Sankhya Re - 3 in Marathi Love Stories by Gajendra Kudmate books and stories PDF | सख्या रे - भाग 3

Featured Books
Categories
Share

सख्या रे - भाग 3

भाग – ३

दोघेही घरातून बाहेर पडले आणि बाहेर येऊन आपसात बोलू लागले. तेव्हा मिताली बोलते, “ सुमित मला काही बर वाटत नाही आहे. तू तुझ्या आई बाबांपासून वेगळा राहशील. अरे त्यांना तुझी फार आवश्यकता आहे.” तेव्हा सुमित हि म्हणतो, “ हो ग माझे मन हि तेच बोलते आहे. मला तर वाटते आपल्याला काहीतरी मार्ग काढावे लागेल अथवा...” मग मिताली बोलली, “ का बर थांबलास तू काय करणार आहेस.” तेव्हा सुमित म्हणाला, “ मिताली मला एक गोष्ट सांग, तू माझ्यावाचून दूर राहू शकते काय?” मिताली म्हणाली, “ काय म्हणतोस तू आणि काय करायचा विचार आहे तुझा.” तेव्हा सुमित म्हणतो, “ मला माहित आहे कि तू माझ्याशी आणि मी तुझ्याशी किती प्रेम करतो. परंतु तेवढाच प्रेम मी माझ्या आई बाबांना सुद्धा करतो. त्यांनी बालपणापासून वाट्टेल तितके हाल अपेष्टा सहन करून मला वाढवले, माझे शिक्षण पूर्ण केले. आणि आज जेव्हा त्यांना माझी आवशकता आहे तेव्हा असा मी त्यांना सोडून वेगळे कसा राहू.” मग मिताली बोलते, “ हो रे हि गोष्ट माझा मनाला हि आवडली नाही. माझ्या आईने असे वागले नाही पाहिजे. तर मग आता बोल आपण काय करायचे पुढे.” तेथे थोड्या वेळेपुरती शांतता निर्माण झाली आणि काही वेळेनंतर सुमित म्हणाला, “ आपण वेगळे रहायचं, म्हणजे तू तुझा घरी आणि मी माझ्या घरी. जर हि अट तुझ्या आईला मान्य असेल तर आपण लग्न करू अथवा आपण अकाळी विन लग्नाचे राहू.”
तेवढ्यात सुमितचा बाबांचा आवाज मागून आला. ते बोलले, “ बेटा दोघेही जरा घरात येता काय, आम्हाला तुम्हा दोघांशी काही बोलायचे आहे.” ते दोघेही घराचा आत गेले आणि म्हणाले, “ काय झाले बाबा, काय बोलायचे आहे.” सुमितचे बाबा म्हणाले, “ मला माफ कराल पोरांनो , मी तुमचे बोलने मागून उभे राहून ऐकले म्हणून. परंतु मी ते ऐकले म्हणूनच आम्ही हा निर्णय घेण्यास सक्षम झालो कि तुम्ही लग्न करा. तुझी आई म्हणते त्यानुसार तुम्ही दोघेही तुमचा संसार थाटा. आम्हा म्हातार्यांचे काय आहे आज आहो आणि उद्या नाही. तुमचापुढे तुमचे उभे आयुष्य आहे. तुम्ही दोघेही आधी त्याचा विचार करा. तसेच सुमितची आई म्हणाली त्याप्रमाणे तुम्ही काही आमच्यापासून फार लांब राहणार नाही आहात ना. या शहरातच राहणार आहात ना. तर अधून मधून येऊन आमचा हालचाल घेत जा.” तेव्हा ते दोघेही म्हणाले, “ पण बाबा आम्हाला ते मान्य नाही तुम्हाला एकटे ठेवणे.” बाबा म्हणाले, “ अरे बेटा मी आधीच बोललो ना तुम्ही आम्हाला भेटण्यास येऊ शकता कि नाही. अच्छा मला सांगा आता हि बाब लग्नाची आहे म्हणून जर सुमितला कुठल्या बाहेरचा शहरात नौकरीला जावे लागले असते तर त्याला आम्हाला सोडून जावे लागले असते कि नाही. तुम्ही तसेच काही समजा ना, तुम्ही निश्चिंत तुझ्या आईला सांगा आम्ही वेगळे राहायला तयार आहोत तर आम्हाला लग्नाची परवानगी द्या.”
सुमितचा बाबांनी त्यांचा दोघांतील तो प्रश्न मोठ्या समजदारीने सोडवला होता म्हणून आता सुमित आणि मिताली आता लग्न करण्याची तयारी करू लागले होते. सुमितने एक फ्लॅट भाड्याने घेतला होता आणि त्यांचे लग्न काही काळात सामान्यरीत्या पार पडले. ते दोघेही आपल्या नवीन फ्लॅट मध्ये शिफ्ट झाले आणि त्यांचा संसार थाटू लागले होते. त्यांचा राजाराणीचा संसार छान चाललेला होता जवळ जवळ सहा महिने झाले होते आणि एके दिवशी मितालीची आई त्यांचा फ्लॅट वर आली. तिने आल्यावर त्यांचा फ्लॅट बघितला आणि म्हणाली, “ शी बाई कसला हा फ्लॅट आहे माझी मुलगी अशा लहानशा फ्लॅट मध्ये राहते आहे. लग्न करण्यासाठी तर मात्र फार उड्या मारत होता तो सुमित आणि हे असे फ्लॅट घेतले आहे आणि ते हि भाड्याने . मिताली मी तुला आधीच बोलले होते कि मला हे चालणार नाही तरीही तू आणि त्या सुमितने मला फसवले माझ्या शब्दांचा अपमान केला.” मितालीची आई जेव्हा हे सगळ बोलत होती तेव्हा सुमित हि कामावरू येऊन फक्त दारात उभा होता. त्याने ते सगळ ऐकून घेतलं तरीही तो काही बोलला नाही. उलट हसत म्हणाला, “ काय म्हणता आई, का बर तुम्ही चीढता तुमचा म्हणण्यानुसार मी माझ्या आई बाबांपासून वेगळा राहून राहिलो आहे तर आता तुम्हाला कसला त्रास होत आहे.” तेव्हा मिताली मधेच बोलली, “ सुमित शांत हो.” तेव्हा सुमित म्हणाला, “ मी शांतच आहे आई ने जो आरोप माझ्यावर लावला आहे मी त्याचे उत्तर देत आहे.” मिताली पुढे म्हणाली, “ हो तू उत्तर दे आहेस परंतु थोडा आवाज कमी करून बोल ती माझी आई आहे आणि ती आपल्या घरी आली आहे.” सुमित म्हणाला हो मी सुद्धा हे जाणतो कि ती आपल्या घरी आली आहे आणि तिला समजायला पाहिजे कि दुसऱ्यांचा घरी गेल्यावर कसे वागले आणि बोलले पाहिजे. सुमितचा या कथनाने तर आगीत तेल घालण्याचे काम केले होते. तेथील वातावरण आता हळूहळू तापायला लागले होते.
शेष पुढील भागात ............