशानात प्रेताला जाळण्याकरीता लाकड तोडून द्यायचा!
चिता रचायचा सुद्धा काम करायचा ,
मग त्यातुन जे काही पैसे मिळतील, ते आपल्या आंधळ्या बायको समवेत दोन घास खावून अर्धे पैसे जपून ठेवायचा..जर कधी गावात कोणि मेल नाहीच तर मोल-मजुरी सुद्धा करायचा.
आज पांडूबुवाला एक काम मिळाल होत.
आज त्याला सावकाराच्या आईच प्रेत गाडण्यासाठी कोहराम कब्रस्तानात जाऊन एक खड्डा खणायचा होता.
तासाभराच्या कामाचे त्याला अक्षरक्ष दोन हजार रुपया देण्यात आले होते.
आयुष्यात पाहिल्यांदाच इतके पैसे त्याने पाहिले होते.
गुलाबी रंगाची दोन हजाराची नोट पाहून पांडूबूवा कोहराम कब्रस्तानातली, भुतांचा थय-थयाट गावात ऐकलेल्या चार पाच जणांच्या मुखातल्या त्या कब्रस्तानाबदलच्या भयानक , भीतीनी अंगावर सरकन काटा आणणा-या बाता विसरुन गेला होता.
खरच पैसा मानवाला मृत्युच्या मुखात कसा ओढून घेतो ह्याचा हा मुख्य पुरावाच जणु होता...
पांडूबुवाने आपल्या घरुन निघतावेळेस
बायकोला जेवन खावू घालून झोपवल,
आणि आपल्या मागे दार लावून घेत घराबाहेर पडला.
त्याची अंधवत बायको खाटेवर झोपली होती.
बिचारीला आपला नवरा कुठे चालला आहे हे सुद्धा माहीती नव्हत.
पांडूला काही झालच तर तिची काळजी कोण घेणार होता?
कोण सांभाळणार होता त्या बिचारीला?
ह्याचा पांडूबुवाने जरा ही विचार केला होता की नाही?
पैसे म्हंणजे जिव असत का? पैसा काही इतका मोठा झाला आहे का?
की त्या पैस्या खाली मणुष्याला आपल जीवन सुद्धा छोठ वाटू लागल आहे ?
घराच दार बंद करुन पांडूबुवा पाच-सहा पावल पुढे चालत आला ,
घर तरी कुठे होत ते .
घर म्हंणण्यापेक्षा झोपडीच म्हंणेल मी, एक खोलीची झोपडी होती ती , बाजुलाच एक मोरी होती ..
हॉलमधेच जेवणासाठी चुल , आणि चुली बाजुला काही बाही जेवणाच सामान, आणि एक खाट त्यावर त्याची आंधळी बायको नेहमीसारखीच झोपली होती.
पाच सहा पावल चालताच पांडू बुवा थांबला ,
त्याच्या समोरव सावकाराचा एक गडी माणूस टूव्हिलर घेऊन उभा होता.
पांडूबूवा लागलीच त्या टूव्हिलरवर कूदल हाती घेऊन बसला.
तसे एक कीक मारत सावकाराच्या माणसाने गाडी सुरु केली.
व शार्टकट जंगलाच्या रसत्याने गाडी कोहराम कब्रस्तानच्या दिशेने निघाली ...
कारण शार्टकट रस्ता त्यांना लवकरात लवकर मृत्युच्या मुखात पोहचवणार होता, माफ करा म्हंणजेच कब्रस्ताना जवळ पोहचवणार ..होता.
....!
क्रमश: ...
कंमेंट, रेटिंग, नक्की ..वाचक मित्रांनो..नक्की द्या.!😊🙏🏼
ह्या कालोख्या खोळ तलाशी...
लपली आहे ही छाया,
अतृप्त भुकही तयाची..
रचलीये ... मृत्युची माया...
रात्रीस खेळ चाले....रात्रीस खेळ चालेsssssss..
कंमेंट, रेटिंग, स्टिकर प्रोत्साहन..वाचक मित्रांनो..नक्की द्या.!😊🙏🏼