भाग ४.
स्थळ:- बागा बीच, गोवा. आज पृथा आणि प्रलय आई बाबांना घेऊन बीचवर आले होते. थोडेसे चेंज मिळावे त्यांना आणि एन्जॉय देखील करुया! थोड या विचाराने, ते आले होते. पृथा आणि प्रलय एकमेकांसोबत एन्जॉय देखील करतात.
"प्रलय, मी जरा जाऊन येते. मला ना ते मक्याचे कणीस खूप आवडत. त्यामुळे मी ते आणायला जाते", पृथा एका गाडीकडे पाहून म्हणाली. एका छोट्याश्या जागेत एक व्यक्ती एका मोठ्या अश्या भांड्यात कोळसे टाकून मक्याचे कणीस भाजत होता. ते पाहून इकडे तिच्या तोंडाला पाणी सुटते.
"मी पण येतो तुझ्यासोबत. बाबा आई तुम्ही थांबतात की येतात?", प्रलय आई वडिलांना पाहून विचारतो.
"प्रलय, मग तुम्हीच जाऊन घेऊन या! मी इथेच थांबते.", पृथा बाबांच्या चेअरला पकडत हसून म्हणाली. तसा प्रलय एकवार तिला पाहून हसूनच त्या मक्याचे कणीस भाजत बसलेल्या व्यक्तीकडे जातो.
"पृथा, तुझ्यामुळे आमचा प्रलय बदलला हां. नाहीतर त्याला फक्त कामच दिसत असायचं. आता मात्र, तो सगळीकडे लक्ष घालत असतो.", प्रलयची आई प्रलयच्या दिशेला पाहून म्हणाली. त्यांचे बोलणे ऐकून ती गालात हसते.
"आई काहीपण हां. तुमचा मुलगा आहे तसाच आहे! हा, आता आधीसारखे माझ्यासोबत वागत नाही. चांगले वागत आहेत. हेच बस आहे माझ्यासाठी!",पृथा.
"चूऽऽ चूऽऽ, काय परिस्थिती आली आहे पृथा तुझ्यावर? खूप वाईट वाटत बघ मला.",एक आवाज त्यांच्या शेजारी येतो. तसे, त्या तिघांचे लक्ष त्या दिशेला जाते.
"अंकिताऽऽ, तू इथे?",पृथा काहीशी नॉर्मल टोन मध्ये बोलते. पण तिचे बोलणे ऐकून ती मात्र कुत्सितपणे हसते.
"बर झाल मी त्याला सोडलं. नाहीतर मला अश्या त्याच्या अपंग वडिलांना सांभाळावे लागले असते. तू माझ्यासारखं एखाद्या बिझनेसमन सोबत लग्न केलं असत ना? तर ही परिस्थिती नाही आली असती तुझ्यावर. आता देखील नवरा बाहेरच असतो ना? हे नेव्ही वाले असेच असतात. यांना बायको फक्त त्यांच्या आईवडिलांना सांभाळायला हवी असते! मी तर म्हणते अश्या माणसांसोबत लग्न कोणत्याही मुलीने न केलेलं बर. कोण बाई रिस्क घेणार ना? अस तर सुख देत नाही. पण मेल्यावर मात्र आम्हाला वेगवेगळ्या प्रॉब्लेमला फेस करावे लागते यांच्यामुळे. या सगळ्याचा विचार करून मी प्रलयच प्रपोजल नाकारलं. त्याचं आधीपासून माझ्यावर प्रेम होत....", अंकिता आणखीन काही बोलणार या आधीच एक सणसणीत वार तिच्या गालावर होतो. पृथाची पाचही बोट तिच्या गोऱ्या चेहऱ्यावर उमटतात. अंकिता गालावर हात ठेवून समोर पाहते. तर पृथा रागात तिला पाहत असते.
"ऐकून घेते आहे? म्हणजे काहीही बोलत सुटायच नाही अंकिता! तू काय ग मला ज्ञान शिकवत आहेस? स्वतःकडे नीट बघ आधी. मी एका सैनिकाची पत्नी म्हणून समाजात चांगल्या प्रकारे वावरू तरी शकते. तो मान कोणालाही मिळत नाही! एका वाघिणीला मिळत असतो. माझ्या नवऱ्याने का लग्न केलं? हे मी पाहत नाही. उलट मला त्याच्या घरात राहायला मिळत. त्यांच्या आईवडिलांची सेवा करायला मिळते ना? याला मी स्वतःचे भाग्य समजते. कारण ते देशसेवा करतात. त्यांच्या घरात मी आहे म्हणून ते निश्चिंत राहतात! मला प्रलयने मानाने कसे राहावे? स्वतःची ओळख करून दिली आहे. आज माझ्या नावासमोर त्यांचे नाव आहे. हे, पाहून मी आनंदी होत असते. माझ्या आई बाबांना तू बोलली ना? म्हणून ही कानाखाली ठेवली. आणखीन काही बोलली असती? तर तोंड दाखवायला लाज वाटली असती, अशी हालत केली असती मी.", पृथा रागात म्हणाली. तिला कोणी काही बोलले? तर ती सहन करत असायची. पण तिच्या सासू सासऱ्यांबद्दल कोणी काही बोलले? तर मात्र ती खपवून घेत नसायची.
