Sankhya Re - 1 in Marathi Love Stories by Gajendra Kudmate books and stories PDF | सख्या रे - भाग 1

Featured Books
  • आखेट महल - 19

    उन्नीस   यह सूचना मिलते ही सारे शहर में हर्ष की लहर दौड़...

  • अपराध ही अपराध - भाग 22

    अध्याय 22   “क्या बोल रहे हैं?” “जिसक...

  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

Categories
Share

सख्या रे - भाग 1

भाग – १
ट्रिंगचा ट्रिंगचा आवाजाने दिवसाची सुरुवात झाली. घडयाळीचा त्या कर्कश आवाजमुळे सुमितची झोप उडाली आणि तो उठला. सुमित म्हणाला, “ काय रे तुझी रोजचीच कट कट रोज चंगली झोप लागलेली असते तेव्हाच तू अशी ओरडून उठवतेस.” असे म्हणत सुमित बाथरूम मध्ये जातो आणि छान ब्रश आणि आंघोळ करून बाहेर येतो. बाहेर आल्यानंतर लगबगीने तो ऑफिस मध्ये जाण्यासाठी तयार होतो. पोटाला आता सकाळचा नाश्ता हवा असतो त्यासाठी तो फ्रीज मध्ये काहीतरी शोधतो. त्याला काही सापडत नाही तर तर अनायास त्याचा तोंडून निघते, “ मिताली, अग काही बनवून देना फार भूख लागली आहे.” मग थोड्या वेळात तो स्वतःवर एकदम हसतो आणि म्हणतो, “ बेटा सुमित मिताली इथे कुठे असणार ती तर ....” म्हणता म्हणता त्याचे डोळे पाणावले. मग त्याने स्वतःच स्वतःला सावरले आणि पुन्हा म्हणाला, “ चला सुमित राव आपली पुढची मंजिल आहे, कॅन्टीन.” असे म्हणून तो लगबगीने घराचा बाहेर पडला.
सुमित थेट जाऊन बस स्टॉपवर जाऊन उभा राहिला काही वेळाने त्याचा बरोबर काम करणारे कर्मचारी मित्र सुद्धा त्या बस स्टॉपवर आलेत. थोड्या वेळाने बस आली आणि ते सगळे बस मध्ये चढले. बस मध्ये चढता चढताच सगळ्यांचे उरलेल्या सगळ्यांशी हाय हेलो सुरु झाले. कारण कि ती बस त्यांचाच कंपनीची होती ती बस त्याच कंपनीचा कर्मचार्यांसाठी होती म्हणून. बाकीचांसारखा सुमित हि सगळ्याशी हाय हेलो करत एका चेहरयावर जाऊन अडकला आणि गप्प झाला. तो चेहरा आणि ती व्यक्ती सुद्धा तशीच एकदम गप्प झाली. दोघांनी एकमेकाकडे बघितले आणि शांत झाले आणि मग लगेच दुसऱ्या मित्रांसोबत गप्पा गोष्टी करत ऑफिस कडे जाऊ लागले. सुमित मागचा सीटवर बसला होता म्हणून तो सारखा अधून मधून त्या समोरचा सीटवर बघत होता या आशेने कि कुणीतरी मागे वळून बघेल. परंतु या प्रतीक्षेत ती बस ऑफिसमध्ये जाऊन थांबली. एक एक करून सगळे खाली उतरू लागले होते, तरीही सुमितची नजर त्या व्यक्तीला शोधत होती. ती व्यक्ती त्याला उतरतांना दिसली आता पुन्हा सुमितला एक आस वाटू लागली कि त्याचाकडे ती व्यक्ती वळून बघेल परंतु सगळ व्यर्थ ती काहीच न बघता उतरून गेली. आता सुमित म्हणाला, “ चलो सुमित सेठ चले अपने ऑफिस.” म्हणत तो हि खाली उतरला आणि आपल्या ऑफिसकडे जाऊ लागला.
सुमित ऑफिसमध्ये जाण्याचा आधी कॅन्टीन मध्ये गेला आणि त्याने नाश्ता केला त्यानंतर तो ऑफिसमध्ये गेला. तेथे जाऊन आपल्या सीटवर बसून तो आपले रोजचे कार्य करू लागला. तो त्याचा छोट्याशा कॅबीन मध्ये संगणकावर काम करत असतांना त्याचा नाकावर एक ओळखीचा सुगंध आला तो होता त्याचा आवडीचा आणि त्याचा फेवरेट परफ्युम. त्याने त्याचा सीटवरून उभे होऊन पहिले तर ती व्यक्ती त्याचा कॅबिनचा शेजारी उभी होती कुणाशी तरी वार्तालाप करत. त्याला त्या क्षणी आठवले हा परफ्युम तर मी मितालीला तिचा बर्थ डे चा गिफ्ट म्हणून दिला होता. तर आता हि मिताली मला प्रेम करते असे मला वाटते. तो मितालीकडे बघत उभा असतांना मिताली परत जाण्यासाठी मागे वळली आणि तिची नजर सुमित वर पडली. तिने हि सुमितकडे मनभरून बघितले आणि ती मान खाली टाकून तेथून चालली गेली.
सुमितला आता जुन्या आठवणी स्मरण होत होत्या ज्या त्याने फारच त्रास सहन करून विसरण्याचा प्रयत्न केला होता. मिताली आणि सुमित हे बालपणापासूनचे मित्र होते. त्या दोघांचे परिवार आधी एकाच बिल्डींग मध्ये राहत होते. ते दोघेही सोबतच लहानाचे मोठे झाले. त्याचबरोबर त्यांचे बारावी पर्यंत शिक्षण हि सोबतच झाले होते. त्या दोघांना कळलेच नव्हते कि त्यांचा अल्ह्ळ मनात कधी प्रेमाचे बीज रोपित झाले होते तर. हे कळले त्यांना बारावी नंतर उच्च शिक्षणासाठी ते दोघे हि वेगळ्या ठिकाणी वेगळ्या कॉलेजला गेले तेव्हा. बालपणापासून सतत एकदुसऱ्याचा सोबत असल्याने त्यांना दुरावा हा कधीच जाणवला नाही, परंतु आता तो त्यांना फारच तीव्रतेने जाणवू लागला होता. त्याच रूपाने त्यांचे ते अल्हळ प्रेम हि कोलान्ड्या मारु लागले होते. आता ते सतत एक दुसऱ्याला भेटण्याचे कारण शोधू लागले होते. पुढे त्यांचे ते प्रेम अधिकच प्रबळ आणि प्रचंड होऊन गेले. तेवढ्यात त्यांचा नशिबाने एक वेगळी कलाटणी घेतली होती. मितालीचा वडिलांची बडतर्फी झाली होती. ते आता साहेब झाले होते म्हणून त्यांना त्या कंपनीने एक वेगळा फ्लॅट दिला होता आणि ते आता तेथे शिफ्ट झाले होते.
शेष पुढील भागात.........