Kouff ki Raat - 8 in Marathi Horror Stories by jay zom books and stories PDF | खौफ की रात - भाग ८

The Author
Featured Books
Categories
Share

खौफ की रात - भाग ८

भाग 8..



ती काळी मांजर सुद्धा सावकाराच्या वाड्याच्या वरच्या मंजल्यावर असलेल्या एका खिडकीत पाहुन गुर-गूरत होती.


कारण तिला त्या तीन उभ्या काळ्या सल्यांच्या खिडकीत बल्बच्या पेटलेल्या पिवळ्या उजेडात एक हिरवा लुगडा घातलेली... पांढ-या फट्ट खप्पड चेह-याची, कपाळावर रुपयायेवढा कुंकू लावलेली , सावकाराची मेलेली म्हातारी दिसुन येत होती.

आप्ल्या काजळ घातलेल्या सफेद बुभुलांनी वटारलेल्या डोळ्यांनी ती म्हातारी त्या मांजरीला हात-पाय हळवत एका येड्यासारखी उड्या मारत दम दाखवत होती.

परंतु ती मांजर मात्र घाबरुन पळून जाण्या ऐवजी जागेवरच उभ राहुन शरीर आक्रमक रुप धारन करुन तिच्याकडे पाहून गुरु-गूरत होती.

जर का कोणी सामान्य मनुष्यानी तिला हाड-हाड केल असत, तर ती लागलीच पळून गेली असती.

परंतु ही एक अमानवी शक्ति होती, तिला भले ती मांजर कशी घाबरणार?

" हाट ......हाट...इथून चालती हो ! येऊ ..येऊ..का ? येऊ .....डोळे बघ डोळे बघ...!"


त्या ध्यानाने आपले वटारलेले डोळे ..त्या मांजरीस दाखवले...

दात ओठांत दाबून ती त्या मांजरीला दम देत होती... तिच्या फिकट पांढ-या थोबाडावर निळ्सर प्रकाश पडलेला ...अमानविय मृत प्रकाश.


ओट्याच्या अंगणात तिरडी बांधून झाली होती.
गावक-यांच काहीतरी संभाषण सुरू होत.

सावकाराच्या वाड्याचा भलामोठ्ठा दरवाजा ओलांडताच

हॉलमध्ये खाली म्हातारीच मेलेल प्रेत चादरीवर ठेवल होत.

बाजुला एक धुर निघणारा धुंदेरा मडका होता. आजुबाजूला गावातली माणस हाताची घडी घालुन शोक व्यक्त करत होती.

बायका तोंडाला पदर लावून मुस-मुसत रडत होत्या.

कोणि खरच रडत होत-तर त्या उलट सावकाराची उधारी असलेले पैसे कमी होतील किंवा सावकार पैसे मागणार नाही ह्या हेतु ने काही भामटे उर फाडून छाती बदडवत हंबरडा फोडून पांच मिनीट रडून पुन्हा ग्प्प बसत होते.

सावकार सुद्धा मग त्या मांणसांना पाहून बायल्या सारखा मुस-मुसत होता.

तस म्हणायला सावकाराचा आणि त्याच्या म्हाता-या आईचा स्वभावा क्प्टी, नीच , भाडखाऊ, होता.


त्यातच त्या दोघांनी न जाणे कित्येक गरीब मदत मागायला आलेल्याना हडपल होत.

सावकाराने बक्कल पैसा , आडका जमवला होता.

परंतु मेहनतीने नसून, लुटून; मारुन, फसवुन कमावलेला.

ती धन लक्ष्मीची नव्हती, तर त्या उलट सैतानाची होती, काल धन होत ते.

त्यात पाप होत ..आनंद नव्हता मुळीच नव्हता..
रात्रीचे नऊ वाजत आलेले, (मईत निघायची वेळ साडे नऊ होती) साडे नऊ वाजता प्रेत अंतयात्रा स्मशानात घेऊन जायची होती..

आणी प्रेत जाळुन भ्स्मसात करायचं होत.

वेळ जशी वेळ येऊ लागली तस...

सर्वजन मेलेल्या हातारीच्या पाया-पडू लागले,

उधारी असलेले भामटे थेट पायांवर डोके ठेवून एक-एक मिनीट नोटंकी करुन शेंबुड पुसत बाजुला जात होते...

लोकांच आपल्या आईवर असलेल ते प्रेम पाहून सावकाराच भलतच ऊर भरून आल होत.

नाकाच्या दोन्ही बरण्या भरल्या होत्या..जो तो
आपल्या शाळला पुसून रिकाम्या करत होता..

अचानक सावकाराच्या वाड्यातल्या दरवाज्यातुन एक म्हातारा आत आला!

अंगात पांढरट हाफ सदरा , खाली दोन झापांच धोतर होत.

तो म्हातारा चालत सावकारा जवळ आला..

त्सावकारा जवळ जाऊन काहीतरी खुसूर-पुसूर करु लागला.

त्याच्या प्रत्येक शब्दांसरशी सावकाराचे डोळे नोठ-मोठे होत-होते.

भीतीने नाही हो ! तर रागाने?
सावकाराने त्या म्हाता-याची बैठ्या अवस्थेत मान पकडली व गदा-गदा त्याला हलवु लागला.

बाजुलाच सावकाराची बायको उभी होती..

ती घाई घाईतच चालत सावकारा जवळ आली..

