Devayani Development and Key - Part 36 in Marathi Fiction Stories by Dilip Bhide books and stories PDF | देवयानी विकास आणि किल्ली - भाग ३६

Featured Books
Categories
Share

देवयानी विकास आणि किल्ली - भाग ३६

       देवयानी विकास आणि किल्ली.

पात्र परिचय

 

विकास                          नायक

देवयानी                         नायिका  

सुप्रिया                         देवयानीची मैत्रीण

लक्ष्मी                          सुप्रियाची रूम पार्टनर.

राजू                           सुप्रियाचा मित्र

शीतोळे                         पोलिस इंस्पेक्टर

भय्या                          विकासचा मोठा भाऊ.

अश्विनी                         विकासची वाहिनी, भैय्याची बायको

भगवानराव                       विकासचे बाबा

यमुना बाई                      विकासची  आई

गोविंद राव                      देवयानीचे बाबा

कावेरी बाई                      देवयानीची आई.

मावशी आणि काका               देवयानीची मावशी आणि तिचे मिस्टर

मनीषा                         विकासची बहिण

अंकुश                          मनीषाचा नवरा.

सुरेश                           देवयानीचा भाऊ.

विश्राम                         देवयानीचा चुलत भाऊ.

विनोद                          विकास चा चुलत भाऊ

प्रिया                           विकासची चुलत बहीण.

सेजल                          देवयानीची अमेरिकेतली रूम मेट.

पूर्णिमा                          देवयानीची अमेरिकेतली रूम मेट.

राजेश                          विकासचा मित्र.

 

 

 

 

  भाग   ३६      

भाग  ३५  वरून  पुढे  वाचा ......

“देवयानी, मी तुला सर्टिफिकेट ची कॉपी आणि एंगेजमेंट चे अंगठी घालतांनाचे दोन फोटो whatsapp केले  आहे. आत्ताच बघून घे.”

“भाऊजी, फोटो कशाला ?” – देवयानी.

“असू दे. सरकारी काम आहे, जर तो म्हणाला की तुमचं लग्न ठरलं आहे याला पुरावा काय ? तर तेंव्हा हे फोटो तू दाखवू शकतेस.” – भैय्या म्हणाला. 

“होss, माझ्या लक्षातच आलं नाही.” – देवयानी म्हणाली आणि तिने जीभ चावली.

वातावरण इतकं नॉर्मल झालं होतं की बराच वेळ अवांतर गप्पा झाल्यावर देवयानीनी फोन ठेवला.

 

सोमवारी इंटरव्ह्यु झाला. सर्टिफिकेट चा उपयोग झाला. तिला बूकिंग ला clearance मिळाला. जुलै महिन्यांची ५ तारखेचं बूकिंग पण मिळालं. आता देवयानीच्या आनंदाला काही सीमा राहिली नाही. आता विचार चालू झाले की कोणा  साठी काय खरेदी करायची, काय न्यायचं वगैरे. आल्यावर सेजल ला सांगितलं की बूकिंग मिळालं म्हणून.

तू त्या दिवशी म्हणालीस आणि बघ मिशन सक्सेसफुल.

“अभिनंदन देवयानी.” – सेजल.

“थॅंक यू सेजल.” – देवयानी. 

रात्री देवयानीनी नागपूर ला विडियो कॉल  केला.

“काय देवयानी काय न्यूज?” अश्विनीनी विचारलं.

“पांच जुलै चं बूकिंग झालं आहे.” – देवयानी. 

“अरे वा. अभिनंदन” सगळ्यांनीच मग तिचं अभिनंदन केलं.

“देवयानी, क्वारंटाईन मध्ये राहावं लागणार आहे का ग आल्यावर?” – अश्विनी. 

“हो, माझा होम क्वारंटाईन साठी प्रयत्न चालू आहे. त्यासाठी एक सवलत मिळण्यासाठी चा फॉर्म  भरावा लागतो. तो मी भरणार आहे. जर झालं, तर घरीच १४ दिवस, नाही झालं तर एखाद्या हॉटेल मध्ये सोय करावी लागेल आणि ते ही मुंबईलाच.”– देवयानी. 

“अरे बापरे, देवयानी, मग हॉटेल बूक केलं का?” – अश्विनी.

“नाही. मुंबईला आल्यावर तिथे पण एक टेस्ट होईल आणि मग तेच लोक ठरवतील. आपल्याला ते हॉटेलची यादी आणि त्यांचे रेट देतात, आपण त्यातून सिलेक्ट करायचं. अशी प्रोसीजर आहे.” – देवयानी. 