अंकिता एक नजर पृथा वर आणि आई बाबांवर टाकून तिथून जात असते की तेवढ्यात प्रलयची आई तिचा हात धरते.
"ही आहे प्रलयची चॉईस. हे, तुझ्या ध्यानात ठेव!", प्रलयची आई पृथाकडे पाहून हसून म्हणाली. तशी अंकिता त्यांचा हात काढून तिथून तणतणत निघून जाते. प्रलयचे आईवडील मात्र पृथाकडे पाहत राहतात.
"हे, घ्या तुमचं कणीस! काय भारी हात बसला आहे तुमचा तिच्यावर. मला हे आवडल.", प्रलय तिथं येत तिच्या हातात कणीस पकडवत म्हणाला. तो एक एक कणीस आपल्या आईवडिलांना देखील देतो.
"तुम्ही बघितल तर. इट्स ओके. तसही मला नाही आवडत ती. पण आजपासून तर मनातून उतरली ती. माझ्या आई , बाबांना आणि नवऱ्याला काहीही बोलते ना? दाखवूनच दिलं असत तिला. पण झेपल नसत म्हणून सोडून दिले.", पृथा हक्क दाखवत म्हणाली. तिच हक्काने बोलणेच पाहून त्याच्या फॅमिलीला आणि त्याला एक वेगळच समाधान मिळत.
"आता निघू या का? रात्र होत आली आहे.", प्रलयचे बाबा म्हणाले.
"हो. चला जाऊ बाबा.", पृथा बाबांना पाहून म्हणाली. तसे सर्वजण आपले घरी जायला निघतात. पृथा आणि प्रलय बाबांना स्वतःच्या मदतीने गाडीत बसवतात. काही मिनिटात ते तिथून आपली गाडी घेऊन जातात.
***********
स्थळ: विशाखापट्टणम
२००८ ला झालेल्या मुंबई दहशतवादी हल्ल्यामुळे समुद्राची कमान भारतीय नौसेनेच्या हातात सोपवली गेली. त्यामुळे समुद्रात पहारा, गस्त खूप मोठ्या प्रमाणावर भारतीय नौसेनाचा असायचा. आयसिजी म्हणजेच इंडियन कोस्टल गार्ड हे देखील नेव्हीच्या हाताखाली काम करत असायचे. यांना देखील काही ठिकाणी सुरक्षा राखण्यासाठी हाताशी घेण्यात आले. भारतीय नौसेना मुख्यतः तीन विभागांत काम करत असते. वेस्टर्न नेवल कमांड, ईस्टर्न नेवल कमांड आणि दक्षिण नेवल कमांड.वेस्टर्न नेवल कमांड चे मुख्यालय मुंबईत आहे. ईस्टर्न चे मुख्यालय विशाखापट्टणम, तर दक्षिणच कोची या ठिकाणी आहे.
विशाखापट्टणमला आज चीफ ऑफ नेवल स्टाफ म्हणजेच ऍडमिरल सर मोहन रावत आले होते. यांच्या अध्यक्षतेखाली पूर्ण इंडियन नेव्ही काम करत असायची. ते जसे सांगत असायचे? तसे काम सर्व ऑफिसरला करावे लागत असायचे. मोठ्या अधिकारी लोकांसोबत त्यांनी समुद्र सुरक्षासाठी मीटिंग बसवली होती. मीटिंग रूममध्ये सर्व ऑफिसर आपले आपले विचार त्यांना सांगत असतात.
"सर, चीन का हमे हिंद महासागर मे घेर ने का ख्याल चालू है! उनके बडे बडे जहाज और सैनिक लगातार नापाक हरकत करते रहते है।",एक मेन सिनियर ऑफिसर विचार करत म्हणाला.
"इंडोनेशियाने व्यापार के लिये हमारी हेल्प मांगी है। तो हम उन्हे परमिशन देकर चीन को वहां से हटा सकते हैं! कुछ ही दिन में भारत के पास तगडे शस्त्र आ जायेंगे", एडमिरल सर विचार करत म्हणाले. त्यांचे बोलणे ऐकून मीटिंग रूममध्ये शांतता पसरते.
