Nilya Aakashanch Swapn - 8 in Marathi Moral Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | निळ्या आकाशाचं स्वप्नं - भाग ८

Featured Books
  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

  • मोमल : डायरी की गहराई - 47

    पिछले भाग में हम ने देखा कि फीलिक्स को एक औरत बार बार दिखती...

  • इश्क दा मारा - 38

    रानी का सवाल सुन कर राधा गुस्से से रानी की तरफ देखने लगती है...

Categories
Share

निळ्या आकाशाचं स्वप्नं - भाग ८

निळ्या आकाशाचं स्वप्नं भाग ८


मागील भागात आपण बघीतलं की पंकजने राजेश कडून दत्तक प्रक्रियेसाठी कराव्या लागणाऱ्या गोष्टी समजून घेतल्या.

आता पुढे काय होईल ते बघू


राजेश ने सांगितल्याप्रमाणे पंकजने काराच्या साईटवर जाऊन नाव रजीस्टर केलं आणि त्यांच्या गावात असलेल्या दोन दत्तक केंद्रापैकी ' माऊली' या केंद्राचं नाव निवडलं.


दोन दिवसांनी माऊली या दत्तक केंद्रामधून पंकजला फोन आला


" हॅलो"


" पंकज बोलताय?"


" हो."


" तुम्ही बाळ दत्तक हवंय यासाठी काराच्या साईटवर नाव रजीस्टर केलंय?"


" हो मॅडम. दोन दिवसांपूर्वी केलंय."


" तुम्ही आमच्या ऑफिसमध्ये येऊन सगळी कागदपत्रं जमा करा."


" काय लागेल?"


" हा तुमचा व्हाॅट्स ॲप चा नंबर आहे का?"


" हो." पंकज म्हणाला.


" ठीक आहे. मी या नंबरवर कोणती कागदपत्रे हवीत यांची यादी पाठवते. ती घेऊन तुम्ही दोघं ऑफिसच्या अकरा ते पाच या वेळेत या."


" ठीक आहे. मॅडम शनिवारी आपलं ऑफीस चालू असतं का? शनिवारी मला सुट्टी असते."


" हो.चालू असतं."


" या शनिवारी आम्ही दोघं येऊ. येताना सगळी कागदपत्रं घेऊन येतो."


" ठीक आहे."


"माधवी या शनिवारी आपण सगळी कागदपत्रं घेऊन माऊलींच्या ऑफीसमध्ये जायचयं.त्या मॅडमचा फोन आला होता."


" हो जाऊ या. मला आता कधी एकदा बाळ आपल्या घरी येतं असं झालंय."


" मलासुद्धा. शपण राजेश म्हणाला की काही दिवस म्हणजे एखाद वर्ष वाट बघावी लागते. त्याची तयारी ठेव. आज आपण आपलं नाव रजीस्टर केलंय म्हणजे उद्या लगेच बाळ आपल्या घरी येईल असं समजू नकोस."


माधवीला पंकजने हळुवारपणे सांगीतलं. पंकजला माधवीचा स्वभाव माहिती होता. ती मनाने फारच हळवी आहे आणि आता बाळासाठी खूपच आतूर झाली आहे.


" पंकज तू काळजी करू नकोस. मी धीर धरेन तेवढा. डाॅक्टरांकडे उपचार घेत असताना नाही का धीर धरला? आताही धरीन. डाॅक्टरांकडे उपचार घेत असताना कधी आपल्याला बाळ होईल हे माहिती नव्हतं पण कारा च्या साईटवर आपलं नाव रजीस्टर केल्यावर काही महिन्यांनी किंवा वर्षभराने बाळ आपल्या घरी येईल याची खात्री आहे. "


हे बोलून माधवी पंकजकडे बघून हसली. किती दिवसांनी पंकजने माधवीला असं हसताना बघीतलं. त्याच्याही चेहे-यावर हसू उमटलं.


***

आज पंकज खूप दिवसांनी निश्चिंत मनाने ऑफिस मध्ये गेला.


