.... मनातील in Marathi Human Science by Rahul books and stories PDF | .... मनातील

The Author
Featured Books
Categories
Share

.... मनातील

..... प्रथम दर्शनी एखाद्या व्यक्तीचं आपल्या मनावर जे काही म्हणून प्रतिबिंब उमटत
असते,त्या सगळ्यात मोठा वाटा हा त्या व्यक्तींच्या डोळ्यांचा असतो असं म्हटलं तर त्यात काही वावगे ठरू नये.
कारण त्यातील भाव आणि त्यायोगे निर्माण होणाऱ्या भावना ह्या अत्यंत
तरल असतात.कधी त्यात आकर्षण असते ,तर कधी समर्पण .कधी कधी अस वाटत राहतं की , एखाद्याच्या मनात घर करून राहू शकू की, त्यातून पहिल्याच भेटीत हद्दपार होऊन जाऊ हे देखील पहिली नजर च ठरवते. कारण कोणी कितीही म्हणू देत माणसाचं रूप काही नसतं मन चांगला असावं परंतु बऱ्याचदा ह्या गोष्टी केवळ देखावा आणि मन राखण्यासाठी बोलल्या जातात याची प्रचिती आपल्या सगळ्यांना केव्हा ना केव्हा येतेच.पैसा ,पद ,प्रतिष्ठा ह्या सगळ्या आपल्या जमेच्या बाजू असतात.आपल्या अवतीभोवती असलेल्या भौतिक सुविधा समाज जीवनात आपलं एक प्रकारे चित्र उभे करत असतं.आणि
,ह्यापुढे कित्येक जण लोटांगण घेत असतात.प्रसिद्ध उत्क्रांती वादाचा जनक असलेला थोर शास्त्रज्ञ डार्विन ही सांगून गेलाय की ,जो शशक्त असेल तोच जगेल.मग तो माणूस असेल व निसर्गातील कोणताही घटक.माणसाच्या किती छोट्या गरजा असतात..पण त्या पूर्णत्वास. जाता जाता सगळं जिवन चक्र संपुष्टात येते.
मनात होणारी चलबिचल आणि त्याच्या साठी असलेलं कारण काय आहे याचा अजिबात थांगपत्ता लागेना.मन हे इतकं विक्षिप्त असतं की क्षणात इथ आहे तर दुसऱ्याच क्षणी भलतीकडे स्थिरावत असते.आपण मात्र त्याच्यावर विसंबून गेलेलो आहेत.ह्या मनाला लगाम लावणे म्हणजेच सगळ्यात महा कठीण असेलेले काम आहे.
ह्याला सतत न मिळालेल्या च गोष्टी हव्या असतात.जे जवळ असते त्याला आपण स्वीकारत नाही.आणि,जेव्हा त्या आपल्याला मिळणारच नाहीत याची आपल्याला तीव्र जाणीव होते तेव्हा मात्र आपण कसोशीने ते मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करायला पाहतो.त्यात कधीतरी यश लाभत ही असेल पण बहुतांशी वेळा अर्ध्यावर सगळा डाव सोडून समाधान मानावं लागते.
व्यवहारीक जगतात भावनेला कधीच किँमत नसते.मनाने संवेदनशील असलेली लोकं भावनिकतेने विचार करतात.त्यांना व्यवहार कधी कळत नसतोच .आपल्यामुळे कुणी दुःखी असू नये सतत ह्याच भावनेत ते जगत असतात.आणि गृहीत धरले जातात.आर्थिक व्यवहार ,नातेसंबंध ह्यात कायम च दुजा भावाची वागणुकीचा पात्र ठरतात.आपण सतत कोणासाठी उपलब्ध असलो तर आपली किँमत कमी होते का..बाजार पेठेत आणि मानवी नात्यांत dekhi ल हाच न्याय सर्वत्र लागू पडतो.नक्कीच .जिथं आपली प्रत्यक्ष ओळख नसते किंवा जिथं आपली नैसर्गिक मैत्री नसते अशा ठिकाणी आपल्याला एक त्रास दायक पात्र म्हणून बघण्यात येते.जिथं जिथं विश्वासाला पात्र ठरल्या जातो तिथं मात्र भावनिक आणि अंतर्मुख असणाऱ्या लोकांइतकं सरळ साधं कोणी असूच शकत नाही.मनात कुठल्याही कपटा विना ते जीवन गाणं गात असतात.
अधुऱ्या पणाच्य जाणिवेत वावरणारा प्रत्येक जीव हा कुठूनतरी नवी सुरुवात करण्याच्या प्रयत्नात असतो.मानसिक आंदोलनाच्या गर्तेतून निस्टण्याच्या त्याच्या प्रयत्नाला साथ लाभावी इतकाच आपण करू शकतो.शारीरिक दृष्ट्या मजबूत असणारी माणसं देखील cortisol च्य प्रभावात असतात.खरं तर आपण फक्त आणि फक्त डोपामाईन आणि सेरोटोनिन च्या अंमलात आहोत.एखाद्या आवडत असणाऱ्या व्यक्तीचं मेसेज लाईक आणि बोलणं हेच आपलं विश्व होऊन जात आहे.प्रत्यक्ष बोलण्यापेक्षा आभासी वातावरण आपण जग बनवून घेतले आहे.आज एक बोटाचे अंतरावर जग आपल्या कवेत आहेत.पण मनाच्या पातळीवर सगळे रिकामी खोली आहे.ह्या पृथ्वी तलावातील सगळ्यात खोल गर्ता .ही प्रशांत महासागरातील मेरियाना गर्ता आहे.तिची खोली आपल्याला माहीत आहे.पण प्रत्येक मानव कोणत्या गर्तेत अडकलाय हे त्याच्या कितीही जवळील माणूस असो त्याला देखील माहित नसते.अगदी त्याच्या आईलाही नाही.हिमनगाचे टोक जितकं समुद्रात दिसते त्याच्या कितीतरी अधिक खाली ते असते.आणि म्हणूनच ते कितीतरी मोठ्या जगातल्या सगळ्यात सुरक्षित म्हणल्या गेलेल्या जहाजलही गिळंकृत करते.मनाच्या ठिकाणीही आपण असेच असतो.जितकं दिसतो त्याच्या कितीतरी अधिक आतमध्ये वेगळेच असतो.
तसं पाहिलं तर आपल्याला ह्या सगळ्या फाफ ट पसाऱ्यातून केवळ एक माणूस सोडवू शकतो.आणि ते म्हणजे आपण स्वतः त.ते मान्य च करावे लागेल.जितक्या अपेक्षा कमी तितकं अधिक सुखी.विचारांच्या लाटांवर आरुढ होऊन काहीच साध्य होणार नाही.उलट त्यांची तीव्रता वाढत जाते.
आणि त्याला अंत नाही...कारण हा सगळाच प्रवास अंतहीन आहे..कधीही न संपणाऱ्या जाणिवेचा .