भाग ५
राजीव, " मीरा आता बस झालं. या गोष्टी साठी मी तुझी खूप दा माफी मागितली आहे. "
मीरा, " राजीव साहेब खूप उपकार झाले तुमचे की, तुम्ही माफी मागितली. पण फॉरमॅलिटी म्हणून. तुला पश्चात्ताप झालेला दिसत नाही. मी माझ्या मतावर ठाम आहे. आता मी जे ठरवलं आहे ते मी करणारच. "
राजीव विचार करू लागला. कसं बरं हिला सयजवाव. राजीव ने मग खर्चाचा विषय काढायच ठरवले. कारण जास्ती चा खर्च नको म्हणून मीरा ने आजपर्यंत कधी कामवाली बाई नाही ठेवली. त्याने खर्चाचा विषय दाखवून तिचं काम करण थांबवायचे ठरवले.
राजीव, " मीरा पूर्ण वेळ कामवाली म्हणजे तिचा पगार १०/१५ हजार तरी असणार. ती इथे राहिल म्हणजे तीचा खाण्याचा खर्च आला. परत प्रायव्हेट ट्यूशन टिचर म्हणजे तो एक खर्च आला. तुला स्टुडिओ उभारायचा म्हणजे तो खर्च आला. तू च विचार कर भरपूर खर्च होईल.
मीरा, होऊ दे मग खर्च इतकी वर्षे साठवलं आहे ना मग ते माझ्या उपयोगी पडलं तर बिघडले कुठे? इतरां वरती खर्च करायला पैसा आहे. बायको साठी खर्च केला तर पैसा वाया जाणार आहे असं वाटतं का तुला? इतकी वर्षे पैसा वाचतच होता ना . ते काही नाही माझं मत बदलायचा विचार सोडून दे.
मीरा च मत इतक्या सहजसहजी बदलणार नाही हे तो जाणून होता
मीरा ," अरे हो एक सांगायचच राहील तुला."
राजीव ,"अजून बाकी आहे च का तुझं."
मीरा," हो आहे बाकी, उद्यापासून मी जीम जॉईन करणार आहे तर त्यासाठी पण पैसे लागणार आहेत."
राजीव चडफडतच हो म्हणाला . आता खर्च वाढल्यामुळे त्याला अनया वरचा खर्च कमी करावा लागणार होता. अनयाला तसा पण त्याच्यात काही फार इंटरेस्ट नव्हता. तिचा खर्च जास्त होता . ती तो खर्च राजीव कडून काढत होती.
अनयाला देवाने खुप सुंदर रुप दिलं होतं. गोरापान नितळ रंग, सरळ नाक , उभा चेहरा, गुलाबी ओठ आणि ओठ तर असे जणू गुलाबाच्या पाकळ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिचे. घारे डोळे, केसांचा स्टेप कट केलेला होता.
पण तिच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने लहानपणापासून ती मोठ्या बहिणीचे कपडे वापरायची. तेव्हा तिला काही कळत नव्हतं पण जशी जशी ती मोठी होऊ लागली तिला ते सगळं खलू लागलं. शिकून चांगला अभ्यास करून चांगल्या पगाराची नोकरी करु असे तिला वाटू लागले.पण शिक्षण चांगले झाले तरी नोकरी मिळेना.नोकरी साठी लागणारा वशिला तिला मिळत नव्हता.तिचे आई वडील फार साधे होते. आई शाळेत प्यून च काम करायची आणि वडील रिक्षा चालवायचे.
गरीबी होती म्हणून नातेवाईक पण लांबच राहायचे. त्यामुळे तिला वशिला लावणार कुणी भेटत नव्हते.पण ती हिम्मत हरली नव्हती . परिस्थिती पुढे तिने हार मानली नव्हती.पण हळूहळू तिचा धीर खचत चालला होता . एक दिवस ती अशीच इंटरव्ह्यू द्यायला गेली होती.राजीव पण त्याच्या कामानिमित्त तिथे आला होता. अनया कोणाशी तरी फोनवर बोलत होती.ती समोरच्या ला सांगत होती की, वशिल्या शिवाय काही होत नाही.हे तिचं बोलणं राजीव ने ऐकलं होतं. तिला कामाची खूप गरज आहे. हे त्याने ओळखलं होतं. त्याने तिच्या शी बोलण्याचा प्रयत्न केला.
राजीव," हॅलो मी राजीव ."
अनया," हाय मी अनया"
राजीव," इंटरव्ह्यू साठी आला आहात का? "
अनया," हो."
राजीव," माझ्या ऑफिस मध्ये याल का ? पर्सनल असिस्टंट ची जागा खाली आहे. जर तुमची हरकत नसेल तर. "
अनया," माझी काय हरकत असणार आहे."
राजीव ," हे माझं कार्ड आहे . उद्या ११वाजता माझ्या ऑफिस मध्ये भेटू."
राजीव ने तिला स्वतः च्या ऑफिस मध्ये काम करण्याची ऑफर दिली. तिला गरजच होती नोकरी ची . नोकरी समोरून चालत आल्यामुळे तीने ती हसत हसत स्वीकारली.राजीव चे तीने खूप खूप आभार मानले. त्यामुळे ती त्याच्या उपकारा खाली दबली होती.
राजीव आपल्या सौंदर्या वर फिदा आहे , हे ती जाणून होती. तिच्यासाठी राजीव म्हणजे सोन्याचं अंडं देणारी कोंबडी होता.
अनया राजीव च्या ऑफिस मध्ये गेल्यावर काय होते ते बघुया पुढच्या भागात.
हा भाग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाच्या आहेत.