Anamika - 2 in Marathi Love Stories by Sambhaji Sankpal books and stories PDF | अनामिका - भाग 2

Featured Books
Categories
Share

अनामिका - भाग 2

मी ठरवलं होतं की आजच तिच्या वडिलांना समजावून सांगायचं. हा विचार घोळतच मी घराबाहेर निघालो आणि तिच्या घराच्या दिशने वाटचाल करीत चाललो. वाटेत मला माझा मित्र अनिल भेटला, त्याच्यबरोबर गप्पा मारल्या. मग मी माझा आणि अनामिकाचा विषय काढला, त्याला सर्व सांगितलं, आम्ही आता लग्न करायचं ठरवलं पण एक अडचण आहे की तिच्या वडिलांना कसे समजवायच. मला अनिल ने सांगितलं की तुझ काय खरं नाही गड्या, तिच्या वडिलांना समजावून सांगायचं लय कठीण हाय बघ.
अरे अन्या मला आणखी कशाला घाबरवतो, आदीच माझे डोके हँग झाले आहे. चल मी जातो तू जा तुझ्या कामाला.
मी निघालो तिच्या घरी पोहचलो. ति दारात उभे राहिली होतो ती माझीच वाट बघत होती. मी दिसल्यावर तीचा आनंद गगनात मावत नव्हता इतकी खूष झाली होती.
ती : ये आत ये मी तुझीच वाट पाहत होते, माझे बाबा आताच थोडा वेळ झाला बाहेर गेलेत, येतीलच इतक्यात.

तिची आई होती घरी, आई ने बसण्यास सांगितले होते. "चहा ठेवतो बस" , तिची आई म्हणाली.

मी बसलो होतो, काही वेळ कोणीच काही बोलले नाही. मग थोड्या वेळाने अनामिका चहा घेऊन आली आणि मी चहा घेतला. मग मी तिच्या आईला सरळ बोलून टाकलं की मी तुमच्या मुलीशी लग्न करायचं ठरवलं आहे आणि त्यासाठी मी स्वतः बोलायला आलो आणि तिच्या बाबाला पण सांगण्यासाठी आलो आहे.

हे सर्व ऐकून तिची आई अस्वस्थ झाली. म्हणाली, हे समजून घेण्याची आवश्यकता आहे आणि ते मी थोड समजू शकते पण हिच्या बाबाला कोण समजावणार.

मी म्हणालो , "मी समजावून सांगतो ".
आई म्हणाली, बघ तुला काय सांगता येईल ते.

तेवढ्यात तिथे तिचे बाबा आले.

बाबा : अरे तू कधी आलीस

मी: आताच थोडा वेळ झाला

बाबा : काम कसं चाललंय तुझ, आणि शहरात वातावरण कसे आहे.

मी: एकदम ठीक आहे, आणि नोकरी पण ठीक आहे.

बाबा: बोल कसं काय येणं केलंस

मी: आलो होतो, तसे खुप महत्त्वाचं काम होत तुमच्याकडे.

बाबा : काय काम होत (उंच आवाजात विचारले)

तसे थोडे घाबरलो होतो, घाबरत घाबरत मी बोललो

मी: मी तुमच्या मुलीचा अनमिकाचा हात मागायला आलो, मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं आहे.

हे एकताच तिच्या बाबाची तळपायाची आग मस्तकात गेली होती.
जाणारच म्हणा कोणत्या मुलीचा बाप सहन करेल, आणि त्यात मी तिच्या लग्नाची मागणी घातली, एवढं मोठ धाडस केले होते, तेही माझ्या घरच्याना न घेता.

बाबा: पहिला इथून निघून जा, आणि परत ईथे आलास तर तंगड तोडून हातात देईन.

वातावरण खूपच तापलं होतं, मला काही सुचेना मग मी पुन्हा धीर करून बोललो की,

मी जर अनामिकशी लग्न नाही केलं तर अनामिका जीव देईल आणि ती माझ्या शिवाय नाही जगू शकणार आणि मी सुध्दा.

माझ्या या शब्दांवर लगेच अनामिका ने सांगितलं की, हो बाबा हे खरं आहे की मी यांच्याशिवाय नाही जगू शकणार.

हे ऐकताच क्षणी तीचा बाबा बोलला की, तुला मीच ढकलून देतो विहिरीत.

आतातर मला काही सुचेना मग मी तेथून निघलो अनामिका मी परत येईन तू काळजी करू नकोस. पाहू काय मार्ग निघतो का ते.
अनामिका म्हणाली मला तू आताच घेऊन चल.

मी म्हणालो, विश्वास ठेव माझ्यावर मी येईन परत नक्की.

आणि मी तेथून निघलो, ज्याची भिती होती तसेच घडले, तिची आईचा होकार होतं पण बाबाला समजावने खुप कठीण.
मग मी पुढचा प्लॅन तयार केला, माझ्या आई बाबा ना घेऊन जायचं.

मी घरी पोहोचलो आणि सर्व हकीकत माझ्या आई बाबा ना सांगितलं. तसे माझे बाबा बोलले की, तू काळजी करू नकोस , आपण जाऊ एकदा सर्वजण मिळून आणि सांगू समजावून तिच्या बाबांना.

मला थोडे धीर आला, मग मी माझ्या खोलीत गेलो आणि रडू लागलो. मला कसं तरी होत होत, कारण मी हि तिच्याशिवाय जगू शकत नव्हतो.

काही दिवस असेच गेले, मग मी तिला भेटायला बोलावलं कारण खुप दिवांपासुन आम्ही भेटलो नव्हतो.
ती ही मला भेटण्यासाठी आतुर झाली होती.
आम्हीं दोघे गावाच्या बाहेर वडाच्या झाडाखाली भेटायचं ठरवलं होतं, आणि तसा निरोप दिला होता तिला.

......to be continued