हिंद महासागरात चीन वर्चस्व मिळवण्यासाठी वेगवेगळ्या देशांसोबत युद्ध करत असतो. भारताचे नौदल जरीही त्यांच्या सारखे मोठे नसले? तरीही चीन भारतीय नौदलामुळे आपले वर्चस्व मिळवत नव्हता. भारतीय नौदल आपली शक्ती वाढवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असायचा. चीनला रोखण्यासाठी भारताने इराण आणि इराकला पोर्ट विकसित करण्याची मंजुरी दिली. ज्यामुळे चीन समुद्रात वर्चस्व मिळवू शकणार नव्हता.
"सर, चायना ने पाकिस्तान, श्रीलंका और म्यानमार बंदरगाहों पर रणनीती बनाकर स्ट्रिंग ऑफ पर्ल का निर्माण कर रहा है!",दुसरा ऑफिसर बोलतो.
"हम उन को ये रोकने के लिये ही बाकी देशों को पोर्ट की परमिशन दे रहे है! इसलीये हमारे कुछ लोग उन लोगों को सुरक्षा देने जाने वाले है। राष्ट्रपती जी ने ऐसे आदेश दिये है!", एडमिरल सर विचारपूर्वक रणनीती आखत म्हणाले. कारण सध्या भारत सगळ्यांसोबत मैत्री करून देशांना मदत करत असायचा. त्यात भारताला फ्रान्स, रशिया या कडून चांगल्याप्रकारे युद्ध सामग्री मिळत असल्याने, चीन भारताच्या दुश्मन राष्ट्रांशी संबंध जुळवत होता.
*********
स्थळ: दिल्ली.
"हा आहे भारत. सध्या ही लोक स्वतःला खूप सुरक्षित समजत असतात. पण आता अस होणार नाही. काही दिवसांतच या लोकांना आम्ही काय आहोत? हे कळून चुकणार",एक व्यक्ती स्वतःशीचं बोलत गुढपणे हसतो. त्याच्या समोर एका टेबलवर वेगवेगळे पुस्तक, नकाशे पडले होते आणि तो त्यातील एक एक वाचून आपल्या जवळच्या कागदावर काहीतरी लिहत होता. हिंदी, मराठी, पंजाबी अश्या तिन्ही भाषा त्याला अवगत होत्या.
त्याच्यासमोर असलेली पुस्तक साधी नव्हती. ती पुस्तकं रसायन शास्त्राची होती. काही पॉइंट्सला तो हायलाईट करत होता. नॉर्मली लोकांना वाटणार तो एक अभ्यासू व्यक्ती आहे. पण तो ज्याप्रकारे काही पॉइंट्स काढत होता ना? त्यावरून तर तो एक अभ्यासू नसून दुसर काहीतरी करत आहे? अस नक्कीच वाटणार असते. कारण त्याने त्या पुस्तकातील विस्फोट करणारे केमिकलचे पॉइंट काढले होते. त्यांच्या स्टेप काय आहे? ते किती हानिकारक वगैरे आहे? हे सगळ काही त्याने नोट केलं होते.
"आता कळणार आम्ही कोण आहोत ते?गेल्या पाच वर्षांपासून मी या प्लॅन वर काम करत आहे. त्यासाठी मला हिंदू बनावे लागले. न अवगत असणाऱ्या भाषा शिकाव्या लागल्या. एवढ सगळ करून देखील मनाप्रमाणे घडत नव्हत. पण आता तसे होणार नाही! एकच वार आझमीचा",तो आपल्या दाढीवर हात फिरवत म्हणाला. अंगावर पांढरे वस्त्र घातले होते आणि गळ्यात, हातात एक रुद्राक्ष माळ. ज्यामुळे तो हिंदू वाटत होता. एक साधूचा मुलगा बनून तो इतर गोष्टीचा अभ्यास करत होता.या मुळे त्याला सगळ्या प्रकारचे ज्ञान अवगत झाले.
*************
गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावर आयसीजीने कारवाई करून करोडोचा ड्रग साठा पकडला होता. ज्यावर नेव्ही ऑफिसर देखील तिथं येऊन त्या लोकांवर कारवाई करत होते. एका ऑफिसरने त्यांची बोट किनाऱ्यावर आणली आणि तो साठा जप्त केला. गुजरात मध्ये ही तिसरी वेळ होती. साठा कुठून येत होता? हे प्रत्येक वेळी वेगळे ठिकाण असायचं. पण लपवण्याची पद्धत मात्र एकच असायची! आता गुजरातच्या पोर्ट वर नेहमी पेक्षा जास्त सैन्य तैनात राहणार होते. योग्य ती कारवाई त्या लोकांवर करून ऑफिसर आपल्या आपल्या कामाला निघून जातात.
