कथा आहे समुद्र योद्धाची. त्याच्या संघर्षाची. त्याच्या पराक्रमाची. कथा आहे खऱ्या हिरोंची.
चला तर जाऊ आपल्या कथेकडे.
___________
भाग १
दाभोळी नेव्ही पोर्ट, गोवा
आज गोवा मधील समुद्रात नौसेनाने लाल बावटा लावला होता. लाल बावटा लागला म्हणजे समुद्रातील मासेमारी, वॉटर गेम्स ,पर्यटन या सगळ्यांना बंदी केली जाते. लाल बावटा ज्या दिवशी असतो, तेव्हा इंडियन कोस्टल गार्ड आणि स्थानिक पोलीस यांची गस्त समुद्रात चालू असते. इतर सर्व जहाजे समुद्राच्या किनारपट्टीवर उभे केले जातात. जो पर्यंत स्थानिक पोलीस त्यांना पुढील आदेश देत नाही? तो पर्यंत सगळ बंद असते. हा लाल बावटा गोवा मध्ये लावला गेला होता. कारण नौसेनाची एक मोठी युद्ध नौका आपल्या सैनिकांना घेऊन आय
एन एस हंसा जवळच्या समुद्रात येणार होती. त्या युद्ध नौकातील गोवा आणि महाराष्ट्रातील कोल्हापूर, कोकण या जवळच्या ठिकाणचे नौसैनिक सुट्टी घेऊन काही दिवसांसाठी त्यांच्या घरी येणार होते. तर त्यांच्या बदल्यात इतर सैनिक त्या युद्ध नौकेवर आपली ड्युटी करण्यासाठी जाणार होते. त्यासाठी ते या पोर्टवर आपल्या फॅमिलीला घेऊन आले होते. पुन्हा किती तरी महिने त्यांना आपल्या परिवाराला भेटता येणार नव्हते. सुरक्षितता म्हणून गोवा पोलीस तिथं पोर्ट वर हजर होते. या सगळ्यासाठी जवळच्या किनारपट्टीवर लाल बावटा लावण्यात आला होता.
"आई, कधी येणार आहे ते? मला ना त्यांना पाहायचं आहे",एक मुलगी समुद्राच्या दिशेने पाहत म्हणाली.
"पृथा, येईल ग तो. वाट बघ जरा. एवढे दिवस वाट पाहिली ना? आता अजून थोडी वाट पहा.", तिच्या जवळ थांबलेली मध्यम वयाची बाई तिला हसून म्हणाली. तशी ती काहीशी नाराज होऊन समोर पाहते. काहीवेळ जाताच समुद्रात एक भोंगा जोरात वाजायला लागतो. तसे तिथे असलेल्या लोकांचे लक्ष समुद्राच्या दिशेने जाते. एक व्यक्ती हातात लाल झेंडा घेऊन सगळ्यांना सूचना करतो.
"कुछ सेकंद मे नौसेना के अफसर आने वाले है।",एका भोंग्यावर अशी घोषणा होते. तसे तिथे असलेले काही लोक आनंदी होतात. तर काहींच्या डोळ्यात पाणी असते. कारण काही नौसेनिक आता वर्षभरासाठी आपल्या परिवाराला सोडून आपल्या भारतमातेच्या रक्षणासाठी जाणार होते. यामुळे काही लोकांच्या डोळ्यात पाणी होते. कोणी आपल्या बायकोला समजावत होत, तर कोणी आपल्या आईला आणि लहान मुलाला समजावत होते. त्यांना अस रडताना पाहून त्यांचे पाय तिथून निघत नव्हते.
शेवटी, युद्ध नौका खूप जवळ येते किनाऱ्यावर. त्या युद्ध नौकाच्या सिड्या आपोआप किनाऱ्यावर लागतात. तसे काही सैनिक त्यातून बाहेर पडतात. तो देखील सिड्या उतरून बाहेर पडतो. काही मिनिटांसाठी ती नौका थांबणार होती. त्यामुळे बाहेरील सैनिक आपल लगेज घेऊन कुटुंबाचा निरोप घेऊन आतमध्ये जायला लागतात.