बाजुला उभी राहत हळक्या आवाजात म्हणाली.

" अहो काय करताय तुम्ही..? सोडा त्यांला..!?
सावकाराच्या बायकोने सावकाराचा हात सोडून त्या म्हाता-याच मनगट रिकाम केल, तसे दमा झालेल्या रोग्यासारखा तो म्हातारा नागपुडया फुगवून-फुगवून श्वास घेऊ लागला.

काहिवेळ अजुन जर सावकाराने त्याला तसंच पकडून ठेवल असत्ं? तर म्हातारीच्या प्रेताला बाजूला म्हाता-याची जागा फिक्स होती.

" अहो का मारताय त्यांना?" सावकाराची बायको म्हणाली.

बाजुला उभे असलेले गावकरी, खाली बसलेल्या बायका हा फूकटचा तमाशा पाहत होते.

" अंग ह्यो मा×××त बोलतुया! की माझी आईस गाडाव लागल तिच धर्म-जात येगळ हाय..!"


सावकाराच्या ह्या वाक्यावर गावक-यांच्यात कुजबुज सुरु झाली, जो तो ज्वळ असलेल्या माणसाला पाहुन तर्क-वितर्क मांडू लागला.

" काय ? .."

सावकाराची बायको आ वासल्यागत सावकाराकडे पाहत म्हणाली.
" व्हय तर! ह्यो म्हाताराच बोल्ला की मला? " सावकाराने आपल्या बायकोकडे पाहिल मग त्या म्हाता-याकडे रागाने पाहत म्हणाला,जो की आपल्या गळ्याला हात लावुन उभा होता.

" अर ए बरमुड्या! आता बोलतुस, की आणु बंदूक?"


" बंदूक?" तो म्हातारा लटलट काफू लागला.

" व्हय बंदुकच ....पुढच टोक मागन घालुन पूढुन गोली काढीन! बोल ? "

सावकाराच्या ह्या वाक्यावर मुस-मुसणा-या

तोंडावर पदर ठेवुन बसलेल्या बायका खीखीखी करत हसू लागल्या,

गावकरी गालात हसत तमाशा पाहू लागले होते..

नक्की काय चालू होत काहीच कळेना.
फुकटचा तमाशा सुरु झाला होता.
" अव सावकार मला गरीब बापड्याला कशापाई मारताय!
अव अस म्या म्हंणत नाय!"

" मंग कोन म्हंणतय! नाव सांग..त्याच? त्याच्या बी मागून गोळी घालतो आण पुढून काढतो..!"
सावकार रागाने आग-बबुळा झाल्यागत म्हणाला.

त्याचा आवाज पुर्णत वाड्यात घुमल गेल.

" अ..अ...अव सावकार अस म्या नाय ओ, मसनातल्या चिंचखालच्या झाड़ाचा अंबो बा म्हंणतोय.!"
अंबो बा हे नाव ऐकताच सावकाराचा राग एका क्षणात ओसरला, त्याच्या चेह-यावर जरासे प्रश्नार्थक भाव आले..

अंबो बा ह्या नावासारशी गावकरी कपाळावर दोन्ही हात जोडून वर पाहत पाया पडू लागले.

रामपुर गावाबाहेर असलेल्या स्मशानात , आडबाजजुला अंधारात बुडालेल्या एका चिंचेच्या झाडाखाली अंबो बा बसायचा. अंबो बा म्हंणजेच एक अघोरी होय. अंगावर चितेची राख फासलेला, मोठ-मोठाले केस डोक्यावर बांधलेला, नेहमी नशेत धूत्त असलेला एक अघोरी होय.अंबो तरुन वयापासुन ते म्हातारे होई पर्यंत त्या स्मशानातल्या चिंचेच्या झाडाखालीच राहत होते.

उन्हाला- हिवाळा दोन मोसमात चिंचेखाली राहणारा बाना


फक्त पावसाळ्यात काय ते जागा बदलून..स्मशानाभुमी बाजूला असलेल्या एका जुनाट झोपडीत आपल्या काळ्या मांजरी सोबत रहायचा .. .

रामपुर गावातल्या गावक-यां मते अंबो अघो-याकडे अघोरी शक्ति होती.

गावात कोणाच्या अंगावर भुत, पिशाच्च वश झाल असल्यास अंबो बाबा ते उतवरण्याच काम करत.

भुत उतरवण्याचे हा अघोरी बाबा
कोणाकडून ही पैसे घेत नसायचा..फक्त भिक्षा किंवा पैसे म्हणूण ते एक गांजाच
पॉकीट घेत, आणि सदानीकदा नशेत धुत्त राहत.

त्यांच्या शक्तिची प्रचिती अपरंपार होती...लांबून लांबून लों त्यांना भेटाला यायचे.

गावक-यांच्या मते अघोरी बाबा जे बोलेल ते नेहमी खर असायचं
आणी ह्यात तिळमात्र शंका नव्हती.


सावकाराने लागलीच त्या म्हाता-याच्या बोलण्यावर विश्वास ठेवल..


आणि त्याच्या आईच प्रेत रामपुर गावापासुन हायवेवर असलेल्या इंग्रजांनी बांधलेल्या कब्रस्तानात गाडायच ठरवल , ज्या कब्रस्तानाच नाव होत कोहराम कब्रस्तान..!.

एक श्रापीत सेमेट्री.....!



क्रमश :