भाग – २
आता या लवबर्डसाठी आणखी दुरावा वाढणार होता, कारण कि आधी दिवसभर कॉलेज मध्ये दोघांची भेट नाही व्हायची म्हणून ते घरी आल्यावर जास्तीत जास्ती वेळ एकमेकासोबत घालवायचे परंतु आता ते हि शक्य नव्हते म्हणून दोघेही बेचैन होते. एके दिवशी दोघांनी एका ठिकाणी भेटण्याचा बेत आखला आणि ते भेटण्यास आले. तेथे त्यांनी ठरवले कि आपण कायम एक व्हायचे म्हणजे आपण लग्न करायचे. दिघांचे शिक्षण जवळ जवळ पूर्ण झालेच होते म्हणून त्यांनी हा धाडसी निर्णय घेतला होता. त्यांनी हे सुद्धा ठरवले होते कि आपण पळून जाऊन लग्न नाही करायचे. सत्य परिस्थिती आणि आमची इच्छा हे सगळ दोघांचा घरच्या मंडळींना सांगून हे करायचे. जे करायचे ते ठरवून ते दोघे हि आपल्या घराकडे परत गेले होते. घरी जाऊन त्यांनी दोघांनी जे ठरवले होते त्या प्रमाणे घरचा मंडळींना त्यांचा प्रेमाबद्दल आणि लग्न करण्याचा निर्णया बाबत सांगितले.
सुमितने त्याचा आई बाबांना सांगितले, “ आई बाबा मी आणि मिताली आम्ही बालपणापासून एकमेकांसोबत वाढलो शिकलो आणि आता आम्ही एक होण्याचे म्हणजे लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. तर याबाबत तुमची सहमती आम्हाला हवी आहे.” हि गोष्ट ऐकल्यावर सुमितचा आई बाबांना कसला हि आपेक्ष नव्हता फक्त चिंता होती ती मितालीचा आईची. इकडे मितालीने सुद्धा सेम सगळ तिचा आई बाबांना सांगितले आणि त्यांची परवानगी मागितली. तर मितालीचे बाबा एकच बोलले, “ बेटा तू आता मोठी झाली आहेस. तुझ बर आणि वाईट तू स्वतः समजतेस तर योग्य असा निर्णय घे कारण कि हा तुझा आयुष्याचा प्रश्न आहे. माझी तुला संपूर्ण संमती आहे, परंतु एकदा तुझ्या आईचे मत घेशील तर बर होईल.” मग मितालीने तिचा आईकडून तिचे मत काय ते जाणून घेतले. तर तिची आई बोलली, “ पहिल्यांदा तर मला हे लग्न पसंत नाही आहे. कुठे आपण आणि कुठे ते आहेत. आपल स्टेट्स काय आणि त्यांचे स्टेट्स काय याचा विचार करायला हवा. तू एका साहेबांची मुलगी आहे आणि तो तुझ्या बाबांचा हाता खाली काम करणार्याचा मुलगा आहे. तुला जर वाटत असेल कि मी तुला लग्नाला परवानगी द्यावी तर माझी एक अट आहे. ती तुला आणि त्याला मान्य असेल तर मी माझी परवानगी देईल.” त्यावर मिताली उत्तरली, “ आई कसली अट !” तेव्हा तिची आई म्हणाली, “ सुमितला वेगळा फ्लॅट घेऊन त्याचा आई बाबांपासून वेगळ रहावे लागेल आणि तुमचा संसारात त्यांची कसलीही ढवळाढवळ चालणार नाही. हे जर तुम्हा दोघांना मंजूर असेल तर मला हे लग्न करण्यास आपत्ती नाही आहे.”
दुसर्यादिवशी दोघेही पुन्हा भेटले तेव्हा सुमितने सांगितले, “ मिताली माझ्या आई बाबांनी एकमुखाने आपल्या लग्नाला परवानगी दिली आहे. तुझ्या आई बाबांचे काय म्हणणे आहे.” मितालीला कळत नव्हते काय बोलावे म्हणून तरीही तिला बोलावे लगणार होते. तर ती बोलली, “सुमित माझ्या बाबांनी सुद्धा परवानगी दिली परंतु माझ्या आईने ” म्हणून ती थांबली. सुमित बोलला, “ काय झाले मिताली, काही समस्या आहे काय तुझ्या आईला?” मिताली उत्तरली, “ हो पण मी म्यानेज करून घेईल.” मग सुमित बोलला, “ अग हो पण काय प्रॉब्लेम आहे ते तर सांगशील आणि एक गोष्ट आपण ठरवले होते कि कुणालाही काहीही असत्य सांगायचे नाही. सगळ आपण खर आणि सत्य सांगून करायचे आहे तर तू हि मला खर काय ते सांग मगच मी पुढे पाऊल टाकणार.” आता शेवटी मितालीला सत्य काय ते सुमितला सांगावे लागले, ती बोलली, “ सुमित माझ्या आईचे म्हणणे आहे कि तु एक वेगळा फ्लॅट घेऊन माझ्याबरोबर तुझ्या आई बाबांपासून वेगळ रहायचं तरच ती आपल्या लग्नाला परवानगी देईल. कारण कि तिला समाजातील तिचे स्टेट्स सांभाळायचे आहे आणि तुझ्या घरचा लोकांना ती आपल्या स्टेट्सचा बरोबरचे समजत नाही.”
आता मात्र सुमितला हि विचार आला होता. तेव्हा मिताली म्हणाली, “ सुमित माझे मन मानत नाही या गोष्टीला, कुणी कसं काय आपल्या आई बाबांपासून वेगळे राहणार आणि ते हि अशा बिनडोक बाई मुळे.” मग सुमित मितालीला घेऊन सरळ आपल्या घरी गेला आणि त्याचा आई बाबांसमोर हा मुद्दा ठेवला. त्याला मितालीने संगीतलेला सगळा प्रकार त्यांचा पुढे सांगितला. तेव्हा त्याची आई बोलली, “ बरोबर आहे त्याचं ते श्रीमंत आहेत आणि आपण एक सामान्य मनुष्य आहोत. त्यांना मोठ मोठ्या लोकांत उठावे बसावे लागते. याचा विचार आपणही करायला हवा. आमचा तर निर्णय आम्ही दोघांनी एकमुखाने आधीच सांगितला आहे. आता तुम्हा दोघांना काय करायचे आहे ते ठरवायचे आहे. सुमितला जर वेगळ रहायचं असेल तरी हि आमची काही हरकत नाही आहे. राहून राहून किती लांब रहणार आहे. या शहरातच तर राहणार आहे ना.” मात्र हे सगळ बोलतांना सुमितचा आईचे बोलने आणि त्यांचा चेहरा हे मेळ खात नव्हते. कुठेतरी त्यांचा मनात पोटचा मुलापासून दूर रहाण्याचे दुख त्यांचा डोळ्यात दिसत होते. ते दोघेही त्यांचा लेकरांचा आनंदासाठी हा त्याग करण्यास तयार होते. आता निर्णय मिताली आणि सुमितला घ्याचा होता. शेष पुढील भागात.........