तो बाहेर येऊन आसपास पाहतो. त्याची नजर एका ठिकाणी पडते. तसा तो गालात हसतो आणि आपल सामान हातात घेऊन त्या दिशेला जायला लागतो.
"बाय, बाय ऑल.",मागे एकदा वळून तो सर्वांना म्हणतो.
"भाई, आपकी राह देंखेंगे हम। ", युद्ध नौकामध्ये असलेला ऑफिसर म्हणाला.
"जरूर लौटेंगे! ",तो हसून अस बोलून तिथून निघतो. तो मात्र आता एक क्षणभर देखील वेळ न वाया घालता पटकन समोर असलेल्या एका मुलीला अंतर ठेवून जवळ घेतो आणि तिच्या माथ्यावर स्वतःचे ओठ टेकवतो.
"आय मिस यू पृथा. आय लव्ह यू. ", तो आनंदी होऊन बोलतो.
"अहो, अस काय करत आहात? तुमच्या अश्या वागण्याने मला लाज वाटते", पृथा हळू आवाजात म्हणाली.
"बायकोला मिठीत घेतल आहे मी. त्यामुळे मला काही वाटत नाही. पृथा तू ना अशी घाबरट कधी पासून बनली ग हा?",तो तिला बाजूला करत म्हणाला. त्याच्या या बोलण्याने ती त्याला पाहते. अलगदपणे आपला एक हात उचलून त्याच्या गालावर ठेवते. तिच्या मुलायम हातांचा स्पर्श होताच तो डोळे बंद करतो. पण इकडे मात्र त्याच्या समोर उभ्या असलेल्या पृथाच्या डोळ्यात पाणी येते. तब्बल दहा महिन्या नंतर ती त्याला समोर उभी पाहत होती. या दहा महिन्यात तिने एकही सण साजरा केला नव्हता. तो आला घरी की, त्याचं दिवशी तिच्या घरात वेगवेगळे सण असायचे. लोक तिला कधी कधी वेडे म्हणत असायचे. पण तिचं तिलाच माहीत होते.
"आज माझी दिवाळी आहे. कारण तुम्ही घरी आला आहेत प्रलय",ती इमोशनल होऊन म्हणाली. तिचा असा आवाज ऐकून तो पटकन डोळे उघडतो आणि तिला मिठीत घेतो.
"वेडी. आता अस नाही रडायचं. मी माझी या वर्षीची वार्षिक दोन महिन्यांची सुट्टी घेऊन आलो आहे. आता आपण हॅप्पी हॅप्पी राहायचं.",तो तिला समजावत म्हणाला. तशी पृथा त्याचं बोलणे ऐकून आनंदी होते. त्यांचे बोलणे चालू असते की, मगाशची बाई त्यांच्याजवळ येते.
"आता बायको मिळाली तर आईला विसरलास ना? आम्हाला कोण विचारत आता",ती बाई खोटं खोटं नाराज होत म्हणाली.
"आई, अस काही नाही आहे. उलट तू तर माझ्यासाठी पहिली आहे आणि मग पृथा", प्रलय पृथाला बाजूला करत म्हणाला.
"मी अशीच खोटी खोटी नाराज झाली होती. पण खर सांगू तू नव्हता घरी, तरीही तुझ्या बायकोने कधी आम्हाला काहीच कमी पडू दिले नाही. अगदी स्वतः चे आईवडील समजून आमची काळजी घेतली. या जगात नवरा घरी नसल्यावर सून कधी कधी सासू सासऱ्यांना पाहत नाही, असे ऐकले होते. पण पृथा वेगळी आहे. अगदी तुझ्यासारखी आहे.",आई पृथाकडे पाहून तिचे कौतुक करत म्हणाली. आईचे बोलणे ऐकून प्रलयच्या चेहऱ्यावर समाधान पसरते.
