भाग – ५
संध्याकाळ होणार होती आणि सगळ्यांना ऑफिसची सुट्टी झाली होती. मितालीचा परिपूर्ण लक्षात होते कि तिला ऑफिस नंतर बागेत जायचे आहे, कारण सुमित तिची बागेत वाट पाहणार आहे म्हणून. तर मिताली तिचा सीटवरून उठली आणि तिने थेट सुमितचा केबिनकडे नजर वळवली. तर तिला तेथे काहीच हलचल दिसली नाही. घरी जाण्याची वेळ झाली म्हणून ती ऑफिसचा बाहेर निघतांना मुद्दामून सुमितचा कॅबीन जवळून आली. काय बघते तर सुमित आधीच निघून गेलेला होता. मिताली हि आता लगबगीने ऑफिसचा बाहेर निघाली. तिचा बरोबरचा मित्र मैत्रिणी तिला बस स्टँड जवळ चालण्यास म्हणू लागले. तर मितालीने त्यांना मला काही काम आहे जवळच म्हणून दांडी मारली. मितालीने मग बस स्टॉप कडे न जाता थेट बागेकडे वळली आणि गेली. ती जशी बागेचा गेटचा आत शिरली तिला सुमित दिसला. सुमित एका मोठ्या वृक्षाचा खाली बसला होता.
ती मग लगबगीने त्या वृक्षाचा अर्थात सुमितचा जवळ गेली. मिताली तेथे जाऊन मात्र थोडी स्थिरावली आणि हळूच सुमितचा पाठीमागे पाठ करून बसली. सुमित मितालीचा येण्याचा प्रतीक्षेत गुंग होता. छान झुर झुर वारा सुटलेला होता आणि सुमितचा नाकात तोच ओळखीचा सुगंध आला. तो सुगंध नाकात जाता बरोबर सुमितची गुंगी तुटली आणि तो शुद्धीवर आला. त्याने ओळखले होते कि तो सुगंध त्याच पर्फ्यूमचा आहे आणि सुमित समझला कि मिताली आली आहे. त्यानंतर सुमित अनयास बोलला, “ आलीस तू !” मग मिताली हि बोलली, “ हो आले मी.” ती पुढे बोलली, “ तू मघाशी येतांना मला तुने माझ्या प्रेमाची शप्पथ दिली होतीस आणि मग तर मला येणे होतेच.” मग सुमित बोलला, “ मग अशी मागे का बसलीस, पुढे येना.” मग मिताली म्हणाली, “ नको मी इथेच बरी आहे आणि तुला काय बोलायचे आहे ते तेथूनच तू बोल.”
मग सुमितने बोण्यास सुरुवात केली, “ मिताली मी सगळ्यात आधी तुझी क्षमा मागतो मी असे वागायला नको होते. मी त्या दिवशी त्यावेळेस स्वतःला आवरायला पाहिजे होते.” रागाचा भारात मी त्या वेळेस तुला आणि तुझ्या आईला काही असे वाईट बोललेलो नव्हतो. फक्त माझे पुरुषत्व आणि माझा आवाज जरा जास्त उंच तळावरती गेले होते. तो पुढे म्हणाला, “ मिताली, I Love You मी पूर्वीसारखाच तुझ्यावर आजही आणि आताही प्रेम करतो. मी तुझ्या वीन राहणेच काय तर मी तुझ्या विन जगू शकत नाही. तुला तर नक्की माहित असेल कि मी कसा जगतोय. तू घर सोडून गेलीस तेव्हापासून मी तुला न जाने किती कॉल केले. तू माझा कॉल उचलत नव्हती तर मी आणखीच बेजार होऊन पुन्हा पुन्हा तुला कॉल करत रहायचो. परंतु शेवटी स्थिती मात्र तीच No Answer.
तेव्हा थकून हारून मी तुला कॉल करने बंद केले. एकतर तू मज डोळ्यांना दिसत नव्हतीस आणि दुसरे तुझा आवाजही माझ्या कानावर पडत नव्हता. त्यामुळे मी फार वेडा होऊन गेलो होतो. अग मी त्यावेळेस मोबाईल मधील आपल्या दोघांचे व्हिडीओ बघून मी तुला बघण्याची आणि तुझा आवाज ऐकण्याची तहान भूख भागवत होतो. एकवेळेस तर माझ्या मनात हा विचार आला होता कि, तू ज्या आयुष्यात नाहीस तर ते आयुष्य जगण्यात काय अर्थ आहे, तर संपवून टाकावे ते आयुष्यच. परंतु काही क्षणात तुझ्या विचार आला आणि आपल्या निस्वार्थ प्रेमावर माझा दृढ विश्वास होता म्हणून मी आजवर तुझी प्रतीक्षा करतो आहे.”
मग सुमित मितालीचा समोर गुडघ्यावर बसून बोलला, “ मिताली तू पुन्हा माझ्या आयुष्यात आणि माझा घरात येणा . आता माझा धीर फारच खचून गेला आहे, आणि माझी उत्कंठा आता अधिकच अनावर झाली आहे. म्हणून शेवटचे तूला सांगण्यासाठी मी तुला बोलावले आहे. आता जरी तू परत आली नाहीस तर मला कधीच या जगात बघू शकणार नाही.” म्हणून सुमित ढसाढसा अक्षरशा रडू लागला होता. इकडे मिताली जेव्हापासून तेथे आली आणि आतापर्यंत सुमित जे काही बोलला ते ऐकत ऐकत फक्त आणि फक्त रडत होती. मितालीकडून काही प्रतिसाद नाही आला म्हणून सुमित थांबला. त्याने स्वतःला सावरले आणि त्याचे अश्रू पुसले. तर त्याला मितालीचा रडण्याचा आवाज ऐकू आला. सुमितने मान वर करून मितालीकडे बघितले तर ती सुद्धा ढसाढसा रडत होती. सुमितने ओळखले आणि तो समजला कि हा पश्चात्ताप आहे जो मितालीला हि आता होत आहे. मग सुमित मितालीला बोलला, “ रडून घे मिताली मनमोकळेपणाने रडून घे. म्हणतात कि रडल्याने मनावरील बोझ, ताण कमी होतो म्हणून तू मनसोक्त रडून घे. ”
शेष पुढील भागात ............