Sha no Varun - 3 in Marathi Love Stories by Bhavana Sawant books and stories PDF | शं नो वरुणः (समुद्र योद्धा) - भाग ३

Featured Books
Categories
Share

शं नो वरुणः (समुद्र योद्धा) - भाग ३

भाग ३.




"पृथा, तुला आठवत आपल बालपण? एवढे भयंकर आपण भांडायचो? की लोक देखील म्हणायचे, कसे होईल यांचे?", प्रलय तिच्या शेजारी बसत म्हणाला.ती आज गॅलरीत बसून आपल त्याच्यासोबत वेळ घालवत होती.





"हो. आठवत ना! तेव्हा आपण भांडत असायचो. पण आता एकमेकांशिवाय करमत नाही आपल्याला", पृथा त्याच्या मांडीवर जाऊन बसत त्याच्या गळ्यात हात टाकत म्हणाली.




"वेगळे होते ते दिवस.", प्रलय तिला जवळ घेत म्हणाला. पृथा हसून डोळे बंद करते आणि भूतकाळात हरवते. तो देखील तिला जवळ घेऊन भूतकाळात जातो.





भूतकाळ:-



आंबोली, महाराष्ट्र


आंबोलीच्या एका छोट्याश्या गावात एक तेरा चौदा वर्षांच्या आसपास असलेली मुलगी सायकलवर बसून हातवारे करत काहीतरी बोलत असते.




"या वर्षी टोटल चाळीस मार्क्स आणले मी. दोन टक्के वाढले माझे. हे घ्या पेढे काकू.",ती सायकलवरून खाली उतरत म्हणाली. तिचे ते मार्क्स ऐकून त्या काकू आनंदी होतात.




"फक्त चाळीस? अग बाई ग!! हे, खूप कमी आहे इडियट मुलगी. आजकाल मुली टॉपला येत आहे आणि तू आहे की मागून पहिली येऊन आनंदी होत आहे? आई, अजिबात काही पेढे वगैरे घ्यायचे नाही!",एक मुलगा तिथं येऊन चिडून म्हणाला. त्या मुलाचं बोलणे ऐकून ती त्याला पाहते.




"मला जेवढं झेपते ना? तेवढाच अभ्यास मी करते. तसही
मला कुठे मोठेपणी काय करायचं आहे? आपल लग्न करा आणि संसार थाटा! तूच शिक बाबा! कधी माझा आनंद बघवत नाही तुला.",ती तोंडवाकड करत म्हणाली.




"सिरीयसली पृथा? अग आजकाल मुलांना देखील शिकलेल्या मुली लागत असतात आणि जॉब वर असणाऱ्या. जॉबच सोड तू! पण शिक्षण तरी नीट घे की बाई!",तो आता तिला समजावत म्हणाला. पण त्याचं बोलणे ऐकून ती "नाही" मध्ये मान हलवून तिथून निघून जाते. कारण तिला अजिबात शिक्षणात इंटरेस्ट नव्हता. आईवडील शिकवत आहे, म्हणून ती शिकत असायची!





"आई, यावेळी मी काही चुकीचं बोललो नाही तिला! मला वाटत ती स्वतःच्या पायावर उभी राहावी. यासाठी तिला चांगल सांगितले. पण ती अस न बोलता निघून गेली.",तो आता आपल्या आईकडे पाहत म्हणाला.





"नाही. तू चुकीचं नाही बोलला. तिला शिकायचं नसेल? तर राहू दे की. प्रलय, तुझा रिजल्ट कधी आहे बर दहावीचा?", त्याची आई विषय बदलत म्हणाली.





"माझा पाच जूनला आहे. मला चांगले मार्क्स मिळाले की, मी नेव्हीत जाऊ शकतो. दहावी नंतर कोल्हापूरला जाऊन अकरावी, बारावी करायचा विचार आहे माझा. सायन्स मधून केली की मला चान्स चांगला आहे!", प्रलय आपल्या आईला आपले विचार सांगत असतो. आधीपासूनच तो हुशार आणि समजूतदार होता. त्याने त्याचं करियर ठरवलं होत आणि त्या दिशेला जाण्यासाठी तो मेहनत घेत होता. भारतीय नौसेनाचे त्याला खूपच वेड लागले होते.





