भाग – ६
मग थोड्या वेळाने मितालीने स्वतःला सावरले आणि ती आता सुमितकडे चेहरा करून बोलली, “ सख्या रे तू हे आजवर का नाही बोललास, हि गोष्ट आणि हे वाक्य बोलण्यास का बर इतका उशीर केलास. अरे तुझ्या कॉल न उचलणे हा माझ्या कडून घडलेला फार मोठा अक्षम्य असा गुन्हा होता रे . तू बोललास त्याचप्रमाणे माझ्या हि राग अनावर झाला होता आणि मी रागाचा भारात हे सगळ कृत्य केलं. मग काही दिवसांनी जेव्हा माझा अनावर झालेला राग शांत झाला त्यावेळेस मला हे कळून चुकले होते कि माझ्या हातून किती मोठी चूक घडली आहे. मला माझी चूक लक्षात आली होती परंतु तेव्हा वेळ माझ्या हातून निघून गेली होती. माझ्या आईचा त्या फाजील आणि खोट्या अभिमानामुळे मी माझे घर आणि माझा सोन्यासारखा संसार उध्वस्त करायला लागली होती.”
मग ती पुढे म्हणाली, “ माझ्या आईने तुला आणि तुझ्या आई बाबांना थर्ड क्लास म्हटले होते आणि मी माझ्या मनाला आणि ईश्वराला साक्षी ठेवून कबूल करते कि ती चूक नाही तर गुन्हा माझ्या आईचा आणि माझा होता. ते शब्द माझी आई बोलली होती परंतु तिला आंधळ्या सारखा पाठींबा देऊन मी फारच मोठा अपराध केला होता. माझ्या आईचा त्या फाजील, निरर्थक आणि खोट्या अभिमानामुळे आधीच तुला आणि तुझ्या आई बाबांना किती त्रास सहन करायला लागला. त्या बिनडोक बाईचा अहंकारामुळे तुझ्या आई बाबांना काय कींमत मोजावी लागली आणि कसला त्याग करावा लागला हे सुद्धा तेव्हा मला कळून चुकले होते. परंतु मी करणार काय मी तुझ्या नजरेत पडून गेली होती आणि माझ्या मनात राहून राहून आत्मग्लानी येऊन मी स्वतःलाच दोष देत रडत बसायची.”
मग मितालीने सुमितचा हात हातात घेतला आणि ती पुढे म्हणाली, “ सख्या रे, मी पण तुझ्यावर जीवापाळ प्रेम केलय रे ते हि बालपणापासून. तू मघाशी ऑफिस मध्ये बोललास कि खाकसचा दाण्या इतकं प्रेम, अरे मी तर एवढे प्रेम केले आहे तुझ्यावर कि, ते प्रेम साठवण्यासाठी हे संपूर्ण आकाश अपूर्ण पडेल. सख्या रे माझी हि तुझ्याच सारखी अवस्था झाली होती रे. तुझा कॉल न उचलण्याने तुझा कॉल येणे बंद झाले. तुझ्यासारखीच मी सुद्धा तुला बघण्यासाठी आणि तुझा आवाज ऐकण्यासाठी फार वेडी आणि आतुर होऊन गेली होती. तुझ्याच प्रमाणे मी सुद्धा फोनमधील आपले व्हिडिओ आणि फोटो बघून मी माझ्या उतावीळ डोळ्यांची तहान भागवत आली.” मग मितालीने एक दीर्घ श्वास घेतला आणि पुढे ती म्हणाली, “ तुला आठवते काय रे तो पर्फ्यूम जो तुने मला माझ्या बर्थ डे ला गिफ्ट केला होता. तो हि फक्त तुझ्या आवडीचा, तुला तो पर्फ्यूम आणि त्याचा सुगंध इतका आवडायचा कि तुझा हट्ट असायचा कि मी तोच पर्फ्यूम रोज वापरावे. तर मी तोच पर्फ्यूम आता हि नचुकता रोज लावते आणि आजही मी तोच लावलेला आहे. त्या पर्फ्यूमचा दरवळणारा सुगंध तर मला असा वाटतो कि ते तुझे बाहुपाश आहेत आणि मी तुझ्या बाहुपाशात निवांत झोके घेत आहे.”
मिताली मग सुमितचा जवळ आली आणि त्यानंतर ती पुढे बोलली, “ सख्या रे, आपल्या दोघांची स्थिती सारखीच होती. इकडे तू तडपलास आणि तकडे मी तडपत होते. ते हि कशासाठी कि आपण प्रेम केलंय आणि ते हि खर प्रेम. तुझ्याच प्रमाणे माझा हि तोच विचार होऊन गेला होता कि ज्या आयुष्यात तू नाहीस ते आयुष्यच संपवून टाकायचे. परंतु मला तुझा विचार आला आणि आपल्या निखळ अशा प्रेमाने मला असे करू दिले नाही. मी तर माझ्या रागाचा भारात तुझा कॉल उचलला नाही, परंतु तुला खर सांगते त्याच क्षणापासून मी माझा मोबाईल २४ तास माझ्या नजरेपासून दूर ठेवला नाही. चुकुनही कधी सुमितचा कॉल येईल आणि मी पक्षा सारखी पंख पसरून माझा हक्काचा घरी उडून जाईल. परंतु त्या क्षणाची प्रतीक्षा मी आजवर करती आहे.”
तिने सुमितचा चेहरा दोन्ही हातात घेतला आणि म्हणाली, “ सख्या रे, मी तुझ्या फक्त एका कॉलची वाट बघत होती रे. का नाही केलास तू कॉल आणि हा माझा नव्हे तर माझ्या वेड्या मनाचा प्रेमळ अट्टहास होता त्या व्यतिरिक्त आणखी काहीच नव्हता रे.” मग आता सुमित हि सहज झालेला होता. तर तो बोलला, “ मग खरच आली असतीस !” मिताली उत्तरली, “ हो रे नक्कीच, फक्त एकदा कॉल करून बघायचा होता तू ! तुझा कॉल येताच मी तशीच तात्काळ ज्या परीस्थितीत असती मी निघून आली असती तुझ्याजवळ.” नंतर सुमित म्हणाला, “ मग चलायचे आपल्या घरी!” मिताली उत्तरली, “ हो रे माझ्या सख्या मला लवकर आपल्या घरी घेऊन चल मला आता हा दुरावा असहनीय झाला आहे.” मग दोघांनी एकमेकांना मिठी मारली आणि ते आपल्या घरचा प्रवासाला निघाले.
समाप्त