Chalitla khavis in Marathi Spiritual Stories by Pournima kamble books and stories PDF | चाळीतला खवीस..एक सत्य घटना

Featured Books
Categories
Share

चाळीतला खवीस..एक सत्य घटना

पुण्यामधील एक ठिकाण म्हणजे कल्याणीनगर मधील एक चाळ म्हणजे कोठ्यावली चाळ....ती जागा अजूनही अस्तित्वात आहे पण तिथे कुठलीही बिल्डिंग बांधून देत नाही....

कोठ्यावली चाळ मध्ये माझे आजी आजोबा राहायचे आणी आजूबाजूला ही अनेक लोक राहायला होते. आणि तिथे काही आपले आर्मी मधील काही जवान ही राहायचे.चाळ म्हटले की सर्व अगदी एकमेकांच्या सुखा दुःखात सहभागी होणारे प्रेमळ लोक सगळे प्रत्येक वर्षी सन आले की एकत्र साजरी करायचे लग्न समारंभात एकमेकांची मदत करायचे.

एक दिवस सगळे लोक बसले होते गप्पा मारीत जे पूर्वीपासून तिथे राहण्यास होते ते काही पूर्वीच्या घडलेल्या गोष्टी सांगू लागले त्याच वेळेस आजी आजोबा माझी आई मावशी,मामा सर्व चाळीतील माणसे एकत्र बसून ऐकत होते.तिथे एक खूप वयस्कर म्हणजे 80 वर्षाचे आजोबा होते ते सांगू लागले....

त्यामध्ये माझे आजोबा म्हटले की भूत प्रेत काही नसते मी पैज लावतो की इथे काही नाही.असे बोलताच आजीने त्यांना म्हटले हे काय करताय तुम्ही हे सांगतात ते खरे असेल माझ्या आजीचा यावर फार विश्वास होता पण माझे आजोबा फार हट्टी होते ते काही ऐकेना मग सगळ्यांनी पैज मान्य केली आणी ती रात्र होती सोमवती अमावस्या....

अमावस्या म्हटले की सगळ्यांची घाबरगुंडी होत असे पण वार शनिवार आणी सोमवाती अमावस्या रात्रीचे 12 वाजले होते सगळीकडे शांतता पसरली होती बाकी लोक लवकर झोपी गेले होते.पण माझ्या आजोबांना सवय होती ती मिसरी लावायची त्यांनी मिसरी लावली आणी चाळीच्या मधोमध अंथरून टाकून झोपी गेले तेव्हा साधारण 1.00 वाजले असतील आजोबा झोपले आणी काही वेळातच कोणी आपल्या बाजूने येत आहे याचा भास त्यांना होऊ लागला कोल्हापुरी चप्पल सारखे कर्र ्र ..... कर्र ्र ......आवाज आजोबांची झोप उडाली आणी डोळे उघडताच पाहतात तो काय.......भला मोठा माणूस पहिलवान सारखा दिसणारा उघडबंब असणार खांबा एवढा उंच चेहरा विद्रुप होता तो येऊन सरळ आजोबांच्या छातीवर येऊन बसला आजोबांना काही सुचेना त्यांचा आवाज ही फुटेना कारण तो माणूस नव्हता तो होता तो खावीस.............धिप्पाड असे त्याचे अंग,लालसर डोळे त्याला पाहताच आजोबांना काही सुचेना त्यांचे हात पाय थर थर कापू लागले त्यांची बोबडी वळेना जसे काही त्याने त्यांचा गळा दाबून धरला आहे.आता त्यांना वाटले की मी काही जगत नाही असे मनातल्या मनात ते बोलू लागले.पण खाविशाच तावडीतून सुटायलाच पाहिजे नाहीतर आजचा दिवस आपला शेवटचा असेल पण आजोबानी हार पत्कारली नाही......

आजोबांची पाचावर धारण झाली काय करू काही कळेना मग त्यांनी एकजीव करून जोरात आवाज दिला...वाचवा....वाचवा......वाचवा........मी मेलो......मी मेलो.......असे बोलत राहिले आणि  ते बेशुद्ध झाले आवाज ऐकताच चाळीतले लोक बाहेर आले त्यांनी आजोबांना उठवले व घरात घेऊन गेले पण सर्व खूप घाबरलेले होते आजोबा काही उठेनात रात्रीचे 3.30  वाजले होते....त्यांच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडले आणी त्यांना जाग आली.सगळेजण त्यांना विचारू लागले पण आजी मात्र पूर्ण घाबरली होती तिला कळलं होत की ह्यांना तो खावीस दिसला असणार आजीने सांगितले आता खूप रात्र झाली आहे आपण सकाळी बोलूयात असे बोलून सर्व चाळीतील माणसे आपआपल्या घरात गेले...

सकाळी उठून त्यांनी त्याच्या सोबत घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला पण त्यांना दुसऱ्या दिवशी खूप ताप आला होता त्यांची अवस्था गंभीर होती आणि म्हटले परत अशी कोणत्याही गोष्टीची चेष्टा करणार नाही...माझ्या छातीवर तो खावीस येऊन बसला होता मला काही सुचेना असे बोलले आणी सगळ्यांची माफी मागितली पुन्हा ही घोडचूक करणार नाही...

तेव्हापासून आजोबानी कधीही कुठली पैज लावली नाही.ते कधीही रात्रीच्या वेळी रात्री अपरात्री बाहेर झोपले नाही.....