"चांगल आहे. सगळ तुझ्या मनासारखे घडो!", त्याची आई अस म्हणून त्याच्या कपाळावर हात फिरवते.





हा आहे प्रलय करंदीकर. नावाप्रमाणेच हुशार असा आहे. नेव्ही मध्ये त्याला जायचे होते. त्यासाठी तो प्रचंड मेहनत घेत होता. आतापासूनच त्याचं सगळ ठरलेलं होत. नंतर ठरवायला वेळ नसतो. त्यामुळे त्याने आपल ठरवलेले होते. त्याचे वडील विक्रम करंदीकर आर्मी ऑफिसर होते. ते देखील देशसेवा करत होते. देशसेवेत असल्याने, प्रलयच्या अंगात देखील ते प्रेम रुजले गेले होते. याच्या विरुद्ध स्वभावाची होती पृथा नाईक. जिला अभ्यास, करियर यात काही इंटरेस्ट नव्हता! आताच आठवी पास केली होती.




पृथा आपल्या घरी काहीशी चिडूनच येते. मुड ऑफ झाला होता तिचा. खरतर प्रलय तिच्या चांगल्यासाठीच बोलला होता. पण मॅडमने वेगळच समजले होते. आधीपासूनच दोघांचे पटत नव्हते.




"पृथा, काय झालं? असा चेहरा का उतरला आहे तुझा? आज काय कोणाचे हात पाय मोडले नाही का?",एक मध्यम वयाचा व्यक्ती तिच्या खोलीत येत म्हणाला.





कोकणातील कौलारू घर होते त्यांचे. गावातील मोठे घराणे असल्याने, त्यांचे घर गावातील मोठे होते. तिची खोली देखील तशीच चांगली होती.




"बाबा, मी काय रोज विनाकारण सगळ्यांना त्रास देत असते का? मला जे पटत नाही, तिथे मी सगळ्यांना उत्तर देत असते. पण तो वादळ मात्र मला पेलवत नाही! नुसत कोणत्याही कारणाने मला बोलत असत. मला नाही आवडत ते बोलणे",पृथा काहीशी गाल फुगवून म्हणाली.




"आज पण त्या प्रलय सोबत काहीतरी बिनसले दिसत आहे. काय झालं बर सांग मला?",तिचे बाबा विचारतात. तशी ती सगळा प्रकार त्यांना सांगून मोकळी होते.




"यात काय चुकीचे बोलला बर तो? उलट खरच बोलला तो. शिक्षण चांगल घेतल तर पुढे तू जाशील! नाहीतर अशीच गावात पडून राहशील. कारण मुलांना तर शिकलेल्या बायको हव्या असतात. पृथा, जग जस बदलत जात असत ना? तसे तसे लोकांचे विचार देखील बदलत असतात. त्यामुळे आपण जगासोबत शिक्षण घ्यावे. नाहीतर हातातून वेळ निघून गेली ना? मग फक्त पश्चात्ताप करावा लागतो. त्यामुळे आताच विचार कर.", पृथाचे वडील चांगल्याप्रकारे तिला समजावत म्हणाले. थोडीशी अल्लड होती ती. त्यामुळे त्यांचे बोलणे ऐकून ती फक्त मान हलवते. वडिलांचे बोलणे मनावर घेऊन पृथा मन लावून अभ्यास करण्याचा काही दिवस प्रयत्न करते. मग मात्र पुन्हा आपल्या पूर्वस्थितीत येते.





प्रलय मात्र नेव्हीच्या परीक्षेची चांगली तयारी करत असतो. सकाळ रात्र न बघता तो जनरल नॉलेजचा अभ्यास करत असतो. त्याच्यासोबत आणखीन एक त्याच्याच वर्गातील मैत्रीण अंकिता नावाची अभ्यास करत असते. तिला आलेल्या शंका तो सोडवत असायचा.




