Kouff ki Raat - 9 in Marathi Horror Stories by jay zom books and stories PDF | खौफ की रात - भाग ९

The Author
Featured Books
Categories
Share

खौफ की रात - भाग ९

...भाग 9

लेखक :जयेश झोमटे..

सदर कथा काल्पनिक आहे !
कथेत भुत ,प्रेत अमानविय शक्तिंचे उल्लेख आहे .
कथेत अंधश्रद्धा आहे परंतू लेखक तिला खतपाणी घालत नाही ... गरज असल्याने तिच वापर केल गेल आहे कृपया भयरसिकांनी कथा आन्ंद मिळाव ह्या उद्दीष्टाने वाचावी .






काळ्याशार ढगांमध्ये लपून चंद्र लप्ंडाव खेळत होता.

अरे हो विसरलोच की , आज तर अमावस्या आहे ना ? मग चंद्र तरी कसा उगवून येणार !

चंद्र नसल्याने पृथ्वीवर मरणाचा अशुभ अंधार पसरलेला ..

आणि त्या अशुभ रात्रीच्या अंधारात ,

रामपुर गावात घेऊन जाणारा नागमोडी वळणाचा तो मातीचा रस्ता पुर्णत कालोखात बुडाला होता..


त्यासमवेतच कालोखात बुडालेल्या त्या रसत्यावरुन

,पांढरट धुक आकाशातले ढग हळूवारपणे पुढे सरकावे तसे पुढे-पुढे सरकत होता.


रसत्या बाजुलाच रामपुर गाव नाव असलेला फला दिसुन येत होता.


त्या फळ्यालाही धुक काहीक्षण आपल्या मिठीत घेत होते, तर काहिवेळाने आपली थंडगा मिठी सोडत होते ...

रामपुर गावचा हा रस्ता जेमतेम वीस मिंनीट चालताच गाव लागत होत...

आणी गावात पोहचताच समोरच एक वडाच भलमोठ्ठ वृक्ष दिसुन येत असे.

त्याच वृक्षावर एक घुबड येऊन बसली..
ही तीच घुबड आहे जी काहीक्षणा अगोदर कुठेतरी उडून गेली होती...

काम होताच पुन्हा ..येऊन त्या झाडावर बसली होती..

चॉकलेटी, पांढ-या मिश्रित पिसांच, बाकदार नाकाच, वटारलेल्या भेदक डोळ्यांच, अपशकुनी घुबड ते..

त्याचे ते वटारलेले डोळे आता लाल रंगासारखे दिसत होते.

जणु त्याग रक्त ओतल गेल असाव....

..

त्या वडाच्या झाडाखाली दोन आकृत्या म्हंणजेच सोपान आणि निळ्या रामपुर गावचे युवक काही संभाषण करत होते ...आणि हे भयाण

अमानविय कृत्याच वाहन घुबड , ते एकटक ऐकत आहे की काय अस वाटत होत.

कारण ते दलींद्री, अपशकुनी, अघोर, मसनात, कब्रस्तानातल्या झाडांवर राहाणार घुबड एकटक टक लावून त्या दोघांकडेच पाहत होत ना !

दोघांच्याही हसत-खिदळत गप्पागोष्टी चालू होत्या.

" अरे निळ्या ! आज वर्षाचा लास्ट दिवस आहे ना भावा..?"
सोपान आपल्या गाडीवरुन थोड शरीर झुकवत पुढे येत म्ह्नाला.

" हा भावा!" निळ्या इतकेच म्हणाला.

" अरे म काय प्लान हाय का नाय?"

" अरे कसला प्लान!" निळ्या न समजल्या सारखा मुद्दाम म्हणाला.

" अरे पार्टीचा रे भावा ! " सोपान ने लक्षात आणुन दिल .

" अरे पैसे नाय रे भावा!"
.. निळ्या भिका-यासारखा म्हंणाला.

" म, हा सिगारेट काय वाण्यानी फ्री दिला का?"
सोपान ने दोन वेळा भुवया उडवल्या व म्हंणाला.

