Punha Navyane - 8 in Marathi Women Focused by Shalaka Bhojane books and stories PDF | पुन्हा नव्याने - 8

Featured Books
Categories
Share

पुन्हा नव्याने - 8


तिने हि दोघांना मिठीत घेतले. दोघेही खूप खूष दिसत होते. रियाने पप्पांना पण बोलावले. चौघांनी एकमेकांना मिठी मारली. मीरा ने देवाकडे प्रार्थना केली की, माझं कुटुंब असचं एकत्र राहू दे. मुलं मग फ्रेश व्हायला गेली. राजीव पण फ्रेश व्हायला गेला. मीरा किचनमध्ये गेली. हॉट चाॅकलेट आणि चीज टोस्ट चा मस्त नाश्ता बघून मुलं खूप खूष झाली. राजीव आणि मीरा पण नाश्ता करायला बसले. मुलं काय काय गमती जमती झाल्या ते राजीव आणि मीराला सांगत होते.
मीरा ने मुलांना सांगितले की उद्या पासून नवीन मावशी येणार आहे त. मम्मा आता मेक अप चा स्टुडिओ काढणार आहे.त्यामुळे ती थोडी बिझी असेल. पण मावशी असतील घरी. तसं पण मुलांना देखील वेळ नव्हता. ती पण आपल्या आपल्या क्लासमध्ये बिझी होती. त्यामुळे फार वेळ कुणी घरात नसायचं. रात्री जेवायला सगळे एकत्र असणार होते. तसं पण मीरा चं काम चालू व्हायला दोन महिने तरी जाणार होते. कारण गाळा हातात आल्यावर त्याचं इंटीरियर करायला वेळ जाणार होता. तोपर्यंत मीरा मावशी ना सर्व कामे शिकवू शकेल.
. दुसऱ्या दिवशी मावशी आपली बॅग घेऊन रहायला आल्या. मीरा ने त्यांना एक छोटी स्टोर रूम होती तिथे त्यांच सामान वैगरे ठेवायला सांगितले. त्यांच्या कडून त्यांची आधार कार्ड ची झेरॉक्स घेऊन त्याचा एक एक फोटो आपल्या मोबाईल मध्ये काढून ते पेपर व्यवस्थित कपाटात ठेवले. एक छोटा कॅमेरा पण किचन मध्ये आणि हॉलमध्ये बसवून घ्यायचा विचार करत होती. जेणेकरून तिला घरातलं सगळं दिसत राहीले असते. पूर्ण वेळ ग्रृहिणी होती ना ती आपलं घर असं कोणाच्या भरवशावर टाकलं नव्हतं तीने.
पण राजीव च्या अशा वागण्यामुळे तिला हा निर्णय घ्यावा लागत होता.. राजीव तिला गृहीत धरू लागला होता. मुलांसाठी म्हणून तीने टोकाचा निर्णय घ्यायचं टाळलं होतं. तिच्या नात्यातला च एका बहीणी च्या संसारची झालेली दैना ती बघत होती.
तिची मावस बहीण सारीकाचा घटस्फोट तिच्या डोळ्यासमोर तरळला.तीची मावस बहीण सारीकाचा, तीचं छान चौकोनी कुटुंब होतं. हळूहळू काय झालं माहीत नाही पण दोघांच पटेना झालं. दोघांमध्ये सततभांडणं होऊ लागली. सुरवातीला वाटायचे की वरवरची नवरा बायको ची भांडण होते. पण ती भांडणे मिटण्या ऐवजी वाढतच गेली. भांडण मिटवण्यासाठी ना तीने प्रयत्न केले ना तिच्या नवऱ्याने. मुलं बिचारी या सगळ्याने बावरून गेली होती. शेवटी दोघांनी घटस्फोटा चा निर्णय घेतला. दोघे वेगवेगळे राहू लागले. सारिका कडे दोन्ही मुलं होती ती त्यांना त्यांच्या बापाला भेटी देत नव्हती. कोर्टाने त्यांना घटस्फोट दिला. एक मुल आईकडे आणि एक मुल बापाकडे राहील असा निर्णय दिला.
दोन्ही भावंडांची ताटातूट झाली. मुलीला आईकडे आणि मुलाला बापाकडे ठेवायचा निर्णय दिला. तिच्या घरी जेव्हा जेव्हा मीरा जायची तेव्हा तेव्हा ती मुलगी मला निस्तेज वाटायची. मुला वर लक्ष न दिल्याने मुलगा
पण वाया गेला होता. अशाप्रकारे एक कुटुंब होत्याच नव्हतं झालं. मीरा ला आपलं असं काही होऊ नये वाटत होते. म्हणून तीने तो विषय जास्त वाढवला नाही.
कधी कधी काही गोष्टी वेगळ्या पद्धतीने हॅन्डल कराव्या लागतात.'घेतली सुरी आणि मारली ऊरी 'असं करुन चालत नाही. तसचं हे प्रकरण मीरा आता वेगळ्या च पद्धतीने हॅन्डल करणार होती. मावशी आल्या मुळे तिची दगदग थोडी कमी होत होती.मावशी पण आपलं घर समजून सगळं करत होत्या. मुलाने पण त्यांना कधीच कामवाली सारखं वागवलं नाही.‌त्यामुळे त्या देखील घरचा एक सदस्य च बनल्या होत्या. मुलांच्या तर त्या खूप च फेवरेट झाल्या होत्या. रियाला तर रोज रात्री झोपण्यापूर्वी त्यांच्याकडून स्टोरी ऐकायला फार आवडायचे. त्यामुळे मीरा पण आता बिनधास्त झाली होती.
तीच्या स्टूडिओच काम सुरू झाले होते. त्यात ती बिझी झाली होती. इंटिरिअर तसे पूर्ण झाले होते आता तिला आरसे , चेअर्स, लाईटस् , मेकअप किट वैगरे निवडण्यात तिचा दिवस जात होता.‌हळूहळू स्टुडिओचे सर्व सेट अप झाले. पण मीराने अजून काय चालू केलं नव्हतं. गुडी पाडवा चार पाच दिवसांवर आला होता‌. म्हणून ती त्याच शुभमुहूर्तावर स्टुडिओ च उद्घाटन करणार होती.
सर्व काही व्यवस्थित झाल्यामुळे ती थोडी निवांत बसली होती. मावशी ‌नी तिला ," केसांना तेल लावून देऊ का ताई ?" असे विचारले. तिला ही तेल लावायचेच होते . तर तीने त्यांना हो म्हणून सांगितले.

मीरा आणि मावशी काय बोलतात ते बघूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला ते तुमच्या प्रतिक्रियेतून नक्की सांगा.तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाच्या आहेत. भाग आवडला असल्यास स्टिकर्स द्यायला विसरू नका.