"बाबा...! बाबा...अहो उठा ना...बघा किती वाजलेत? आज तुम्ही मला बागेत जायचं म्हणून प्रॉमिस केलेलं ना..? मग उठा ना." लहानशी चिऊ तिच्या झोपलेल्या बाबांना उठवत होती.
"चिऊ, उठ बरं तिथून बाबांना त्रास नको देऊ, ते काल रात्री उशिरा दमून आलेत झोपू दे त्यांना. चल बरं पटकन,मी तुला अंघोळ घालते."
वैदही आपले केस पुसत म्हणाली.
"नाही... मी नाही येणार, अगं मला बाबांनी काल प्रॉमिस केलंय..." "काय चाललंय सकाळी सकाळी तुम्हा दोघींचं?"
वैदही काही बोलणार इतक्यात शिव डोळे चोळत उठून बसला.
"Good Morning बाबा..." चिऊ पटकन शिव च्या मिठीत शिरली.
"Good Morning पिल्लू.." शिव तिला कुशीत घेत बोलला.
"बघा ना बाबा तुमची बायको मला कशी बोलतिये सकाळी सकाळी." चिऊ शिव च्या गळ्यात आपले चिमुकले हात गुंफत म्हणाली.
"क्काय म्हणालीस?,इकडे ये तुला बघतेच आता मी थांब." वैदही तिच्याकडे येत म्हणाली.
"बाबा वाचवा...!" चिऊ शिवला अजूनच बिलगली.
" ए वैदू शांत हो. अगं लहान आहे ती,तीच्यावर कशाला रागवतियेस?" शिव वैदही ला अडवत म्हणाला."चिऊ जा बरं ब्रश करून घे मी आलोच."
"Thank you बाबा"
चिऊ शिवचा मुका घेत बेडवरून टुणकन उडी मारून पळाली.
"अगं सावकाश पडशील..."
"बघितलत? काही लहान बिहान नाहीये, तुमच्या लाडामूळे बिघडलिये ती आणि मी तुम्हाला सांगते हिला आताच वळण लावायला पाहिजे...."
"Statue..." शिव पटकन वैदहिकडे बोट करत बोलला,
आणि वैदहिसूद्धा चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह घेऊन अचानक स्तब्ध झाली.
" बघ बरं चेहऱ्यावर कित्ती राग साचलाय?" शिव स्तब्ध झालेल्या वैदहीच्या गळ्यात हात गुंफत बोलला.
"मी असं ऐकलंय की सारखं सारखं असा चेहऱ्यावर राग ठेवल्यानं सुंदर स्त्रिया लवकर म्हाताऱ्या होतात." शिव लाडीकपणे तिला जवळ ओढत म्हणाला.
"हो का?, आणि आमच्या smart नवरोबांना ही जगावेगळी माहिती कोणी सांगितली?" वैदही नॉर्मल होत म्हणाली. "कोणी कशाला सांगायला हवी? सग्गळं काही माहिती असतं तुझ्या नवऱ्याला." दोघे अजूनच जवळ आले..." बाबा कुठे आहात? या ना पटकन किती उशीर?" चिऊ चा बाथरूम मधून आवाज आला, आणि दोघे दचकून वेगळे झाले."जा, आधी अंघोळ करून या. बाईसाहेबांना काल प्रॉमिस केलंय ना? आज माझ्या आधी उठून बसलीये ती. नाहीतर आख्खं घर डोक्यावर घेईल ती" वैदही हसत म्हणाली,"आईचे गुण जसेच्या तसे उचललेत दुसरं काय?"
"काय म्हणालात?"
"कुठे काय...? काहीच नाही"
"अस्सच घाबरायचं मला"
"न घाबरून सांगतोय कुणाला?"
वैदही मोठ्याने हसायला लागली,आणि शिव सुद्धा हसायला लागला.
थोड्या वेळात शिव आणि चिऊ दोघे अंघोळ आटपून breakfast ला बसले इतक्यात शिव चा फोन खणानला, अनिश चा कॉल पाहून शिव थोडा चकित झाला.त्याने कॉल रिसिव्ह करून कानाला लावला"हा बोल अनिश, ... अच्छा बाकी अजून काही सांगितलं का त्यांनी ? " शिवचा चेहरा थोडा गंभीर झाला."बरं ठीक आहे मी दहा मिनिटात पोहोचतोय तिथे.हो...हो दोघे सोबतच जाऊ, ok bye."
"काय हो काय झालं?"
शिवच्या एकंदर बोलण्यावरून वैदही समजलीच होती पण तरीही मनाची समजूत घालण्यासाठी ती विचारत होती.
" अगं काही नाही, एक छोटंसं काम आलंय,म्हणूनच फोन केलेला अनिश ने ,बाकी काही नाही. बरं मला जावं लागेल urgent,ठीके? "
"अहो!, पण आज तर रविवार आहे ना?" वैदही थोडीशी खट्टू होऊन बोलली."अगं सांगितलं ना वैदू, काम आहे छोटंसं. "
"नक्की Serious काही नाहीये?"
"हो वैदू...."
वैदही ला का कोणास ठाउक असा वाटत होतं की शिव तिच्या पासून काहीतरी लपवत आहे.
"बरं ऐक मी चिऊला बागेत नाही घेऊन जाऊ शकणार तू जा ठीके?" शिव.
"तुम्हाला वाटतंय ती येईल तुमच्याशिवाय?"
"काही नाही, येईल ती, मी समजावते तिला."शिव तयार होत बोलला.
"बाबा काय झालं?"
चिऊ शिवजवळ येत बोलली
" अगं काही नाही चिऊ actually ना मला एक छोटंसं काम आलंय मी लग्गेच ते करून येतो. ok?"
म्हणजे तुम्ही माझ्यासोबत बागेत नाही येणार?"चिऊ खट्टू होऊन म्हणाली.
"Sorry पिल्लू , अगं मी नाही येऊ शकणार पण आई आहे ना तिच्या सोबत जा तू ठीके? खूप मज्जा करा दोघी मस्त."
"पण तुम्ही प्रॉमिस केलं होतं ना?"चिऊ रडकुंडीला येत म्हणाली.
"अगं वेडी आहेस का तू? असं रडतं का कोणी ? मी अस्सा जातो आणि अस्सा येतो. पक्कावाला प्रॉमिस."
शिव चिऊ ला उचलून घेत तिचे डोळे पुसत म्हणाला.
"पक्कावला प्रॉमिस" चिऊ हसत बोलली
"Good girl"
शिव तिचा मुका घेत म्हणाला आणि पटकन बाईकची चावी घेऊन घराबाहेर जायला निघाला.
का कोणास ठाउक पण वैदहीला राहून राहून वाटत होतं की काहीतरी शिव लपवतोय.ती तशीच काळजीने दरवाजाकडे जाणाऱ्या
शिवाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिली तो जाऊ पर्यंत.
क्रमशः