"बाय बाय. बाय पापा",एका मुलाचा रडका आवाज त्याच्या कानी पडतो. तसा प्रलय त्या दिशेला पाहतो. युद्ध नौका आता समुद्राच्या दिशेने जात होती. त्यात आताच चढलेल्या सैनिकांच्या फॅमिली त्यांना रडून निरोप देत होत्या. पुन्हा दहा महिन्यानंतर मुलगा, नवरा आपला पाहायला मिळणार नव्हता. या कारणाने तिथं असलेल्या प्रत्येक बाईच्या आणि लहान मुलांच्या डोळ्यात पाणी होते. नौसेना सैनिक देखील युद्ध नौका मधून त्यांना बाय करत असतात. इमोशन्स वर कंट्रोल ठेवायचे. यावर त्यांना ट्रेनिंग दिली असल्याने, ते मात्र चेहऱ्यावर हसू ठेवत बाय बाय करत असतात.
"तुम्हारे पापा असली हिरो है। असली हिरो के बच्चे हो ना तुम? फिर ऐसें रो कर पापा को बाय मत करो!", प्रलय त्या मुलाकडे जात हिंदीत म्हणाला. त्याच बोलणे ऐकुन तो मुलगा शांत होतो आणि पुन्हा समुद्राकडे पाहतो. पण आता ती युद्ध नौका खूप दूर गेलेली असते. त्यातून काही सैनिक पांढऱ्या वेशात बाहेर थांबलेले आहेत अस दिसते. तो मुलगा डैकच्या तिथं पाहतो आणि आनंदात हात हलवून दाखवतो. डैकवर असलेला माणूस हातातील दुर्बीणने पोर्टच्या दिशेला पाहतो आणि आनंदी होऊन तो देखील हात हलवतो. त्या मुलाला आनंदी पाहून तो देखील आता समाधानात आपल्या कामाला निघून जातो. प्रलय त्या मुलाला त्याच्या आईकडे सोडून आपल्या फॅमिलीकडे जातो.
"चला, आता घरी", प्रलय अस म्हणून स्वतः च सामान हातात घेतो. सामान त्याच कमी नव्हते काही. खूप जास्त असे होते. दोन मोठ्या अश्या चौकोनी आकाराच्या पेट्या होत्या, दोन अश्या छोट्या बॅग होत्या, तर दोन मोठ्या अश्या होत्या. पोर्ट वर काम करणारे लोक त्या बॅग उचलतात आणि त्यांच्यासाठी मागवण्यात आलेल्या गाडीत त्या बॅग ठेवतात. एक गाडी तर सामानाने भरते. तसा तो दुसऱ्या गाडीला बोलवायला म्हणून बाहेर जात असतो की, तेवढ्यात ती त्याचा हात धरते.
"अहो, आपल्या गाडीने जाऊया. मी आणली आहे आपली गाडी. या गाडीतून सामान जाऊ दे घरी.", पृथा आनंदात म्हणाली. पण तिचे बोलणे ऐकून तो तिला पाहतो.
"भाऊ, इकडे जवळच आमचं घर आहे. तर तुम्ही आमच्या गाडीच्या मागे चला. तुम्ही रस्ता नाही चुकणार", पृथा त्या ड्रायव्हरला पाहून म्हणाली.
"ओके, मॅडम",तो अस बोलून गाडीत बसतो.
प्रलय शॉकमध्ये असल्याने, पृथा त्याचा हात धरते आणि त्याला एका सेंट्रो कारकडे ओढत घेऊन येते. तो कारला पाहतो आणि स्वतःच्या आईला पाहतो.
"असा बघू नको तू आम्हाला. तुझी बायको शिकली आहे कार. बुलेट तर ट्रेन सारखी चालवत असायची. आता कार तर विमानात बसल्यासारखी चालवते. माझ्या सुनेचा कोणी हात नाही धरणार अश्या प्रकारे ती चालवते.",आई हसून म्हणाल्या. त्या अस बोलून गाडीत मागच्या सीटवर जाऊन बसतात. तो पुढच्या ड्रायव्हिंग सीटवर बसणार असतोच की, तेवढ्यात ती पटकन जाऊन तिथं बसते. तो मग नाही मध्ये मान हलवून मागे बसतो.
