Aatmahatyes kaaran ki... - 4 in Marathi Short Stories by Shalaka Bhojane books and stories PDF | आत्महत्येस कारण की.... - 4

Featured Books
  • ભીતરમન - 58

    અમારો આખો પરિવાર પોતપોતાના રૂમમાં ઊંઘવા માટે જતો રહ્યો હતો....

  • ખજાનો - 86

    " હા, તેને જોઈ શકાય છે. સામાન્ય રીતે રેડ કોલંબસ મંકી માનવ જા...

  • ફરે તે ફરફરે - 41

      "આજ ફિર જીનેકી તમન્ના હૈ ,આજ ફિર મરનેકા ઇરાદા હૈ "ખબર...

  • ભાગવત રહસ્ય - 119

    ભાગવત રહસ્ય-૧૧૯   વીરભદ્ર દક્ષના યજ્ઞ સ્થાને આવ્યો છે. મોટો...

  • પ્રેમ થાય કે કરાય? ભાગ - 21

    સગાઈ"મમ્મી હું મારા મિત્રો સાથે મોલમાં જાવ છું. તારે કંઈ લાવ...

Categories
Share

आत्महत्येस कारण की.... - 4

भाग ४
जेव्हा बाबांना हे समजले तेव्हा त्यांना फार वाईट वाटले.मिताली च्या आईला म्हणाले, "अगं, तू मला एकदा सांगायचे तरी होते. जेव्हा तीला आपल्या आधाराची गरज होती. तेव्हा च जर आपण तिच्या पाठीशी उभे नाही राहणार तर कधी राहणार. आपल्या मुलीचे लग्न झाले म्हणून ती इतकी परकी झाली का ❓ आपल्याला.समाज काय बोलेल याचा विचार करून तू गप्प बसतील, तिच्या जीवा पेक्षा जास्त आहे का तूला समाज . आता जर मिताली ला काही झाले ना? तर तोच समाज तुला टोचून बोलेल की, "माहिती होत तरी त्याच्यावर काही मार्ग काढला नाही. किती मानसिक त्रास सहन केला असेल माझ्या मिताली ने. किती एकटी पडली असेल ती. "असे म्हणून मिताली चे बाबा रडू लागले.
रात्र गेली तरी मिताली काही शुद्धीवर आली नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी च डॉक्टरांची धावपळ सुरू झाली. ते बघून सगळे च घाबरले. डाॅक्टरांनी तन्मय ला बोलवले आणि सांगितले की, मिताली आता शुद्धित आली आहे आणि तिची प्रकृती आता स्थिर आहे. तन्मय लगेच तिला भेटण्यासाठी जाऊ लागला. पण डॉक्टरांनी त्याला सांगितले की, आधी पोलीस तिला भेटतील मग इतर सगळे भेटू शकतात. डॉक्टरांनी पोलिसांना कळवले. पोलीस लगेच च आले आणि मिताली चा जबाब नोंदवण्यासाठी आत गेले. हे बघून तन्मय च्या आईचे धाबे दणाणले.
मिताली शुद्धीत आली तेव्हा ती हॉस्पिटल मध्ये होती. समोर नर्स होती. तिने मिताली ला शुद्ध आलेली बघून डॉक्टरांना बोलावले. डॉक्टरांनी तिला तपासले तीची प्रकृती आता स्थिर वाटत होती. म्हणून त्यांनी पोलिसांना बोलावले पोलीस आले आणि मिताली चा जबाब नोंदवू लागले. मिताली ने पोलिसांना सर्व थोडक्यात सांगितले. मानसिक त्रास दिल्याबद्दल तन्मय च्या आई विरोधात तक्रार नोंदवली.
त्याप्रमाणे पोलिसांनी तन्मय च्या आईला अटक केले. तन्मय या सगळ्या प्रकाराने भांबावून गेला. तन्मय चे वडील लगेच वकिला कडे निघाले. तन्मय ने मिताली ला भेटण्यासाठी डॉक्टरांना विनंती केली. पण तिला आरामाची गरज आहे जास्त त्रास झाल्यास तिची तब्येत बिघडू शकते, असे डॉक्टर म्हणाले. मिताली च्या प्रकृती त सुधारणा झाल्यामुळे तिला जनरल वाॅर्ड मध्ये शिफ्ट केले. मिताली आई आणि वडील तिच्या बरोबर होते. पण का माहिती नाही आई वडिलांना बघून पण मिताली आनंद झाला नाही. आपण खूप एकटे पडलो आहोत. ही जाणीव सतत होत होती.
