Anamika - 1 in Marathi Love Stories by Sambhaji Sankpal books and stories PDF | अनामिका - भाग 1

Featured Books
Categories
Share

अनामिका - भाग 1

मी एके दिवशी सहज रस्त्याने चालत निघालो होतो तेव्हा समोरून एक अत्यंत सुंदर अशी तरुणी येत होती.

तिला पाहून माझे काळीज धडधडायला लागलं कारण ती माझी शाळेतील प्रेम होत, तिच्याशी बोलायचा प्रयत्न करूया असे मनात विचार घोळत असतानाच तिनेच मला आवाज दिला, मी चक्रावून गेलो आणि थोड वेळ मला काही सुचेना , मग मी ही मग प्रतिसाद दिला , तिने मला विचारलं कसा आहेस, मी ठीक आहे.

ती : खूप दिवस झाले भेटला नाहीस , कुठे होतास .

मी : मी कामानिमित्त शहरात गेलो होतो, म्हणून नाही भेटलो,

ती: विसरलास की काय मला. लग्न वगैरे काही केलं की काय.

मी : नाही अजून, आणि तूझ काय 

ती : नाही केलं तुझीच वाट पाहत होते, चल माझ्या घरी जाऊया आपण,आज कोणी नाही आहे.

 

मग आम्ही तीच्या घरी गेलो.

तसे घरी कोणीही नव्हत. तिने चहा ठेवला आणि मी कॉट वर बसलो होतो. ती चहा घेऊन आली आणि माझ्याजवळ येऊन बसली. मी चहा पित होतो तसे ती माझ्या खूपच जवळ येऊन बसली.  मला खूपच कसं तरी होत होत. ती मला म्हणाली तुला आठवत का आपलं पहिली भेट आणि पाहिली मिठी.

हो, आठवतंय

तस तिने मला मिठीत घेतले आणि माझं  चुंबन घेतले, ते इतके घट्ट होत की माझा श्वास फुलला. मग आमचा पुढचा प्रवास सुरू झाला......

मग आम्ही बेडरूम मध्ये पोहचलो आणि आम्ही खूप मोठा आनंद घेतला, खूप दिवांपासून आम्ही दोघेही समाधानी झालो होतो, अगदी जग जिंकल्यासारख वाटत होत. 

काहीवेळाने आम्ही दोघेही फ्रेश होवून गप्पा मारत बसलो, मग मी पुन्हा लग्नाचा प्रस्ताव दिला तसा तिने होकार ही दिला पण एक अडचण होती ती म्हणजे घरच्याची परवानगी. मी तिला म्हणालो आपण योग्य वेळ आली की बोलू आपल्या लग्नाबद्दल घरच्यांशी.

मी निघतो, 

ती: परत कधी येणार

मी : लवकरच येईन.

मी घरी आलो आणि शहरात कामासाठी निघलो. 

मध्यंतर खूप काळ लोटला. एक दिवस अचानक तीचा फोन आला, 

ती: कधी येणार आहे, इकडे घरच्यांनी माझ लग्न करायचं ठवलंय, आणि त्यासाठी मुलं पाहणे ही चालू केलं, तू लवकर ये. 

मी: हो येतो लगेच.

तसा मी लगेच गावाकडे निघालो कारण माझं ही खूप प्रेम होतं तिच्यावर आणी तीही माझ्यावर जीव ओवाळून टाकला होता, आणि मी तिच्यासाठी काही पण करायला तयार होतो तशीच ती ही. 

मी गावाकडे पोहचलो आणि घरी न जाता पहिला तिला भेटायला गेलो, तिला मी गावाकडच्या वडाच्या झाडाखाली बोलावले होते. 

मला पाहताच तिने लगेच मला घट्ट मिठी मारली, आणि रडू लागली तसे माझ्याही डोळ्यात नकळत पाणी आले. 

मी तिला धीर देत समजावलं की आजच मी माझ्या घरी आपल्या लग्नाबद्दल बोलतो आणि तुझ्या घरी येऊनही. 

तसे तिला जरा थोड हलकं फुलकं वाटलं आणि मी तिच्या ओठांच चुंबन घेतले,  तशी ती मला बिलगली आणि घट्ट मिठी मारली,

ती: मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही 

मी: मी पण आय लव यू .

ती: आय लव यू टू

मग आम्ही दोघेही आपापल्या घरी गेलो.

मी माझ्या घरी बापाला सांगितलं की मला अनामिका शी लग्न करायचं आहे आणि मी तिच्या शिवाय दुसऱ्या कोणाशी लग्न करणार नाही. 

तस माझा बाप साधा विचार करत असे त्यामुळे तो तयार झाला होता. 

पण खरं तर माझी परीक्षा आता सुरू होणार होती, कारण मला आता तिच्या घरच्याना खास करून तिच्या बापाला समजावयाचे होत आणि ते थोड कठीण होते. 

To be continued....

 

 

To be continued......