" अबे ए सोपान आपली गर्लफ्रेंड वाण्याची पोर हाय लेका!"


निळ्या एक भुवई उंचावत माज दाखवत म्हणाला.
" मज्जा हाय भावा तुझी! नाय तर आम्हाला एक
पोर नाय पटत लेका!"

सोपान आपल काल तोंड आरश्यात पाहत म्हंणाला जे की अंधारात साईड मिरर मध्ये दिसत नव्हत.

" अबे माझी कसली मजा ! ती फक्त सिगारेटच देते!"

" अं काय बोल्ला !" ऐकल्या न सारख सोपान उच्चारला.


तसे विषय बदलत

" चल ते सोड, पार्टीला जाऊयात!"

" अबे साल्या ! तुझ्याकडे तर पैसे नाहीयेत ना!आणी आधीच तू माझ्याकडून पैसे घेतलेत, लक्षात आहे का?" सोपान म्हणाला
तसे त्याच्या ह्या वाक्यावर निळ्या हळूच कठड्यावरुन खाली येत सोपानला मस्का लावत म्हणाला.

" सोपान शेट देऊ की पैसे तूमचे! मी कय पळून चाललो_ का!" निळ्यासोपानच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला.

सोपानला कोणीही शेट म्हणाल, की तो थेट चण्याच्या झाडावर चढायचा, आणी हे निळ्याला माहीती होत. आणि तस्ंच झाल.

" हा हा चल ठीके देतो पैसे , पन एक लक्षात ठेव !" सोपान काहीवेळ थांबून त्यानव तर्जनी दाखवत पुढे म्हणाल." पन शेवटच हं "

सोपानने न जाणे कित्येक वेळा हा शेवटचा डायलॉग मारलेला, जो की अजुन ही मारतच होता.

त्याच शेवटची उधारी त्याला न जाणे कधी मिळेल ते देवच जाणे


.निळ्याने त्याच्या ह्या वाक्यावर सोपानला मनातच वेडा म्हंटल..

पन तस चेह-यावर न दाखवता, त्याने फक्त हो असा इशारा करत मान हळवली.



सोपानने गाडीला लागलीच किक देत गाडी सुरु केली, त्यासरशी इंजिंनचा खर,खरता आवाज आणि पुढची हेडलाईट पेटली.

" हम्म चल बस्स चल !"

निळ्या लागलीच एक ढ्यांग टाकुन मागे बसला. सोपान ने लागलीच फर्स्ट गियर टाकल, आणि क्लच सोडून गाडी पुढे जाणार की तोच एक ओळखीचा आवाज आला.


" ए भावांनो , थांबा ! अरे अस कस मला एकट्याला सोडून निघाले रे तुम्ही " सोपानने लागलीच
गाडी थांबवली.

व आवाज आलेल्या दिशेने मागे वळुन पाहिल,

मागे वळुन पाहिल्यासरशी त्या दोघांनाही ही आपल्या समोद एक हाफ पेंन्ट, निळी टी-शर्ट घातलेला गलभद-या सारखा एक युवक दिसुन आला.

त्या युवकाच नाव अमोल होत, त्याचे मधले दोन दात हसताना एखाद्या सशासारखे मोठे होऊन ओठां बाहेर पडायचे,

जे दात पाहून समोरचा हसायला लागला नाही तर नवळचं म्हंणाव.

आणी एक इन्ट्रेस्टींग गोष्ट अशी , की अमोल चे वडील सुद्धा त्याच्या सारखेच सेम-टू-सेम मिळती जुळती क्वॉलेटी होती.

बाप बेटा एकसारखेच होत्व...त्यांच दोघांच तोंड मिळत-जुळत त्यासमवेतच दात सुद्धा एका सशासारखे हसताना बाहेर यायचे, अमोलच्या वडीलांचा मासे विक्रेतीचा व्यव्साय होता.

त्यातुन त्यांना खुपच नफा मिळत होता. परंतु नफा मिळुन सुद्धा अमोलचे वडील एक नंबरचे कंजूस माणूस होते..

लवकरच योग्यवेळी ते ह्या कथेत येतिल..