“अरे देवा, कठीणच आहे सर्व. म्हणजे भारतात आल्यावर सुद्धा बेळगाव ला जायला १४-१५ दिवस लागतील.” – अश्विनी. 

“हो वहिनी, असं होऊ शकतं.” – देवयानी. 

भैय्या मध्येच बोलला

“देवयानी, माझ्या मनात आत्ताच एक विचार आला, सांगू का?”

“काय भाऊजी, सांगा न.” – देवयानी. 

“ए, देवयानी, तू मला भाऊजी वगैरे म्हणू नकोस. सरळ  भैय्या च म्हण. ते भाऊजी वगैरे म्हंटलं की मला फेटा, पगडी बांधल्या सारखं वाटतं. भैय्याच ठीक आहे. विकास मला भय्या म्हणतो, तू ही तेच म्हण.” – भैय्या 

“बरं. तुम्ही म्हणता तसं. पण हेच सांगायचं होतं का?” आणि देवयानी प्रसन्न हसली.

लगेच अश्विनी म्हणाली, “देवयानी, तू अशीच मोकळे पणाने  हसत रहा. घर उजळून निघाल्या  सारखं वाटतं. काय आई, बरोबर आहे ना?”

“हो तर, अगदी खरं आहे. अग गेले काही दिवस तुझा मलूल चेहरा बघून आम्हाला सुद्धा उदास व्हायला झालं होतं.” – यामुनाबाई म्हणाल्या. 

देवयानीनी एक स्माइल दिलं, आणि म्हणाली की “भैय्या भाऊजी काय सांगत होते, ते सांगा ना.”

“अरे काय देवयानी, पुन्हा भाऊजी?” – भैय्या

“असू द्या हो, माझी जीभ नाही रेटत तुम्हाला नुसतं भैय्या म्हणायला. हिन्दी सिरियल मध्ये होतं असं, मला नाही जमणार. ते जाऊ द्या, तुम्ही काय सांगणार होता?” – देवयानी.

“ओके. हे बघ, तू जर बेळगाव ला गेलीस तर नागपूरला येता नाही येणार.”– भैय्या म्हणाला.  

“का असं?” – देवयानी.

“एक तर सर्व बंद आहे, म्हणजे, गाड्या बंद, बसेस बंद, फ्लाईट बंद. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जायला बंदी. इतकंच काय, जिल्हा बंदी सुद्धा आहे. अश्या परिस्थिती मध्ये तू बेळगाव हून नागपूर ला कशी येणार?” – भैय्या.

“अरे देवा, मग आता मी काय करू?” – देवयानी.

“डेस्टीनेशन  नागपूर दाखव.” भैय्या म्हणाला. “म्हणजे तिथून मुंबई आणि मुंबई हून नागपूर. असं तुला येता येईल. पण ऑफकोर्स नागपूर वरुन तुला हलता येणार नाही. नाही म्हंटलं तरी, तू ट्रान्सपोर्ट ओपन होई पर्यन्त नागपूरलाच अडकून पडशील. बघ. सोच लो”

“पण मी विकासची शुश्रूषा करायलाच भारतात येणार आहे, ते मी बेळगाव ला राहून कशी करणार? आणि आता नागपूरच तर माझं गाव आहे, नाही का? मी नागपूरलाच  येते.” – देवयानी.

भगवानराव मध्येच बोलले.

“आम्हाला असं वाटतं देवयानी, की तू आधी तुझ्या आई, बाबांना, विचारावस. साखरपूडा झाला असला, तरी अजून लग्न व्हायचं आहे आणि मुलगी लग्ना आधीच सासरी राहायला जाते म्हंटल्यावर त्यांची वेगळी मतं असू शकतात.”

“हो. बाबा विचारते.” – देवयानी. 

“ठीक तर मग तू विचार, डिसकस कर त्यांच्याशी. आपण उद्या तू फोन करशील तेंव्हा या विषयावर बोलू.” – भगवानराव.

“बाबा, आपण एवढं सगळं बोललो, पण विकास ची तब्येत कशी आहे हे सांगीतलंच नाही.” – देवयानी. 

“अग भैय्याने कसं तरी करून जुगाड लावून, चारही इंजेक्शन ची सोय केली. हॉस्पिटल मध्ये जमा पण करून आला आहे आज. आता आज पासून रोज एक इंजेक्शन दिल्या जाईल. त्यामुळे उद्या कळेल आपल्याला किती सुधार आहे तो. कारण आजच्या रात्रीचं धरून दोन डोस दिल्या जातील. ओके ?” - भगवानराव.

“ओके, ठेवते मी आता.” – देवयानी. 