**********
स्थळ: गोवा.
"पृथा, काल अंकिता मिळाली होती ना? तिला मी आधी चांगली समजलो होतो. पण तिने मला प्रपोज केल्यापासून, मी तिच्यापासून दूर राहायला लागलो. कारण मला ना खरचं इंटरेस्ट नव्हता. त्यात नेव्ही मध्ये असले चालत नाही ना! म्हणून मी दूर असायचो", प्रलय सकाळचा फ्रेश होऊन कॉफी मग हातात धरून तिच्यासोबत बोलायला लागतो.
"प्रलय, मी विचारलं का तुम्हाला? ते वय असत तसे. होतात चुका कधी कधी.", पृथा त्याच मग स्वतः च्या हातात घेत हसून म्हणाली. ती तो मग स्वतःच्या तोंडाला लावून त्यातील कॉफी पिते.
"तू एवढी समजूतदार झाली. मला वाटल अस बोलून दाखवलं तर माझं काही खर नाही.", प्रलय हसूनच एका हाताने तिला जवळ घेत म्हणाला.
"आहेच मी. तुम्ही सांगा ना तुमचं शिक्षण कस झालं? तुम्ही कोल्हापूरला गेलात. त्या नंतरचे मला तुमच्या बद्दलच काहीच माहीत नाही. भेट झाली आपली ती गोवा मध्ये. ते सुद्धा तुम्ही ऑफिसर बनून आलात तेव्हा. लग्न देखील तुमच्या आवडीने नाही झाले! यावरून तुम्ही चिडला होतात आईवर. जर माझे वडील असते ना? तर तुमचे लग्न माझ्याशी नक्कीच झाले नसते.", पृथाचा आवाज शेवटची ओळ बोलताना बारीक होतो.
"झाले असते लग्न. उचलून आणल असते मी. मला ना त्यावेळी प्रेम वगैरे कळत नव्हते. पण आपल लग्न झालं ना? त्यावेळी तुझ्यापासून दूर गेल्यावर मला तुझी किंमत कळली. फोनवर मी विचारत असायचो तुझ्याबद्दल आईला. पण तुझ्याशी बोलण्याची हिंमत होत नसायची माझी. वेळ चुकीची होती आपल्या लग्नाची कदाचित!", प्रलय अस बोलून तिच्या हातातून मग घेत तो तोंडाला लावतो. पृथाने जिथे तोंड लावल होत. तिथेच तो लावतो.
"दहावीचा रिझल्ट लागला. त्यात मी टॉप केले. ९८% मिळाले मला. त्यामुळे कोल्हापूरला शिक्षण घेण्यासाठी एका मोठ्या अश्या कॉलेज मध्ये गेलो. चांगले मार्क्स असल्याने विज्ञान शाखेत सहज मला जाता आले. तिथे हॉस्टेलवर राहून मी नेव्हीची सिलेक्शन प्रोसिजर कशी असते? याची माहिती मिळवायला लागलो. फिजिक्स, केमिस्ट्री, गणित, बायोलॉजी हे विषय मी माझे ठेवले मराठी बदली आयटी घेतला. कारण नेव्हित फिजिक्स, गणित कम्पल्सरी हवे असते. यामुळे गणित घेतला. रात्रंदिवस मी सगळे जग विसरून अभ्यास करत असायचो. त्यामुळेच मला अकरावी बारावीला देखील ९५% मिळाले.", प्रलय अस बोलून थांबतो. त्याचे मार्क्स ऐकून ती एकदा स्वतःचे डोळे गोल गोल फिरवते.
"९५% मिळवले? मस्तच ना!", पृथा शांतपणे म्हणाली.
"मिळवले खरे! त्यानंतर मात्र खूप काही करावे लागले. मार्क्स मिळवले नंतर मला डायरेक्ट परीक्षा देऊन जायचे होते नेव्हीत. पण तसे घडले नाही!",प्रलय काहीसा नाराज होत म्हणाला. त्याचा असा चेहरा पाहून तिला तर काही समजत नाही. एवढ चांगल असून देखील? तो नेव्हीत गेला नाही? हे ऐकून ती शांत होते.
क्रमशः
-----------------
काय असेल कारण प्रलयचे? एवढे मार्क्स चांगले असून देखील इंडियन नेव्हीत गेला नाही?का दिली नाही एक्झाम त्याने?
यावर तुम्हाला काय वाटते? विचार करा.