"लवकर बसा बर.",पृथा सीटबेल्ट लावत म्हणाली.
"बसलो आता बाई", प्रलय हसून म्हणाला. मग पृथा गाडीला चावी लावते आणि व्यवस्थित पणे गाडी चालू करून ती हळू हळू पोर्ट मधून बाहेर पडते. तिला अस गाडी चालवताना पाहून तो तिलाच पाहत राहतो. ते सुद्धा कौतुकाने. त्यानेच गाडी घेतली होती. पण आता तो घरात नाही म्हणजे ती गाडी खराब झाली असेल? असा त्याच्या मनात विचार आला होता. आज मात्र त्या गाडीला व्यवस्थित पाहून आनंद झाला होता.
"पृथा , गाडी कधी शिकली तू?", प्रलय विचारतो.
"तुम्ही ड्युटीला असताना शिकून घेतली. मला माहित आहे ही तुमची फेवरेट कार आहे आणि स्पेशल आहे. मग मी थोडीच तिला खराब होऊ देणार होती.", पृथा कर ड्राईव्ह करत पुढे पाहून म्हणाली.
"ओहऽऽऽ , थँक्यू पृथा.", प्रलय आनंदी होऊन म्हणाला.
तो पृथाकडे पाहतो. ती दिसायला गोरीपान होती. आज स्पेशल तिने त्याला आवडत म्हणून पिवळ्या रंगाची साधीशी साडी घातली होती. गळ्यात एक मोठं अस मंगळसूत्र होत. या व्यतिरिक्त कपाळावर कुंकू आणि डोक्यावर छोटीशी लाल रंगाची टिकली. या तीन गोष्टी मुळे तिचे सौंदर्य वाढत जात होते. चेहरा देखील असा टवटवीत वाटत होता. ती आपली गाडी चालवत बडबडत असते. तो मात्र, तिच्या सौंदर्याकडे पाहत असतो. मागे बसलेली त्याची आई हसून गप्प राहते.
"आले आपले घर. चला आता उतरा खाली.", पृथा सीट बेल्ट काढत म्हणाली.
"आले पण. असो, नेक्स्ट टाईम लाँग ड्राईव्हला जाऊ या!!", प्रलय भानावर येत म्हणाला. तो पटकन खाली उतरतो. मागच्या गाडीत असलेले सामान ड्राईव्हर काढून बाहेर ठेवत असतो. त्याला अस काम करताना पाहून प्रलय त्याच्याकडे जातो आणि आपल सामान काढायला लागत असतो की तेवढ्यात, ड्रायव्हर त्याला अडवतो.
"ये, क्या कर रहे हो साहब आप? अरे, आप तो देश के जवान हो!! हम जैसे लोग आज यहाँ अच्छे से रहते हैं। वो भी आपकी वजह से इसलिये, हमे भि आपकी सेवा करने का मौका दीजिए। ", ड्रायव्हर अस बोलून त्याचे सामान काढायला लागतो. त्याचं बोलणे ऐकुन प्रलय त्याला पाहतो.
"वो हमारा काम है। ", प्रलय त्याच्याकडे पाहत म्हणतो आणि सामान घेत असतो. पण ड्रायव्हर काही त्याचे ऐकून न घेता त्याचं सामान काढून आणून त्यांच्या फ्लॅट मध्ये ठेवून येतो.
"चलो, साहब हम चलते है।", ड्रायव्हर अस बोलून तिथून निघून जातो. पृथा आणि प्रलय मात्र त्याला पाहत राहतात. फक्त नेव्हीचा युनिफॉर्म पाहून त्या माणसाने फुकट त्यांना सर्व्हिस दिली होती. इतर लोकांसोबत एक एक रुपयासाठी वाद घालताना बरेच ड्रायव्हर त्यांनी पाहिले होते. हा मात्र, एवढी मदत करून त्यांचे सामान घरापर्यंत सोडून पैसे न घेता गेला होता. यामुळे ते त्याला पाहतात.