 

दुसऱ्या दिवशी, नेहमी प्रमाणे सगळं आटोपून सेजल आणि देवयानी आपापल्या रूम मध्ये लॅपटॉप घेऊन बसल्या. थोड्या वेळाने सेजल कशाला तरी बाहेर आली होती, तेवढ्यात डोअर बेल वाजली. सेजल बाहेरच होती म्हणून तिने दार  उघडलं. दोघींचं बोलणं चालू होतं. वेगळाच आवाज आला म्हणून कोण आलं आहे हे पाहण्यासाठी देवयानी पण बाहेर आली. पूर्णिमा आली होती. चेहरा उतरला होता. आवाज कांपरा झाला होता. आणि एकदम दोघींच्या गळ्यात पडून रडायलाच लागली. सेजल आणि देवयानी दोघीही पहातच राहिल्या. काय झालं आहे हे कळायला काहीच मार्ग नव्हता.

पांच मिनिटांनी तिचे हुंदके  थांबले. मग सेजलने तिला खुर्चीवर बसवलं आणि देवयानी पाणी घेऊन आली. पाणी प्यायल्यावर पूर्णिमा थोडी शांत झाली. थोड्या वेळ तशीच चुपचाप बसून राहिली. देवयानी आणि सेजल तिच्या बोलण्याची वाट बघत होत्या. सेजल म्हणाली की तिला आधी शांत होऊ दे मग आपण बोलू. आणि देवयानीनी मान हलवली. पण तेवढ्यात दोघींचेही कॉल आले मग सेजल म्हणाली

“पूर्णिमा, तू फ्रेश हो. नाश्ता तयार आहे, तो खाऊन घे. तो पर्यन्त आमचे कॉल घेतो मग आपण बोलू.” आणि दोघीही  आपापल्या रूम मध्ये गेल्या. पूर्णिमा पण त्यांच्याच ऑफिस मधली होती त्यामुळे तिला काही वाटलं नाही. ती फ्रेश व्हायला गेली.

दोनेक तासाने  सेजल बाहेर आली तेंव्हा पूर्णिमा गाढ  झोपली होती. सेजल नी  काही तिला उठवलं नाही. पण नंतर दोघींनाही काम संपवून मोकळं व्हायला संध्याकाळचे सात वाजले. बाहेर पूर्णिमा एकटीच बसली होती. झोप झाल्या मुळे  चेहरा तसा बरा दिसत होता. सेजल ने चहा केला आणि मग तिघी बसल्या.

हं पूर्णिमा सांग आता, काय झालय ते.

पूर्णिमाचा चेहरा पुन्हा कसानुसा झाला. रडवेल्या आवजातच म्हणाली की

“तुम्हाला मी सनातनी म्हणून चिडवत होते पण काल कळलं की तुम्हीच बरोबर वागत होत्या म्हणून. तुमचं न ऐकल्यामुळे माझी फार वाताहत झाली.” आणि तिला भावना आवरता आल्या नाहीत. ती रडायलाच लागली.

“सेजल, पूर्णिमा इतकी रडते आहे, यांचा अर्थ जे काही घडलं असेल ते पूर्णिमा च्या पण सहन करण्याच्या बाहेर असलं पाहिजे, म्हणजेच काहीतरी भयंकर घडलेलं दिसतंय.” देवयानीची प्रतिक्रिया.

“हो ग,” पूर्णिमा म्हणाली, “काय सांगू तुम्हाला, सांगताना सुद्धा लाज वाटते आहे.”

“हे बघ, तसं असेल तर नको सांगू. पण विसरून जा सगळं. आणि लुक अहेड आपल्यालाच मनस्ताप करून घेण्यात काहीच अर्थ नाहीये.” सेजल म्हणाली. 

“नाही ग, काल जे काही घडलं ते सगळंच इतकं भयंकर होतं की काय सांगू.” पूर्णिमाच्या डोळ्यासमोर कालचा प्रसंग तरळला.

 

“पूर्णिमा,” राजू म्हणत होता, “आज आपल्या कडे एक छोटीशी पार्टी आहे. माझा एक मित्र आणि त्याची पार्टनर येणार आहेत.”

“कशा बद्दल पार्टी आहे? बर्थडे?” – पूर्णिमा.

“पार्टी करायला काय लागतं? असच करावीशी वाटली म्हणून.” – राजू. 

“ओके. नो प्रॉब्लेम. पण जर ही पार्टी तू सॅटर्डे ला ठेवली असतीस तर बरं झालं असतं. दुसऱ्या दिवशी काम करतांना झोप येते.” – पूर्णिमा म्हणाली. 

“चलता हैं यार. एखाद दिन के लिए चलता हैं.” – राजू.  

“ओके.” – पूर्णिमाची संमती.

क्रमश: ........

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

धन्यवाद.