मिताली त्यांच्या शी फार काही बोलली नाही. आई बाबा तिची फार काळजी घेत होते. बाबा बोलले, " पोरी मी तुझा फार मोठा अपराधी आहे. "मिताली फक्त एवढेच बोलली, " बाबा हे माझ्या प्रारब्धाचे भोग आहेत. " थोड्या वेळाने तन्मय तिला भेटायला आला.तन्मय ने तिला विचारले कशी आहेस मिताली? का केलास तू असं माझा जरापण विचार नाही आला का तुला? "
" तुझा विचार ? आला ना खूप दा आला. तुझा विचार करून च मी इतके दिवस गप्प होते. तूझ्या आनंदासाठी मी माझा जाॅब पण सोडला. वाटले आता सगळे चांगले होईल पण नाही झाल उलटं तुझी आई खूष होण्याची ऐवजी मला जास्त च ओरडू लागली. मी तुला कितीदा सांगण्याचा प्रयत्न केला पण तू काही ऐकून च घेतल नाही स. तू फक्त मुलगा म्हणून तुझ्या आईला खूष ठेवण्याचा प्रयत्न करत होतास. माझी किंमत तुझ्या नजरेत काय आहे ते आता मला कळले आहे. त्यामुळे यापुढे मी तुझ्या बरोबर राहू शकत नाही. डिवोर्स चे पेपर मी बरी झाले की तुला पाठवून देईन. मिताली आता तू फार रागात आहे स. आपण या विषयावर नंतर बोलूया.
मिताली ने त्यावर काहीच उत्तर दिले नाही.
निशा शी बोलायला एक समुपदेशक आली . तिचे नाव होते सुलभा. तिने मिताली शी बोलायला सुरुवात केली. " तिने मिताली ला आपली ओळख करून दिली. हाय , कशी आहेस? " बरी आहे आता. पण मला फार उदास वाटत आहे. एकटे पडल्यासारखे वाटत आहे. शिक्षण किती झालयं तुझं? माझं शिक्षण बी. कॉम पर्यंत झाले आहे. त्यानंतर मी डी टि पीचा कोर्स केला होता. मिताली काय वाटतय जे तूझ्या मनात आहे ते मला तू विश्वासाने सांगू शकतेस यावर मार्ग काढण्याचा आपण नक्की च प्रयत्न करू. तुझे मन पण हलके होईल. निशा सांगू लागली, " अनय मला ऑफिस मध्ये भेटला. अनय वर माझे खूप प्रेम होत. त्याच्याशी लग्न झाल्यावर तर मी खूप च खूष झाले. सगळे माझ्या मनासारखे झाले होते. पण असे मला वाटत होते. सगळे छान चालू होते. पण सासूबाईंना काय झाले काय माहित? त्या सतत माझ्या चूका काढू लागल्या. मी कामाला जाते त्यामुळे त्यांना किती काम पडते आहे या वयात. हे सतत तन्मय ला सांगू लागल्या. कामवाली ठेऊ म्हटलं तर ते पण नको होते.
त्यांच्या एकुण वागण्या वरुन मी हे समजून चुकले की,मी त्यांना आवडत नाही . त्यांच्या साठी मी माझा जॉब पण सोडला. कारण त्यावरून माझी आणि तन्मय चे सतत भांडणे होऊ लागली होती. मी खूपदा प्रयत्न केला त्याला सांगण्याचा पण तो काही ऐकूनच घेत नव्हता. मी आईला हे सांगण्याचा प्रयत्न केला पण तीने ही मला समजून घेतले नाही.पण त्या दिवशी भांडण झाले तेव्हा तन्मय ने माझ्या कानाखाली मारली. ज्या माणसाने लग्नात माझी पदोपदी साथ देईल हे वचन दिले होते. त्याने एकदा पण माझी बाजू समजून घेतली नाही. त्यामुळे मला काही सुचेना. मी खूप एकटी पडले आहे. असे बोलूू मिताली रडायला लागली.
सुलभा मिताली ला म्हणाली, "तु खूप मोठी चूक केलीस. ह्या तून काही ना काही मार्ग नक्की च निघाला असता. असो जे झाले ते झाले. तू पहिली जीथे करत होतीस तसा जाॅब शोध आणि आपल्या पायावर उभी रहा. स्वत:ला सिद्ध करून दाखव.स्वत:साठी जग. "

सुलभा च्या बोलण्याचा मिताली वर काही परिणाम होईल का ❓ मिताली काय निर्णय घेते?. बघूया पुढच्या भागात.