"चला, घरी जाऊ. अशी लोक कमी असतात. ", पृथा त्याचा हात हातात घेत म्हणाली.
"हम्म", प्रलय हुंकार भरत म्हणाला. तो तसाच तिचा हात हातात घट्ट पकडून तिच्यासोबत आपल्या फ्लॅट मध्ये जायला लागतो. दारापाशी तो येताच त्याची आई त्याचं औक्षण करून त्याला घरात घेते.
"बाबा, त्या रूम मध्ये आहेत", पृथा हे वाक्य जरा हळू आवाजात त्याला म्हणाली. थोडस टेन्शन तिला आले होते. त्याची आई देखील त्याला डोळ्यांनीच जायला सांगते. सध्या दोघी कसल्या तरी विचाराने टेन्शन मध्ये आल्या होत्या. हे त्याला पृथाच्या चेहऱ्यावरून कळते. कारण तिचा चेहरा बोलका होता. मनात जे चालू असायचे, ते तिने सांगितले नाही कोणाला? तरीही तिच्या चेहऱ्यावरून ते स्पष्ट दिसत असायचे. तो एकवार तिला पाहतो आणि तसाच एका रुमकडे चालत जातो. त्या रूमचा दरवाजा हळूच लोटून तो आतमध्ये पाहतो. आतील दृश्य पाहून तर त्याचे डोळेच भरतात.
"बाबाऽऽऽ , हे काय झाले अहो तुम्हाला? ", प्रलय एका मध्यम वयाच्या माणसाजवळ येत विचारतो. तो माणूस व्हील चेअरवर बसला होता. त्याच्या एक पाय गुडघ्यापासून नव्हता. त्या व्यक्तीला तसे पाहून प्रलयचे डोळे वाहायला लागतात. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसुन त्याचे वडील होते.
"पायाला जखम झाली होती आणि ती वाढत गेली. त्यामुळे पाय सडला. मला शुगर आहे. या कारणाने डॉक्टरने पाय......", त्याचे बाबा न घाबरता बोलत असतात. पण तो पटकन त्यांचे बोलणे पूर्ण व्हायच्या आधीच तसाच त्यांना मिठी मारतो.
"मला का नाही सांगितले, तुम्ही सर्वांनी?मी आलो असतो ना? कसही करून", प्रलय रडत रडत बोलतो.
"मी आर्मीचा जवान होतो. हे तू विसरू नको! काय मला धाड नाही भरली. अजून तुझी मुल पाहायची आहे मला. माझ्या लेकीने मला तीन महिन्यात कव्हर केले आहे. त्यामुळे मी आता बरा आहे. अस रडू नको! ऑफिसरला अश्रू बरे दिसत नाही.", त्याचे बाबा हाताने त्याला दूर करत म्हणाले. त्यांचे बोलणे ऐकून प्रलय त्यांच्यापासून दूर होतो आणि स्वतःचे डोळे पुसतो.
"पृथा, तू ये आत.", त्याचे वडील आवाज देत म्हणाले. त्यांचा तो आवाज ऐकून पृथा आतमध्ये येते.
"ही माझी मुलगी आहे. हिच्या डोळ्यात तू कधीच पाणी येऊ द्यायचे नाही. आज तू घरी आला आहे, म्हणून तिचा चेहरा खुलून दिसत आहे. त्यामुळे आता आपण चौघे मिळून सर्व सण साजरे करणार आहोत तिच्यासोबत.", प्रलयचे बाबा कडक शब्दांत म्हणाले. आर्मीचे जवान असल्याने, ते तसेच कठोर आणि कडक असे बोलत असायचे. त्यांचे बोलणे ऐकून ती त्यांना पाहते.
"तुम्ही म्हणाल, तसेच होईल बाबा. मी पृथाला घेऊन आंबोलीला जाऊन यायचा विचार करत आहे. तिकडच्या शिक्षकांना देखील भेटून येऊ आणि हिचे माहेर देखील पाहून येऊ. तुम्ही पण चला. तेवढं रिफ्रेश होशाल!", प्रलय आता नॉर्मल होत म्हणाला. त्याचं बोलणे ऐकून पृथा नाही मध्ये मान हलवते.