शनिवारी पंकज आणि माधवी दोघेही माऊली च्या ऑफिस मध्ये सगळी कागद पत्र घेऊन गेले.


" या"


माऊली ऑफिस मधील मॅडमने दोघांना बसायला सांगितलं.


खुर्चीवर बसताच पंकजने सगळी कागद पत्र मॅडमच्या समोर ठेवली.


मॅडम ने ती कागदपत्र बघितली आणि त्यांच्या फाईल मध्ये लावून ठेवली.


" आज ही कागदपत्र पुन्हा एकदा नीट बघून घेईन. काही नाही असं जर वाटलं तर तुम्हाला फोन करीन. "


" मॅडम साधारण किती वेळ लागतो या सगळ्या प्रोसिजरला?"


न राहून माधवी ने मॅडम ना विचारलं.


" कागदोपत्री सगळे सोपस्कार पूर्ण व्हायला फारतर एक महिना लागेल पण बाळ तुमच्या घरी येण्यासाठी वाट बघावी लागेल."


" किती?"


" मला तुमची घाई कळतेय पण तुम्हाला मॅच होईल असं बाळ आम्ही बघतो. तुम्हाला मुलगा हवा की मुलगी?"


" काही चालेल."


" मुलगा हवा असेल तर वाट बघावी लागते.‌मुलगी हवी असेल तर एवढी वाट बघावी लागत नाही."


" असं का?" पंकज ने विचारल.


" मुलगा हवा म्हणणारे बरेच असतात. मुलींना दत्तक घेणारे फार कमी असतात."


" आम्हाला मुलगीच हवी आहे. मुलीचं प्रेम वेगळंच असतं."


माधवी म्हणाली. थोडंसं हसून मॅडम म्हणाल्या,


" तो कॉलम भरतेय आता. तुमचा फोटो याकरिता घेतला की तुमच्या रंगाशी मिळताजुळतं बाळ आम्ही तुम्हाला देऊ."


" ठीक आहे आम्हीं निघू?" पंकजने मॅडम ना विचारलं.


" हो सगळी कागद पत्र आता जमा केली आहेत.आता आम्ही तुम्हाला वेळोवेळी कळवत जाऊ.काही दिवसांनी तुम्हाला भेटून त्या भेटीबद्दल काराला कळवावे लागतं. याला संस्थेकडून फाॅलो अप घेणं म्हणतात. तुम्हाला काही अडचण आली तर आम्हाला फोन करा आम्ही ती अडचण दूर करण्याचा प्रयत्न करू."

मॅडम म्हणाल्या.


" आम्ही निघू? " पंकजने विचारलं.


" हो." मॅडम म्हणाल्या.


पंकज आणि माधवी माऊली संस्थेतून बाहेर पडले तेव्हा मनात एक आनंद घेऊन बाहेर पडले. पंकजही मनातून खुप आनंदी झाला कारण बाळासाठी करावी लागणारी प्रतीक्षा आता थोडक्या दिवसांवर आली होती.


पंकज माधवीचा चेहेरा न्याहाळीत होता. माधवीचा चेहेरा आनंदाने निथळत होता. बाळाची असोशी तिला गप्प बसू देत नव्हती. घरी पोचेपर्यंत माधवी म्हणायला पंकज बरोबर होती पण खरतर ती स्वतःच्याच आनंदात मशगुल होती.


माधवी गाडीवर बसल्या बसल्या स्वतःशीच हसली. पंकजने आरशात तिला हसताना बघीतलं.


माधवी येणा-या बाळाच्या भावविश्वात रमून गेली आणि पंकज? तो माधवीचा प्रफुल्लित चेहरा बघण्यात दंग झाला.

_______________________________

माऊली संस्थेचत पंकज आणि माधवी यांना बाळ हवंय असं रजीस्टर झालंय आता बाळ पंंकज आणि माधवीच्या आयुष्यात कधी येतं बघू.