त्यामुळे त्यांच्याबद्दल पुढे काही सांगायलाच नको.

निळ्या,सोपान,अमोल हे तिघेही गट्टीबाज मित्र होते . आणि ह्या तीन गट्टीबाज मित्रांच्या आयुष्याला , नियती चांगलाच घोडा लावणार नव्हती...या पाहुयात..!


" काय रे कुठ चाललात सावकाराच्या म्हातारीला सोडून?"
अमोल आपले मधले दोन दात दाखवत भुतासारखा फ़िदिफ़िदि हसत म्हणाला .त्याच्या ह्या वाक्याचा निळ्याला जरा राग आला, डोक पेटून उठल.

" अबे ए झाकणझुल्या ..मग काय तीच म्हढ घेऊन फिरत बसू गावभर ! की तिला खांद्यावर उचलून घ्यायला आम्हीच आहोत पुर्णत गावात..

पुर्णत गाव वाड्यात जमलाय तिला ऊचलायला
देइल खांद कोणीतरी !

तु कशाला टेंशन घेतो रे ल×××ड्या!" निळ्याने चेह-यावरचे केस पुन्हा बाजुला सारले .

" भाई जस्ट कुल यार मी जॉक करतोय! बर ते सोडा तुम्ही कुठे
निघालात?"

अमोल विषय बदलत म्हणाला.त्याच्या ह्य वाक्यावर निळ्याने अमोल ला हळकेच डोळा मारला व म्हणाला.

" अरे सोपान शेट पार्टी देतायेत आज 31 ची !" निळ्याने सोपानचे खांदे दाबायला सुरुवात केली,

तसे सोपानने गालात हसत अमोलकडे पाहील.अ

मोलला कळून चुकल होत, की ह्या येड्याला,येड्यात काढल गेलंय.

तस त्याने सुद्धा चान्स घ्यायची ठरवली .

" हा मग! आमचा सोपान शेट कसा आहे ?"

" कसा आहे ?" निळ्या न समजल्या सारखा पटकन म्हणाला.

तसे सोपानच्या चेह-यावर प्रश्नचिन्ह उमटले. ते पाहून अमोल म्हणाला.

" ओ शेठ, तुम्ही माणूस आहात लेय ग्रेट !: अमोलने अस म्हंणतच सोपानचे खांदे दाबायला सुरुवात केली.व म्हणाला.

" सोपान शेट आम्हाला पन द्या की पार्टी?"
अमोलच्या वाक्यावर सोपान बोलनार की तोच मध्ये निळ्या म्हणाला.
" अर बस्स की लेका मांफ ! सोपान शेट काय नाही म्हणतील का." खर सांगायचं तर सोपान नाहीच म्हंणणार होता.

.परंतु शेट नावाच रुबाब कायम ठेवण्यासाठी तो तैयार झाला,

तसे अमोलने निळ्याच्या मागे आपला बस्तान मांडला .

गाडीच इंजीन सुरुच होत, सोपान शेटने पुन्हा एकदा गियर टाकल व क्लच सोडत गाडी मागुन नळीतून धूर सोडत , इंजीनचा आवाज करत हायवेच्या दिशेने निघाली.
लाल रंगाची लाईट कमी-कमी होत, अंधारात गाडी नाहीशी झाली तसे, ते वडावरच्या फांदीवर बसलेल घुबड, घुत्कार करत पंख फडफडत उडून गेल.

सावकाराच्या वाड्याच्या दिशेने...

क्रमश :
सदर कथा काल्पनिक आहे !
कथेत भुत ,प्रेत अमानविय शक्तिंचे उल्लेख आहे .
कथेत अंधश्रद्धा आहे परंतू लेखक तिला खतपाणी घालत नाही ... गरज असल्याने तिच वापर केल गेल आहे कृपया भयरसिकांनी कथा आन्ंद मिळाव ह्या उद्दीष्टाने वाचावी .
□□□□□□□□□□□□□□□
copyrightby jayesh zomate
( 2023 ) kohraam kabrastaan
marathi language novel...
zomate creation... 2023...
□□□□□□□□□□□□□□□