"नाही जायचं का तुला?", त्याची आई तिथे येऊन विचारते.
"आई, एकतर हे येतात कमी दिवसांसाठी आणि त्यात बाहेर फिरायच म्हणतात. मग त्या मध्येच दिवस निघून जातो. मला तर अस आपल्या फॅमिली मध्ये राहून गेम वगैरे खेळून आठवणी गोळा करायला आवडेल. त्यासाठी नको म्हणत आहे मी", पृथा त्याच्याकडे पाहून काहीशी चिडून म्हणाली. तिचे असे बोलणे ऐकून प्रलयच्या बाबांच्या चेहऱ्यावर हसू येत.
"ओके. मग आता मी फ्रेश होतो. तू जे काही केलं असशील माझ्यासाठी? ते वाढ मला आज. आपण बाहेर न जाता फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करू. आता खुश?", प्रलय देखील हसून तिला म्हणाला. आता मात्र त्याचं बोलणे ऐकून ती आनंदी होते.
********
कराची , पाकिस्तान.
एका मोठ्या अश्या दोन मजली घराच्या बेसमेंटमध्ये एका मुलीचे हात बांधून ठेवले होते.
"तुम्हे क्या लगा? हमे पता नहीं चलेगा? इंडीयन इंटेलिजन्स हो ना तुम? अब बुला अपने इंडिया को बचाने के लिये?",एक व्यक्ती रागातच तिच्या हाताच्या बोटांवर पाय ठेवत म्हणाला.
"मैं इतनी भी कमजोर नहीं हू! सालोऽऽ लड़की हुं मैं इसलिये मुझको तकलीफ दे रहे हो ना? कुछ हासिल नहीं करोगे तुम लोग।",ती रागातच बोलत असते. तोंडातून तिच्या रक्त येत असत. अंगाला देखील काही ठिकाणी जखमा झाल्या होत्या. पण तरीही ती घाबरली नव्हती त्यांना. तिचं असे बोलणे ऐकून तो माणूस तिचे केस धरतो.
"हम लोग तुम्हारा क्या हाल कर सकते हैं ना? ये अब तुम देखोगी?",तो व्यक्ती अस म्हणून रागातच आपल्या माणसाला आदेश करतो.
"मेरा भारत महान हैं! और वो हमेशा रहेगा!! मैं मर जाऊंगी लेकीन मेरे जैसे और आयेंगे। जय हिंद, जय भारत", ती मोठ्याने ओरडुन समोर बसलेल्या लोकांना पाहून म्हणाली. तसा तिच्या मागे असलेला माणूस रागातच तिचं मुंडके तलवारीने धडापासून वेगळे करतो. तिच्या रक्ताचे सडे पूर्ण बेसमेंट मध्ये पडतात. मुंडकी उडून जाते. पण तिचे धड काही वेळ तसेच राहते. मागे असलेला माणूस रागात लाथ मारतो. तसे तिचे शरीर जमिनीवर पडते. ते लोक आपल्या हातात तलवारी घेऊन आनंद साजरा करत असतात.
"अब इसके शरीर को जला कर राख कर दो! भारत सरकार को इसका पता नहीं चलना चाहिए। हिदायत , अब हमारे प्लॅन को जल्द ही अंजाम देना होगा। भारत में जो लोग हैं उन्से बांत करो!",दुसरी एक व्यक्ती आपल्या दाढी वर हात फिरवत म्हणाली. त्यांचे बोलणे ऐकून सगळे त्या व्यक्तीला पाहतात. मात्र तो गुढपणे हसतो. तो त्या माणसांना काहीतरी सांगतो. तसे त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्स्प्रेशन बदलतात.
क्रमशः
________________
कोणत्याही धर्मातील लोकांच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही आहे. दुखावल्या असतील तर माफी. कथा वेगळी आहे आणि थोडीफार काल्पनिक आहे. याची वाचकांनी नोंद घ्यावी.
भेटू पुढील भागात.❤️