"अंकिता, मग पुढे काय ठरवलं आहे? काय करणार आहेस पुढे जाऊन?", प्रलय अभ्यास करता करता विचारतो.




अंकिता ही दिसायला चांगली गोरी होती. तिचे वडील देखील सरकारी नोकर असल्याने, ती देखील मेहनती मुलगी बनली होती. अभ्यास एके अभ्यास! असे तिचे ठरलेले होते.




"यूपीएससी द्यायची आहे. त्यासाठी अभ्यास करत आहे. मला आयएएस बनायचं आहे. ते बनून स्त्रीशिक्षणाला जास्त महत्त्व कसे देता येईल? गावागावांचा विकास कसा घडेल? हे सगळ पाहायचं आहे. ", अंकिता आपल एक एक सांगत असते.





"चांगल आहे. मला अभ्यास करणाऱ्या मुली बऱ्या वाटतात. आता बघू रिझल्ट मध्ये काय होत माझं ते?", प्रलय विचार करत म्हणाला.




"नेहमी प्रमाणे टॉप करशील बघ तू! मी सेकंड येणार.", अंकिता आनंदी होऊन प्रलयच्या हातावर हात ठेवत म्हणाली. तिचा स्पर्श होताच तो पटकन आपला हात मागे घेतो.




"सॉरी. मग कॉलेजला मी कोल्हापूरला जाणार आहे? तू पण येणार आहेस अस कळल. तर आपण एकाच कॉलेजला ट्राय केलं तर? ", अंकिता विषय बदलत म्हणाली.




"नाही. माझं स्वप्न वेगळे आहे. ते खूप महत्त्वाचे आहे.", प्रलय नकारार्थी मान हलवत म्हणाला. तशी अंकिता त्याला पाहत राहते!





"प्रलय, आय लव्ह यू! हे , मी आधीही सांगणार होती. पण नाही सांगू शकले. आता मात्र सांगत आहे. मला तू हवा आहेस! माझ्या स्वप्नांच्या दिशेने मी जाताना त्या वाटेवर मला तुझी साथ हवी आहे! देशील मला साथ?", अंकिता त्याच्या डोळ्यात पाहत त्याचा हात हातात घेत म्हणाली. मात्र, तिचे असे बोलणे ऐकून तो शॉक होतो.





"तू काय बोलते आहेस? तुझं तुला तरी कळत का अंकिता? वय काय आहे आपल? या वयात आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे असतात. त्या वयात तू असल बडबडत आहेस? प्रेमाची व्याख्या तरी माहीत आहे का तुला? ", प्रलय तिचा हात झटकत रागात म्हणाला. त्याला तिचे बोलणे पटलेच नव्हते. तिचे आईवडील पोरगी आयएएस बनायला हवी. यामुळे लाखोंचा पैसा तिच्यावर उधळत होते. दहावीचे क्लासेस देखील त्यांनी तालुक्यावरून शिक्षक बोलावून तिला दिले होते. हे सगळ काही प्रलय पाहत होता. पण ही कुठे तरी भलती कडे वाहवत जात आहे? असे आता त्याला वाटू लागले होते. या कारणाने तो चिडतो.





"काय चुकीचे बोलली मी? तू त्या पृथासोबत बोलत असतो ना? ते अजिबात पटत नाही मला. या कारणाने जे मनात आहे ते बोलून दाखवले. आता तूच विचार कर माझा! मला याबद्दल काही माहीत नाही.", अंकिता रागात अस बोलून निघून जाते.





"हे वयच नाही आहे ग आपल? मी नाही देऊ शकत कोणाला साथ! तुलाच काय मी कोणासोबतही नाही राहू शकत! माझ्यासोबत जी लग्न करेल? तिच्या आयुष्यात फक्त विरह आणि दुःखच लिहलेले असेल. यामुळे मी या सर्वांपासून दूर राहत आहे! माझे फक्त माझ्या भारतमातेवर प्रेम आहे. इतर कोणावरही नाही", प्रलय ती गेली त्या दिशेला पाहत मनात म्हणाला.




वर्तमानकाळ:-



पृथाचा डोकं त्याला स्वतःच्या उघड्या छातीजवळ जाणवत तसा तो भूतकाळातून बाहेर येऊन तिला पाहतो. ती एखाद्या लहानमुलीसारखी त्याच्या शर्टला पकडुन बसली होती. तिला अस करताना पाहून तो गालात हसतो. तो एकवार तिच्या चेहऱ्याला पाहतो. एक वेगळेच तेज तिच्या चेहऱ्यावर त्याला दिसत होते. गळ्यात त्याच्या नावाचे मंगळसूत्र पाहून तो समाधानी होतो.




"बायको, तू खूप क्यूट दिसत आहेस!", प्रलय डोळे बंद असणाऱ्या पृथाकडे पाहून म्हणाला. त्याचं बोलणे ऐकुन ती लाजून त्याच्या कुशीत लपण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असते.




"तुम्ही, छळू नका मला बर!",ती लाजून म्हणाली. पण आज मात्र त्याला तिच्यावर प्रेम करावेसे वाटत होते. या कारणाने तो तिला व्यवस्थित करून आपल्या पायावर बसवतो. तिच्या डोळ्यात पाहून तो अलगदपणे तिच्या ओठांवर ओठ टेकवतो. प्रलयच अस प्रेम पाहून ती आपले डोळे बंद करते. तो मात्र डोळे न बंद करता तिला आपलस करत असतो. खरच त्याला ती एक वेगळी भासत होती. लहानपणीची ती आणि आताची ती? यात फरक वाटत होता. समजूतदारपणा जास्तच तिच्यात आला होता. प्रलयचे प्रेम पाहून ती देखील त्याला प्रतिसाद देते. काहीवेळाने तो तिला उचलून घेऊन रूम मध्ये आणून बेडवर ठेवतो.




"आज तुला पूर्णतः मला स्वीकारायचे आहे. परमिशन आहे का मला तुझी?", प्रलय तिच्या डोक्यावर ओठ टेकवत म्हणाला. त्याचं बोलणे ऐकुन ती लाजून खाली मान घालते.




"मी तुमचीच आहे प्रलय! आय लव्ह यू. ", पृथा खाली मान घालून म्हणाली. तिचं बोलणे ऐकुन तो आनंदी होतो आणि एका हाताने तिला जवळ घेऊन तिच्यावर प्रेम करायला लागतो. खूप प्रेम येत होते दोघांना एकमेकांवर. तो तर तिला स्वतःपासून जरा सेकांदासाठी लांब करत नाही. त्याची आई वडील देखील दोघांना डिस्टर्ब करायला जात नाही.






पृथासारखी मुलगी त्यांना सून म्हणून मिळाली होती. यातच त्या समाधानी होत्या. नवऱ्या सोबत वेळ तिला मिळावा यासाठी त्या रुमच्या दिशेला जात नाही.



**********


दिल्ली:-



एक व्यक्ती मोठ्या अश्या पुस्तकांच्या लाइब्रेरी मधून काहीतरी शोधत असतो. कितीतरी पुस्तक तो चाळून त्याची पान पाहून ठेवत असतो. पण त्याला जे काही हवे? ते मिळत नसल्याने, त्याचा राग राग होत असतो. सकाळीच लाइब्रेरीचे कार्ड दाखवून त्याने आतमध्ये प्रवेश मिळवला होता. त्या लाइब्रेरीमध्ये बरीच अशी वेगवेगळ्या विषयाची पुस्तकं होती. हे त्याला माहीत होते. सगळ्यात मोठी लाइब्रेरी असल्याने इथ त्याला हवे ते मिळेल?असे वाटत होते. त्यामुळेच तो इथे आला होता.





"येस! यही चाहिए था। अब मिल गया हमे।", तो व्यक्ती अस बोलून लाइब्रेरीमधील एक मोठं अस पुस्तक उचलून गुढपणे हसतच सोबत घेऊन जातो.




क्रमशः
_____________________